प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित राज्यस्तरीय संविधान गौरव महापरीक्षा 2024 ची उत्तर पत्रिका सदर लेखात देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे 2,000 स्पर्धकांनी नोंदणी केली होती.
मुख्य परीक्षा (40 प्रश्न)
8 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय संविधान गौरव ऑनलाईन महापरीक्षा 2024 ची मुख्य परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 40 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात आले होते.
संविधान गौरव परीक्षेची उत्तरपत्रिका खालीलप्रमाणे आहे.
1) भारतीय संविधान स्वीकृती दिवस कोणता?
A) 26 नोव्हेंबर 1949 ✅
B) 26 जानेवारी 1950
C) 15 ऑगस्ट 1947
D) वरीलपैकी नाही
संदर्भ : भारतीय संविधान, प्रस्तावना
2) पुढील विधाने लक्षात घ्या.
1. भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही.
2. सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही.
अयोग्य नसलेले/ली विधान/ने ओळखा.
A) फक्त 1
B) फक्त 2
C) दोन्ही ✅
D) न 1, न 2
संदर्भ : भारतीय संविधान – घटना वैशिष्ट्ये
3) भारतीय संविधानाचे ओळखपत्र म्हणून कशास संबोधतात?
A) सरनामा ✅
B) संविधानाचा भाग 1
K) 42वी घटनादुरुस्ती
D) वरीलपैकी नाही
संदर्भ : भारतीय संविधान, मूलभूत संकल्पना
4) खालील विधाने विचारात घ्या.
अ) संविधानाची प्रस्तावना किंवा उद्देश पत्रिका हा संविधानाचा भाग आहे.
ब) परिशिष्ट किंवा Schedule हे संविधानाचा भाग नाहीत.
A) (अ) अयोग्य परंतु (ब) योग्य
B) (अ) आणि (ब) हे दोन्ही योग्य
C) (अ) आणि (ब) हे दोन्ही अयोग्य
D) (अ) योग्य परंतु (ब) अयोग्य ✅
संदर्भ : भारतीय संविधान, प्रस्तावना
5) खालील विधाने विचारात घ्या.
1. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत.
2. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करणे देखील एक मूलभूत हक्क आहे.
A) दोन्ही विधाने अचूक ✅
B) केवळ विधान 1 अचूक
C) केवळ विधान 2 अचूक
D) दोन्ही विधाने चूक
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 3
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या घटकास “भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा” (Heart and Soul of the Constitution) म्हटले आहे?
A) उद्देशपत्रिका (सरनामा)
B) भाग 3 (मूलभूत हक्क)
C) समतेचा हक्क
D) यापैकी नाही ✅
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 3, कलम 32
7) खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधान निवडा.
1. मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करतात.
2. मूलभूत अधिकार केवळ सरकारविरोधी संरक्षण देतात; व्यक्ती-व्यक्तीतील भांडणांमध्ये त्यांचा उपयोग होत नाही.
3. मूलभूत अधिकार भारतीय संविधानात अंमलात आणण्याजोगे (Justiciable) आहेत.
4. राष्ट्रीय आपत्तीच्या (आणीबाणीच्या) वेळी, तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित (रद्द) होऊ शकत नाहीत.
A) फक्त 1 आणि 3 योग्य ✅
B) फक्त 1, 2 आणि 3 योग्य
C) फक्त 1 आणि 4 योग्य
D) सर्व विधाने योग्य
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 3, मूलभूत अधिकार
8) खालील विधाने विचारात घ्या.
भारतीय संविधानाचा भाग 4 मधील कलम 44 अर्थात ‘समान नागरिक कायदा’ (UCC) या संबंधित खालील विधाने लक्षात घ्या.
1. हे मुस्लिमांना नियंत्रित आणि दबावात ठेवण्यासाठी आहे.
2. लिंग, धर्म आणि जात यावर आधारित भेदभाव कमी करून संपविते.
3. सर्व जातींच्या सवलती व आरक्षण संपविते.
A) केवळ विधान 1 बरोबर
B) केवळ विधान 2 बरोबर ✅
C) केवळ विधान 3 बरोबर
D) सर्व विधाने चूक
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 4, कलम 44
9) बार्टी (BARTI) ही संस्था भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे निर्माण करण्यात आली आहे?
A) अनुच्छेद 41
B) अनुच्छेद 46 ✅
C) अनुच्छेद 338
D) वरीलपैकी नाही
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 4, कलम 46
10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340 च्या माध्यमातून कोणत्या वर्गाच्या उन्नती व कल्याणासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी आयोग स्थापण्याचे उद्दिष्ट ठेवले होते?
A) इतर मागासवर्गीय (OBC) समुदाय ✅
B) अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST)
C) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
D) धर्मांतरित बौद्ध नागरिक
संदर्भ : भारतीय संविधान, भाग 16, कलम – 340
11) भारतीय संविधानाच्या भाग 16 मध्ये कलम 330 ते कलम 342 यांचा समावेश का करण्यात आला?
A) अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना राजकीय प्रतिनिधित्व देणे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे.
B) इतर मागासवर्गीय (OBC) समुदायाच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्यासाठी धोरणे तयार करणे.
C) वंचित घटकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे.
D) वरीलपैकी सर्व ✅
संदर्भ : भारतीय संविधान, भाग – 16
12) भारतीय संविधानामधील भाग 16 नसल्यास काय परिणाम होऊ शकले असते?
1. वंचित आणि मागासवर्गीय घटकांना समान संधी प्राप्त झाली नसती.
2. भाग-16 च्या अभावाने सामाजिक न्यायाची कमतरता भासली असती.
3. ओबीसींच्या उत्थानासाठी OBC आयोग स्थापन होऊ शकला नसता.
A) केवळ विधान 3 बरोबर
B) विधान 3 बरोबर तर 1 आणि 2 चूक
C) विधान 2 आणि 3 बरोबर तर 1 चूक
D) तिन्ही विधाने बरोबर ✅
संदर्भ : भारतीय संविधान, भाग – 16
13) पुढील विधान विचारात घ्या.
1. ‘सार्वभौमत्व’ हा शब्द ‘स्वातंत्र्य’ या शब्दासाठी वापरला जातो.
2. राज्य ‘सार्वभौम’ असणे म्हणजे राज्यास स्वतःचे संविधान असणे होय.
A) दोन्ही विधाने अचूक ✅
B) केवळ विधान 2 अचूक
C) विधान 1 चूक; 2 अचूक
D) विधान 1 बरोबर; 2 चूक
संदर्भ : 11वी राज्यशास्त्र, प्रकरण पहिले – राज्य, पान क्र. 5
14) ………….. राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास मान्यता देते.
A) उदारमतवाद
B) अभिजात उदारमतवाद
C) नवउदारमतवाद
D) यापैकी नाही ✅
संदर्भ – 11वी राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे – स्वातंत्र्य आणि हक्क, पान क्र. 11
15) ज्याप्रमाणे भारताचे कायदेमंडळ संसद (पार्लमेंट) आहे तसे अमेरिकेचे कायदेमंडळ कोणते?
A. काँग्रेस ✅
B. सिनेट
C. हाऊस ऑफ लॉर्ड्स
D. संसद
संदर्भ : 11वी राज्यशास्त्र, प्रकरण तिसरे – समता आणि न्याय, पान क्र. 26
16) भारतात महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला?
A) 1947 पासून
B) 1949 पासून
C) 1950 पासून ✅
C) 1951 पासून
संदर्भ : 11वी राज्यशास्त्र, प्रकरण पाचवे – प्रतिनिधित्वाची संकल्पना, पान क्र. 39
17) न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य कोणते आहे?
A) कायदा करणे
B) कार्यवाही करणे
C) अभिनिर्णय ✅
D) नेमणुका करणे
संदर्भ : 11वी राज्यशास्त्र, प्रकरण सहावे – न्यायमंडळाची भूमिका, पान क्र. 44
18) “संविधान कितीही चांगले असले पण त्याची अंमलबजावणी करणारे जर चुकीचे असतील तर ते चुकीचे ठरेल आणि संविधान कितीही वाईट असले पण त्यांची अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ते योग्यच ठरेल!”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील वाक्य राज्यसभा टीव्हीने संविधान मालिकेत कुणाच्या तोंडून वदविले (उद्धृत केले) आहे?
A) महात्मा गांधी ✅
B) मोहम्मद अली जिना
C) पंडित जवाहरलाल नेहरू
D) सरदार वल्लभभाई पटेल
संदर्भ : संविधान मालिका भाग – 1, वेळ 37:50
19) 21 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेमध्ये मूलभूत अधिकार याविषयीची चर्चा चालू असताना ‘अस्पृश्यतेच्या मुळाशी जातीभेद आहे’ असे मत कोणी मांडले?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) जगजीवन राम
C) सर बी.एन. राव
D) डॉ. एस.सी. बॅनर्जी ✅
संदर्भ : संविधान मालिका, भाग – 3, वेळ – 38:06
20) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, मूलभूत अधिकार किंवा कोणतेही अधिकार केव्हा प्रभावशाली किंवा सुरक्षित राहतात?
A) त्या अधिकारांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर
B) समाज आणि देशातील लोकांच्या सद्विवेकबुद्धीच्या वर्तणुकीमुळे ✅
C) संसद आणि न्यायालयाद्वारे
D) पोलीस आणि लष्करी कार्यवाहीद्वारे
संदर्भ : संविधान मालिका, भाग – 3, वेळ 46:00
21) संविधान सभेतील चर्चेदरम्यान ‘युनिफॉर्म हिंदू कोड बिलास’ काय म्हणून टीका केली गेली?
A) डॉ. आंबेडकर बिल
B) हिंदू महिला कोड बिल ✅
C) वुमन रिझर्वेशन बिल
D) हिंदू धर्मविरोधी बिल
संदर्भ : संविधान मालिका – एपिसोड – 5, वेळ – 53:15
22) “सरकार त्यांच्या मर्जीतल्या न्यायाधीशांना नेमून सरकारला हवे तसे निर्णय देण्यास सांगतात” ही बाब संविधान सभेतील चर्चेत कोणी मांडली होती?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) एम. पी. मिश्रा ✅
C) डॉ. राजेंद्र प्रसाद
D) श्यामा प्रसाद मुखर्जी
संदर्भ : संविधान मालिका, एपिसोड 6, वेळ – 53 ते 56 मिनिटे
23) ‘संविधान’ या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोणी साकारली होती?
A) जब्बार पटेल
B) सचिन देशमुख
C) सागर खेडेकर
D) वरीलपैकी नाही ✅
संदर्भ : संविधान मालिका
24) 25 वर्षांनंतर, ब्राजेश्वर प्रसाद यांचे कोणते दोन शब्द संविधानाच्या सरनाम्यात सामील केले गेले?
A) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ✅
B) लोकशाही आणि गणराज्य
C) सार्वभौम आणि समाजवादी
D) एकता आणि एकात्मता
संदर्भ : संविधान मालिका – भाग – 10, वेळ – 13:30 मिनिटे
25) संविधान सभेमध्ये अंतिम आणि ऐतिहासिक भाषण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा येत होते तेव्हा काय घडले?
A) सभासदांचा गदारोळ आणि बाबासाहेबांच्या भाषणाला विरोध
B) सर्व संविधान सभेच्या सदस्य उभे राहून टाळ्या वाजवून घटनाकार डॉ. आंबेडकरांचे स्वागत ✅
C) बाबासाहेबांच्या भाषणाच्या आधी ठराविक वेळेप्रमाणे राष्ट्रगीत गायन
D) संविधान सभेची महात्मा गांधी यांना आदरांजली
संदर्भ : संविधान मालिका, भाग 10 वेळ – 33:00 मिनिटे
26) मसुदा समितीला भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
A) 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
B) 141 दिवस ✅
C) 165 दिवस
D) 3 वर्षे
संदर्भ : संविधान मालिका, भाग 10, वेळ – 35:19 ते 35:30 मिनिटे
27) पुढील विधान विचारात घ्या.
1. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
2. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.
A) केवळ विधान 1 बरोबर
B) केवळ विधान 2 बरोबर ✅
C) दोन्ही विधाने बरोबर
D) दोन्ही विधाने चूक
संदर्भ : संविधान मालिका, भारतीय संविधान निर्मिती
28) खालील विधाने लक्षात घ्या :
अ) बंगाल प्रांतामधून मुस्लिम लोकांनी निवडून दिल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले होते.
ब) मुस्लिम लीगने सहकार्य केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पहिल्यांदा जावू शकले.
क) संविधान सभेत जाण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगालमधील राखीव मतदार संघातून उभे असल्याने त्यांना मुस्लिम लोकांच्या मतांची तसेच मुस्लिम लीगच्या सहकार्याची आवश्यकता नव्हती.
A) केवळ (क) बरोबर ✅
B) केवळ (अ) बरोबर
C) केवळ (ब) बरोबर
D) (अ) आणि (ब) बरोबर
संदर्भ : सर्वव्यापी आंबेडकर मालिका, घटनाकार आंबेडकर, वेळ – 5:15
29) संविधान बनवणाऱ्या मसुदा समितीचे पूर्ण काम एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले असल्यासंबंधीचे पुरावे कोणते?
1. 5 नोव्हेंबर 1948 रोजीच्या संविधान सभेतील चर्चा व भाषणे
2. विशेषतः टी. टी. कृष्णमाचारी यांचे भाषण
A) केवळ 1 अचूक
B) केवळ 2 अचूक
C) दोन्ही अचूक ✅
D) दोन्ही चूक
संदर्भ : सर्वव्यापी आंबेडकर, घटनाकार आंबेडकर, वेळ – 16:40
30) 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील आपल्या अंतिम व ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भविष्याविषयी कोणती चिंता व्यक्त करतात?
1. राजकीय समता प्रस्थापित करण्यास येणाऱ्या अडचणी विषयी
2. सामाजिक समता प्रस्थापित करण्यास येणाऱ्या अडचणी विषयी
3. आर्थिक समता प्रस्थापित करण्यास येणाऱ्या अडचणी विषयी
A) विधान 1 आणि 2 बरोबर
B) विधान 2 आणि 3 बरोबर✅
C) केवळ विधान 1 बरोबर
D) सर्व विधाने बरोबर
संदर्भ : सर्वव्यापी आंबेडकर, घटनाकार आंबेडकर, वेळ 22:00
31) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार, साऱ्या हिंदुस्तानाचे एकीकरण घडून आणायचे असेल तर त्यासाठी कोणती भाषा शिकली पाहिजे?
A) संस्कृत भाषा
B) हिंदी भाषा ✅
C) इंग्लिश भाषा
D) पाली भाषा
संदर्भ : धम्म भारत – ‘या’ 12 भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत होत्या!
32) 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात अनुसूचित जमातींची (ST) लोकसंख्या 1 कोटी 5 लाख होती; तर त्यांपैकी बौद्ध धर्मीयांची संख्या किती होती?
A) 20 लाख
B) 2 लाख
C) 20 हजार ✅
D) 2 हजार
संदर्भ : धम्म भारत – महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी आणि प्रत्येक ST जमातीची लोकसंख्या
33) 2024 मधील 18व्या लोकसभा निवडणुकीद्वारे संसदेत पोहोचणारे बौद्ध धर्मीय खासदार खालीलपैकी कोणते आहेत?
1. बळवंत वानखेडे (काँग्रेस)
2. किरेन रिजिजू (भाजप)
3. चंद्रशेखर आजाद (आसप)
4. वर्षा गायकवाड (काँग्रेस)
5. प्रकाश आंबेडकर (वंबआ)
A) सर्व 1, 2, 3, 4 व 5
B) फक्त 1, 2, 3 व 4
C) फक्त 1, 2 व 4 ✅
D) फक्त 1, 3 व 4
संदर्भ : धम्म भारत – ‘ये’ हैं 18वीं लोकसभा में बौद्ध सांसद (2024–2029)
34) लोकसंख्येच्या प्रमाणानुसार (8.53%), महार तथा बौद्ध समाजाचे किती आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत असायला हवेत?
A. 14 ते 15 बौद्ध आमदार
B. 18 ते 19 बौद्ध आमदार
C. 24 ते 25 बौद्ध आमदार ✅
D. 28 ते 29 बौद्ध आमदार
संदर्भ : धम्म भारत – महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधी किती असावे आणि किती आहे?
35) जर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या 13 टक्के आरक्षणाचे उप-वर्गीकरण करावयाचे झाले तर मातंग (मांग) जातसमूहाला किती आरक्षण मिळू शकते?
A. 1.5 टक्के
B. 2.5 टक्के ✅
C. 3.5 टक्के
D. 7.5 टक्के
संदर्भ : धम्म भारत – SC-ST आरक्षणाचे उप-वर्गीकरण केले तर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळेल?
36) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, राजकीय लोकशाही ही कोणत्या चार गृहीतांवर आधारलेली असते?
1) व्यक्ती हेच एकमेव साध्य आहे.
2) व्यक्तीला काही आदेश हक्क असतात व राज्यघटनेने त्या हक्कांची हमी त्याला दिलीच पाहिजे.
3) कोणत्याही विशेषाधिकाराच्या प्राप्तीखातर व्यक्तीला आपल्या हक्कांचा त्याग करावा लागू नये.
4) इतरांवर शासन करण्याची सत्ता राज्यसंस्थेकडून कोणत्याही खासगी व्यक्तींना दिली जाता कामा नये.
A. फक्त 4
B. फक्त 3 व 4
C. फक्त 2, 3 व 4
D. सर्व 1, 2, 3 व 4 ✅
संदर्भ : धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विषयक विचार
37) “महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले.”
वरील उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रसंगी काढले होते?
A) 1931 मध्ये मुंबईतील म. गांधींशी झालेल्या पहिल्या भेटीत
B) 1931 मध्ये इंग्लंडमधील दुसर्या गोलमेज परिषदेत म. गांधींसमोर
C) 1932 मध्ये म. गांधींनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर ✅
D) 1948 मध्ये महात्मा गांधी यांचे निधन झाल्यानंतर
संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर, पुणे करार
38) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (पीएचडी) पदवी कोणत्या विद्यापीठातून संपादित केली?
A) बॉम्बे युनिव्हर्सिटी, भारत
B) कोलंबिया युनिव्हर्सिटी, अमेरिका ✅
C) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ब्रिटन
D) ऑनरेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन, ब्रिटन
संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर – उच्च शिक्षण
39) खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे?
A. महाराष्ट्रीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म किंवा मृत्यू या दोन्हींपैकी एक घटना महाराष्ट्रात झाली होती.
B. आपल्या हयात भावंडांमध्ये भीमराव (बाबासाहेब) हे सर्वात लहान व चौदावे अपत्य होते.
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर होते.
D. राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘लोकमान्य’ उपाधी दिली होती. ✅
संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर – सुरुवातीचे जीवन (B), वैयक्तिक जीवन (C), प्रभाव व वारसा (D)
40) भारत सरकारने अधिकृतपणे ‘भारतीय संविधान दिन’ केव्हापासून साजरा करण्यास सुरुवात केली?
A) 1951
B) 1991
C) 2015 ✅
D) 2016
संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर – पुरस्कार व सन्मान – समर्पित विशेष दिवस
समाप्त
सराव परीक्षा (10 प्रश्न)
4 डिसेंबर 2024 रोजी संविधान गौरव महापरीक्षा 2024 ची सराव परीक्षा (Practice Test) झाली. या परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या सराव परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे.
प्रश्न 1) भारतीय संविधानाचा अंमलबजावणी दिवस कोणता?
A) 26 नोव्हेंबर 1949
B) 15 ऑगस्ट 1947
C) 26 जानेवारी 1950 ✅
D) वरील पैकी एक ही नाही.
संदर्भ – भारतीय संविधान
प्रश्न 2) पुढील विधान विचारात घ्या.
1. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत ‘राज्य’ नव्हते.
2. स्वातंत्र्यप्राप्ती आधी भारत हे सर्व ‘सार्वभौम राज्य’ होते.
A) केवळ विधान 1 अचूक ✅
B) केवळ विधान 2 अचूक
C) दोन्ही विधान चूक
D दोन्ही विधान अचूक
संदर्भ – 11वी राज्यशास्त्र – राज्य : प्रकरण – 1, पान क्रमांक – 5
प्रश्न 3) ‘नकारात्मक स्वातंत्र्य’ राज्य संस्थेस व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास पाठबळ देते, तर ‘आधुनिक उदारमतवाद’ राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास मान्यता देत नाही.
A) पूर्वार्ध योग्य तथा उत्तरार्ध अयोग्य
B) पूर्वार्ध अयोग्य तथा उत्तरार्ध योग्य
C) पूर्वार्ध तथा उत्तरार्ध हे दोन्ही योग्य
D) पूर्वार्ध तथा उत्तरार्ध हे दोन्ही अयोग्य ✅
संदर्भ – 11वी राज्यशास्त्र – स्वातंत्र्य आणि हक्क : प्रकरण – 2, पान क्रमांक – 11
प्रश्न 4) ‘धर्मांतर रोखण्याचे कायदे’ कोणत्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करतात?
A) अनुच्छेद 25 (धार्मिक स्वातंत्र्य)
B) अनुच्छेद 14 (समानता)
C)अनुच्छेद 21 (जीवन व स्वातंत्र्याचा हक्क)
D) वरील सर्व ✅
संदर्भ : भारतीय संविधान – मूलभूत हक्क (भाग – 3)
प्रश्न 5) खालील उद्गार कोणाचे आहे?
“डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना तयार करण्यात, त्यानंतर संविधान सभेच्या विधिमंडळात आणि नंतर हंगामी संसदेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.”
A) डॉ. राजेंद्र प्रसाद (अध्यक्ष, संविधान सभा)
B) बी.एन. राव (सल्लागार, संविधान सभा)
C) जवाहरलाल नेहरू (सदस्य, संविधान सभा) ✅
D) टी.टी. कृष्णामाचारी (सदस्य, संविधान सभा)
संदर्भ : धम्म भारत – लोकसभेत नेहरूंची आंबेडकरांना श्रद्धांजली
प्रश्न 6) पॅंथिऑनच्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांक 2024 नुसार, भारतीय इतिहासातील आजवरच्या पहिल्या 30 सर्वात प्रसिद्ध व्यक्तींमध्ये कोणत्या बुद्धिस्ट राजाचा/राजांचा समावेश झालेला आहे?
A. सम्राट अशोक ✅
B. सम्राट हर्षवर्धन
C. सम्राट कनिष्क
D. वरीलपैकी सर्व
संदर्भ : धम्म भारत : Top 30 Most Famous Personalities of India of all time (2024)
प्रश्न 7) दुसऱ्यांदा संविधान सभेवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून संविधान सभेच्या नोंदवहीत ….. रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.
A. 29 ऑगस्ट 1947
B. 15 ऑगस्ट 1947
C) 14 जुलै 1947 ✅
D. 9 डिसेंबर 1946
संदर्भ : मराठी विकिपीडिया – बाबासाहेब आंबेडकर – संविधान निर्मितीतील योगदान
प्रश्न 8) पुढील विधाने विचारात घ्या.
1. न्यायालयाला संविधानाच्या मुलभूत तत्त्वांच्या विरोधातील कायदे अमान्य करण्याचा अधिकार आहे.
2. भारतीय राज्यव्यवस्थेत संविधान हा सर्वोच्च कायदा मानला जातो.
A) केवळ विधान 1 अचूक
B) केवळ विधान 2 अचूक
C) दोन्ही विधाने अचूक आहेत ✅
D) दोन्ही विधाने चूक आहेत
सदर्भ : भारतीय संविधान – विधान 1 – अनुच्छेद – 13; विधान 2 – भारतीय राज्यव्यवस्थेची रचना संविधानिक सर्वोच्चत्त्वाच्या तत्त्वावर आधारित आहे
प्रश्न 9) भारतीय संविधानाची उद्देशिका कोणत्या मूलभूत तत्त्वांना महत्त्व देते?
A) स्वतंत्रता, समानता आणि समाजवाद
B) लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद
C) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
D) वरील सर्व ✅
संदर्भ : भारतीय संविधान – प्रस्तावना
प्रश्न 10) “संविधान कितीही चांगले असले पण त्याची अंमलबजावणी करणारे जर चुकीचे असतील तर ते चुकीचे ठरेल आणि संविधान कितीही वाईट असले पण त्याची अंमलबजावणी करणारे जर चांगले असतील तर ते योग्यच ठरेल!”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील वाक्य राज्यसभा टीव्हीच्या संविधान मालिकेत कोणाच्या तोंडून वदविले (उद्धृत केले) आहे?
A) महात्मा गांधी ✅
B) मोहम्मद अली जिना
C) पंडित जवाहरलाल नेहरू
D) सरदार वल्लभभाई पटेल
संदर्भ : संविधान मालिका – भाग – 1, वेळ – 37:50
समाप्त
हेही पहा
- महाराष्ट्रातील विद्यमान 10 बौद्ध आमदार (2024-29)
- महाराष्ट्रातील 29 दलित आमदार कोणत्या SC जातीचे? बौद्ध, चर्मकार, मातंग, खाटीक आमदारांची संख्या किती?
- अभ्यासक्रम : संविधान गौरव परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 10 लेखांची यादी
- माहिती : संविधान गौरव महापरीक्षा 2024
- निकाल : भीमस्मरण महापरीक्षा 2024 चा निकाल जाहीर
- भीमस्मरण परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 40 लेखांची यादी
- उत्तर पत्रिका : धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023
सोशल मीडिया माध्यमे
- प्रबुद्ध टीव्हीचे लेटेस्ट व्हिडीओ अपडेट मिळवण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. (लिंक क्लिक करा)
- भीमस्मरण परीक्षेसंबंधी सूचना मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
- भीमस्मरण परीक्षेचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी सबंधित धम्मभारतच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.
प्रश्नांची level खूप deep मध्ये आहे.. जसं mpsc आयोग प्रश्न काढतो तसे प्रश्न आहे थोडं कठीण थोडं सोपं . स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांना असे प्रश्न सोडवायला मज्जा येईल…
Very nice sir khup chhan aahe utarrpatrika.