‘मोफत’ बौद्ध पुस्तके असे मिळवा घरपोच

या लेखात घरपोच ‘विनामूल्य’ बौद्ध पुस्तके मिळवण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. ही मोफत बौद्ध पुस्तके मराठी, हिंदीसह अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये उपलब्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्मावरील पुस्तके मिळवा आणि वाचायला सुरुवात करा. ही बौद्ध पुस्तके तुमचे जीवन ‘समृद्ध’ करतील.

  इस लेख को हिंदी में पढ़ें 

मोफत बौद्ध पुस्तके मिळवा
मोफत बौद्ध पुस्तके असे मिळवा घरपोच…

तुम्हाला जर “बुद्ध आणि त्यांचा धम्म” आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इतर पुस्तके मराठीमध्ये (तसेच पंजाबी, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू इत्यादी भाषांमध्ये) मोफत मिळवण्यात स्वारस्य असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कुठल्याही भागात रहात असाल तरीही तुम्हाला बौद्ध धर्मावरील पुस्तके तुमच्या घरापर्यंत मोफत मिळू शकतात; आणि त्यासाठी तुम्हाला शिपिंग, सीमाशुल्क किंवा इतर कोणत्याही संबंधित खर्चाचीही गरज नाही. पुस्तकांव्यतिरिक्त तुम्हाला बुद्धांचे फोटो सुद्धा मोफत मिळू शकतात.

The Corporate Body of the Buddha Educational Foundation ही तैवान देशामधील एक बौद्ध संस्था आहे, जी बौद्ध साहित्य (बौद्ध पुस्तके) विनामूल्य जगभर वितरित करते. ही संस्था छापील बौद्ध पुस्तके, PDF ई-पुस्तकेबुद्धांचे फोटोधम्म टॉक्सबौद्ध डिस्क यासारख्या विविध गोष्टी ही संस्था उपलब्ध करते, ते ही अगदी विनामूल्य.

बौद्ध धर्माचा प्रचार करणे आणि बौद्ध शिकवणी सर्वसामान्यांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हे “बुद्धा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट बॉडी” संस्थेचे ध्येय आहे. बौद्ध पुस्तके या श्रेणी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके सुद्धा समाविष्ट आहेत. बौद्ध व आंबेडकरी वाचकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण खजिनाच आहे.

स्वतः मला या संस्थेच्या माध्यमातून पाच पेक्षा जास्त वेळा घरपोच विनामूल्य पुस्तके मिळाली आहेत, आणि हा अतिशय चांगला अनुभव होता. ही चाचणी केल्यानंतरच मी आपल्या मराठी वाचकांसाठी विशेषतः महाराष्ट्रीय बौद्ध वाचकांसाठी हा लेख लिहिला आहे.

 

बौद्ध पुस्तके ऑर्डर करण्याची प्रक्रिया

बौद्ध धर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अनेक बौद्ध पुस्तके तसेच बुद्धांचे फोटो विनामूल्य आपल्या घरी मिळविण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

स्टेप 1. सर्वप्रथम, Google वर Budaedu.org सर्च करून “The Corporate Body of the Buddha Educational Foundation” वेबसाइटवर जा. अथवा ही link क्लिक करा.

(टीप : वेबसाइटवर Chinese भाषा दिसत असल्यास, ती इंग्रजीमध्ये बदला. यासाठी वेबसाइटच्या वरच्या भागातील कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला English भाषेचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.)

स्टेप 2.Dharma Materials” वर क्लिक करा (खालील स्क्रीनशॉट पहा) आणि वेबसाइट तुम्हाला सर्व धम्म सामग्रीच्या पृष्ठावर घेऊन जाईल.

Home page (photo no. 1)

स्टेप 3. धम्म मटेरिअल पेजवर, तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला “Request Form” दिसेल आणि उजव्या बाजूला “what’s available” – पुस्तकांच्या “वेगवेगळ्या भाषा” दिसतील. (खालील स्क्रीनशॉट पाहा)

Hindi” वर क्लिक करा. (बाणाच्या चिन्हाने दर्शवले आहे)

तसेच शेवटी “Buddha Picture” वर क्लिक केल्यानंतर बुद्धांचे फोटोज दिसतील. (बाणाचे चिन्ह)

Free Buddhist books 2
dhamma material (photo no 2)

स्टेप 4.Hindi” वर क्लिक केल्यानंतर – हिंदी श्रेणीमध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलगू, पाली, कन्नड, भोजपुरी, मल्याळी आणि इतर भारतीय भाषांमधील पुस्तकांची यादी दिसेल. (खालील स्क्रीनशॉट पहा)

या पुस्तकांपैकी जी पुस्तके तुम्हाला घरपोच हवी आहेत, त्या पुस्तकांचा “Book No.” (पुस्तक क्रमांक) आणि “Title” (पुस्तकाचे नाव) या दोन गोष्टी अचूकपणे नोट करून (लिहून) ठेवाव्यात. या दोन गोष्टी पुस्तके ऑर्डर करण्याच्या फॉर्मवर नोंदवाव्या लागणार आहेत. 

उदाहरणार्थ : बाबासाहेबांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ “मराठी” भाषेत मिळवण्यासाठी “IN013” हा बुक नंबर आणि “The Buddha and his Dhamma” हे टायटल नोट करावे. (खालील स्क्रीनशॉट पहा)

free Buddhist books 3
books in Indian languages (photo 3)

पुस्तकांखेरीज, “Buddha Picture” वर क्लिक करुन भगवान बुद्धांचे फोटो पाहावे आणि तुम्हाला हवा असलेल्या फोटोचा/चे क्रमांक आणि शीर्षक अचुकपणे नोट करावे. (खालील स्क्रीनशॉट पहा)

बुद्धांचे फोटो स्वतंत्रपणे ऑर्डर करून मागवावेत. म्हणजेच, बौद्ध पुस्तके आणि बुद्धाचे फोटो हे एकत्रितपणे न मागवता, दोन वेगवेगळ्या ऑर्डर्स द्वारे मागवावेत.

Free buddha pictures
Free buddha pictures (photo 4)

स्टेप 5. आता तुम्ही निवडलेल्या पुस्तकांची ऑर्डर देण्यासाठी Dharma Material पेजवर परतावे. या पेजच्या डाव्या बाजूला “Small Quantity” दिसेल, त्यावर क्लिक करावे. (खालील स्क्रीनशॉट पहा.)

free buddhist books - Small Quantity
free buddhist books – Small Quantity (photo 5)

स्टेप 6. स्मॉल क्वांटिटी वर क्लिक केल्यानंतर, नवीन पेजवर तुम्हाला कोविड-19 संदर्भातील एक दीर्घ सूचना दिसेल. (खालील स्क्रीनशॉट पहा)

या पेजच्या सर्वात खाली जा आणि तेथील “next” ऑप्शनवर क्लिक करावे.

 

स्टेप 7. आता नवीन विंडोमध्ये तुम्हाला “एप्लीकेशन फॉर्म” (The Application Form of Dharma Materials) दिसेल, जिथे तुम्हाला तुमचा तपशील आणि तुम्हाला ऑर्डर द्यावयाच्या पुस्तकांची माहिती अचुकपणे भरायची आहे. (खालील स्क्रीनशॉट पहा)

सुरुवातीला, तुमची वैयक्तिक माहिती भरा जसे की नाव, ईमेल आणि पत्ता इत्यादी.

अत्यंत महत्त्वाचे : खालील काही गोष्टी न चुकवता काळजीपूर्वक भराव्यात.

  • सर्वप्रथम Apply category समोर Individual लागू असेल, ते तसेच ठेवावे.
  • *Customs Tariffs समोर Afford to Pay निवडावे; “Not Afford to Pay” निवडू नये, अन्यथा फॉर्म सबमिट होणार नाही. (तथापि, स्मॉल क्वांटिटीसाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च वा सीमाशुल्क द्यावा लागणार नाही.)
  • Zipcode समोर तुमचा अचूक Pin code लिहावा.
  • Organizational Affiliation Name आणि Fax यांसमोर काहीही लिहायची आवश्यकता नाही.

*वेबसाईटवर “Afford to Pay” लिहिलेले असले तरीही तुम्हाला स्मॉल क्वांटिटीसाठी (5 पुस्तके) कस्टम फी (सीमाशुल्क) भरावा लागणार नाही. कदाचित, लार्ज क्वांटिटीच्या (100-200 पुस्तके) मोठ्या ऑर्डरसाठी तुम्हाला पैसे (कस्टम फी) देण्यास सांगितले जाईल.

free Buddhist books 6
Application Form (photo no 6)

स्टेप 8. फॉर्ममध्ये तुमचा तपशील भरल्यानंतर त्याखालीच तुम्हाला ऑर्डर द्यावयाच्या पुस्तकांची माहिती लिहायची आहे.

तुम्ही आधी नोट केलेल्या कमाल 5 पुस्तकांचा/ फोटोंचा Book No. (पुस्तक क्रमांक), Book Title (पुस्तकाची शीर्षके) आणि Quantity (पुस्तकाच्या प्रती) ही माहिती नोंदवा आणि सबमिट बटणवर क्लिक करा! (खालील स्क्रीनशॉट पहा, उदाहरण म्हणून पाच पुस्तकांची माहिती लिहिलेली आहे).

free Buddhist books
books (photo no 7)

टीप : एकावेळी जास्तीत जास्त 5 पुस्तकांची ऑर्डर द्या. तुम्हाला 5 पेक्षा जास्त पुस्तकांची गरज असल्यास, कृपया एकापेक्षा जास्त वेळा तुमची ऑर्डर द्या, तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा ऑर्डर करू शकता.

 

स्टेप 9. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर, पुन्हा एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही भरलेला फॉर्म आणि ऑर्डर केलेल्या पुस्तकांचा तपशील दिसेल. ही सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्या व ती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सर्वात खाली असलेल्या Yes to Submit बटनाला क्लिक करावे.

आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झाला असेल. तुम्ही तुमची डॉ. आंबेडकरांची पुस्तके आणि बौद्ध धर्माची पुस्तके मोफत मिळवण्यासाठी सज्ज आहात.

ही पुस्तके तुमच्यापर्यंत पोहोचायला 2 ते 3 महिने कालावधी लागू शकतो पण तुमच्यापर्यंत पुस्तके सुरक्षितपणे पोहोचतील याची खात्री बाळगा!


इतर महत्त्वपूर्ण लिंक्स 

  • मोफत छापील बौद्ध पुस्तके मिळवण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
  • मोफत PDF बौद्ध ई-पुस्तके मिळवण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
  • मोफत बुद्धांचे फोटोज/ पोस्टर्स मिळवण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
  • मोफत धम्मचर्चा (Dhamma Talks) पाहण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
  • मोफत बौद्ध डिस्क (Buddhist disc) मिळवण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.
  • मोफत डॉ. आंबेडकरांची PDF ई-पुस्तके मिळवण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.

उपलब्ध पुस्तकांच्या यादीमध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा धम्म मटेरियल तपासले तर तुम्हाला नवीन पुस्तके दिसू शकतात.


संस्थेसाठी : मोठ्या संख्येने बौद्ध पुस्तके मिळवण्यासाठी

तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून 50, 100 किंवा अधिक पुस्तके विनामूल्य ऑर्डर करू शकता.

जर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आणि बौद्ध धर्माची पुस्तके लोकांमध्ये वितरित करण्यासाठी “मोठ्या प्रमाणात” मिळवण्यात स्वारस्य असेल, तर Dhamma material पृष्ठावर जा आणि “लार्ज क्वांटिटी” वर क्लिक करा. तेव्हा तुम्हाला हा फॉर्म मिळेल. ह्या फॉर्मची प्रिंट काढता तो फॉर्म भरा घ्या आणि शेवटी खालील पत्त्यावर फॅक्स, ईमेल किंवा पोस्टद्वारे पाठवा –

Fax: +886-2-2391-3415
E-mailoverseas@budaedu.org
Air Mail: 11F, No.55, Hang Chow South Road, Sec. 1, Taipei City, Taiwan. (post code: 100)


वाचकांसाठी : हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.

ही बौद्ध पुस्तके ऑर्डर करताना तुम्हाला काही अडचणी येत असल्यास कृपया मला ई-मेल वर किंवा व्हाट्सअप वर कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!