भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने प्रबुद्ध टीव्हीद्वारे भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 (वर्ष 2 रे) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आली आहे. सदर माहिती वाचून इच्छुकांनी भीमस्मरण महापरीक्षा 2025 साठी नाव नोंदणी आजच करा. 

भीमस्मरण महापरीक्षा 2025 - bhimsmaran-pariksha-2025
भीमस्मरण महापरीक्षा 2025

भीमस्मरण महापरीक्षेचा उद्देश्य

14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती केवळ उत्साहाने वा नाचून साजरी करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ते प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार मेहनतीने भारतीय समाजातील विषमता व अन्यायाला वाचा फोडून समता, न्याय आणि मानवाधिकारांचा मार्ग दाखवला. त्यांनी देशातील विषमतावादी व्यवस्थेचे समताधारित पुनर्स्थापन केले.

हा समताधारित देश टिकवायचा असेल, तर बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्यांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. या हेतूने प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलतर्फे भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

भीमस्मरण महापरीक्षा 2025 ही परीक्षा विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्यास प्रेरित करेल. तसेच प्रत्येक नागरिकाला देशनिर्मितीच्या कार्यात आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देईल.

चला, आपण सर्वजण एकत्र येऊन . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातला समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेला एक प्रगतशील भारत घडवूया!

(2024 मध्ये पहिली भीमस्मरण परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 2025 मध्ये ही दुसरी आवृत्ती घेण्यात येत आहे.)


बक्षिसे आणि पारितोषिके

10 विजेत्यांना एकूण 52,000 रुपयांची रोख बक्षिसे आणि पारितोषिके देण्यात येतील.

  • प्रथम पारितोषिक : ₹15,000
  • द्वितीय पारितोषिक : ₹12,500
  • तृतीय पारितोषिक : ₹10,000 (10 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव)
  • चतुर्थ पारितोषिक : ₹7,000 (अंध, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव)
  • पंचम पारितोषिक: ₹5,000 (महिलांसाठी राखीव)
  • षष्ठम ते दशम पारितोषिक (प्रोत्साहनपर 5 बक्षीसे): ₹2,500 [6वा ते 10वा क्रमांक मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी ₹500]
  • ई-प्रमाणपत्र : सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 

परीक्षेचे स्वरूप

मुख्य परीक्षा:

तारीख: 11 मे 2025 (ऑनलाईन)
प्रश्नसंख्या: 40 (MCQ)
एकूण गुण: 200
कालावधी: 40 मिनिटे

 

सराव परीक्षा:

तारीख: 4 मे 2025 (ऑनलाईन)
प्रश्नसंख्या: 10 (MCQ)
एकूण गुण: 40
कालावधी: 15 मिनिटे

सराव परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी आयोजित केली आहे.

 

महत्त्वाच्या सूचना:

  • परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) नसेल.
  • सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक असेल.
  • ही परीक्षा फक्त मराठीतच घेतली जाईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इन्हिलेशन ऑफ कास्ट (ग्रंथ) हा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे.

 

Syllabus Links

अभ्यासक्रमाचे साहित्य क्लिक करून अभ्यासावे.

भीमस्मरण महापरीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल –

 1️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन‘ ग्रंथ (20 प्रश्न)
  पुस्तक वाचा

2️⃣ धम्म भारत संकेतस्थळावरील 5 निवडक लेख (5 प्रश्न)
⇒  खालील लेख वाचा: ⇓⇓⇓

3️⃣ मराठी विकिपीडियावरील “बाबासाहेब आंबेडकर” लेख (15 प्रश्न)
⇒  लेख वाचा


महत्त्वाच्या तारखा

  • नोंदणीची अंतिम तारीख: 26 एप्रिल 2025
  • मुख्य परीक्षेची तारीख: 11 मे 2025 (दुपारी 1:30 ते 2:10)
  • निकाल जाहीर होण्याची तारीख: 18 मे 2025 

 

(वरील तारखांमध्ये बदल होणार नाही)

 

  • मुख्य परीक्षेनंतर एक-दोन दिवसांत उत्तरतालिका धम्म भारत वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.”
  • स्पर्धेचा निकाल 18 मे 2025 रोजी सायंकाळी 7:00 वाजता प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनल आणि धम्म भारत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

नियम व अटी

परीक्षेचे स्वरूप:

  • ही परीक्षा पूर्णतः ऑनलाईन असेल.
  • परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल.
  • स्पर्धक मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून परीक्षा देऊ शकतात.

 

वयोमर्यादा:

  • किमान वय: 10 वर्षे
  • कमाल वय: नाही

 

राखीव बक्षिसे:

  • 3र्‍या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची बक्षिसे राखीव असतील.

 

परीक्षेची लिंक:

  • परीक्षेच्या दिवशी पेपर सोडवण्यासाठीची लिंक WhatsApp वर पाठवली जाईल.
  • परीक्षेची लिंक मिळवण्यासाठी स्पर्धकाच्या मोबाईलमध्ये 7447755627 हा नंबर सेव्ह असणे अनिवार्य आहे.

 

पात्रता:

  • ही परीक्षा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आहे.

 

समान गुण मिळाल्यास:

  • कमी वेळेत परीक्षा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला प्राधान्य दिले जाईल.

 

नोंदणी शुल्क:

  • ₹100 फीस असेल.

 

प्रवेश रद्द करणे:

  • नाव नोंदणी केल्यानंतर स्पर्धकाचा प्रवेश रद्द होणार नाही.

 

नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार:

  • आयोजक परीक्षेच्या नियमांमध्ये आवश्यक ते बदल करू शकतात. 
  • त्यांना नवीन नियम बनवण्याचा तसेच जुना नियम रद्द करण्याचा अधिकार राहील.

नोंदणी कशी कराल?

WhatsApp वर “Registration Link” असा मेसेज पाठवा:
7447755627

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या:
PrabuddhaTV.in

WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल

 

ही भीमस्मरण परीक्षा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी आहे. चला, या ऐतिहासिक परीक्षेचा भाग बनूया आणि परिवर्तनाची नवी लाट निर्माण करूया! ✊


हेही बघा


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

7 thoughts on “भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025

  1. आदरणीय सर,
    मला असे वाटते की आपण यंदा घेत असलेल्या धम्मज्ञान महापरीक्षेच्या अभ्यासक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, क्रांती आणि प्रतिकांती ही पुस्तके असावीत. कारण माझ्या मते ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मावर लिहिलेली सर्वोत्तम पुस्तके आहेत. इतर पुस्तके या पुस्तकांशी स्पर्धा करू शकत नाही. माझी कळकळीची विनंती मान्य करावी, हीच नम्र विनंती.

    1. सर, आगामी परीक्षा संदर्भात तुम्ही सुचवलेल्या सूचनेचा नक्की विचार केला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मावर सर्वोत्तम पुस्तके लिहिली यावर दुमत नाही परंतु आपण इतरही महत्त्वाच्या बौद्ध पुस्तकांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. बौद्ध पुस्तकांमध्येच स्पर्धा करण्याला काही अर्थ नाही कारण आपल्याला ‘धम्म’ समजून घेण्यासाठी तो विविध अंगाने समजून घ्यावा लागेल. जर तुम्ही ‘बौद्धधम्म जिज्ञासा’ आणि ‘डॉ. आंबेडकर आणि बौद्धधर्म’ ही दोन पुस्तके वाचली तर त्यामध्ये देखील तुम्हाला बाबासाहेबांचे विचार आढळेल.

  2. आपण करत असलेल्या भारतरत्नाबौद्धिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन, विचार प्रचारार्थ त्यांच्या लिखित साहित्यावर भीमस्मरण ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून जो उपक्रम करत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व मंगलमय शुभेच्छा बाबासाहेबाना अभिप्रेत असलेल्या बौध्द धर्म व संविधान यावरही अभ्यासक्रम परीक्षा व्हावी.
    नामोबुध्दाय जयभीम

    1. जय भीम नमो बुद्धाय. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!