सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल? आरक्षण रद्द केल्यामुळे कोणकोणते फायदे तोटे होऊ शकतात याविषयीची थोडक्यात माहिती आपण बघूयात…
जात आणि आरक्षण हे आपल्या देशातील अत्यंत ज्वलंत विषय आहेत. सध्या भारतात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांना आरक्षण दिले जाते. मागास जातीसमूहांना पुढे आणणं, त्यांना संधी देणं, प्रतिनिधित्व देणे हा आरक्षण देण्यामागे उद्देश आहे. आरक्षण हे केवळ जातीच्या आधारावर दिले जातं असं नव्हे तर ते लिंगाच्या आधारावर सुद्धा दिलं जातं, ते शारीरिक व्यंग यावर सुद्धा दिलं जातं. त्यामुळे सर्व आरक्षण रद्द झालं तर त्याचा परिणाम महिला, अपंग, अनाथ आणि इतरही घटकांवर होईल. जर SC, ST, OBC, महिला… या सर्वांचे आरक्षण रद्द केले तर कोण-कोणत्या संभावना उद्भवू शकतात यावर आपण विचार करू.
सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
१) आरक्षण रद्द झाले तर खुल्या प्रवर्गातील लोकांपुढे जास्त संधी उपलब्ध होतील. 40.5% वरून शंभर टक्के 100% संधी उपलब्ध होतील.
२) केवळ गुणवत्तेचा विचार करून नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये
प्रवेश मिळेल.
३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या आरक्षित जातसमूहांना त्यांचे अधिकार संपुष्टात आले असे वाटेल आणि ते रस्त्यावर येतील.
४) आरक्षण रद्द झाले तर एकाच वेळी देशातील सर्व राज्यांमध्ये दंगली उसळतील आणि भारतीय सैन्याला पाचरण करावे लागेल व मार्शल लॉ लागू करावा लागेल.
५) सर्व आरक्षण रद्द झाले तर देशातील विविध क्षेत्रांमधील सर्व प्रमुख जागांवर सवर्ण समाजाचे वर्चस्व राहील.
६) जर एखाद्या केंद्र शासनाने संसदेत आरक्षण रद्द केले तर पुढे त्यांचा पक्ष निवडून येणार नाही. कारण देशातील 80 टक्के मतदार हे मागास प्रवर्गातील आहेत.
७) सर्व आरक्षण रद्द झाले तर पुढारलेले लोक अजून पुढे जातील व मागासलेले लोक अजून मागास होतील.
८) जाती व्यवस्था अस्तित्वात असली आणि तेव्हा सर्व आरक्षण रद्द झाल्यास जातींमधील दरी अधिक घट्ट होईल. जाती-जातींमधील संघर्ष वाढेल, कारण जातींमध्ये असमानता असेल.
९) सर्व आरक्षण रद्द केलं तर महिलांसाठी असलेल्या उपाययोजना सुद्धा रद्द होतील. महिलांना अनेक राज्यांमध्ये बस आणि मेट्रो यामध्ये मिळणाऱ्या अर्ध्या किंवा पूर्ण तिकिटाच्या सवलती सुद्धा संपतील.
१०) सर्व आरक्षण रद्द केलं तर त्याचा फटका संसदेतील महिला आरक्षणाला सुद्धा बसेल. भारतीय संसदेमध्ये महिलांना कायद्याद्वारे मंजूर झालेले ते 33 टक्के आरक्षण आपोआप संपुष्टात येईल.
११) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी महिलांना पुरुषांशी कॉम्पिटिशन करावे लागेल, पुरुषांएवढे गुण घ्यावे लागतील. या प्रक्रियेत महिला संख्येने कमी होऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरुषांचे वर्चस्व वाढेल.
१२) विविध योजनांमध्ये महिलांना मिळणारी सूट रद्द होईल, परिणामी त्यांना गृहिणी बनवून चूल आणि मूल यावर लक्ष पुरवावे लागेल. पुरुषप्रधान संस्कृती प्रबळ होईल.
१३) अनाथ आणि अपंग लोकांना मिळणारे आरक्षण आणि सवलती रद्द होतील. तेव्हा ते इतरांशी थेट कॉम्पिटिशन करण्यात सक्षम नसतील आणि त्यांच्या विकासाच्या वाटा बंद होते.
१३) अल्पसंख्याक म्हणून अनेक धार्मिक समूहांना विविध सवलती दिल्या जातात, त्या सुद्धा संपतील.
१४) तृतीयपंथी व्यक्तींना पोलीस दलामध्ये येण्यासाठी सवलती दिल्या जातात, आरक्षण रद्द झाल्यामुळे पोलीस दलातून तृतीयपंथी गायब होतील.
१५) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसभा आणि विधानसभा यांवर असलेल्या राखीव जागा संपुष्टात आल्याने त्यांचे राजकीय आरक्षण रद्द होईल.
१६) ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाले तर सवर्ण समाजांतील गरीब विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी होईल.
१७) सर्व आरक्षण रद्द झाले तर मागास आणि अतिमागास जाती कायमच्या मागे पडतील. त्यांचा विकास होण्याच्या शक्यता कायमच्या मावळतील.
१८) सर्व आरक्षण रद्द झाले तर ज्येष्ठांना मिळणारा विविध सुविधा मिळणार नाही. उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये हाफ भाडे आणि फुल भाडे पूर्णपणे माप आहे, ते आरक्षण रद्द झाल्यानंतर असणार नाही.
मागास समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षण हे देशामध्ये खूप गरजेचे आहे, हे भारतीयांनी समजून घेतलं पाहिजे. सकारात्मक दृष्टीने भारतात आरक्षण लागू करण्यात आले आहे. सर्व आरक्षण रद्द झाले तर प्रतिनिधित्व व समान संधीच्या अभावामुळे भारताचा विकास न होता अधोगतीच होईल.
तुम्हाला काय वाटते? आरक्षण रद्द केले तर कोणते फायदे आणि नुकसान होऊ शकते? कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुमचे विचार. धन्यवाद.
हे ही बघा
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.