जगभरातील उल्लेखनीय व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक उपाध्या दिलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संबोधन व संबोधन करणाऱ्या व्यक्ती, याविषयी या आपण लेखात जाणून घेणार आहोत.
आपल्या संबोधनांमधून ‘संबोधक’ लोकांनी बाबासाहेबांविषयी आदरयुक्त ‘शब्दप्रयोग’, उपाध्या अथवा विशेषणे वापरलेली आढळतात. बाबासाहेबांचा गौरव केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून झालेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सर्वात आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. सध्या भारतीय राजकारणात आणि समाजकारणात ते खूप प्रासंगिक आहेत. भारतासह जगातील अनेक लोकांनी त्यांचा सन्मान केला आहे, त्यांना वेगवेगळे संबोधने – उपाध्या देऊन गौरवले आहे.
आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना कोणकोणत्या उपाध्या देऊन गौरवण्यात आले आहे आणि त्या उपाध्याय कोणी दिल्या, हे जाणून घेणार आहोत. ‘महामानव’ ही त्यांना सर्वाधिक वापरली जाणारी उपाधी आहे.
संबोधन | संबोधक |
लोकमान्य | राजर्षी शाहू महाराज |
महात्मा | प्रल्हाद केशव अत्रे |
बोधिसत्व | महास्थवीर चंद्रमणी |
बाबासाहेब | जनता |
दलितांचा मुक्तिदाता | महाराजा सयाजीराव गायकवाड |
बुद्धिमत्ता व ज्ञानाचा झरा | गव्हर्नर रिचर्ड कॅसे |
सामाजिक क्रांतिचा प्रकाश | राम मनोहर लोहिया |
विद्यासंपन्न पुरुष | प्रल्हाद केशव अत्रे |
श्रेष्ठ विद्वान | महात्मा गांधी |
अर्थशास्त्रामधील माझे गुरू | डॉ. अमर्त्य सेन |
भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ | डॉ. नरेंद्र जाधव |
दूरदर्शी व शूरवीर महापुरुष | लॉर्ड माउंटबेटन |
असामान्य व्यक्तिमत्त्व | लॉर्ड बॉट्मली |
जगाचा प्रणेता | संयुक्त राष्ट्रसंघ |
सर्वेश्रेष्ठ विद्यार्थी | एडवीन सेलिग्मन |
या युगातील भगवान बुद्ध | महास्थवीर चंद्रमणी |
आधुनिक सम्राट अशोक | महास्थवीर संघरक्षित |
भारताचे आधारस्तंभ | विनायक दामोदर सावरकर |
विश्वमानव | नरेंद्र मोदी |
छळ-अत्याचाराच्या विरुद्ध बंड करणारी व्यक्ती | जवाहरलाल नेहरू |
गरीबांचा मसिहा | रामचंद्र गुहा |
भारताचे अब्राहम लिंकन | TIME magazine |
जगापुढील भारताचे प्रवक्ते | एन. राम, जेष्ठ पत्रकार |
अखंड व उग्र ज्ञानसाधना | डॉ. भालचंद्र फडके |
संपूर्ण जगाचे नेते | अरविंद केजरीवाल |
काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न | डॉ. सविता आंबेडकर |
हजारों विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ विद्वान | महात्मा गांधी |
सर्वसामान्यांचा हक्कदाता | बराक ओबामा |
स्वतंत्र भारताचे दिशादर्शक | गुन्नार मर्डाल |
गरीबांचा खरा कैवारी | महात्मा गांधी |
दलित व शोषितांचे खरे आणि प्रसिद्ध महानायक | अमर्त्य सेन |
दलितांचा खरा पुढारी | राजर्षी शाहू महाराज |
भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक | महिंद राजपक्ष, श्रीलंकेचे राष्ट्रपती |
५०० ग्रज्युएटांच्या बरोबरीचे विद्वान | जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगो |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संबोधन व संबोधन करणाऱ्या व्यक्ती
01. लोकमान्य ← राजर्षी शाहू महाराज
थोर समाजसुधारक छत्रपती रा. शाहू महाराजांनी आपल्या एका पत्रामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ‘लोकमान्य’ संबोधले होते. अर्थात शाहू महाराज बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य मानत नव्हते.
02. महात्मा ← प्रल्हाद केशव अत्रे
बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर आ. प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये बाबासाहेबांवर अनेक अग्रलेख लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांना ‘महात्मा’ म्हणून संबोधले.
03. बोधिसत्व ← महास्थवीर चंद्रमणी/ भारतीय भिक्खू
भारतीय बौद्ध जनता आणि आता तर अबौद्ध जनता सुद्धा बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ संबोधित असते. मात्र बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ संबोधले होते. बौद्ध धर्मात, बोधिसत्व म्हणजे ‘त्या पदाला पोहोचलेला’ आणि ‘बुद्धत्वाच्या खालोखाल’ अवस्था प्राप्त करणारी व्यक्ती.
04. दलितांचा मुक्तिदाता ← सयाजीराव गायकवाड
बाबासाहेबांना परदेशी शिकण्यासाठी आर्थिक मदत करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सुरुवातीच्या काळातच बाबासाहेबांना ‘दलितांचा मुक्तिदाता’ म्हटले होते.
05. बुद्धिमत्ता व ज्ञानाचा झरा ← गव्हर्नर रिचर्ड कॅसे
बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘आधुनिक भारतातील बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा झरा’ (fountain of knowledge and wisdom) म्हटले होते. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता आणि उच्च दर्जाच्या ज्ञानाशी ब्रिटिश अधिकारी सुद्धा परिचित होते.
06. सामाजिक क्रांतीचे प्रकाश दाता ← राम मनोहर लोहिया
भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकीय नेते असलेले डॉ. राम मनोहर लोहिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘सामाजिक क्रांतीचे प्रकाश दाता’ म्हटले आहे.
6. विद्यासंपन्न पुरुष ← प्रल्हाद केशव अत्रे
आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांना आपल्या अग्रलेखांमध्ये विविध विशेषणांनी गौरविले होते, त्यापैकी एक विशेषण ‘विद्यासंपन्न पुरुष’ होते.
07. सर्वश्रेष्ठ विद्वान ← महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील बाबासाहेबांच्या कार्याचा आणि प्रतिभेचा गौरव केलेला आहे. गांधींनी म्हटले होते की, “डॉ. आंबेडकर हे बुद्धिमत्तेच्या कसोटीवर हजारो सुशिक्षित हिंदू विद्वानांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत”. महात्मा गांधी बाबासाहेबांचा उल्लेख अनेकदा ‘डॉक्टर’ असा करत.
08. अर्थशास्त्रामधील गुरू ← डॉ. अमर्त्य सेन
भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ डॉ. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रामधील त्यांचा गुरु मानतात. बाबासाहेबांनी आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचला आणि भारतातील आर्थिक समस्येवर पायाभूत कार्य केले, आणि त्यांच्या आर्थिक योगदानासाठी त्यांना सदैव स्मरण ठेवले जाईल असेही डॉ. सेन म्हणाले. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकाराच्या निर्णय अतिशय तर्कशुद्ध होता असे मत देखील अमर्त्य सेन यांनी मांडले आणि ते स्वतः देखील बौद्ध धर्माचे अनुयायी बनले.
09. भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ ← डॉ. नरेंद्र जाधव
भारतातील एक आघाडीचे अर्थतज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावर बाबासाहेबांचा मोठा प्रभाव आहे. डॉ. नरेंद्र जाधव म्हटले आहे की, “भारतीय इतिहासातील सर्वाधिक शिक्षित अर्थतज्ज्ञ आणि सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, डॉ. अमर्त्य सेन नव्हे. त्यांनी बाबासाहेबांवर अनेक पुस्तके लिहिली. ‘आमचा बाप आण् आम्ही’ हे डॉ. जाधवांनी लिहिलेले पुस्तक मराठीच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध पुस्तक आहे. आजवर त्याच्या 200 पेक्षा जास्त आवृत्ती निघाल्या आहेत.
10. दूरदर्शी व शूरवीर महापुरुष ← लॉर्ड माउंटबेटन
म्यानमारचे माजी गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य जवळून पाहिले होते आणि बाबासाहेबांची त्यांचा वैयक्तिक परिचय होता. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीमधील योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांना एक ‘दूरदर्शी व शूरवीर महापुरुष’ म्हटले.
- अस्पृश्यता निवारण चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्त्रोत – आंबेडकर, गांधी आणि नेहरू
11. असामान्य व्यक्तिमत्त्व ← लॉर्ड बॉट्मली
लंडनच्या संसदेचे खासदार लॉर्ड बॉटमली 1931 मध्ये पहिल्यांदा भारतीय गोलमेज परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये भेटले होते. दुसऱ्यांदा ते 1946 मध्ये भारतामध्ये बाबासाहेबांना भेटले. बाबासाहेबांनी बॉटमली यांना उद्योग, कारखाने आणि मजूर यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. लॉर्ड बॉटमली म्हणतात की “डॉ. आंबेडकर एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारणांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे”.
12. जगाचे प्रणेते ← संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations)
संयुक्त राष्ट्र संघ अर्थात युनायटेड नेशन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तीन वेळा साजरी केली आहे. 2016 मध्ये बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्र संघाने बाबासाहेबांच्या कार्यांचा गौरव केला आणि त्यांना ‘जगाचा प्रणेता’ संबोधले.
13. कोलंबिया विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी ← प्रा. एडवीन सेलिग्मन
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिकत असताना डॉ. एडविन सेलिग्मन हे बाबासाहेबांचे प्राध्यापक होते. सेलिग्मन यांना बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता माहिती होती. कोलंबिया विद्यापीठामध्ये एकदा लाला लजपतराय, प्राध्यापक सेलिग्मन आणि विद्यार्थी भीमराव आंबेडकर हे तीघे चर्चा करत असताना सेलिग्मन लाला लजपतराय यांना म्हणाले होते की, “केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीमराव आंबेडकर सर्वश्रेष्ठ (सर्वात बुद्धिमान) विद्यार्थी आहेत”.
14. या युगातील भगवान बुद्ध ← महास्थवीर चंद्रमणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना ‘या युगातील भगवान बुद्ध’ म्हणून संबोधले होते.
15. आधुनिक सम्राट अशोक ← महास्थवीर संघरक्षित
ब्रिटिश बौद्ध विद्वान, लेखक आणि भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांच्यावर बाबासाहेबांचा मोठा प्रभाव होता. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मासाठी केलेले कार्य अत्यंत अफाट होते आणि यामुळे संघरक्षित यांनी बाबासाहेबांना ‘आधुनिक सम्राट अशोक’ असे म्हटले.
भारतामध्ये सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माच्या उत्कर्षासाठी आणि प्रसारासाठीचे सर्वाधिक कार्य हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले आहे, असे संघरक्षित म्हणाले. संघरक्षित यांनी ‘विसाव्या शतकातील 5 सर्वश्रेष्ठ बौद्धां’मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश केलेला आहे. ‘आंबेडकर अँड बुद्धिझम’ या आपल्या पुस्तकात संघरक्षित यांनी बाबासाहेबांबद्दल सविस्तर विचार मांडलेले आहेत.
16. भारताचे आधारस्तंभ ← विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर यांनी धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चरित्र वाचल्यानंतर बाबासाहेबांना ‘भारताचे आधारस्तंभ’ संबोधले होते.
17. विश्वमानव ← नरेंद्र मोदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘विश्वमानव’ म्हणून अनेकांनी संबोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना विश्वमानव म्हटले आणि त्यांच्या कार्याची तुलना मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्या कार्याशी केले.
18. छळ-अत्याचाराच्या विरुद्ध बंड करणारी व्यक्ती ← जवाहरलाल नेहरू
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर राज्यसभेमध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यावेळी ते आपल्या भाषणात बाबासाहेबांना ‘छळ व अत्याचाराच्या विरुद्ध बंड करणारी सामर्थ्यवान व्यक्ती’ म्हटले होते.
19. गरीबांचा मसिहा ← रामचंद्र गुहा
प्रसिद्ध गांधीवादी लेखक रामचंद्र गुहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या व्यक्तींमध्ये केला आहे. गुहा यांनी बाबासाहेबांना ‘गरिबांचा मसिहा’ म्हटलेले आहे. ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या सर्वेक्षणामध्ये बाबासाहेबांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड झाल्यानंतर रामचंद्र गुहा (परिक्षक) यांनी त्याचे स्वागत केले होते.
20. भारताचे अब्राहम लिंकन ← TIME magazine
अमेरिकेच्या जगप्रसिद्ध टाईम मॅक्झिनने 1936 मध्ये बाबासाहेबांवर ‘रिलिजन : अन्टचेबल लिंकन’ नावाचा लेख लिहिला होता. आणि त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारताचे अब्राहम लिंकन’ म्हणून गौरवले होते. गोलमेज परिषदांदरम्यान (1931-33) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती बनले होते.
21. जगापुढील भारताचे प्रवक्ते ← एन. राम
2012 मध्ये झालेल्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ सर्वेक्षणामध्ये ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी बाबासाहेबांना ‘जगापुढील भारताचे प्रवक्ते’ संबोधले होते.
22. अखंड व उग्र ज्ञानसाधक ← डॉ. भालचंद्र फडके
भालचंद्र फडके यांनी बाबासाहेबांना अखंड व उग्र ज्ञानसाधना करणारी व्यक्ती म्हटले होते.
23. संपूर्ण जगाचे नेते ← अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकदा आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हे, केवळ भारताचे नेते नव्हे, तर संपूर्ण जगाचे नेते आहेत, असे म्हटले होते.
24. काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न ← डॉ. सविता आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब तथा डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांनी आपल्या आत्मचरित्रात (डॉ. आंबेडकरांच्या सहवासात) आपले पती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न’ म्हटले होते.
25. लोकशाहीचे त्राते नि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी ← धनंजय कीर
चरित्रकार धनंजय कीर यांनी आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये त्यांना ‘लोकशाहीचे त्राते आणि मानवी स्वतंत्र्याची कैवारी’ संबोधले होते.
26. स्वातंत्र्य भारताचे दिशादर्शक ← गुन्नार मर्डाल
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार विजेते स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणी गुन्नार मर्डाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य भारताचे दिशादर्शक म्हटले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या आर्थिक योगदानाची सुद्धा प्रशंसा केली आहे.
27. सर्वसामान्यांचा हक्कदाता ← बराक ओबामा
2010 मध्ये भारतीय संसदेला संबोधित करताना तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘सर्वसामान्य जनतेला त्यांचा हक्क देणारी व्यक्ती’ म्हणून संबोधले होते.
28. भारताचे मार्टिन ल्युथर किंग ← दयाना पोलेहंकी
अमेरिकन राज्य – मिशिगनमध्ये 14 एप्रिल 2022 हा दिवस ‘डॉ. बी. आर. आंबेडकर एक्विटी डे’ म्हणून घोषित करण्यात आला, तेव्हा मिशिगनच्या सिनेटर दयाना पोलेहंकी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारताचे मार्टिन ल्युथर किंग’ असे संबोधले.
29. प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता ← डॉ. नरेंद्र जाधव
डॉ. नरेंद्र जाधव यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधी हे ‘भारताचे राष्ट्रपिता’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता’ किंवा ‘प्रजासत्ताक भारताची निर्माते’ आहेत.
30. निर्भय नेता ← आमिर खान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी बाबासाहेब हे आपले आदर्श आहे, असे सांगितले. त्यांनी बाबासाहेबांना जागतिक नेते सुद्धा म्हटले. बाबासाहेब निर्भय नेते होते आणि त्यांच्या हृदयात सर्वांप्रती प्रेम होते या दोन गोष्टींमुळे आमिर खान फार प्रभावित झाला.
31. 1st कोलंबीयन अहेड ऑफ द देअर टाइम ← कोलंबिया विद्यापीठ
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला 2004 मध्ये अडीचशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या विद्यापीठाने जगभरातील आपल्या माजी 100 सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची द कोलंबीयन अहेड ऑफ देअर टाइम नावाने एक यादी केली. ह्या शंभर व्यक्तीने आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. जेव्हा या यादीमधील नावांचा योग्यतेनुसार क्रम लावण्यात आला तेव्हा त्यामध्ये प्रथम क्रमांकावर नाव होते ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ यांचे.
बाबासाहेब या टॉप 100 लोकांच्या यादीमध्ये एकमेव भारतीय होते. कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना आपल्या विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी अर्थातच ‘जगातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती’ म्हणून गौरव केला. कोलंबिया विद्यापीठाने जगभरात उल्लेखनीय व्यक्ती निर्माण केले आहेत.
32. द ग्रेटेस्ट इंडियन ← आऊटलुक सर्वेक्षण 2012
2012 मध्ये झालेल्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ नावाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणामध्ये जगभरातील जनतेने विशेषतः भारतीय जनतेने विविध स्तरावरून मतदान केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ किंवा ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून घोषित केले. तथापि महात्मा गांधींना या सर्वेक्षणाबाहेर ठेवले होते.
या सर्वेक्षणात बाबासाहेबांनंतर दुसऱ्या क्रमांकावर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, तिसऱ्या क्रमांकावर वल्लभभाई पटेल तर चौथ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू होते. या सर्वेक्षणामध्ये तब्बल दोन कोटी लोकांनी सहभाग घेतला होता.
33. गरिबांचा खरा आणि निर्भय नायक ← महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी प्रजासत्ताक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘गरिबांचा खरा आणि निर्भय नायक’ संबोधले आहे.
सारांश
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संबोधन व संबोधन करणाऱ्या व्यक्ती’ हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. लेख आवडल्यास इतरांपर्यंत जरूर शेअर करा.
या लेखामध्ये बाबासाहेबांविषयी एखादे ‘नवीन संबोधन वा उपाधी’ जोडायची असल्यास कृपया त्याविषयी ई-मेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. किंवा अन्य काही बदल आवश्यक असल्यास लेख अद्ययावत केला जाईल. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- आंबेडकर जयंतीशी संबंधित रंजक तथ्ये
- Dr. Ambedkar Family – आंबेडकर परिवार की संपूर्ण जानकारी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |