Last Updated on 8 September 2025 by Sandesh Hiwale
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण जीवनपट अथवा दिनविशेष (Timeline of Dr. Babasaheb Ambedkar in September) या लेखामध्ये सविस्तर समाविष्ट करण्यात आला असून, त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांची ही माहिती अत्यंत उपयुक्त आणि जपून ठेवण्यासारखी आहे.

Timeline of Dr Ambedkar in September
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास : वेगवेगळ्या वर्षांतील सप्टेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या असून, त्या या जीवनपटातून उलगडल्या आहेत. या लेखामध्ये बाबासाहेबांच्या महत्त्वपूर्ण घडामोडीं सोबतच काही जागतिक व आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय व प्रादेशिक दिन तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या — यामध्ये त्यांना ‘बाबासाहेब’ हे संबोधन मिळाले, त्यांनी कायदेमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतरच त्या पदाचा राजीनामाही दिला, मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतींची कोनशीला ठेवली, समाज समता संघाची स्थापना केली, दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली, म. गांधी व पेरियार यांच्याशी त्यांची ऐतिहासिक भेट झाली, बौद्ध धर्म स्वीकारण्याची तारीख जाहीर केली गेली आणि पुणे करारासारखी महत्त्वपूर्ण घटना घडली.
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in September
सप्टेंबरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट
1 सप्टेंबर
- 1951 : औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने सुरू केलेल्या मिलिंद कॉलेजच्या नव्या इमारतींची कोनशीला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ठेवण्यात आली.
- 1951 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध उपासना पाठ’ ही बुद्ध वंदनाची पुस्तिका प्रकाशित झाली.
2 सप्टेंबर
- 1946 : जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना झाली.
- 1953 : भाषिक राज्य निर्मिती विषयक विधेयकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण भाषण केले.
- 1954 : राज्यसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाच्या चर्चेत चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले.
3 सप्टेंबर
- 1946 : नागपूर येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन तर्फे ‘पुणे करार’ विरोधी सत्याग्रह आयोजित करण्यात आला.
4 सप्टेंबर
- 1925 : पुणे नगरपालिकेत महात्मा फुले पुतळा उभारण्याचा ठराव चर्चेला आला.
- 1927 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा कार्यप्रचार करण्यासाठी ‘समाज समता संघ’ या संस्थेची स्थापना केली.
- दादाभाई नौरोजी जयंती (1825)
5 सप्टेंबर
- 1932 : वडाळा येथील गणेश उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
- 1936 : नागपूर येथे ‘पतितपावन’ हे साप्ताहिक प्रकाशित झाले.
- राष्ट्रीय शिक्षक दिन (सर्वेपल्ली राधाकृष्णन जयंती, 1888)
हेही वाचा: मराठी बौद्ध कलाकारांची यादी
6 सप्टेंबर
- 1930 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लंडन येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण देण्यात आले.
- 1943 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय मजूर परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले, ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक साधने आणि आरोग्य या विषयांवरील कामगारांच्या मागण्यांबाबत बाबासाहेबांनी सविस्तर विवेचन केले. (हे अधिवेशन ६ ते ७ सप्टेंबर १९४३ या कालावधीत पार पडले.)
- 1954 : वर्गीकृत जाती आणि अन्य जाती आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
7 सप्टेंबर
- 1931 : दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे सुरू झाली. 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 या काळात झालेल्या या परिषदेत अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार देण्याच्या मुद्द्यावरून महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तीव्र मतभेद झाले.
- 1931 : फेडरल स्ट्रक्चर कमिटीची बैठक घेण्यात आली. भारताला संघराज्यात्मक राज्यघटना द्यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत मांडण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताच्या भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर चर्चा करण्यासाठी ही घटना समिती स्थापन झाली. या समितीमध्ये काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादींचा समावेश होता. या समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. ७ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बकिंगहॅम पॅलेस येथे झालेल्या बैठकींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्तापूर्ण मते मांडून सर्वांना प्रभावित केले.
- 1943 : ६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या त्रिपक्षीय मजूर परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनातही बाबासाहेब सहभागी झाले आणि कामगारांच्या जीवनावश्यक मागण्यांवर सखोल विचार मांडला.
8 सप्टेंबर
- 1936 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थक गटातील १६ जणांची एक तुकडी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसर, पंजाब येथे रवाना झाली.
- 1932 : ब्रिटिश पंतप्रधान रॅक्से मॅकडोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदार संघासंबंधी महात्मा गांधींना पत्र लिहिले.
- 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीवरून वामनराव गोडबोले यांना पत्र लिहिले.
- जागतिक साक्षरता दिन
9 सप्टेंबर
- 1906 : राजर्षी शाहू महाराज व व्हाईसरॉय लॉर्ड मेंटो यांची शिमला येथे ऐतिहासिक भेट झाली.
- 1930 : लंडन येथील गोलमेज परिषदेत भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आले.
- 1937 : मुंबईतील राजगृह येथे जैन धर्मियांसोबत धर्मांतरासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा झाली.
- 1943 : दिल्ली येथे मजूर परिषदेच्या खुल्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औद्योगीकरणाच्या मुद्द्यावर भाषण केले, तसेच बंगाल सरकारने स्थापलेल्या मजूर संघ सल्लागार संघासमोरही त्यांनी आपली मते मांडली.
- Timeline of Dr Ambedkar in September
10 सप्टेंबर
- 1944 : मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प येथे भरलेल्या संत, महंत व गोसाव्यांच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले. हिंदू धर्म मठातर्फे गैगीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली होती.
- 1949 : संपत्तीच्या मोबदल्यासंबंधी सुधारित कलमाचा मसुदा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.
हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य आणि समतेबद्दलचे विचार
11 सप्टेंबर
- 1930 : गोलमेज परिषदेसाठी नेमलेल्या प्रतिनिधींची यादी जाहीर करण्यात आली.
- 1938 : पुणे येथे अकरावे अस्पृश्य विद्यार्थी संमेलन भरले.
- 1938 : मुंबई विधिमंडळात ‘औद्योगिक तंटा’ या विधेयकावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचा संप करण्याचा हक्क काढून घेण्यास तीव्र विरोध केला.
- 1948 : कराची, पाकिस्तान येथे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे निधन झाले.
- आ. विनोबा भावे जयंती (1895)
12 सप्टेंबर
- 1929 : नाशिक रोड येथे संत गाडगे महाराजांनी ‘स्पृश्य-अस्पृश्य विचार’ या विषयावर जाहीर व्याख्यान दिले.
- 1954 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेत ‘अस्पृश्यता विषयक गुन्हे’ या बिलावर अभ्यासपूर्वक प्रतिपादन केले. Timeline of Dr Ambedkar in September
13 सप्टेंबर
- 1929 : नांदगाव येथे भरलेल्या श्री सोमवंशी मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
- 1939 : कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अध्यक्षीय भाषण ‘जनता’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झाले.
14 सप्टेंबर
- 1949: राष्ट्रीय हिंदी दिवस – संविधान सभेकडून हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आल्यामुळे या दिवसाला राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून ओळखले जाते.
- 1956 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या ‘द बुद्धा अॅण्ड हिज धम्मा’ या ग्रंथाची टंकलिखित प्रत भेट दिली.
15 सप्टेंबर
- 1954 : राज्यसभेत राज्यघटनेच्या वारंवार दुरुस्तीच्या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
- 2002 : नानकचंद रत्तू पुण्यतिथी (बाबासाहेबांचे खाजगी सचिव)
- राष्ट्रीय अभियंता दिवस (मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जयंती, 1861)
16 सप्टेंबर
- 1931 : लंडनच्या बकिंगहॅम पॅलेस येथे झालेल्या संघराज्य रचना समितीच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण भाषण केले.
- 1954 : राज्यसभेत ‘अस्पृश्यता गुन्हे बिल’ या विषयावर त्यांनी प्रभावी भाषण केले.
- भारतरत्न व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या संगीतकार एम.एस. सुब्बालक्ष्मी जन्मदिवस (1916)
- कामगार शिक्षण दिन
Timeline of Dr. Babasaheb Ambedkar in September
हेही वाचा: अस्पृश्यता निवारण चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
17 सप्टेंबर
- अनागरिक धम्मपाल जयंती (1864)
- पेरियार जयंती (1879)
- 1927 : मुंबईतील एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या महाड सत्याग्रहाच्या पहिल्या जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “सत्याग्रह करून आपण आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत” असे प्रतिपादन केले.
- 1937 : मुंबई विधिमंडळात खोती व महार वतन नष्ट करणाऱ्या विधेयकावर भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील शेतकरी-मजुरांच्या हक्कांची बाजू मांडली.
- 1943 : इंडियन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेतर्फे भरलेल्या कार्यकर्त्यांच्या शिक्षण वर्गाच्या समारोपावेळी डॉ. आंबेडकरांनी ‘मजूर आणि संसदीय लोकशाही’ या विषयावर भाषण केले.
- यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन (1977)
18 सप्टेंबर
- 1931 : लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची दुसरी मुलाखत झाली.
- 1936 : डॉ. आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात खोती बिल मांडले. Timeline of Dr Ambedkar in September
19 सप्टेंबर
- 1932 : इंडियन मर्चंट्स हॉल, मुंबई येथे हिंदू नेत्यांच्या सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या उपोषणावर भाष्य केले आणि “गांधींचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय्य हक्काला हरताळ फासणार नाही” असे उद्गार काढले.
- 1934 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्यासाठी पोयबावडी, परळी, मुंबई येथे सभा घेतली आणि “गुलाम म्हणून आपण किती दिवस सहन करणार?” असा प्रश्न समाजापुढे ठेवला.
- 1937 : स्वतंत्र मजूर पक्ष कार्यकारी मंडळाची सभा झाली.
- 1951 : संसदेत हिंदू कोड बिलावरील चर्चेत डॉ. आंबेडकरांनी विवाह व घटस्फोट यावरील भाग स्वतंत्र विधेयक म्हणून मान्य करावा, असे निवेदन केले.
20 सप्टेंबर
- 1932 : अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्याच्या निर्णयाविरोधात महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या प्रसंगी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठाम उभे राहिले.
- 1942 : शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन पक्षाची घटना मंजूर झाली.
- 1944 : हैदराबाद राज्यातील शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या महिला व विद्यार्थी शाखांकडून डॉ. आंबेडकरांचा मानपत्र देऊन सत्कार केला.
हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विचार
21 सप्टेंबर
- आंतरराष्ट्रीय शांतता दिन (1981)
- 1932 : पुणे कराराचा मध्यवर्ती मानबिंदू ठरवण्यात आला.
22 सप्टेंबर
-
1887 : कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
- 1944 : मद्रास महापालिकेकडून मेयरच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चांदीच्या करंड्यातून मानपत्र अर्पण करण्यात आले. तसेच आंध्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, मद्रास तर्फेही त्यांचा गौरव झाला.
23 सप्टेंबर
- 1917 : संकल्प दिवस — बडोद्याला जातिभेदामुळे डॉ. आंबेडकरांना घरातून हाकलण्यात आले. त्यांनी बागेत झाडाखाली रात्र काढली आणि जातिभेद निर्मूलनाचा संकल्प केला.
- 1944 : डॉ. आंबेडकर आणि पेरियार रामसामी यांची भेट झाली.
- 1944 : मद्रास येथे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
- 1944 : मद्रास रेल्वेतील अस्पृश्य कामगारांनी मजूर मंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांना मानपत्र अर्पण केले.
- 1956 : डॉ. आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांतून जाहीर केले की ते नागपूर येथे विजयादशमीला (14 ऑक्टोबर 1956) बौद्ध धर्म स्वीकारतील.
24 सप्टेंबर
- 1873 : महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केला.
- 1932 : पुणे करार — डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात समझोता झाला. या करारावर डॉ. आंबेडकर व पं. मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
- 1941 : परळी येथे झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना आवाहन केले – “इंग्रजांना वाचवण्यासाठी नव्हे, तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून सैन्यात सामील व्हा.”
- 1944 : मद्रास येथे बुद्धिवादी सभेत (रॅशनॅलिस्ट असोसिएशन) भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेद व भगवद्गीतेवर तीव्र टीका केली.
25 सप्टेंबर
- 1925 : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जयंती
- 1930 : पनवेलजवळील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला.
- 1932 : पुणे करारास पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत सह्या करण्यात आल्या.
- 1992 : ‘डॉ. आंबेडकर’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक परपल्ली भारत होते, तर अभिनेता आकाश खुराना यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती. (पाहा – बाबासाहेबांच्या चित्रपटांची यादी)
हेही वाचा: राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र
26 सप्टेंबर
- 1820: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर जयंती
- 1936 : पतितपावनयेथे आर.जी. घोडीयोर (भंडारा) द्वारे सवर्ण हिंदूंच्या अत्याचारांविरोधात चौकशी व कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले.
- 1944 : आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे झालेल्या सभेत डॉ. आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले.
27 सप्टेंबर
- जागतिक पर्यटन दिन
- 1932 : पुणे करारानंतर महात्मा गांधींनी उपोषण सोडले.
- 1951 : हिंदू कोड बिलावरील मतभेदांमुळे डॉ. आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. (6 ऑक्टोबर 1951 रोजी राजीनामा स्वीकारला, नंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याची कारणे पत्राद्वारे व माध्यमांतून स्पष्ट केली.)
28 सप्टेंबर
- 1907 :भगतसिंग जयंती
- 1931 : अल्पसंख्यांक समितीच्या कामाला प्रारंभ झाला.
- 1932 : पुणे करारानंतरचे पहिले जाहीर भाषण — मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, “देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही.”
- 1944 : “गांधींना वर्णाश्रम धर्म नष्ट करावयाचा नाही; त्यांना दूरदृष्टीच नाही” असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढले.
- 1952 : मुंबईतील नरे पार्क येथील जनसंमेलनात त्यांनी म्हटले – “सार्वजनिक पैशांचा अपहार करण्याइतके नीच कृत्य दुसरे नाही.”
29 सप्टेंबर
- 1934 : पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्यासाठी मुंबईत सभा झाली.
- 1950 : वरळी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- जयंती (1892) व स्मृतिदिन (1964): रावबहादूर एन. शिवराज
30 सप्टेंबर
- जागतिक भाषांतर दिन
- 1920 : डॉ. आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम.एस्सी. अभ्यासासाठी पुन्हा प्रवेश घेतला आणि ‘ग्रेज इन’मध्ये कायद्याचे शिक्षण सुरू केले.
- 1956 : दिल्लीतील निवासस्थानी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची बैठक झाली. यात फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा: जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती
सप्टेंबरमधील अन्य महत्वाच्या घटना
- 1927 : अनुयायांनी भीमराव आंबेडकरांना “बाबासाहेब” ही उपाधी दिली.
- 1947 : सप्टेंबरमध्ये डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून पदग्रहण केले. त्यांनी सप्टेंबर 1947 ते ऑक्टोबर 1951 दरम्यान या पदावर कार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)
›› जानेवारी ⇔ फेब्रुवारी ⇔ मार्च ⇔ एप्रिल ⇔ मे ⇔ जून ⇔ जुलै ⇔ ऑगस्ट ⇔ सप्टेंबर ⇔ ऑक्टोबर ⇔ नोव्हेंबर ⇔ डिसेंबर ‹‹
सारांश
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in September) याविषयीची माहिती पाहिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.
सदर लेखात एखादी बाब समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणीय चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.