प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. – निकाल भीमस्मरण परीक्षा 2025

निकाल जाहीर : भीमस्मरण महापरीक्षा 2025
सामाजिक जागृतीचा एक आगळा-वेगळा उपक्रम
भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा 11 मे 2025 रोजी ऑनलाईन स्वरूपात पार पडली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका आणि गुण यादी जाहीर करण्यात आली आणि आज, 25 मे 2025 रोजी धम्म भारत वेबसाईटवर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येत आहे.
या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे – बाबासाहेबांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, संविधानिक मूल्यांची ओळख करून देणे, आणि समता व बंधुतेचे संस्कार रुजवणे. केवळ एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित न ठेवता आंबेडकरी विचारसरणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न अतिशय यशस्वी ठरला.
भीमस्मरण परीक्षेविषयी सविस्तर माहिती येथे वाचा.
स्पर्धेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ही स्पर्धा महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने लोकांनी उत्साहाने स्वीकारली. राज्यातील जवळपास सर्व जिल्हे व तालुक्यांतून सुमारे 2500 स्पर्धक सहभागी झाले. विशेष म्हणजे, यामध्ये 50% महिला स्पर्धक होत्या.
विविध वयोगट व क्षेत्रातील – लहान मुले, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील, पत्रकार, पोलिस, सैनिक, निवृत्त नागरिक, प्रबोधनकार, लेखक, कवी – अशा अनेकांनी सहभाग घेतला. सर्व जाती, धर्म व वर्गातील स्पर्धकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचे उदाहरण घडवले. महाराष्ट्रात असा बहुविध आणि समरस सहभाग क्वचितच पाहायला मिळतो.
परीक्षेचा अभ्यासक्रम
- मराठी विकिपीडिया वरील लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – जीवन व कार्य
- बाबासाहेबांची प्रसिद्ध लेखनसामग्री : जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – सखोल अभ्यास
- धम्म भारत वरील निवडक लेख
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे होते आणि त्यामध्ये तार्किक विचारशक्ती, समज आणि मूल्याधिष्ठित विचारांची तपासणी करणारे मुद्दे समाविष्ट होते. परीक्षेपूर्वी सर्व स्पर्धकांना आवश्यक सूचना आणि लिंक वेळेवर पाठवण्यात आली.
उपक्रमाचे संयोजन
ही स्पर्धा प्रबुद्ध टीव्ही या समाजाभिमुख डिजिटल प्लॅटफॉर्मने आयोजित केली. संविधान, इतिहास आणि सामाजिक विषयांवर सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून ‘भीमस्मरण’ परीक्षेला मूर्त स्वरूप मिळाले. धम्म भारत वेबसाईटने या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बाबासाहेबांचे विचार दस्तऐवजीकरण, जतन आणि प्रसाराच्या दृष्टीने हे योगदान अमूल्य ठरले.
या उपक्रमामागे तांत्रिक टीम, प्रश्नसंच लेखक, तपासणी समिती व हेल्पडेस्क अशा कार्यक्षम मंडळींचा सहभाग होता. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी प्रवीण जामनिक (अकोला) आणि संदेश हिवाळे (जालना) यांनी विशेष मेहनत घेतली.
पारितोषिके आणि विजेते
या परीक्षेसाठी एकूण ₹52,000 चे बक्षिसे ठेवण्यात आले होते. 10 विजेत्यांची नावे व त्यांचे पारितोषिक खालीलप्रमाणे:
1️⃣ प्रथम क्रमांक
प्रज्वल प्रभाकर सरकटे
(जिल्हा – बुलडाणा)
प्राप्त गुण – 185
रोल नंबर – 252219
बक्षिस – ₹15,000
2️⃣ द्वितीय क्रमांक
आदित्य अशोक सरवदे
(जिल्हा – पुणे)
प्राप्त गुण 180
रोल नंबर – 251054
बक्षिस – ₹12,500
राखीव पारितोषिके (3)
3️⃣ तृतीय क्रमांक
(10 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)
प्रसाद गोरखनाथ पगारे
(जिल्हा – नाशिक)
प्राप्त गुण – 145
रोल नंबर – 252270
बक्षिस – ₹10,000
4️⃣ चतुर्थ क्रमांक
(अंध, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव)
राहुल भानुदास गोदाम
(जिल्हा – लातूर)
प्राप्त गुण – 135
रोल नंबर – 252456
बक्षिस – ₹7,000
5️⃣ पंचम क्रमांक
(महिला स्पर्धकांसाठी राखीव)
प्रज्ञा पद्माकर गेडाम
(जिल्हा – यवतमाळ)
प्राप्त गुण – 175
रोल नंबर – 252202
बक्षिस – ₹5,000
प्रोत्साहन पारितोषिके (5)
6️⃣ षष्ठम क्रमांक
अशोक किसन कांबळे
(जिल्हा – नागपूर)
प्राप्त गुण – 180
रोल नंबर – 251280
बक्षिस – ₹500
7️⃣ सप्तम क्रमांक
ललिता अशोक कांबळे
(जिल्हा – नागपूर)
प्राप्त गुण 170
रोल नंबर – 251781
बक्षिस – ₹500
8️⃣ अष्टम क्रमांक
अश्विन धनंजय जीवने
(जिल्हा – चंद्रपूर)
प्राप्त गुण – 165
रोल नंबर – 251524
बक्षिस – ₹500
9️⃣ नवम क्रमांक
सागर भारत गाडे
(जिल्हा – सातारा)
प्राप्त गुण – 165
रोल नंबर – 252658
बक्षिस – ₹500
1️⃣0️⃣ दशम क्रमांक
दयानंद प्रकाश खडसे
(जिल्हा – यवतमाळ)
एकूण गुण – 160
रोल नंबर – 251415
बक्षिस – ₹500
एक वैचारिक चळवळ
भीमस्मरण महापरीक्षा 2025 ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर ती एक वैचारिक जागृती, सामाजिक समतेची चळवळ आणि संविधानिक जाणीव वाढवणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात बौद्धिक चळवळीसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
या परीक्षेशी संबंधित लिंक्स
हेही बघा
- प्रबुद्ध टीव्हीच्या सर्व मागील परीक्षा
- संविधान गौरव परीक्षा 2024
- ‘मोफत’ बौद्ध पुस्तके असे मिळवा घरपोच
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.