मे महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मे महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in May) आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण ऑगस्ट ते एप्रिल महिन्यांतील जीवनपट लेख बनवलेले आहेत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in May
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in May

Timeline of Dr BR Ambedkar in May

वेगवेगळ्या वर्षांतील मे महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. मे महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in May – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

मे महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो —  ‘कास्ट्स इन इंडिया’ निबंधाचे वाचन, ‘मला बौद्ध धर्म का आवडतो?’ यावर बीबीसी मुलाखत, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड, एम.ए. पदवीचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर, भारतीय संविधान सभेची स्थापना, बुद्ध जयंती कार्यक्रमात उपस्थिती, रमाबाईंचे निधन, सविता आंबेडकरांचे निधन, आमदार म्हणून मुंबई विधानसभेवर निवड, ‘मुक्ती कोण पथे?’ हे भाषण… इत्यादी.

 

मेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 मे

  • महाराष्ट्र दिन
  • कामगार दिन
  • 1932 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भिन्न मतपत्रिका लोथीयन कमिशनपुढे ठेवली.
  • 1956 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यसभेमध्ये ‘भाषिक प्रांत रचना’ यावर भाषण झाले.

 

2 मे

  • 1950 : नवी दिल्ली येथे बौद्ध धर्मावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले जाहीर भाषण झाले.
  • 1954 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मधील विदर्भ साहित्य संघाला भेट दिली.

 

3 मे

  • 1928 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई मुनिसिपालीटी ॲक्ट दुरुस्ती बिलावर चर्चा झाली.
  • 1936 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर येथे भव्य स्वागत करण्यात आले त्यांची मिरवणूक काढण्यात आली, तसेच महानगरपालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देण्यात आले.
  • दिनकरराव जवळकर स्मृतिदिन

 

 

4 मे

  • 1929 : यवतमाळ येथे संत चोखामेळा फ्री बोर्डिंग तर्फे बहिष्कृत विद्यार्थ्यांचे संमेलन झाले.
  • 1936 : अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1955 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ स्थापन केलेल्या ‘द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची नोंदणी झाली.

 

5 मे

  • 1933 : धुगाव, अमरावती येथे मध्य प्रांत वऱ्हाड महार परिषदेचे बारावे अधिवेशन संपन्न झाले.
  • 1950 : धर्मांतरासंबंधी पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेतली.

 

6 मे

  • 1933 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त समितीच्या कामकाजासाठी लंडनला पोहोचले.
  • 1945 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन झाले.
  • 1955 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोपारा येथे बुद्धजयंती निमित्त भाषण केले. (भाषण पाहा)
  • छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन

 

7 मे

  • 1932 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरच्या (कामठी) अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले.
  • 1943 : मजूरमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार समितीच्या अस्थायी समितीची बैठक झाली.

 

8 मे

  • 1955 : नरे पार्क, मुंबई येथे आयोजित केलेल्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • संत कबीर स्मृतिदिन
  • महास्थवीर चंद्रमणी निर्वाण

 

9 मे

  • 1916 : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘कास्ट्स इन इंडिया’ निबंधाचे वाचन केले.
  • 1941 : चारमिनार या बाबासाहेबांच्या इमारतीची विक्री झाली.
  • कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन

 

10 मे

  • 1938 : नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1943 : इंडियन फेडरेशन ऑफ लेबर, मुंबई तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला.

 

11 मे

  • 1988 : मुंबईच्या मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी हजारो सामान्य जनतेने दिली.
  • Ambedkar in May

 

12 मे

  • 1934 : चिपळूण, महार सेवा संघातर्फे पाचवे अधिवेशन झाले.
  • 1935 : कि.फा. बनसोडे (पाटील) यांचे अध्यक्षतेखाली तालुका परिषद भरली.
  • 1956 : बीबीसी आकाशवाणीवरून ‘मला बौद्ध धर्म का आवडतो?’ या विषयावर बाबासाहेबांची मुलाखत वा भाषण झाले.

 

13 मे

  • 1920 : शाहू महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र आले.
  • 1952 : राज्यसभेचे सदस्य म्हणून घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शपथविधी झाला. त्यांची प्रिव्हिलेज कमिटीमध्ये निवड झाली.

 

14 मे

  • 1938 : कोकण पंचमहल महार परिषद कणकवली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर भाषण झाले.
  • संत चोखामेळा स्मृतिदिन

 

Timeline of Dr Ambedkar in May

15 मे

  • 1915 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी’ हा प्रबंध एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला सादर केला होता. 1936 मध्ये याला पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले गेले.
  • वामनदादा कर्डक स्मृतिदिन

 

16 मे

  • 1938 : चिपळूण येथे प्रचार दौऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1946 : भारतीय संविधान सभा आणि भारताचे हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापनेची घोषणा झाली.

 

17 मे

  • 1929 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला भिन्न मतपत्रिका सादर केले.
  • 1938 : खोती आंदोलनासंबंधी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

18 मे

  • 1929 : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील उंबरोल येथे बहिष्कृत हितचिंतक सेवा संघातर्फे पाण्यासाठी सत्याग्रह करण्यात आला.

 

19 मे

  • 1929 : मालवण येथे कोकणप्रांत पूर्वास्पृश्य शिक्षण परिषद झाली.

 

20 मे

  • 1951 : महाबोधी सोसायटी, नवी दिल्ली यांच्यावतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.

 

21 मे

  • 1932 : पुणे जिल्हा बहिष्कृत समाज व अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिले गेले.

 

22 मे

  • 1932 : पुणे येथे महार स्वयंसेवकांनी समाजसेवेसाठी तन-मन-धनाने प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
  • 1947 : पंडित जवाहरलाल नेहरूंचे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आले, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या निवडक उद्योगधंद्यांच्या राष्ट्रीयकरणाची कल्पना मान्य करण्यात आली.

 

23 मे

  • 1930 : पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे नारायणगाव येथे अधिवेशन झाले.
  • 1932 : कोल्हापूर येथे कर्नाटकातील दिवाण बहादुर अण्णा आबाजी लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

24 मे

  • 1950 : हैदराबाद येथे कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
  • 1956 : नरे पार्क, मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.‌ आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांद्वारे बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर घोषणा करण्यात आली.

 

25 मे

  • 1928 : वऱ्हाड प्रांतात पातुंगा येथे अस्पृश्य समाजाच्या परिषदेत सुधारित पद्धतीचा विवाह झाला.
  • 1950 : बौद्ध धर्माचे संस्कार व विधी पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबो, श्रीलंकेला भेट.
  • गुरु महास्थवीर चंद्रमणी जयंती

 

26 मे

  • 1932 : ब्रिटिश पंतप्रधानांना भेटण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातून प्रयाण झाले.

 

27 मे

  • 1928 : समाज समता संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत श्रीधरपंत टिळकांच्या दुखवट्याची सभा झाली.
  • माता रमाबाई स्मृतिदिन (1935)
  • जवाहरलाल नेहरू स्मृतिदिन

 

28 मे

  • 1933 : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे महार एज्युकेशन सोसायटी तर्फे अस्पृश्यांची जाहीर सभा झाली.
  • 1940 : भंडारा येथे विडी मजुरांची जाहीर सभा झाली.

 

29 मे

  • 1928 : बहिष्कृत हितकारणी सभेतर्फे सायमन कमिशनला अहवाल सादर करण्यात आला.
  • 1932 : मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल बाबासाहेबांकडून सायमन कमिशनला निवेदन देण्यात आले.
  • सविता आंबेडकर स्मृतिदिन (2003)

 

30 मे

  • 1920 : नागपूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बहिष्कृत वर्गाचे अधिवेशन झाले, यामध्ये धूम्रपान निषेध करण्यात आला. (30 मे ते 1 जून 1920)
  • 1937 : निवडून आलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांच्या अभिनंदनासाठी परळ कामगार मैदानावर सभा झाली. आमदार म्हणून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा निवडून आले होते, तसेच पुढे ते मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुद्धा झाले.

 

31 मे

  • 1920 : नागपूर येथील बहिष्कृत वर्गाच्या अधिवेशन झाले. हा अधिवेशनाचा दुसरा दिवस होता.
  • 1936 : मुंबई येथील पुरंदरे स्टेडियमवर इलाका अखिल महार परिषद झाली. या परिषदेत ‘मुक्ती कोण पथे’ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले.
  • राणी अहिल्याबाई होळकर जयंती

 

मे मध्ये घडलेल्या अन्य घटना 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण मे महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in May) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *