प्रबुद्ध टीव्हीच्या सर्व ऑनलाईन परीक्षांची यादी या लेखात देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रबुद्ध टीव्ही या माध्यमातून बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर सातत्याने केला जात आहे. समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रबुद्ध टीव्हीने विविध राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षांचे आयोजन केले असून, त्याद्वारे हजारो स्पर्धकांनी सामाजिक आणि वैचारिक जागृतीचा भाग घेतला आहे.
चला तर मग, या प्रेरणादायी परीक्षांचा एक झपाटून टाकणारा मागोवा घेऊया.
1. प्रबुद्ध परिवर्तन परीक्षा 2022-23
प्रबुद्ध टीव्हीने आयोजित केलेली पहिली राज्यस्तरीय महापरीक्षा — प्रबुद्ध परिवर्तन परीक्षा — 2 एप्रिल 2023 रोजी पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘माझी आत्मकथा’ (संपादन: ज. गो. संत) हे एकमेव पाठ्यपुस्तक परीक्षेचा अभ्यासक्रम होते.
- सहभागी: 1,273 स्पर्धक
- एकूण प्रश्न: 50
- बक्षिसे: एकूण ₹18,000
- प्रथम: ₹7,500
- द्वितीय: ₹5,500
- तृतीय: ₹3,500
- 3 उत्तेजनार्थ: ₹1,500 (प्रत्येकी ₹500)
2. सामान्य ज्ञान परीक्षा 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त 23 एप्रिल 2023 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. स्पर्धकांसाठी अभ्यासक्रम म्हणून चार महत्त्वाचे अभ्यासस्रोत निश्चित करण्यात आले होते:
- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (लेखक: धनंजय कीर)
- ‘माझी आत्मकथा’ – संपादक: ज. गो. संत
- मराठी विकिपीडिया वरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ लेख
- ‘धम्म भारत’ संकेतस्थळावरील निवडक लेख
- सहभागी: 2,145 स्पर्धक
- एकूण प्रश्न: 50
- बक्षिसे: ₹24,500
- प्रथम: ₹10,000
- द्वितीय: ₹7,500
- तृतीय: ₹5,500
- 3 उत्तेजनार्थ: ₹1,500 (प्रत्येकी ₹500)
3. धम्मज्ञान परीक्षा 2023
29 ऑक्टोबर 2023 रोजी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धम्मज्ञान महापरीक्षा आयोजित करण्यात आली. यामध्ये 2087 स्पर्धक सहभागी झाले.
- एकूण प्रश्न: 50 + 10
- अभ्यासक्रम:
- ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ – लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- धम्म भारत वेबसाईटवरील 30 बौद्ध धर्मविषयक लेख
4. भीमस्मरण परीक्षा – 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 19 मे व 9 जून 2024 रोजी दोन टप्प्यांत भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये 56% महिला, 44% पुरुष आणि एका तृतीयलिंगी व्यक्तीने सहभाग घेतला.
- एकूण प्रश्न: 50 + 15
- अभ्यासक्रम:
- ‘माझी आत्मकथा’ – संपादक: ज. गो. संत
- धम्म भारतवरील 40 निवडक लेख
- मराठी विकिपीडिया वरील बाबासाहेबांचा लेख
5. संविधान गौरव परीक्षा 2024
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त, संविधानाविषयी जनजागृती घडवण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीने 75वा संविधान दिवस अभ्यासात्मक पद्धतीने साजरा केला.
संविधानाच्या मूलतत्त्वांचे शिक्षण देणारी ही परीक्षा (8 डिसेंबर 2024) नागरिकांना त्यांच्या हक्कांचे आणि कर्तव्यांचे भान देणारी ठरली.
- सहभागी: 2000+ स्पर्धक
- एकूण प्रश्न: 40
- बक्षिसे:
- प्रथम: ₹20,000
- द्वितीय: ₹15,000
- तृतीय: ₹10,00
- चतुर्थ: ₹5000
-
अभ्यासक्रम:
- भारतीय संविधान
- 11वी चे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक
- राज्यसभा टिव्ही द्वारा निर्मित ‘संविधान मालिका‘
- ‘सर्वव्यापी आंबेडकर‘ या मालिकेतील “घटनाकार आंबेडकर” भाग
- धम्म भारत संकेतस्थळावरील 10 निवडक लेख
- मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर‘ लेख
- हेही पाहा
- संविधान गौरव महापरीक्षा 2024
- अभ्यासक्रम : संविधान गौरव परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी
- उत्तर पत्रिका : संविधान गौरव महापरीक्षा 2024
- संविधान गौरव परीक्षा निकाल पाहण्यासाठी → क्लिक करा
6. भीमस्मरण परीक्षा – 2025
14 एप्रिल 2025 रोजी बाबासाहेबांची 134वी जयंती उत्सवात साजरी करताना त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यावर भर देण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीने 11 मे 2025 रोजी भीमस्मरण परीक्षा आयोजित केली.
- सहभागी: 2500 स्पर्धक
- एकूण प्रश्न: 40
- अभ्यासक्रम:
- ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- धम्म भारतवरील 5 लेख
- मराठी विकिपीडिया वरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ लेख
-
बक्षिसे: एकूण ₹52,000 ची 10 पारितोषिके
- प्रथम: ₹15,000
- द्वितीय: ₹12,500
- तृतीय: ₹10,000
- चतुर्थ: ₹7,000
- पंचम: ₹5,000
- 5 उत्तेजनार्थ बक्षिसे: ₹2,500 (प्रत्येकी ₹500)
WhatsApp चॅनल्स फॉलो करा
परीक्षेसंबंधी सूचना आणि अपडेट मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या आणि धम्म भारतच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा.
- प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनलची लिंक क्लिक करा
- धम्म भारतच्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक क्लिक करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.