डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार

Last Updated on 9 August 2026 by Sandesh Hiwale

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार (Dr Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi) हे केवळ प्रेरणादायी वाक्ये नसून शिक्षण, स्वाभिमान, समानता, लोकशाही आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे जीवनमूल्य आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचार प्रत्येकाने समजून घेऊन शक्य तितके आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही निवडक प्रेरणादायी सुविचार जाणून घेणार आहोत.

Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi
Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार | Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi

भारतीय इतिहासात ज्ञान, शिक्षण, तर्कशक्ती आणि सामाजिक परिवर्तन यांचे सर्वोच्च प्रतीक म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच नव्हे, तर जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित, समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि मानवतावादी विचारवंत म्हणूनही इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार हे केवळ प्रेरणादायी वाक्ये नसून ते जीवन जगण्याची दिशा देणारे विचार आहेत. शिक्षण, स्वाभिमान, समानता, लोकशाही, संविधान, स्त्री-पुरुष समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा आणि मानवतेवर आधारित त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.

या लेखामध्ये आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, तसेच Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi यांचे संकलन सादर करत आहोत. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, शिक्षक, अभ्यासक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी हा संग्रह विशेष उपयुक्त ठरेल.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण होते?

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६) हे आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली, अस्पृश्यता व जातीय अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला आणि समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची संकल्पना मांडली.

त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांना जगातील सर्वाधिक शिक्षित राजकारण्यांपैकी एक मानले जाते.

गोलमेज परिषद, संविधान सभा आणि विविध राष्ट्रीय चर्चांमध्ये त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने जगभरातील विद्वानांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे विचार आज भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार का वाचावेत?

आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात बाबासाहेबांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात. त्यांच्या सुविचारांमधून आपल्याला—

  • शिक्षणाचे महत्त्व समजते.
  • आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळते.
  • संविधान आणि लोकशाहीचे मूल्य समजते.
  • सामाजिक समानता व मानवतेचा संदेश मिळतो.
  • वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा मिळते.
  • संघर्षातून यश मिळवण्याची ताकद प्राप्त होते.

म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकाने वाचावेत आणि शक्य तितके जीवनात आचरणात आणावेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार | Dr Babasaheb Ambedkar Motivational Thoughts in Marathi

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

(२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख धारण करू नका.

(३) स्वातंत्र्य विचारसरणीचे आणि स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

(४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

(५) शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

(६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

(७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.

(८) मी संघर्ष करून अस्पृश्यांत जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे.

(९) दैवावर [नशिबावर] भरवसा ठेवू नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.

(१०) अस्पृश्यता ही जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भिषण आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

(११) स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

(१२) सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंतत: ही भारतीय ही भूमिका घ्यावी.

(१३) चारित्र्य शोभते संयमाने, आणि सौंदर्य शोभते शीलाने.

(१४) उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका.

(१५) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

(१६) करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

(१७) शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

(१८) पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

(१९) ग्रंथ हेच गुरू.

(२०) वाचाल तर वाचाल.

Dr Babasaheb Ambedkar thoughts in Marathi

(२१) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.

(२२) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

(२३) तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.

(२४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर पाण्यात जाता येईल.

(२५) एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

(२६) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

(२७) धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

(२८) लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे तर, लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती होय.

(२९) द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

(३०) बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

(३१) बौद्ध धर्मामुळे भारत देश महान.

(३२) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

(३३) मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

(३४) शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!

(३५) साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.

(३६) शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

(३७) विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.

(३८) सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

(३९) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

(४०) अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

(४१) मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.

(४२) जगात म्हणे सहा विद्वान आहेत, आणि त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत, असे एक युरोपियन म्हणाले होते.

(४३) ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

(४४) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत सुद्धा आहे.

(४५) भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता अन्य कोणत्याही धर्मात नाही.
(४६) सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

(४७) बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.

(४८) बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

(४९) शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

(५०) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ती-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

 

हे सुद्धा वाचा :

 

(५१) शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

(५२) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?

(५३) हिंसा ही वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

(५४) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा.

(५५) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

(५६) वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही एक तपश्चर्या आहे. तिला मनः संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

(५७) मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

(५८) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

(५९) पती-पत्नीमधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

(६०) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

(६१) शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल, तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

(६२) तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

(६३) मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करतो.

(६४) जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

(६५) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

(६६) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

(६७) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

(६८) सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

(६९) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

(७०) स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे.

(७१) माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर, तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

(७२) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

(७३) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

(७४) एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

(७५) शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

हे ही वाचलंत का?


बाबासाहेबांचे 75 प्रेरणादायी विचार – या लेखामागील इतिहास

आज इंटरनेटवर, फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, ब्लॉग आणि विविध वेबसाइट्सवर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार” या नावाने अनेक पोस्ट फिरताना दिसतात. अनेकांनी त्या वाचल्या असतील, शेअर केल्या असतील किंवा वेगवेगळ्या स्वरूपात पाहिल्या असतील.

परंतु या संग्रहाची एक छोटीशी पार्श्वभूमी सांगणे मला आवश्यक वाटते.

या ७५ प्रेरणादायी सुविचारांचा मूळ संग्रह आणि संकलन मी (संदेश हिवाळे) स्वतः २०१६ मध्ये तयार केला होता. त्या काळात मी हा संग्रह प्रथम फेसबुकवर प्रकाशित केला आणि नंतर तो व्हॉट्सॲपसह इतर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला.

त्या काळी माझ्या फेसबुक पेजचे नाव Buddhism in Maharashtra होते, जे पुढे Dhamma Bharat (धम्म भारत) या नावाने ओळखले जाऊ लागले. जुलै २०१६ मध्ये प्रथम ही पोस्ट प्रकाशित झाली (पाहा) आणि त्यानंतर मार्च २०१७ मध्ये मी ती माझ्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरूनही पुन्हा शेअर केली. (पाहा)

पुढील काही महिन्यांत ही पोस्ट इतकी लोकप्रिय झाली की हजारो लोकांनी ती कॉपी करून पुन्हा प्रकाशित केली. अनेकांनी ती जसाच्या तशी शेअर केली, तर काहींनी पोस्टमधील माझे नाव काढून टाकले. त्याबद्दल मला कोणतीही तक्रार नाही, कारण विचार जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तितके चांगलेच.

मात्र काही जणांनी या संकलनावर स्वतःचे नाव लेखक किंवा संकलनकर्ता म्हणून लिहून प्रकाशित केले. दुसऱ्याच्या परिश्रमाचे श्रेय स्वतःकडे घेणे योग्य नाही. तरीही, या लेखाचा उद्देश कोणावर टीका करणे नसून वाचकांपर्यंत बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार अधिक चांगल्या स्वरूपात पोहोचवणे हा आहे.

या लेखात मी मूळ पोस्ट जसाच्या तशी प्रकाशित केलेली नाही. त्याऐवजी शुद्धलेखन, भाषा, मांडणी, माहिती आणि वाचनीयता यामध्ये आवश्यक सुधारणा करून हा लेख अधिक समृद्ध, अद्ययावत आणि अभ्यासपूर्ण स्वरूपात सादर केला आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही का महत्त्वाचे आहेत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ इतिहासाचा भाग नाहीत, तर ते वर्तमान आणि भविष्य घडवणारी मूल्यव्यवस्था आहेत. शिक्षण, संविधान, लोकशाही, स्त्री-पुरुष समानता, आर्थिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तन या प्रत्येक विषयावर त्यांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच लागू पडते.

म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, Dr Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.


निष्कर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि विचार हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रत्येक सुविचारामध्ये शिक्षण, आत्मसन्मान, न्याय, समानता आणि मानवतेचा संदेश दडलेला आहे. आशा आहे की या लेखातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.

जर हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर तो आपल्या मित्र-परिवारासोबत आणि सामाजिक माध्यमांवर अवश्य शेअर करा, जेणेकरून बाबासाहेबांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील.


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

5 thoughts on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार”

  1. Jay Bheem Dada बाबासाहेबांचे विचार आणि सुविचार हे मला खूप आवडले आहे प्रेरणादायी सुविचार आहे. तुम्ही चांगली पोस्ट लिहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!