प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित राज्यस्तरीय भीमस्मरण महापरीक्षा 2025 ची उत्तर पत्रिका सदर लेखात देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे 2,500 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. – उत्तर पत्रिका भीमस्मरण परीक्षा

महत्त्वाच्या तारखा
भीमस्मरण महापरीक्षा 2025 संदर्भातील महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- उत्तरपत्रिका दिनांक 12 मे 2025, सायं. 7:00 वा. रोजी ‘धम्म भारत’ या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
- गुणांची यादी दिनांक 18 मे 2025, सायं. 7:00 वा. रोजी जाहीर करण्यात येईल.
- निकाल व बक्षीस वितरण दिनांक 25 मे 2025, सायं. 7:00 वा. रोजी ‘धम्म भारत’ वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.
- सहभाग प्रमाणपत्रे दिनांक 18 मे ते 28 मे 2025 दरम्यान उपलब्ध करून दिली जातील.
मुख्य परीक्षा (40 प्रश्न)
11 मे 2025 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 ची मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेत एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे आहे.
टीप:
(१) बरोबर उत्तर गडद हिरव्या रंगात दाखवले आहे आणि त्यासमोर ✅ हे चिन्ह दिलेले आहे.
(२) प्रत्येक प्रश्नाखाली त्याचा संदर्भ दिलेला असून, त्यावर क्लिक करून तुम्ही मूळ स्त्रोतामधील माहिती थेट पाहू शकता.
प्रश्न. 01] खालीलपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत कोणते आहे?
(अ) हिंदू हे भारताचे आजारी लोक आहेत.
(ब) हिंदूंचे आजारपण इतर भारतीयांच्या आरोग्याला आणि सुखाला हानी पोहोचवत आहे.
A) केवळ (अ)
B) केवळ (ब)
C) (अ) आणि (ब) दोन्ही ✅
D) (अ) आणि (ब) दोन्ही नाहीत
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन , प्रस्तावना, पान क्रमांक 1
प्रश्न 02]
विधान A: सवर्ण सुधारक हिंदू धर्मातील जातिव्यवस्था नष्ट करू इच्छित होते.
विधान B: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, सवर्ण सुधारकांना रुढीवादी सहकाऱ्यांपासून अलग होण्याची इच्छा नव्हती.
वरील विधानांबाबत योग्य मत कोणते?
A) दोन्ही विधाने योग्य असून, विधान B हे A चे स्पष्टीकरण आहे.
B) दोन्ही विधाने योग्य आहेत, पण B हे A चे स्पष्टीकरण नाही
C) A अयोग्य आणि B योग्य ✅
D) A योग्य आणि B अयोग्य
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रस्तावना, पान क्रमांक 13
प्रश्न 03] समर्थ रामदासांचे विचार उद्धृत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘दासबोध’चा उपयोग काय दाखवण्यासाठी केला आहे?
A) मराठी संतांची उदारमतवादी भूमिका
B) अस्पृश्यता नाकारणारी संतपरंपरा
C) धर्मग्रंथातून जातिभेदाचा पुरस्कार ✅
D) ब्राह्मणेतरांचा ऐतिहासिक गौरव
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, पान क्रमांक 14
प्रश्न 04] खालील विधानांचा विचार करा:
1. सुधारकांनी सामाजिक चळवळ कुटुंब व्यवस्था सुधारणेच्या चौकटीत ठेवली.
2. सुधारकांच्या कार्यसूचीत जातिव्यवस्था नष्ट करणे हे होते.
A) केवळ 1 बरोबर ✅
B) दोन्ही बरोबर
C) केवळ 1 चूक
D) दोन्ही चूक
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, पान क्रमांक 20
प्रश्न 05] खालील विधाने विचारात घ्या:
1. धर्म समाजातील उच्चवर्णीय लोकांच्या वर्चस्वाचा आधार बनतो.
2. संपत्ती आणि भौतिक संसाधनांपेक्षा, धर्म व्यवस्था अधिक शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करतो.
A) केवळ पहिले विधान योग्य
B) दोन्ही विधाने योग्य ✅
C) केवळ दुसरे विधान योग्य
D) दोन्ही विधाने अयोग्य
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 3, पान क्रमांक 23
प्रश्न 06] खालीलपैकी अचूक विधान कोणते?
1. जातिव्यवस्था म्हणजे श्रमविभाजन होय.
2. जातिव्यवस्था म्हणजे श्रमिकांचे विभाजन होय.
3. जातिव्यवस्थेतील श्रमविभाजन हे धार्मिक दुराग्रहाच्या पूर्वनिर्धारणावर आधारित असते.
A) केवळ 3
B) 2 आणि 3 ✅
C) केवळ 1
D) 1 आणि 3
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 4
प्रश्न 07] जातीची वंशावळ दाखविणारा कुप्रसिद्ध ग्रंथ कोणता?
A) दासबोध
B) सह्याद्री खंड ✅
C) कोकण खंड
D) जातीयता
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 7
प्रश्न 08] स्वतःला कोण दैवज्ञ ब्राम्हण म्हणवून घेत?
A) सोनार ✅
B) मराठे
C) कायस्थ
D) महारातील काही उपजाती
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 9
प्रश्न 09] “मोठे हे लहानांना तुडवत आहेत, प्रबळ हे निर्बळांना झोडपत आहेत, क्रूर लोकांना कोणाची भीती नाही, दयाळू लोकांमध्ये धाडस नाही आणि शहाण्या माणसांना फिकरच नाही.”
हे शब्द कुणाचे?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) गौतम बुद्ध
C) मॉरिस ✅
D) कार्ल मार्क
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 11
प्रश्न 10] खालील विधान A आणि कारण R वाचा आणि योग्य पर्याय निवडा:
A (विधान):
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य समाजाच्या चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेला स्पष्टपणे नाकारले.
R (कारण):
कारण आर्य समाजाने चातुर्वर्ण्याला वैज्ञानिक तत्त्वज्ञान म्हणून सिद्ध केले होते आणि त्यात व्यक्तिगत श्रद्धा आणि धार्मिकता यांचा समन्वय साधला होता.
A) A बरोबर आहे, पण R दोन्ही चुकीचे आहे. ✅
B) A आणि R दोन्ही बरोबर आहेत, पण R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
C) A आणि R दोन्ही बरोबर आहेत, पण R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
D) A चुकीचे आहे, पण R बरोबर आहे.
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 15
प्रश्न 11]
विधान (Assertion): युरोपात सामाजिक क्रांती शक्य झाली, पण भारतात ती शक्य झाली नाही.
कारण (Reason): युरोपातील दुर्बल वर्गाला शस्त्र धारण करणे, शिक्षण घेणे, आणि लष्करात सहभागी होण्याचा अधिकार होता, तर भारतात चातुर्वर्ण्य पद्धतीने शुद्रांकडून ही सर्व साधने हिरावून घेतली गेली.
A) दोन्ही बरोबर आणि कारण स्पष्टीकरण आहे. ✅
B) दोन्ही बरोबर, पण कारण स्पष्टीकरण नाही.
C) विधान बरोबर, कारण चूक.
D) विधान चूक, कारण बरोबर.
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 17
प्रश्न 12] ‘हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) महात्मा गांधी
C) श्री संतराम
D) यापैकी नाही ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 19
प्रश्न 13] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, “शास्त्रांच्या विश्लेषणाने जाती नष्ट होणार नाहीत, कारण… .”
— या विधानाची योग्य कारणमीमांसा कोणती?
A) शास्त्रांवर आधारित असलेल्या समजुतींनी जातिव्यवस्थेला पवित्रता दिली आहे.
B) लोकांनी शास्त्रांमधून जे आत्मसात केले आहे, तेच त्यांच्या कृतीचे आणि श्रद्धेचे कारण आहे.
C) जातिव्यवस्थेचा नाश शास्त्रांचे खंडन आणि धार्मिक आधार नाकारल्याशिवाय शक्य नाही.
A) विधाने A आणि B
B) फक्त विधान C
C) विधाने A आणि C
D) सर्व पर्याय बरोबर ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 20
प्रश्न 14] हिंदू शास्त्रांनुसार ‘सदाचार’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
1. योग्य आणि चांगली कृती
2. चांगल्या किंवा वाईट अशा प्राचीन रूढी आणि परंपरा
3. नैतिक आणि विवेकाने वागणे
A) 1 आणि 3
B) फक्त 2 ✅
C) फक्त 3
D) फक्त 1
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 22
प्रश्न 15] डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म नष्ट करण्यास सांगतात, कारण —
1. ज्याला हिंदू लोक धर्म समजतात, तो धर्म नसून केवळ कायदा (संहिता) आहे.
2. ज्याला हिंदू लोक धर्म समजतात, तो जुनाट आणि प्राचीन कायदा आहे.
3. ज्याला हिंदू लोक धर्म समजतात, ती केवळ असमान समाजव्यवस्था आहे.
A) केवळ 3
B) 1 आणि 3
C) 1 आणि 2
D) वरील सर्व ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 23
प्रश्न 16] “जात हे दुसरे-तिसरे काही नसून ____चे मूर्तिमंत स्वरूप आहे.”
A) वर्णाचे
B) सनातनाचे
C) ब्राह्मणवादाचे ✅
D) शास्त्रप्रधानतेचे
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 24
प्रश्न 17] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, हिंदू धर्म वाचवण्यासाठी कोणता प्रमुख अडथळा दूर करणे आवश्यक आहे?
A) इस्लाम धर्म
B) इंग्रज शासन
C) ब्राह्मणवाद ✅
D) सामाजिक सुधारणावाद
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 24
प्रश्न 18] “परिवर्तन हा व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनाचा नियम आहे” — हा विचार खालीलपैकी कोणाचा आहे?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) प्रो. जॉन डेवी/ड्यूई
C) एडमंड बर्क
D) वरील सर्व ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, प्रकरण 25
प्रश्न 19] ‘जातिसंस्थेचे निर्मूलन’ ग्रंथात असे दर्शविले आहे की, लोक जातीप्रथा व अस्पृश्यता यांचे कट्टर अनुयायी राहिले, तर ___ .
A) धर्मनिष्ठ जीवन आणि स्वतःची उन्नती घडवत नसली, तरी भारतात संत आणि महात्म्यांचा दृष्टिकोन बदलत नाही.
B) धर्मनिष्ठ जीवन आणि स्वतःची उन्नती घडवत नाही.
C) संतांचे पवित्र जीवन व उदात्त प्रवचने यांचा लोकांच्या जीवनावर व वर्तनावर शास्त्रांच्या विरोधात इतका प्रभाव झाला की, लोक अज्ञानी लोकांपेक्षा संत आणि महात्मा झाले.
D) संतांचे पवित्र जीवन व उदात्त प्रवचने यांचा लोकांच्या जीवनावर व वर्तनावर शास्त्रांच्या विरोधात काहीच प्रभाव पडला नाही. ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, परिशिष्ट 2, प्रकरण 3
प्रश्न 20] “हिंदू हे दोन जगांमध्ये भटकत आहेत – एक मेलेले जग, तर दुसरे जन्म घेण्यास असमर्थ जग.”
हे मत कुणाचे आहे?
A) मॅथ्थु अर्नोल्ड ✅
B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C) कार्ल मार्क्स
D) महात्मा गांधी
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन, परिशिष्ट 2, पृष्ठ क्र. 92
प्रश्न 21] 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जातीमधील एकूण बौद्ध (नवबौद्ध) लोकसंख्येपैकी किती टक्के लोक महाराष्ट्रात राहतात?
A) 97%
B) 90% ✅
C) 77%
D) 68%
संदर्भ: धम्म भारत – नवबौद्ध म्हणजे काय? संकल्पना व तुलनात्मक विश्लेषण
प्रश्न 22] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित खालीलपैकी कोणते ठिकाण ‘स्फूर्तिभूमी’ म्हणून ओळखले जाते?
A) महू, मध्य प्रदेश
B) आंबडवे, महाराष्ट्र ✅
C) नागपूर, महाराष्ट्र
D) दिल्ली, भारत
संदर्भ: धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित महत्त्वाची स्थळे
प्रश्न 23] भारताच्या नव्या संसद भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य गोलाकार शिल्पामध्ये (भित्तिचित्रात) त्यांच्या सोबत खालीलपैकी कोणाची प्रतिमा साकारलेली आहे?
A) भगवान बुद्ध
B) महात्मा गांधी
C) पंडित नेहरू
D) सरदार पटेल ✅
संदर्भ: धम्म भारत – नवीन संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प
प्रश्न 24] खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले गेले आहेत?
1. व्हिएतनाम
2. श्रीलंका
3. जपान
4. द. कोरीया
A) फक्त 2, 3 व 4
B) फक्त 1, 2 व 4
C) फक्त 1, 3 व 4 ✅
D) फक्त 1, 2 व 3
संदर्भ: धम्म भारत – जगभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची यादी
प्रश्न 25] वर्ष 2024 मध्ये हिंदी विकिपीडियावर सर्वाधिक वाचल्या गेलेल्या चरित्रात्मक लेखांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लेख अव्वल (पहिल्या) क्रमांकावर होता. तर, भगवान बुद्ध यांचा लेख कोणत्या क्रमांकावर होता?
A) तिसऱ्या
B) पाचव्या
C) दहाव्या ✅
D) अकराव्या
संदर्भ: धम्म भारत – 2024 में, आंबेडकर को हिन्दी विकिपीडिया पर सबसे अधिक पढ़ा गया, उनके बाद गांधी थे; देखें टॉप 20 लिस्ट
प्रश्न 26] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ केव्हा प्रदान करण्यात आला?
A) 1990 ✅
B) 1991
C) 1992
D) 1993
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, पुरस्कार आणि सन्मान
प्रश्न 27] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कोणती पदवी प्राप्त केली होती?
A) M.A. in Economics
B) D.Sc. in Political science
C) Ph.D. in Sociology
D) M.Sc. in Economics ✅
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
प्रश्न 28] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “डॉक्टर ऑफ लॉज” (LL.D.) ही मानद पदवी खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने प्रदान केली होती?
A) कोलंबिया विद्यापीठ ✅
B) उस्मानिया विद्यापीठ
C) मुंबई विद्यापीठ
D) ऑक्सफर्ड विद्यापीठ
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, पुरस्कार आणि सन्मान
प्रश्न 29] खालीलपैकी कोणते राजकीय पद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही भूषविले नव्हते?
A) आमदार (राज्य विधिमंडळ सदस्य)
B) खासदार (केंद्रीय विधिमंडळ सदस्य)
C) विरोधी पक्षनेते (राज्य विधिमंडळ)
D) विरोधी पक्षनेते (केंद्रीय विधिमंडळ) ✅
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, राजकीय कारकीर्द
प्रश्न 30] 2012 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या “द ग्रेटेस्ट इंडियन” या सार्वजनिक सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम क्रमांकावर निवडले गेले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या नेत्यांना मागे टाकले होते?
1) महात्मा गांधी
2) वल्लभभाई पटेल
3) जवाहरलाल नेहरू
4) सुभाषचंद्र बोस
A) 1, 2 व 3
B) 1 व 4
C) 2 व 3 ✅
D) वरीलपैकी सर्व
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, प्रभाव व वारसा
प्रश्न 31] बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना कोणत्या वर्षी केली?
A) 1924 ✅
B) 1925
C) 1926
D) 1923
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा
प्रश्न 32] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले?
A) 1920
B) 1924
C) 1927 ✅
D) 1930
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारिता
प्रश्न 33] 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी हिंदू धर्म त्यागण्याची घोषणा केली होती?
A) मुंबई
B) नागपूर
C) येवला ✅
D) औरंगाबाद
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा
प्रश्न 34] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील मार्गदर्शक प्राध्यापक कोण होते?
A) एडवर्ड सॅपिर
B) जॉन ड्युई ✅
C) हर्बर्ट सायमन
D) एडविन कॅनन
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, कोलंबिया विद्यापीठ
प्रश्न 35] मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना दरमहा किती रुपये वेतन मिळत होते?
A) ₹450 ✅
B) ₹550
C) ₹350
D) ₹150
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
प्रश्न 36] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते राजकीय पक्ष प्रत्यक्षपणे स्थापन केले होते?
1) शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
2) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
3) इंडिपेंडेंट लेबर पार्टी
4) दलित काँग्रेस ऑफ इंडिया
A) फक्त 2
B) फक्त 1 आणि 3 ✅
C) फक्त 1, 2 आणि 3
D) सर्व 1, 2, 3 आणि 4
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, राजकीय कारकीर्द
प्रश्न 37] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खालील घटनांचा योग्य कालक्रमानुसार (चढत्या क्रमाने – सर्वात आधीपासून सर्वात नंतरपर्यंत) क्रम लावा:
1. कायदेमंत्री पदाचा राजीनामा
2. भारतीय संविधान सभेत प्रवेश
3. बौद्ध धम्माची दीक्षा
4. वरिष्ठ संसद सदनात (राज्यसभा) प्रवेश
A) 2 – 1 – 4 – 3 ✅
B) 2 – 1 – 3 – 4
C) 1 – 2 – 4 – 3
D) 2 – 4 – 1 – 3
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, राजकीय कारकीर्द
प्रश्न 38] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले पुस्तक कोणते होते?
A) Annihilation of Caste
B) The Problem of the Rupee
C) Castes in India ✅
D) Who Were the Shudras?
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, कोलंबिया विद्यापीठ
प्रश्न 39] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution’ हे पुस्तक (प्रबंध) कोणत्या शैक्षणिक पदवीच्या अनुषंगाने लिहिले?
A) एम.ए.
B) एलएल.एम.
C) पीएच.डी.
D) डी.एस्सी. ✅
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
प्रश्न 40] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला?
A) इस्लाम
B) शीख धर्म
C) बौद्ध धर्म ✅
D) ख्रिस्ती धर्म
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्मात धर्मांतर
समाप्त
सराव परीक्षा (10 प्रश्न)
4 मे 2025 रोजी भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 ची सराव परीक्षा (Practice Test) झाली. या परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या सराव परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे.
प्रश्न 1)
“जो विवेक करू शकत नाही, तो धर्मांध असतो;
जो विवेक करू शकत नाही, तो मूर्ख असतो;
जो विवेक करण्याचे धैर्य दाखवत नाही, तो गुलाम असतो.”
हे विचार कुणाचे आहेत?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) गौतम बुद्ध
C) गॅलिलिओ
D) एच. ड्रुमंड ✅
संदर्भ: ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ पुस्तक – पृष्ठ क्र. 1
प्रश्न 2) ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ (Annihilation of Caste) या ग्रंथाची दुसरी आवृत्ती कोणत्या वर्षी प्रकाशित केली गेली?
A) 1934
B) 1935
C) 1936
D) 1937 ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन – प्रस्तावना
प्रश्न 3) ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ हे भाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी लिहिले होते?
A) आकाशवाणी केंद्र, दिल्ली
B) अस्पृश्य विद्यार्थी संमेलन, पुणे
C) महार समाज सेवा संघ, मुंबई
D) जातपात तोडक मंडळ, लाहोर ✅
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन
प्रश्न 4) खालील विधानांचा विचार करा:
Assertion (A):
सामाजिक सुधारणा म्हणजे हिंदू समाजाची पुनर्बांधणी व पुनर्रचना होय.
Reason (R):
कारण, केवळ कुटुंबव्यवस्थेत बदल करून सामाजिक विषमता दूर होऊ शकत नाही.
वरील बाबत योग्य उत्तर काय आहे?
(A) A आणि R दोन्ही योग्य आहेत आणि R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✅
(B) A आणि R दोन्ही योग्य आहेत पण R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(C) A योग्य आहे पण R चुकीचे आहे.
(D) A चुकीचे आहे पण R योग्य आहे.
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन – प्रकरण 2
प्रश्न 5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोमच्या प्लेबिअन्सच्या प्रकरणाकडे का लक्ष केंद्रित करतात?
1. धर्माची माणसावर असलेली सत्ता दर्शविण्यासाठी.
2. जातीयतेला नष्ट करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक आहे हे दाखविण्यासाठी.
3. धर्माची ताकद पैशासारखीच महत्त्वाची आहे हे दाखवण्यासाठी.
A) केवळ 2 योग्य
B) केवळ 1 आणि 3 योग्य ✅
C) 3 योग्य
D) वरीलपैकी एकही नाही
संदर्भ: जातिव्यवस्थेचे निर्मूलन – प्रकरण तीनचा आशय
प्रश्न 6) 2024 मध्ये हिंदी विकिपीडियावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लेख किती वेळा वाचला गेला होता?
A) 20 लाखांपेक्षा जास्त वेळा
B) 25 लाखांपेक्षा जास्त वेळा
C) 10 लाखांपेक्षा जास्त वेळा ✅
D) 15 लाखांपेक्षा जास्त वेळा
संदर्भ: धम्म भारत – 2024 में, आंबेडकर को हिन्दी विकिपीडिया पर सबसे अधिक पढ़ा गया, उनके बाद गांधी थे; देखें टॉप 20 लिस्ट
प्रश्न 7) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील बौद्धांची “प्रवर्गनिहाय टक्केवारी” खालीलपैकी कोणती योग्य आहे?
A) 68% अनुसूचित जातीचे बौद्ध, 10% अनुसूचित जमातीचे बौद्ध, आणि 22% ओबीसी व सवर्ण बौद्ध ✅
B) 80% अनुसूचित जातीचे बौद्ध, 0.3% अनुसूचित जमातीचे बौद्ध, आणि 20% ओबीसी व सवर्ण बौद्ध
C) 90% अनुसूचित जातीचे बौद्ध, 9% अनुसूचित जमातीचे बौद्ध, आणि 1% ओबीसी व सवर्ण बौद्ध
D) 80% अनुसूचित जातीचे बौद्ध, 15% अनुसूचित जमातीचे बौद्ध, आणि 5% ओबीसी व सवर्ण बौद्ध
संदर्भ: धम्म भारत – नवबौद्ध म्हणजे काय? संकल्पना व तुलनात्मक विश्लेषण
प्रश्न 8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?
A) 14 एप्रिल 1889
B) 14 एप्रिल 1891 ✅
C) 15 ऑगस्ट 1891
D) 26 जानेवारी 1950
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, सुरुवातीचे जीवन
प्रश्न 9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “डॉक्टर ऑफ लिटरेचर” (D.Litt.) ही सन्माननीय पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली होती?
A) मुंबई विद्यापीठ
B) उस्मानिया विद्यापीठ ✅
C) कोलंबिया विद्यापीठ
D) ऑक्सफर्ड विद्यापीठ
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, पुरस्कार आणि सन्मान
प्रश्न 10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय संसदेत राज्यसभा सदस्य म्हणून किती वेळा निवड झाली होती?
A) एकदा
B) दोनदा ✅
C) तिनदा
D) एकदाही नाही
संदर्भ: मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, राजकीय कारकीर्द
समाप्त
मागील परीक्षांच्या उत्तरपत्रिका पाहा
- उत्तर पत्रिका : संविधान गौरव महापरीक्षा 2024
- उत्तर पत्रिका : भीमस्मरण महापरीक्षा 2024
- उत्तर पत्रिका : धम्मज्ञान महापरीक्षा 2023
WhatsApp चॅनल्स फॉलो करा
- प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनलची लिंक क्लिक करा
- धम्म भारतच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक क्लिक करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.