न्यूयॉर्क टाईम्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स दैनिकाने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. – न्यूयॉर्क टाईम्सची आंबेडकरांना श्रद्धांजली

New York Times on Dr BR Ambedkar
न्यूयॉर्क टाईम्सची आंबेडकरांना श्रद्धांजली – New York Times Tribute on Dr BR Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले, तेव्हा भारतासह जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्या. अमेरिकेच्या जगप्रसिद्ध न्युयॉर्क टाइम्स या दैनिकाने आपल्या इंटरनॅशनल एडिशनच्या 7 डिसेंबरच्या अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. न्यूयॉर्क टाइम्सने श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.

New York Times Tribute to Dr BR Ambedkar

न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या बातमीचे शीर्षक पुढीलप्रमाणे ठेवले होते :

 

मूळ इंग्रजीत असलेल्या या बातमीचे मराठी भाषांतर खालीलप्रमाणे :

गुरूवारी ता. 6-12-1956 रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. ते जगात सुप्रसिद्ध होते. अस्पृश्य समाजाचे धुरंधर कैवारी म्हणून त्यांची ख्याती जगात विशेष लक्षणीय होती. या अस्पृश्य समाजातच ते जन्मले. अस्पृश्य समाजात जन्म घेण्यार्‍यास अत्यंत बिकट परिस्थितीतून जावे लागते. मनुष्यमात्रास अस्पृश्यतेमधून बाहेर पडता येत नाही, इतकी वाईट अवस्था अस्पृश्यांची आहे. परंतु डॉ. आंबेडकर तिला आव्हान देणारे होते. नैसर्गिक व परिश्रमपूर्वक मिळविलेली बुद्धिमत्ता असल्यानंतर मनुष्य त्या परिस्थितिस कसे आव्हान देऊ शकतो, यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. आंबेडकर. डॉ. आंबेडकरांनी अनेक शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या, ज्यांपैकी काही पदव्या त्यांनी अमेरिकेत मिळविल्या. भारत सरकारच्या मंत्रिमंडळांत, ब्रिटीश आमदानीत त्याचप्रमाणे भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून कार्य केले.

अस्पृश्य समाजाचे ते सर्वात महान पुढारी होते, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. अस्पृश्यतेची समस्या सोडविण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय कोणता याबाबत मोहनदास के. गांधी यांचेबरोबर आंबेडकरांचे मतभेद झाले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की डॉ. आंबेडकरांचा अस्पृश्यांचे प्रश्न सोडविण्याबाबतचा दृष्टिकोण गांधीपेक्षा अधिक कायदेशीरपणाचा असे. तथापि शेवटी डॉ. आंबेडकरांनी आपल्या, 600000 अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली; व त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी अस्पृश्य समाजाचा प्रश्न सोडविण्याचा दृष्टिकोण व्यक्त केला.

भारताच्या शासनाचा कायदेशीर पाया मुख्यतः डॉ. आंबेडकर यांनी बसविला, हे जगात तितकेसे कदाचित माहीत नसावे. आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळांत कायदेमंत्री होते. भारतीय घटनेचे आंबेडकरच खरेखुरे शिल्पकार होते. घटनेपेक्षाही त्यांची श्रेष्ठ कामगिरी म्हणजे त्यांनी हिंदु कोड तयार केले. हिंदू कोड बिलाचे दोन मुख्य उद्देश्य होते. भारतीय समाजाचा मूलभूत बदल कायदेशीर मार्गाने घडविण्याचा एक उद्देश्य होता, त्याचप्रमाणे भारतीय समाज प्रगतिकारक व मानव्यप्रत जाणारा व्हावा असा दुसरा उद्देश्य होता.

आंबेडकर ही जगातील एक महान व्यक्ति होती. ते आपल्या सभोवार असलेल्या परिस्थितींतून व साधनांतून उत्कृष्ट मार्ग शोधीत असत. त्यांचे गांधींबरोबर एक मत झाले नाही; आणि त्यांनी नेहरूंचे मंत्रिमंडळ मतभेदानेच सोडले. डॉ. आंबेडकरांनी आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण दर्जाच्या प्रथा पाडल्या होत्या; आणि त्या प्रथेनुसार आंबेडकर सतत वागले. आंबेकरांनी जी महान कार्य आरंभिली त्यांची फळे पहावयास ते अधिक काळ जगू शकले नाहीत. त्यांच्या अनेक महान कार्यांपैकी काही कार्यांना फळे यावयास अधिक वेळ लागेल. मात्र, आंबेडकरांचा प्रभाव हा अपूर्वपणे भारतावर पडलेला आहे. त्यांच्या कार्याचा व त्यांचा बहुमान राखण्यातच भारताचे शहाणपण आहे.

– न्यूयॉर्क टाईम्स, इंटरनॅशनल एडिशन, ता. 7-12-1956

 


बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेले इतर लेख


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.

🔸 WhatsApp
🔸 Telegram
🔸 Facebook
🔸 E-mail dhammabharat@gmail.com


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *