उत्तर पत्रिका : भीमस्मरण महापरीक्षा 2024

2024 च्या मे-जूनमध्ये प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 च्या पाच परीक्षा संपन्न झाल्या. ‘मुख्य परीक्षा’ (19 मे) आणि तिच्या दोन सराव परीक्षा (12 व 13 मे), तसेच ‘अंतिम परीक्षा’ (9 जून) आणि तिची एक सराव परीक्षा (7 जून) अशा या पाच परीक्षा होत्या. या सर्व परीक्षांच्या उत्तर पत्रिका सदर लेखात देण्यात आलेल्या आहेत.

भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024
भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024

आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त, प्रबुद्ध टीव्ही द्वारे भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली आहे.

या लेखामध्ये भीमस्मरण परीक्षेच्या विविध प्रश्नपत्रिकांची उत्तरासह माहिती देण्यात आली आहे. मुख्य परीक्षा (19 मे) आणि तिच्या दोन सराव परीक्षा (12 व 13 मे), तसेच अंतिम परीक्षा (9 जून) आणि तिची एक सराव परीक्षा (7 जून) अशा या पाच परीक्षा होत्या.


अंतिम परीक्षा (15 प्रश्न)

9 जून 2024 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 ची अंतिम परीक्षा संपन्न झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण 15 प्रश्न (30 गुणांसाठी) विचारण्यात आले होते. या परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे. 

मुख्य परीक्षा देणाऱ्या 1025 स्पर्धकांपैकी टॉप 11 स्पर्धक हे अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरले होते. 10 स्पर्धकांनी पेपर यशस्वीपणे सोडवला.

 

प्रश्न 1) पँथिऑनच्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकानुसार, महाराष्ट्रातील ‘पहिल्या पाच’ सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?

1. लोकमान्य टिळक
2. महात्मा फुले
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. छ. शिवाजी महाराज
5. स्वातंत्र्यवीर सावरकर
6. छ. संभाजी महाराज

A. (2), (3) आणि (6)
B. (2), (5) आणि (6) ✅
C. (1), (3) आणि (4)
D. (1), (2) आणि (5)

 

संदर्भ : धम्म भारत – महाराष्ट्रातील टॉप 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्ती


प्रश्न 2) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता कोण होता?

A. सचिन खेडेकर
B. सागर देशमुख ✅
C. प्रसाद जावडे
D. सुरेंद्र पाल

 

संदर्भ : धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टीव्ही मालिका


प्रश्न 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स’ ही राजकीय संस्था केव्हा सुरू केली?

A. 1944
B. 1945
C. 1955
D. 1956 ✅

 

संदर्भ : धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी स्थापन केलेल्या संस्था


प्रश्न 4) “आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवू ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.”

वरील विधान कोणत्या नोबेल पारितोषिक विजेत्याचे आहे?

A. नेल्सन मंडेला, द. आफ्रिका ✅
B. मार्टिन ल्युथर किंग ज्यु., अमेरिका
C. कैलास सत्यार्थी, भारत
D. बराक ओबामा, अमेरिका

 

संदर्भ : धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विचार


प्रश्न 5) पेरियार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या पुस्तकाचे तामिळमध्ये भाषांतर केले?

A. रिडल्स इन हिंदुइज्म
B. दि अनटचेबल्स
C. व्हू वर दी शुद्राज
D. एनिहिलेशन ऑफ कास्ट्स ✅

 

संदर्भ : धम्म भारत – पेरियार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषण


प्रश्न 6) 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील महार लोकसंख्या 80.06 लाख होती, त्यांपैकी किती धार्मिकदृष्ट्या ‘हिंदू’ म्हणून नोंदणीकृत झाले होते?

A. 30.54 लाख ✅
B. 49.44 लाख
C. 52.04 लाख
D. 66.22 लाख

 

संदर्भ : धम्म भारत, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या


प्रश्न 7) “भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्थान आहे.”

हे मत खालीलपैकी कोणी व्यक्त केलेले आहे.

A. डॉ. गेल ऑमवेट ✅
B. डॉ. एलिनॉर झेलियट
C. ख्रिस्तोफ जाफ्रेलॉट
D. ख्रिस्तोफर क्वीन

 

संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा


प्रश्न 8) रमाई अर्थात रमाबाई आंबेडकर यांचे निधन …… मध्ये झाले.

A. 1933
B. 1935 ✅
C. 1937
D. 1938

 

संदर्भ : मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, वैयक्तिक जीवन


प्रश्न 9) 1934 मध्ये या दोन नेत्यांमध्ये पुणे करार झाला होता.

A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महात्मा गांधी
B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – पं. जवाहरलाल नेहरू
C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. राजेंद्र प्रसाद
D) वरीलपैकी कोणतेही नाही ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 17 : पुणे करार

स्पष्टीकरण : पुणे करार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यांत झाला होता. हा करार 1932 मध्ये झालेला आहे, परंतु प्रश्नामध्ये ‘1934’ चा उल्लेख आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर प्रर्याय क्र. D ‘वरीलपैकी कोणतेही नाही’ आहे.


प्रश्न 10) योग्य गट ओळखा.

A) [1] संविधान सभेची पहिली बैठक – 9 डिसेंबर 1947, [2] 11 अधिवेशने – 165 दिवस, [3] मसुदा समितीची निवड – 29 ऑगस्ट 1947

B) [1] संविधान सभेची पहिली बैठक – 9 डिसेंबर 1946, [2] 11 अधिवेशने – 165 दिवस, [3] मसुदा समितीची निवड – 29 ऑगस्ट 1947 ✅ 

C) [1] संविधान सभेची पहिली बैठक – 9 डिसेंबर 1946, [2] 11 अधिवेशने – 165 दिवस, [3] मसुदा समितीची निवड – 29 ऑगस्ट 1946

D) [1] संविधान सभेची पहिली बैठक – 9 डिसेंबर 1946, [2] 11 अधिवेशने – 141 दिवस, [3] मसुदा समितीची निवड – 29 ऑगस्ट 1947

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्रश्न 11) चुकीचा पर्याय ओळखा.

A) शिखांचे प्रमुख सेनापती गुरु गोविंद सिंग यांनी राजपूत राजांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ✅

B) मूळ राज्यघटनेत 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती.

C) 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले.

D) 14 ऑगस्ट 1931 रोजी मणिभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली.

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्रश्न 12) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायदेमंत्री पदाच्या राजीनाच्या निवेदनातील योग्य विधान ओळखा.

अ. दलितांबाबत सरकार उदासीन होते.
ब. काश्मीरबाबत सरकारचे चुकीचे धोरण होते.
क. सरकारचे चुकीचे परराष्ट्र धोरण होते.
ड. संसदेत हिंदू कोड बिल मंजूर न होणे.

A) अ आणि ड
B) ब, क आणि ड
C) फक्त ड
D) अ, ब, क आणि ड ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 25 :  माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान


प्रश्न 13) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली ‘डिमेटर देवतेची’ कथा कशातील आहे?

A) बायबल
B) ग्रीक पुराण ✅
C) पोर्तुगीज पुराण
D) ब्रिटिश पुराण

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 33 : अस्पृश्यांना संदेश


प्रश्न 14) साऱ्या हिंदुस्तानाचे एकीकरण घडून आणायचे असेल तर त्यासाठी कोणती भाषा शिकली पाहिजे, असे बाबासाहेबांना वाटते?

A) मराठी भाषा
B) हिंदी भाषा ✅
C) इंग्रजी भाषा
D) संस्कृत भाषा

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 46 : महाराष्ट्राचे एकीकरण


प्रश्न 15) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी ___ दुःखावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला आहे.

A) शुद्रांच्या
B) अस्पृश्यांच्या
C) गरीबांच्या ✅
D) बेकारांच्या

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 50 : बुद्ध की कार्ल मार्क्स


अंतिम परीक्षा – सराव (15 प्रश्न)

7 जून 2024 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 च्या अंतिम परीक्षेची सराव परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत मुख्य परीक्षेतील प्रश्नांमधून एकूण 15 प्रश्न (30 गुणांसाठी) विचारण्यात आले होते. ही परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आली होती.


मुख्य परीक्षा (50 प्रश्न)

19 मे 2024 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 ची मुख्य परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे. 

या परीक्षेमध्ये 1660 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तथापि 1025 स्पर्धकांनी (61.75%) पेपर यशस्वीपणे सोडवला.


प्रश्न 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव काय?

A) मालोजी आंबेडकर
B) मालोजी सकपाळ ✅
C) मालोजी सकपाल
D) मालोजी सपकाळ

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 1 : तो मीच तर नव्हे ना ?


प्रश्न 2) ……….…. मध्ये शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपणाचे वर्णन आढळते.

A) वेद, ब्राम्हणे
B) रामायण, महाभारत
C) उपनिषद
D) पुराण ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 5 : माझे वडिल


प्रश्न 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार, …… राष्ट्राला विघातक आहे.

A) भक्तिमार्ग ✅
B) धर्मांधता
C) गांधीवाद
D) हिंदुत्ववाद

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 5 : माझे वडिल


प्रश्न 4) कोणी कपडे कसे परिधान करावेत यासंबंधीचा कायदा कोणाच्या काळात होता?

A) मुघल आणि निजाम
B) निजाम आणि आदिलशाही
C) मराठा, इंग्रज आणि पोर्तुगीज
D) वरीलपैकी नाही ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 11 : आपली स्थिती


प्रश्न 5) पंचीकरण या ग्रंथाचे लेखक कोण?

A) संत कबीर
B) संत ज्ञानेश्वर ✅
C) महात्मा फुले
D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 11 : आपली स्थिती


प्रश्न 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, त्यांचा मंदिर प्रवेश सत्याग्रह कशासाठी होता?

1) हिंदू मनांची परीक्षा घेण्यासाठी
2) हिंदूंनी माणसाला माणूस म्हणून वागविण्यासाठी
3) हिंदूंनी माणसाला माणुसकीचे अधिकार देण्यासाठी
4) हिंदूंनी मानवतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी
5) अस्पृश्यांना आपल्या हक्कांची जाणीव होण्यासाठी

A) 1 आणि 2
B) 3 आणि 4
C) केवळ 5
D) वरीलपैकी सर्व ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 13 : सत्याग्रह का ?


प्रश्न 7) गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणास वर्गणी जमवून देण्याचे कबूल केले होते?

A) शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (अनुसूचित जाती महासंघ)
B) इंडिपेंडेंट लेबर पार्टी (स्वतंत्र मजूर पक्ष)
C) भारतीय दलित काँग्रेस (इंडियन दलित काँग्रेस) ✅
D) रयत शिक्षण संस्था (पीपल्स एज्युकेशन सोसायटी)

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 16 : राउंड टेबल कॉन्फरन्स-१


प्रश्न 8) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, जबाबदारीचे स्वराज्य म्हणजे काय?

A) प्रांतिक स्वायत्तता
B) मध्यवर्ती स्वायत्तता
C) केंद्रीय स्वायत्तता
D) केवळ A आणि B ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 16 : राउंड टेबल कॉन्फरन्स-१


प्रश्न 9) जातीविशिष्ट प्रश्नांच्या बाबतीत महात्मा गांधींची वृत्ती व धोरणे काय आहेत याचा खरा व स्पष्ट पुरावा आपल्याला कोठे मिळाला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले?

A) ‘हरीजन’ मधील लेखांतून
B) म. गांधींसोबतच्या पहिल्या भेटीत
C) फेडरल स्टक्ट्रर कमिटीत ✅
D) दुसऱ्या गोलमेज परिषदेत

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 16 : राउंड टेबल कॉन्फरन्स-१


प्रश्न 10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन दिग्गज नेत्यांची पहिली भेट केव्हा झाली होती?

A) 31 ऑगस्ट 1931
B) 08 मार्च 1931
C) 14 ऑगस्ट 1931 ✅
D) वरीलपैकी नाही

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 18 : गांधी-आंबेडकर चर्चा


प्रश्न 11) डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेत जातावेळी त्यांच्या प्रवासाचा योग्य मार्ग सांगणारा गट ओळखा.

A) मुंबई, जिनेवा, ट्युरीअन, पॅरिस, डोव्हर, लंडन ✅
B) मुंबई, ट्युरीअन, डोव्हर, जिनेवा, पॅरिस, लंडन
C) मुंबई, जिनेवा, पॅरिस, डोव्हर, ट्युरीअन, लंडन
D) मुंबई, डोव्हर, ट्युरीअन, जिनेवा, पॅरिस, लंडन

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 19 : राउंड टेबल कॉन्फरन्स-२


प्रश्न 12) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

………… चालविणे तशी सोपी गोष्ट नाही. त्यात ……….. चा एक मोठा प्रश्न असतो.

A) पत्रक, पैशांचा ✅
B) चळवळ, जनसहभागा
C) शिक्षण संस्था, गरीब विद्यार्थ्यांचा
D) राजकीय पक्ष, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 20 : मजूरमंत्री


प्रश्न 13) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, कोणत्या कायद्याने निर्माण केलेल्या केंद्रापेक्षाही भारत देशाचे मध्यवर्ती केंद्र अधिक बळकट असावे.

A) 1950च्या कायद्याने
B) 1935च्या कायद्याने ✅
C) 1919च्या कायद्याने
D) 1909च्या कायद्याने

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 21 : घटना समितीत प्रवेश


प्रश्न 14) (R) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीचे कामकाज किती दिवस चालले?

A) 2 वर्षे 11 महिने 18 दिवस 
B) 165 दिवस
C) 141 दिवस ✅
D) 1,082 दिवस

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्रश्न 15) संविधान सभेतील आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देश केव्हा स्वतंत्र होणार असल्याचे सांगितले?

A) 26 जानेवारी 1929
B) 15 ऑगस्ट 1947
C) 26 नोव्हेंबर 1949
D) 26 जानेवारी 1950 ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्रश्न 16) खालील विचार कोणाचे आहेत?

“स्वाभिमानाचा बळी देवून कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शीलाचा बळी देवून कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देवून कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.”

A) अब्राहम लिंकन
B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C) डॅनियल ओकेनेल ✅
D) डॉ. राजेंद्र प्रसाद

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्रश्न 17) आपल्या विधीमंत्री पदाचा राजीनामा देता वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कशाचे सदस्य होते?

A) संविधान सभा
B) राज्यसभा
C) लोकसभा ✅
D) वरीलपैकी नाही

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 24 : कायदेमंत्री


प्रश्न 18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा केव्हा दिला?

A) 27 सप्टेंबर 1951 ✅
B) 28 सप्टेंबर 1951
C) 5 ऑक्टोबर 1951
D) 6 ऑक्टोबर 1951

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 24 : कायदेमंत्री


प्रश्न 19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, सनातनी लोक कोणती तत्त्वे नाकारतात?

A) स्वातंत्र्य, समता, बंधुता ✅
B) संविधान, लोकशाही, आरक्षण
C) जातीय उच्चाटन, विषमता निर्मूलन, धर्मनिरपेक्षता
D) न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 25 : माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान


प्रश्न 20) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, विद्येचा वापर कसा करावा?

अ. शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यास उपयुक्त ठरले पाहिजे.
ब. समाजाला घडविण्याचे आणि वाढविण्याचे क्रांतिकारी काम केले पाहिजे.
क. भारतीयांचा बौद्धिक, नैतिक आणि सामजिक विकास केला पाहिजे.

A) केवळ अ
B) केवळ अ आणि ब
C) केवळ ब आणि क
D) अ, ब आणि क ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 27 : शैक्षणिक कार्य


प्रश्न 21) महापरिनिब्बान सुत्तात खालीलपैकी कोणते विवेचन आलेले आहे?

अ. प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे.
ब. स्वातंत्र्याचा उपयोग सत्य शोधण्यासाठी केला पाहिजे.
क. सत्य म्हणजे ते मनुष्याच्या पंचज्ञानेद्रियांना पटणारे हवे.

A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 27 : शैक्षणिक कार्य


प्रश्न 22) योग्य जोड्या लावा.

1) 20/06/1946   अ) ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ प्रस्तावना लेखन

2) 09/12/1946   ब) सिद्धार्थ कॉलेजची स्थापना

3) 15/03/1956   क) गणराज्य दिवस

4) 26/01/1950   ड) संविधान सभेची पहिली बैठक

A) 1 – अ, 2 – ड, 3 – ब, 4 – क
B) 1 – ब, 2 – ड, 3 – अ, 4 – क ✅
C) 1 – ड, 2 – ब, 3 – अ, 4 – क
D) 1 – ड, 2 – अ, 3 – ब, 4 – क

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22, 27, 36 : माझे परमस्नेही


प्रश्न 23) (R) बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनातील …… साधायला अत्यंत आवश्यक आहे.

A) कल्याण ✅
B) सुख
C) अर्हतपद
D) निब्बान

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 30 : बुद्धं सरणं गच्छामि


प्रश्न 24) (R) “अक्रोधेन जयते क्रोधं” हे सुत्त कशातील आहे?

A) मिलिंद प्रश्न
B) धम्मपद ✅
C) सुत्तपिठक
D) थेरी गाथा

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 27 : शैक्षणिक कार्य


प्रश्न 25) (R) प्रेस घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1800 रुपयांची आर्थिक मदत कोणी केली होती?

A) श्री. शंकरराव परशा ✅
B) छ्त्रपती शाहू महाराज
C) श्री. देवराव नाईक
D) महाराज सयाजीराव गायकवाड

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 16 : राउंड टेबल कॉन्फरन्स-१


प्रश्न 26) “डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना तयार करण्यात, त्यानंतर संविधान सभेच्या विधिमंडळात आणि नंतर हंगामी संसदेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.”

वरील विधान कोणाचे आहे?

A) टी.टी. कृष्णामाचारी
B) डॉ. राजेंद्र प्रसाद
C) जवाहरलाल नेहरू ✅
D) के.आर. नारायणन

 

संदर्भ – धम्म भारत : लोकसभेत नेहरूंची आंबेडकरांना श्रद्धांजली


प्रश्न 27) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या राजकीय पदांवर काम केले आहे?

अ) लोकसभा सदस्य (खासदार)
ब) राज्यसभा सदस्य (खासदार)
क) महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार)
ड) महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (आमदार)

A) अ आणि ब ✅
B) ब, क आणि ड
C) अ, ब, क आणि ड
D) फक्त ब

 

संदर्भ – धम्म भारत : आंबेडकर घराण्याची राजकीय कारकीर्द


प्रश्न 28) अनुसूचित जातीची महार व्यक्ती ही कोणत्या धर्माची अनुयायी असू शकते?

A) फक्त हिंदू धर्म
B) हिंदू आणि बौद्ध धर्म
C) हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म
D) हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म ✅

 

संदर्भ – धम्म भारत : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या


प्रश्न 29) 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील महारांची लोकसंख्या आणि बौद्धांची लोकसंख्या यांमध्ये किती फरक आहे?

A) सुमारे 15 लाख ✅
B) सुमारे 20 लाख
C) सुमारे 05 लाख
D) सुमारे 10 लाख

 

संदर्भ – धम्म भारत : महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्या किती आहे?


प्रश्न 30) 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी (SC) कितींमध्ये बौद्ध लोक आढळले आहेत?

A) 1 (फक्त महार)
B) 3 (महार, मांग व चांभार)
C) 53 (जवळपास सर्व) ✅
D) 59 (सर्व)

 

संदर्भ – धम्म भारत : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या


प्रश्न 31) 26 नोव्हेंबर 2023 रोजी (संविधान दिनी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एका प्रमुख ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या पुतळ्याबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

अ) हा पुतळा वकिली वेशातील आहे.
ब) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले.
क) दिल्लीच्या उच्च न्यायालयात हा पुतळा स्थापन करण्यात आला.
ड) या पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या हातामध्ये ‘भारतीय संविधान’ दिलेले नाही.

A) फक्त (अ) आणि (ब) बरोबर ✅
B) फक्त (क) आणि (ड) बरोबर
C) फक्त (अ), (ब) आणि (क) बरोबर
D) (अ), (ब), (क) आणि (ड) बरोबर

 

संदर्भ – धम्म भारत : सर्वोच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा


प्रश्न 32) खालीलपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातवंडे (नातू) कोणती आहेत?

1. प्रकाश आंबेडकर
2. भीमराव आंबेडकर
3. राजरत्न आंबेडकर

A) फक्त (1) बरोबर
B) फक्त (1) आणि (2) बरोबर ✅
C) फक्त (1) आणि (3) बरोबर
D) (1), (2) आणि (3) बरोबर

 

संदर्भ – धम्म भारत : आंबेडकर घराण्याची राजकीय कारकीर्द


प्रश्न 33) 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बौद्ध आणि महार या दोन समूहांची एकत्रितपणे लोकसंख्या किती होती?

A) सुमारे 1 कोटी 45 लाख
B) सुमारे 1 कोटी 10 लाख
C) सुमारे 86 लाख
D) सुमारे 96 लाख ✅

 

संदर्भ – धम्म भारत : बौद्ध समाजाला आरक्षण किती आहे?


प्रश्न 34) खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही.

1. अमेरिका
2. रशिया
3. जपान
4. श्रीलंका

A) फक्त 2
B) फक्त 2 व 3
C) फक्त 2 व 4 ✅
D) यांपैकी नाही

 

संदर्भ – धम्म भारत :  भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची यादी


प्रश्न 35) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले जीवनचरित्र कोणी लिहिले?

A) धनंजय कीर
B) चांगदेव खैरमोडे
C) ज.गो. संत
D) रामचंद्र बनौधा ✅

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आद्यचरित्रे


प्रश्न 36) कोलंबिया युनिव्हर्सिटीने आपल्या सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या ‘कोलंबीयन्स अहेड ऑफ देअर टाईम’ नावाच्या यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘परिचय’ काय दिला आहे.

A) नंबर वन स्कॉलर इन द वर्ल्ड
B) फाऊंडिंग फादर ऑफ मॉडर्न इंडिया ✅
C) फाऊंडिंग फादर ऑफ रिपब्लिक इंडिया
D) सिम्बॉल ऑफ नॉलेज

 

संदर्भ – धम्म भारत :  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तल्लख बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वपूर्ण व रंजक गोष्टी  (मूळ संदर्भ)


प्रश्न 37) आग्नेय आशियातील बौद्ध देशांच्या कोणत्या गोष्टीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्चर्यचकित झाले?

A) त्यांनी आपल्या देशांमध्ये बौद्धधम्म टिकवून ठेवल्यामुळे
B) त्यांचे मन साम्यवादाकडे वळल्यामुळे ✅
C) त्यांनी बौद्ध धर्मामध्ये विविध कर्मकांड घुसवल्यामुळे
D) त्यांनी बुद्धभूमीत (भारतात) धम्म प्रचार न केल्यामुळे

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धर्माबद्दल 50 विचार (चौथा)


प्रश्न 38) खालील विधानांचा विचार करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त …….

1. त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2. त्यांचा पुतळा संसदेच्या प्रणांगणात बसवण्यात आला.
3. त्यांचे तैलचित्र संसदेमध्ये लावण्यात आले.
4. त्यांच्या स्मरणार्थ ‘इयर ऑफ सोशल जस्टिस‘ पुढील एक वर्षभर साजरे केले.

A) फक्त (1) आणि (3) बरोबर
B) फक्त (1), (3) आणि (4) बरोबर
C) (1), (2), (3) आणि (4) सर्व बरोबर
D) (1), (2), (3) आणि (4) सर्व चूक ✅

 

संदर्भ – धम्म भारत : आंबेडकर जयंतीशी संबंधित खास गोष्टी


प्रश्न 39) हिंदू धर्मात अमुलाग्र परिवर्तन झाले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी धार्मिक परिवर्तन करण्यायोग्य कोणत्या गोष्टी सांगितल्या?

1. हिंदू धर्माचा एक ग्रंथ आणि एक ईश्वर असावा.
2. जुन्या हिंदू ग्रंथांच्या आधारे आचारणाचा उपदेश करणाऱ्यांना शिक्षा व्हावी.
3. पुरोहितवर्ग नसावा. आवश्यकता असेलच तर तो जन्माधिनिष्ठ नसावा.
4. पुरोहित हा सरकारद्वारे नियुक्त म्हणजे सरकारी नोकर असावा.

A) 1, 2 आणि 4
B) 1, 2 आणि 3
C) 1, 3 आणि 4
D) 1, 2, 3 आणि 4 ✅

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार


प्रश्न 40) ओरिजिन या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोणी साकारली होती?

A) गौरव जे. पठानिया ✅
B) मामुट्टी
C) सचिन खेडेकर
D) गौरव पठाण

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट


प्रश्न 41) खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

A) तेलंगणात बाबासाहेबांचा 175 फूट उंच पुतळा उभा असून त्याला ‘स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस’ नाव देण्यात आले आहे. ✅
B) बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा आंध्र प्रदेशात असून त्याची उंची 206 फूट आहे.
C) आचार्य रामानुजन आणि सरदार पटेल फक्त या दोनच ऐतिहासिक व्यक्तींचे पुतळे बाबासाहेबांच्या पुतळ्यांपेक्षा जास्त उंच आहेत.
D) भारतातील 10 सर्वात उंच पुतळ्यांमध्ये दोन पुतळे बाबासाहेबांचे आहेत.

 

संदर्भ – धम्म भारत : भारतातील 10 सर्वात उंच पुतळे


प्रश्न 42) (R) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारताचे अब्राहम लिंकन” म्हणून कोणी गौरवले? 

A) फोर्ब मॅक्झिन
B) टाईम मॅक्झिन ✅
C) लंडन टाइम्स
D) न्यूयॉर्क टाइम्स

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उल्लेखनीय लोकांद्वारे मिळालेल्या उपाध्या, गौरव आणि सन्मान


प्रश्न 43) हिंदी विकिपीडिया आणि मराठी विकिपीडिया या दोघांवरील 2023 वर्षातील सर्वाधिक वाचले गेलेले पहिले दोन चरित्रलेख विचारात घ्या.

1. मराठी विकिपीडियावर – पहिल्या क्रमांकावर ‘बाबासाहेब आंबेडकर’ तर दुसऱ्या ‘शिवाजी महाराज’ चरित्रलेख आहे.
2. हिंदी विकिपीडियावर – पहिल्या क्रमांकावर ‘भीमराव आंबेडकर’ तर दुसऱ्या ‘महात्मा गांधी’ चरित्रलेख आहे.
3. मराठी विकिपीडियावर – पहिल्या क्रमांकावर ‘शिवाजी महाराज’ तर दुसऱ्या क्रमांकावर ‘बाबासाहेब आंबेडकर’ चरित्रलेख आहे.
4. हिंदी विकिपीडियावर – पहिल्या क्रमांकावर ‘महात्मा गांधी’ तर दुसऱ्या ‘भीमराव आंबेडकर’ चरित्रलेख आहे.

A. (1) आणि (2) बरोबर
B. (1) आणि (4) बरोबर
C. (2) आणि (3) बरोबर ✅
D. (3) आणि (4) बरोबर

 

संदर्भ – धम्म भारत : 2023 वर्षातील विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्तींची यादी → मराठी विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडिया


प्रश्न 44) अयोग्य जोडी ओळखा.

A) स्फूर्तिभूमी – रत्नागिरी जिल्हा
B) क्रांतिभूमी – नागपूर जिल्हा ✅
C) मुक्तिभूमी – नाशिक जिल्हा
D) चैत्यभूमी – मुंबई शहर जिल्हा

 

संदर्भ – धम्म भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित 10 स्थळे


प्रश्न 45) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुभाषचंद्र बोस यांचा कोणता दृष्टिकोन आवडला नाही?

A) महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यता आंदोलनविषयक दृष्टिकोन
B) ब्रिटिशांना भारताबाहेर काढण्याविषयक दृष्टिकोन
C) अस्पृश्यांच्या समस्येविषयक दृष्टिकोन ✅
D) आझाद हिंद सेनेला पाठिंबा देण्याविषयक दृष्टिकोन

 

संदर्भ – धम्म भारत : सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकमेव भेट


प्रश्न 46) 2023 मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी ……….. च्या संकेतस्थळावर डॉ. आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला.

A) सर्वोच्च न्यायालयाच्या ✅
B) लोकसभेच्या
C) मुंबई उच्च न्यायालयाच्या
D) महाराष्ट्र विधानसभेच्या

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, वकिली


प्रश्न 47) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘वेटिंग फॉर अ व्हिझा’ ही स्वतःची आत्मकथा केव्हा लिहिली?

A) 1930-31 या कालावधी
B) 1932-33 या कालावधी
C) 1935-36 या कालावधी ✅
D) 1937-38 या कालावधी

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा


प्रश्न 48) (R) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते होते?

A) अंबावडे
B) आंबडवे ✅
C) आंबावडे
D) आंबाडवे

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, सुरुवातीचे जीवन


प्रश्न 49) डॉ. सविता भीमराव आंबेडकर उर्फ माईसाहेब यांची लग्नापूर्वीची धार्मिक पार्श्वभूमी काय होती?

A. चित्पावन ब्राह्मण
B. देवरुखे ब्राह्मण
C. देशस्थ ब्राह्मण
D. सारस्वत ब्राह्मण ✅

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, वैयक्तिक जीवन


प्रश्न 50) (R) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा मालोजीराव सकपाळ यांनी कोणत्या पंथाची दीक्षा घेतली होती? 

A) कबीर पंथ
B) रामानंद पंथ ✅
C) वारकरी पंथ
D) शाक्त पंथ

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर, सुरुवातीचे जीवन


सराव परीक्षा – 2 (10 प्रश्न)

13 मे 2024 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 ची दुसरी सराव परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे. 


प्रश्न 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर कोणत्या पायोनियर पलटणीत होते?

A) दुसऱ्या
B) चौथ्या
C) सातव्या ✅
D) नवव्या 

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 2 : मी मूळ नक्षत्रावर जन्मलो


प्रश्न 2) बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनातील …… साधायला अत्यंत आवश्यक आहे.

A) कल्याण ✅
B) सुख
C) अर्हतपद
D) निब्बान

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 30 : बुद्धं सरणं गच्छामि


प्रश्न 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली बुद्ध जयंतीनिमित्त वैशाखी विशेषांक कुणासाठी लिहिला होता?

A) दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ जपान
B) महाबोधी सोसायटी, कलकत्ता ✅
C) बौद्ध धम्म परिषद, रंगून
D) जागतिक बौद्ध महासंघ

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 29 : मी बुद्धाकडे का वळालो ?


प्रश्न 4) ‘हिंदू कोड बिल’ संसदेत पास न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोणत्या पदाचा राजीनामा दिला होता?

A) कायदा मंत्री
B) संविधान सभा सदस्य
C) मजूर मंत्री
D) कायदा व न्याय मंत्री ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 26 : डॉक्टरेटची पदवी


प्रश्न 5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खालील वाक्य योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

“मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजून नये, ___ आणि ____ मी वर चढलो.”

A) वडिलांच्या आणि रमाच्या साह्याने
B) जिद्द आणि चिकाटीने
C) प्रयत्नाने आणि कष्टाने ✅
D) वाचनाने आणि मननाने

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 2 : मी मूळ नक्षत्रावर जन्मलो


प्रश्न 6) भगवान बुद्धांनी सांगितलेले नियम कशात अंतर्भूत केलेले आहेत?

A) विनयपिटकात ✅
B) सुत्तपिटकात
C) अभिधम्मपिटकात
D) धम्मपदात

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 50 : बुद्ध की कार्ल मार्क्स


प्रश्न 7) “जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित नि सर्व देशाचे हित यात संघर्ष झाला. तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिले” हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणास उद्देशून बोलले?

A) संविधान सभेमध्ये
B) मुंबई विधिमंडळात ✅
C) दुसऱ्या गोलमेज परिषदेत 
D) राज्यसभेत

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 20 : मजूरमंत्री


प्रश्न 8) 2023 या वर्षातील हिंदी विकिपीडियावर सर्वाधिक वाचला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा चरित्रलेख कोणता होता?

A) महात्मा गांधी ✅
B) गौतम बुद्ध
C) भीमराव आंबेडकर
D) प्रेमचंद

 

संदर्भ – धम्म भारत, 2023 वर्षातील हिंदी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्तींची यादी


प्रश्न 9) 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 1.33 कोटी अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये कोणत्या धर्माचे अनुयायी सर्वाधिक आहेत?

A) बौद्ध धर्म
B) ख्रिश्चन धर्म
C) हिंदू धर्म ✅
D) वरीलपैकी नाही

 

संदर्भ – धम्म भारत, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी (जातिनिहाय व धर्मनिहाय लोकसंख्येसह)


प्रश्न 10) डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांचे लग्नावेळी वय किती वर्षे होते?

A) 19
B) 29
C) 39 ✅
D) 49

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर,  वैयक्तिक जीवन

       समाप्त       


सराव परीक्षा – 1 (10 प्रश्न)

12 मे 2024 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 ची पहिली सराव परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे. 


प्र. 1) मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या नंतरची पायरी म्हणजे ….. .

अ) प्रवेश मिळेपर्यंत मंदिर सत्याग्रह सुरू ठेवणे
ब) मंदिर प्रवेश सत्याग्रह थांबवणे
क) अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे
ड) अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क मिळवणे

योग्य विधाने निवडा

A) पर्याय फक्त (अ)
B) पर्याय (ब), (क) आणि (ड) ✅
C) पर्याय फक्त (अ) आणि (ड)
D) पर्याय (अ), (क) आणि (ड)

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 13 : सत्याग्रह का ?


प्र. 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे माहेर कोणते होते?

A) वणंद ✅
B) दापोली
C) खेड
D) अंबाडवे

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 56 : माता रामाईच्या आठवणी


प्र. 3) बौद्ध धम्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी कोणती ‘तीन’ स्वतः लिहिलेली पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली होती?

1) क्षुद्र पुर्वी कोण होते?
2) बुद्ध आणि त्यांचा धम्म
3) बुद्ध आणि कार्ल मार्क्स
4) बुद्धधम्माचे सार
5) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती

A) 2, 3 आणि 5 ✅
B) 1, 4 आणि 5
C) 3, 4 आणि 5
D) 1, 2 आणि 3

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 30 : बुद्धं सरणं गच्छामि


प्र. 4) 20 जून 1946 हा दिवस खालीलपैकी कशाचा स्थापना दिवस आहे?

A) पीपल्स एज्युकेशन सोसायटी
B) ‘प्रबुद्ध भारत’ वृत्तपत्र
C) देहूरोड येथील बुद्ध मूर्ती
D) सिद्धार्थ कॉलेज ✅

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 27 : शैक्षणिक कार्य


प्र. 5) मसुदा समितीचे कामकाज किती दिवस चालले?

A) 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
B) 165 दिवस
C) 141 दिवस ✅
D) यापैकी नाही

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 22 : घटनेवरील शेवटचे भाषण


प्र. 6) “वेद निर्मिती म्हणजे मूर्खांचे व वेड्यांचे कार्य होय” असा कुणाचा दावा आहे?

A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) शबरस्वामी ✅
C) गीताकार
D) जैमिनी

 

संदर्भ – माझी आत्मकथा, प्रकरण – 48 : महाराष्ट्रीय संतांचे कार्य


प्र. 7) ‘माझी आत्मकथा’ हा ग्रंथ कोणी संपादित केलेला आहे?

A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) ज.गो. संत ✅
C) चांगदेव खैरमोडे
D) बी.सी. कांबळे

 

संदर्भ – माझी आत्मकथा


प्र. 8) ओरिजिन या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा कोणी साकारली होती?

A) गौरव जे. पठाण
B) मामुट्टी
C) सचिन खेडेकर
D) गौरव पठानिया ✅

 

संदर्भ – धम्म भारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट


प्र. 9) 1941 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ……. या अभिवादनाचा वापर केला.

A) जय भीम ✅
B) जय हिंद
C) जय भवानी
D) जय भारत

 

संदर्भ – मराठी विकिपीडिया, बाबासाहेब आंबेडकर,  प्रभाव व वारसा


प्र. 10) 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी (65.31 लाख) किती अनुसूचित जमातीचे (एसटी) होते?

A) सुमारे 20,800 ✅
B) सुमारे 28,000
C) सुमारे 13,06,000
D) शून्य (एकही बौद्ध हा एसटी/आदिवासी नव्हता)

 

संदर्भ – धम्म भारत, बौद्ध समाजाला आरक्षण किती आहे?

       समाप्त       


हेही पहा 


सोशल मीडिया माध्यमे

  • प्रबुद्ध टीव्हीचे लेटेस्ट व्हिडीओ अपडेट मिळवण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. (लिंक क्लिक करा)
  • भीमस्मरण परीक्षेसंबंधी सूचना मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
  • भीमस्मरण परीक्षेचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी सबंधित धम्मभारतच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *