बौद्ध धर्मासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या विसाव्या शतकातील पहिल्या पाच सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींची नावे येथे देण्यात आलेली आहे. महान ब्रिटिश विद्वान व लेखक संघरक्षित यांनी “Great Buddhists of the Twentieth Century” नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी या 20व्या शतकातील टॉप 5 महान बौद्धांची यादी आणि प्राथमिक माहिती दिली आहे.
विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्ध – Great Buddhists of the Twentieth Century
जगाच्या इतिहासात असंख्य महान बौद्ध विभूती झाल्या, ज्यांनी बौद्ध धर्माला वेळोवेळी समृद्ध आणि सशक्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, ज्याला आपण “धम्मकार्य” असे म्हणू शकतो. बुद्धांच्या काळापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंतच्या थोर बौद्ध व्यक्तींमध्ये विद्वान, राज्यकर्ते, धर्मगुरू, लेखक, धर्मवेत्ते यासारखे अनेक प्रकारचे बौद्धजन आहेत. या लेखामध्ये आपण विसाव्या शतकातील टॉप 5 महान बौद्ध व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. या पाच व्यक्तींनी जगभरातील बौद्ध धर्मासाठी व्यापक असे कार्य केले आहे. बौद्ध धर्मासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या विसाव्या शतकातील पहिल्या पाच महान बौद्ध व्यक्तींचा आढावा या लेखात घेण्यात आलेला आहे.
महान ब्रिटिश विद्वान व लेखक संघरक्षित यांनी ही पाच महान बौद्धांची यादी तयार केली आहे. त्यांनी “Great Buddhists of the Twentieth Century (ग्रेट बुद्धिस्ट ऑफ द ट्वेंटीथ सेंचुरी)” नावाचे पुस्तक प्रकाशित केले, ज्याचा मराठीमध्ये अर्थ “विसाव्या शतकातील महान बौद्ध” किंवा “विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्ध” असा होईल. त्यामध्ये त्यांनी या 5 बौद्ध व्यक्तींची प्राथमिक माहिती दिली आहे तसेच त्यांचे बौद्ध धर्मासंबंधी कार्य सुद्धा सांगितले आहे.
ग्रेट बुद्धिस्ट ऑफ द ट्वेंटीथ सेंचुरी हे पुस्तक अवघे 36 पानांचे असून 1996 मध्ये ते इंग्लिश भाषेत प्रकाशित झाले होते. या पुस्तकात 20व्या शतकात बौद्ध धर्माच्या भवितव्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या पाच व्यक्तींच्या लघु चरित्रांचा हा क्रम आहे. त्यापैकी दोन – अनागरिक धर्मपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – हे दोघे बौद्ध धर्म भारतात परत आणण्यासाठी मुख्यतः जबाबदार होते. इतर – अलेक्झांड्रा डेव्हिड-नील, लामा गोविंदा आणि एडवर्ड कॉन्झे – हे पाश्चात्य होते आणि त्यांची बौद्ध धर्माशी बांधिलकी होती, जी त्यावेळी नविन होती, त्यांना महत्त्वपूर्ण ट्रेल-ब्लॅझर म्हणून परिभाषित केले गेले होते.
भारतातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणतात, बरेच लोक अनागरिक धम्मपाल यांच्याविषयी देखील जाणतात. परंतु इतर तीन सर्वश्रेष्ठ बौद्धांबद्दल देशातील खूप कमी लोकांना माहिती असेल. किमान भारतीय बौद्धांना या विसाव्या शतकातील 5 सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींबद्दल जरूर माहिती असायला हवी.
विसाव्या शतकातील 5 महान बौद्ध – 5 Great Buddhists of the Twentieth Century
1. अनागरिक धर्मपाल
नाव : Anagārika Dharmapāla
देश : श्रीलंका
जन्म : 17 सप्टेंबर 1864
मृत्यू : 29 एप्रिल 1933
अनागरिक धर्मपाल एक श्रीलंकन बौद्ध पुनरुज्जीवनवादी आणि लेखक होते. ते खालील गोष्टींसाठी विख्यात आहेत :
- पहिले जागतिक बौद्ध धर्मप्रचारक
- अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाच्या योगदानांपैकी एक
- ब्रिटीश राजवटीविरुद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती
- अनेक शतकांपासून अक्षरशः नामशेष झालेल्या बौद्ध धर्माला भारतात पुनरुज्जीवन देणारे एक अग्रणी
- आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप या तीन खंडांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार करणारे आधुनिक काळातील पहिले बौद्ध
थिऑसॉफिकल सोसायटीचे निर्माते हेन्री स्टील ऑल्कोट आणि हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्यासोबत, ते सिंहली बौद्ध धर्माचे प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवनवादी होते आणि त्याच्या पाश्चात्य प्रसारातील एक महत्त्वाची व्यक्ती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धशतकापूर्वी त्यांनी तमिळांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जनआंदोलनाला बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची 1891 मध्ये स्थापना केली. त्यांचा मुख्य उद्देश बोधगया मंदिराचे संरक्षण करावयाचा होता. तेव्हा पाश्चात्त्य देशांमध्ये बुद्धधम्माचे विशेष ज्ञान नव्हते. त्यांनी जागतिक बौद्धांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न केले व बौद्धांमधील पांथिक मार्ग (महायान, हीनयान, वज्रयान इत्यादी) न धरता सर्वांना एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नंतरच्या आयुष्यात, ते पूज्य श्री देवमित्त धर्मपाल या नावाने बौद्ध भिक्खू बनले. अनागरिक धम्मपाल यांनी आजीवन बौद्धधम्म प्रसाराचे कार्य केले जे अतिशय व्यापक होते त्यामुळे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये (Great Buddhists of the Twentieth Century) त्यांना प्रथम क्रमांकावर ठेवण्यात आले. अधिक माहिती
2. अलेक्झांड्रा डेव्हिड-नील
नाव : Alexandra David-Néel
देश : बेल्जियन-फ्रेंच
जन्म : 24 ऑक्टोबर 1868
मृत्यू : 8 सप्टेंबर 1969
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील एक बेल्जियन-फ्रेंच शोधकर्ती, अध्यात्मवादी, बौद्ध, अराजकतावादी, ऑपेरा गायिका आणि लेखिका होती. त्या 1924 च्या ल्हासा, तिबेटला दिलेल्या त्यांच्या भेटीसाठी सर्वात जास्त ओळखल्या जातात, जेव्हा तिबेटला भेटी देणे परदेशी लोकांना निषिद्ध होती. त्यांनी पौर्वात्य धर्म, तत्त्वज्ञान यासह त्यांच्या प्रवासाविषयी 30 हून अधिक पुस्तके लिहिली. अलेक्झांड्रा डेव्हिड-नीलने बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात प्रवास केला होता. त्यांच्या शिकवणींचा प्रभाव लेखक जॅक केरोआक आणि ॲलन गिन्सबर्ग, पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचे लोकप्रिय लेखक ॲलन वॉट्स आणि बाबा रामदास आणि गूढवादी बेंजामिन क्रेम. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये (Great Buddhists of the Twentieth Century) अलेक्झांड्रा डेव्हिड-नील यांना द्वितीय स्थानावर ठेवले आहे. अधिक माहिती
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नाव : Dr. Babasaheb Ambedkar
देश : भारत
जन्म : 14 एप्रिल 1891
मृत्यू : 6 डिसेंबर 1956
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हणले जाऊ लागले. महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले.
सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये (Great Buddhists of the Twentieth Century) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तृतीय स्थानावर ठेवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माकडे वळले. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी त्यांनी बौद्ध धम्म प्रचारासाठी घालवला, त्यांनी प्रत्यक्ष धर्मांतर 1956 मध्ये केले असले तरी त्यापूर्वीही ते विविध बौद्ध परिषदांमध्ये सहभागी झाले होते. एकंदरीत एका दशकापेक्षा कमी एवढ्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय व्यापक असे धम्मकार्य केले, तरीही ते या लेखामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले. भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या 1% सांगितलेली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या 5 ते 7 टक्क्यापर्यंत आहे, असे देशातील अनेक बौद्ध कार्यकर्ते दावा करतात. अधिक माहिती
4. अनागरिक गोविंदा
नाव : Anagarika Govinda
देश : जर्मन, ब्रिटिश, भारतीय
जन्म : 17 मे 1898
मृत्यू : 14 जानेवारी 1985
अनागरिक गोविंदा (जन्म: अर्न्स्ट लोथर हॉफमन) आर्य मैत्रेय मंडलाचे संस्थापक आणि तिबेटी बौद्ध धर्म, अभिधर्म आणि बौद्ध ध्यान तसेच बौद्ध धर्माच्या इतर पैलूंचे प्रतिपादक होते. ते चित्रकार आणि कवी देखील होते. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये (Great Buddhists of the Twentieth Century) अनागरिका गोविंदा यांना चौथ्या स्थानावर ठेवले आहे. अधिक माहिती
5. एडवर्ड कॉन्झ
नाव : Edward Conze
देश : इंग्लंड
जन्म : 1904
मृत्यू : 1979
एडवर्ड कॉन्झ हे मार्क्सवाद आणि बौद्ध धर्माचे गाढे विद्वान होते, जे प्रामुख्याने प्रज्ञापारमिता साहित्याच्या भाष्य आणि अनुवादासाठी ओळखले जातात. प्रज्ञापारमिता म्हणजे महायान बौद्ध धर्मातील ज्ञानाची परिपूर्णता”. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये (Great Buddhists of the Twentieth Century) एडवर्ड कॉन्झ यांना पाचव्या स्थानावर ठेवले आहे. अधिक माहिती
सारांश
मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण विसाव्या शतकातील पाच महान बौद्धांची (Great Buddhists of the Twentieth Century) प्राथमिक माहिती जाणून घेतली. बौद्ध धर्माशी संबंधित ही माहिती (buddha dharma information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
संदर्भ —
-
Sangharakshita gives a talk on Great Buddhists of the 20th Century 1996 (video)
-
Great Buddhists of the 20th Century by Sangharakshita (voice)
हे ही वाचलंत का?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी (अभिनेते आणि गायक) – Buddhist Celebrities in India
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्थान आहेत – नाना पाटेकर
- Rajratna Ambedkar biography | राजरत्न आंबेडकर का जीवन परिचय
- Ambedkar Family | जानें आंबेडकर परिवार की संपूर्ण जानकारी
- भारत के टॉप 10 सबसे प्रसिद्ध गायक (Pantheon और Wikipedia की HPI रैंकिंग)
- हिंदी विकिपीडिया पर भारत के टॉप 20 सबसे लोकप्रिय लोग (2016-2020)
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- अन्य लेख वाचा
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
Tumhi dileli mahiti mala far avadli.
Dhanyawad sir