लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे 20 प्रेरणादायी सुविचार | Anna Bhau Sathe Quotes in Marathi

Last Updated on 3 August 2026 by Sandesh Hiwale

सामाजिक समता, मानवता, श्रमाचे महत्त्व आणि परिवर्तनाचा संदेश देणारे अण्णा भाऊ साठे यांचे अनमोल सुविचार आजही प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. जाणून घ्या Anna Bhau Sathe Quotes in Marathi !

Anna Bhau Sathe Quotes in Marathi
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार | Anna Bhau Sathe Quotes in Marathi

साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक अजरामर नाव आहे. आपल्या लेखणीच्या बळावर त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाचे वास्तव जगासमोर मांडले. त्यांचे साहित्य जितके प्रभावी आहे, तितकेच त्यांचे विचारही प्रेरणादायी आहेत. सामाजिक समता, मानवता, श्रमाचे महत्त्व आणि परिवर्तनाचा संदेश देणारे अण्णा भाऊ साठे यांचे हे 20 अनमोल सुविचार आजही प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. anna bhau sathe jayanti

अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 – 18 जुलै 1969) हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक, लोकशाहीर, कादंबरीकार, कथाकार, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा, पोवाडे, लोकनाट्य, लावण्या आणि गीतांच्या माध्यमातून समाजातील अन्याय, विषमता आणि श्रमिकांचे जीवन प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्यावर मार्क्सवादी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रभाव दिसून येतो. – Anna Bhau Sathe Quotes

महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी 1 ऑगस्ट हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिन ‘लेखन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. नव्या पिढीमध्ये लेखनाची आवड निर्माण करणे, मराठी साहित्याचा वारसा जपणे आणि विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखनाकडे प्रेरित करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. – Anna Bhau Sathe Jayanti 2026

अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. मराठी विकिपीडिया वरील टॉप 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे सुद्धा नाव आहे. 

हेही पाहा: अण्णा भाऊ साठे यांची Wikipedia वरील प्रचंड लोकप्रियता; मिळालेत 10,00,000+ views

Annabhau Sathe Quotes In Marathi

 

अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार – Anna Bhau Sathe Quotes

1. तुम्ही गुलाम नाही आहात, तर तुम्ही या वास्तव जगाचे निर्माणकर्ता आहात.

2. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.

3. जात हे वास्तव आहे. गरीबी ही कृत्रिम आहे. गरीबी नष्ट करता येऊ शकते, पण जात नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे.

4. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे, एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा, असे वाटणे गैर नाही.

5. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.

6. प्रतिभेला सत्याचे, जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधकारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्मळ ठरते.

7. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. हे सत्य हृदयात मिळवावे लागते. डोळ्यांना सर्वच दिसते परंतु ते सर्व साहित्याला हात देत नाही. उलट दगा मात्र देते.

8. दलितांचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाजराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा. कारण “जावे ज्यांच्या वंशा, तेव्हा कळे” हे तुकारामांचे म्हणणे खोटे नाही.

9. आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्ये हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या परंपरेचा अभिमान आहे, कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन संघर्षाने झडली आहे.

10. जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव.

11. मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे, रात दिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती.

12. मी जे जीवन जगतो, जगत आहे आणि जे मी अनुभवले आहे, तेच मी लिहितो. माझी माणसे मला कुठे ना कुठे भेटलेली असतात. त्यांचे जगणे, मरणे मला ठाऊक असते.

13. दलितांतही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामासाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो.

14. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि त्यांच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध आणि सभ्य व्हावा, येथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो.

15. जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो.

16. नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.

17. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरुरी आहे.

18. कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीत जन्माला येते, महालात जन्माला येतात ती गरिबाचे रक्त पिणारी ढेकणं.

19. अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे.

20. माणुसकी पळाली पार, होऊनी बेजार, पंजाबातून; सूडाची निशा चढून, लोक पशुहून, बनले हैवान.

Annabhau Sathe Quotes In Marathi

 

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार


सारांश

अण्णा भाऊ साठे यांचे सुविचार हे केवळ प्रेरणादायी वाक्ये नसून सामाजिक परिवर्तन, समता, मानवता आणि संघर्षाचा संदेश देणारे जीवनमूल्य आहेत. त्यांच्या विचारांमधून आजही समाजाला दिशा मिळते. त्यांच्या लेखनातून आणि विचारांतून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन समताधिष्ठित व न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!