भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने प्रबुद्ध टीव्हीद्वारे भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 (वर्ष 2 रे) आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती या लेखात देण्यात आली आहे. सदर माहिती वाचून इच्छुकांनी भीमस्मरण महापरीक्षा 2025 साठी नाव नोंदणी आजच करा. 

भीमस्मरण महापरीक्षा 2025 - bhimsmaran-pariksha-2025
भीमस्मरण महापरीक्षा 2025

सदर लेखात खालील 7 घटकांच्या माध्यमातून भीमस्मरण परीक्षेची संपूर्ण माहिती दिली आहे.

  1. परीक्षेचा उद्देश
  2. बक्षीसे
  3. परीक्षेचे स्वरूप
  4. अभ्यासक्रम
  5. महत्त्वाच्या तारखा
  6. नियम व अटी
  7. नाव नोंदणी

भीमस्मरण महापरीक्षेचा उद्देश्य

14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ नाचून साजरी करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारांचे वाचन आणि आचरण करणे काळाची गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टातून भारतीय समाजातील विषमता आणि अन्यायाला वाचा फोडून समता, न्याय आणि मानवाधिकारांचा मार्ग दाखवला. त्यांनी विषमतावादी देशाची समताधारित पुनर्स्थापना केली.

हा समताधारित देश टिकवायचा असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यानुसार, प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलने भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षेचे आयोजन केले आहे.

भीमस्मरण महापरीक्षा 2025 या परीक्षेद्वारे प्रबुद्ध टीव्ही भारतीय समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गहन अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करत आहे, तसेच देशनिर्मितीच्या कार्यात प्रत्येक भारतीयास सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

चला, एकजुटीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी आणि न्यायशील विचारांवर आधारित प्रगतीशील भारत निर्माण करूया!”

(2024 मध्ये पहिली भीमस्मरण परीक्षा 2024 राबवण्यात आली होती, आणि 2025 मध्ये ही दुसरी भीमस्मरण परीक्षा आयोजित केली गेली आहे.)


बक्षिसे आणि पारितोषिके

10 विजेत्यांना एकूण 52,000 रुपयांची रोख बक्षिसे आणि पारितोषिके देण्यात येतील.

  • प्रथम पारितोषिक: ₹15,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹12,500
  • तृतीय पारितोषिक: ₹10,000 (लहान मुलांसाठी राखीव)
  • चतुर्थ पारितोषिक: ₹7,000 (दिव्यांग, अंध, कर्णबधीर आणि मुकबधीर व्यक्तींसाठी राखीव)
  • पंचम पारितोषिक: ₹5,000 (महिलांसाठी राखीव)
  • 5 प्रोत्साहनपर पारितोषिके : 6व्या ते 10व्या क्रमांकावरील प्रत्येक स्पर्धकाला ₹500 रोख प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून जाईल.

परीक्षेचे स्वरूप

1. मुख्य परीक्षा: 14 एप्रिल 2025 (ऑनलाईन)

  • एकूण 40 प्रश्न (MCQ), एकूण गुण: 200
  • कालावधी: 40 मिनिटे

 

2. सराव परीक्षा: 12 एप्रिल 2025 (ऑनलाईन)

  • एकूण 10 प्रश्न (MCQ), एकूण गुण: 40
  • कालावधी: 15 मिनिटे
  • सराव परीक्षा केवळ मुख्य परीक्षेची पद्धती समजण्यासाठी आहे.

 

MCQ म्हणजे multiple choice question अर्थात बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आहेत. परीक्षेत प्रत्येक प्रश्न आणि त्याखाली चार पर्याय दिलेले असतील.

 

टीप:

  • नकारात्मक गुणपद्धती (निगेटिव्ह मार्किंग) नसेल.
  • परीक्षेत सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल.
  • परीक्षा केवळ मराठी भाषेतच घेतली जाईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इन्हिलेशन ऑफ कास्ट [जातिव्यवस्थेचे निर्मूलन किंवा जातीसंस्थेचे उच्चाटन] (ग्रंथ) आहे.

तीन स्त्रोत परीक्षेसाठी अभ्यासक्रम म्हणून ठरवण्यात आले आहेत – [1] मराठी विकिपीडिया वरील बाबासाहेब आंबेडकरांचा लेख, [2] धम्म भारत संकेतस्थळावरील पाच लेख आणि [3] बाबासाहेबांनी लिहिलेले सर्वात महत्त्वाचे व सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजेच ‘जातिव्यवस्थेची निर्मूलन’.

 

अभ्यासक्रमाचे सर्व आवश्यक साहित्य डिजिटल स्वरूपात (सॉफ्ट कॉपी) खाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. क्लिक करून अभ्यासावे.

अभ्यासक्रमाचे विश्लेषण

(1) मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ लेख (15 प्रश्न)

⇒  क्लिक करा आणि लेख वाचा

 

(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘इन्हिलेशन ऑफ कास्ट‘ ग्रंथ (20 प्रश्न)

⇒  क्लिक करा आणि पुस्तक वाचा (मराठी आवृत्ती)

 

(3) धम्म भारत या संकेतस्थळावरील 5 निवडक लेख (5 प्रश्न)

खालील शीर्षकांना क्लिक करा आणि लेख वाचा ⇓⇓⇓

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगातील पुतळे

(2) नवीन संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प

(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टपाल तिकिटे

(4) आगामी जनगणना, आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि बौद्ध समाज

(5) भारतीय पंतप्रधानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विचार

(वरीलपैकी काही लेखांवर अद्याप काम चालू आहे, थोड्या दिवसांनंतर ते लेख प्रकाशित होईल.)


महत्त्वाच्या तारखा

  • नोंदणीचा अंतिम दिनांक: 12 एप्रिल 2025
  • मुख्य परीक्षा: 14 एप्रिल 2025; दुपारी 1:30 ते 2:10
  • रोल नंबर वाटप: 10 एप्रिल 2025
  • स्पर्धेचा निकाल: 12 मे 2025 (बुद्ध पौर्णिमा)

 

स्पर्धेचा निकाल 12 मे 2025 (बुद्ध पौर्णिमा) रोजी सायंकाळी 7:00 वाजता, प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलवर आणि धम्म भारत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. 


नियम व अटी

1. परीक्षेची पद्धत:
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. स्पर्धक आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे आपल्या घरामधून किंवा अन्य ठिकाणीवरुन परीक्षेचा पेपर सोडवू शकतात.

 

2. वयोमर्यादा:
कमीत कमी स्पर्धकाचे वय 10 वर्ष असावे. कमाल वयोमर्यादा नाही.

 

3. राखीव बक्षीसे:
स्पर्धेत एकूण 10 बक्षिसे (क्रमांक पहिला ते दहावा) देण्यात येतील. त्यांपैकी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची बक्षीसे राखीव ठेवण्यात आली आहेत. नियम व अटी लागू असतील.

 

4. परीक्षा लिंक प्राप्त करण्यासाठी:
सहभागी स्पर्धकांना परीक्षेच्या पेपरची लिंक त्यांच्या रजिस्टर्ड व्हॉट्सॲप नंबरवर पाठविली जाईल.

परीक्षा लिंक मिळवण्यासाठी 7447755627 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करणे अनिवार्य आहे. (हा नंबर सेव्ह नसल्यास परीक्षा लिंक प्राप्त होणार नाही.)

 

5. केवळ महाराष्ट्रीयच पात्र:
ही परीक्षा राज्यस्तरीय असल्याने फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकच परीक्षेसाठी पात्र असतील.

 

6. परीक्षेचे स्वरूप:
मुख्य परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. यामध्ये 40 बहुपर्यायी प्रश्न असतील (प्रत्येक प्रश्न 5 गुणांसाठी). परीक्षेचा कालावधी 40 मिनिटे असेल.

 

7. समान गुण असलेले स्पर्धक:
दोन किंवा अधिक स्पर्धकांचे गुण समान असल्यास कमी वेळेत परीक्षा पूर्ण करणाऱ्याला ‘पहिला’ घोषित केले जाईल.

 

8. निकाल जाहीर करण्याची तारीख:
स्पर्धेचा निकाल 12 मे 2025 (बुद्ध पौर्णिमा) रोजी सायंकाळी 7:00 वाजता, प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलवर आणि धम्म भारत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

 

9. नाव नोंदणी शुल्क:
परीक्षेसाठी प्रवेश शुल्क ₹100 असेल.

 

10. स्पर्धकाचा प्रवेश रद्द करणे:
नाव नोंदणी केल्यानंतर स्पर्धकाचा प्रवेश रद्द होणार नाही.

 

11. नवीन नियमांची अंमलबजावणी:
आयोजकांना परीक्षेच्या कोणत्याही नियमामध्ये बदल करण्याचा, तसेच नवीन नियम तयार करण्याचा आणि जूना नियम रद्द करण्याचा अधिकार राहील. आणि हे बदल सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.


नाव नोंदणी

नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहिती :

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 7447755627 या आयोजकांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर “Registration Link” असा मेसेज करावा, किंवा PrabuddhaTV.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परीक्षेसाठी नाव नोंदणीचा अंतिम दिनांक 12 एप्रिल 2025 आणि प्रवेश शुल्क ₹100 असेल.


WhatsApp चॅनल्स फॉलो करा


हेही बघा


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!