मार्च महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्च महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in March) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यातील जीवनपट लेख बनवलेले आहेत.

Timeline of Dr Babasaheb Ambedkar in March
Timeline of Dr Babasaheb Ambedkar in March

Timeline of Dr BR Ambedkar in March

वेगवेगळ्या वर्षांतील मार्च महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. मार्च महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.

Dr Ambedkar in March – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.

मार्च महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो — काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची सुरुवात तसेच स्थगिती, राज्यसभेवर निवड, पी.एल. नरसुंच्या ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’ ग्रंथाला प्रस्तावना, स्वतंत्र मतदार संघाला गांधींचा विरोध, मुंबई विधिमंडळात ‘महार वतन बिल’ सादर, ‘रानडे गांधी अँड जिना’ व ‘स्टेट्स अँड मायनॉरिटीज’ हे ग्रंथ प्रकाशित, समता सैनिक दलाची स्थापना.. इत्यादी.

 

 मार्चमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

1 मार्च

  • शून्य भेदभाव दिन
  • जागतिक नागरी संरक्षण दिन
  • 1931 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परळ, मुंबई येथे सभा झाली.
  • 1936 : नागपूर जिल्हा दलित महिला परिषद झाली भागीरथीबाई थोरात ह्या परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
  • 1939 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ‘फेडरेशन वर्सेस फ्रीडम’ ग्रंथ प्रकाशित झाला.

 

2 मार्च

  • 1930 : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. यादिवशी सकाळी व दुपारी अशा दोन सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या.
  • 1947 : फिरोजाबाद येथे उत्तर प्रदेश शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन झाले.

 

3 मार्च 

  • जागतिक श्रवणशक्ती दिन
  • जागतिक वन्यजीव दिन
  • 1930 : सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली, त्यामध्ये त्यांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.
  • 1930 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह प्रत्यक्ष सुरू झाला. त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
  • 1934 : काळाराम मंदिर सत्याग्रह स्थगित झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 3 मार्च 1934 रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.
  • 1946 : नरे पार्क, मुंबई येथे निवडणुकीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

4 मार्च 

  • जागतिक लठ्ठपणा दिन
  • 1960 : प्रकाशवीर शास्त्री यांच्या धर्मांतर बंदी या लोकसभेतील विधेयकास कर्मवीर भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड यांनी विरोध करून मनुस्मृती फाडली.

 

5 मार्च 

  • 1929 : खारेपाटण महालातील सोमवंशीय महार बंधूंची जाहीर सभा झाली.
  • 1939 : जत येथे संस्थानातील अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांचे भाषण झाले.

 

 

6 मार्च 

  • 1946 : नागपूर येथे रेवराम कबाडे यांच्या अध्यक्षतेखाली युगांतर हायस्कूलच्या पटांगणात दलित कवींचे पहिले संमेलन झाले.

 

7 मार्च 

  • जनऔषधी दिन
  • 1928 : न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित झाला.
  • 1936 : कामठी येथे डॉ. आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची जाहीर सभा झाली.

 

8 मार्च 

  • आंतरराष्ट्रीय महिला दिन
  • 1937 : जगजीवन राम यांचे बंकिमपूर, पटना येथून बाबासाहेबांना महत्त्वपूर्ण पत्र आले.
  • 1939 : समता सैनिक दलासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

9 मार्च

  • नो स्मोकिंग डे
  • 1920 : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महार लोकांची सभा झाली.
  • 1924 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन ‘बहिष्कृत हितकारिणी सभा‘ नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. (त्यानुसार त्यांनी 20 जुलै 1924 रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ संस्थेची स्थापना झाली व स्वतः बाबासाहेब त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.)
  • 1924 : बहिष्कृत हितकारणी सभेची मुंबई येथे स्थापना झाली.
  • 1954 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विधिमंडळातून राज्यसभेवर निवड झाली. 6 डिसेंबर 1956 पर्यंत ते खासदार होते.

 

10 मार्च

  • 1927 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दारूबंदीवरील भाषण झाले.
  • 1948 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’ या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली, आणि या ग्रंथाची तिसरी आवृत्ती काढून त्याला पुनर्प्रकाशित केले. हा ग्रंथ पी.एल. नरसू यांनी 1907 मध्ये लिहिला होता. याची द्वितीयावृत्ती 1911 मध्ये अनागरिक धर्मपाल यांनी काढली होती.

 

 

11 मार्च

  • महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती
  • 1920 : डॉ. भीमराव आंबेडकरांनी स्वीडनहम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला.
  • 1932 : स्वतंत्र मतदार संघाला महात्मा गांधींचा विरोध सुरू झाला. Ambedkar in March

 

12 मार्च 

  • 1927 : डॉ. आंबेडकरांचे शिक्षणासाठी अनुदान या विषयावर विधिमंडळात भाषण झाले.

 

13 मार्च 

  • धूम्रपानविरोधी दिन
  • 1933 : 8 मार्च ते 17 मार्च समता सैनिक दल या संघटनेच्या सभा झाल्या.

 

14 मार्च

  • आंतरराष्ट्रीय गणित दिन (पाय दिन)
  • 1928 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात ‘महार वतन बिल’ सादर केले.
  • 1955 : प्रांतिक अस्पृश्य परिषद अकोला येथे संपन्न झाली.

 

Timeline of Dr Ambedkar in March

15 मार्च

  • जागतिक ग्राहक हक्क दिन
  • 1943 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रानडे गांधी अँड जिना’ पुस्तक प्रकाशित केले.
  • 1947 : बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्टेट्स अँड मायनॉरिटीज’ हा ग्रंथ प्रकाशित केला.

 

16 मार्च

  • राष्ट्रीय लसीकरण दिन
  • 1937 : महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्यास अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित झाला.

 

 

17 मार्च

  • 1937 : ‘महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे’ हे सत्य मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने 17 मार्च 1937 रोजी मान्य केले. यापूर्वी सुद्धा महाडच्या न्यायालयाच्या निकालाने 8 जून 1931 रोजी आणि ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने 30 जानेवारी 1933 रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा 12 डिसेंबर 1927 चा तात्पुरता मनाई हुकूम 17 मार्च 1937 रोजी पूर्णपणे निकालात निघाला. बॅरीस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले.
  • 1939 : एलफिस्टन गिरणी कामगारांवरील गोळीबारासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

 

18 मार्च 

  • 1939 : समता सैनिक दलाच्या कॅप्टनांची सभा झाली. गरीबदास दखणे हे सभेचे अध्यक्ष होते.
  • 1955 : आग्रा येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची विराट सभा झाली.
  • 1956 : आग्रा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले व चक्की पाट येथे बुद्ध मुर्तींची प्रतिष्ठापना झाली.

 

19 मार्च

  • 1927 : समता सैनिक दल स्थापन दिन.
  • 1927 : अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी 19 मार्च व 20 मार्च 1927 रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली. आणि 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले.
  • 1928 : महार वतन बिल दाखल.
  • 1938 : संपादक टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानशी थैली अर्पण करण्यात आली.
  • 1940 : स्वतंत्र मजूर पक्षातर्फे अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन महाड येथे साजरा करण्यात आला.

 

20 मार्च 

  • आंतरराष्ट्रीय आनंदी दिन
  • जागतिक चिमणी दिन
  • सामाजिक सबलीकरण दिन
  • चवदार तळे क्रांतीदिन
  • 1927 : महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) म्हणून साजरा केला जातो.
  • 1927 : अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी 19 मार्च व 20 मार्च 1927 रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली. आणि 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले.

 

21 मार्च

  • जागतिक कविता दिन
  • जागतिक वृक्षारोपण दिन
  • 1920 : कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते त्यात तर छ. शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती.
  • 1927 : महाडच्या ब्रह्मवृंदांकडून चवदार तळ्याची वेदमंत्रांनी शुद्धी करण्यात आली.
  • 1934 : मलकापूर येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न झाली.

 

22 मार्च

  • जागतिक जल दिन
  • 1920 : कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते त्यात तर छ. शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती.

 

23 मार्च

  • जागतिक हवामान दिन
  • 1918 : मुंबई येथे भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद झाली. सयाजीराव गायकवाड हे परिषदेचे अध्यक्षस्थानी होते.
  • 1929 : बेळगाव येथे विद्यार्थी आश्रमाच्या मैदानात अस्पृश्यांच्या सभेस बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले.

 

24 मार्च

  • जागतिक क्षयरोग दिन
  • 1933 : केंद्रीय कायदेमंडळात श्री रंगा अय्यर यांनी मंदिर प्रवेश बिल मांडले.
  • 1942 : क्रिप्स यांचे त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळ भारतात आले.

 

25 मार्च

  • आंतरराष्ट्रीय न जन्मलेल्या बालकांचा दिन
  • 1947 : लखनऊ येथे असेम्ब्ली हॉलवर मोर्चा काढण्यात आला. Ambedkar in February

 

 

26 मार्च

  • 1929 : बेळगाव जिल्हा बहिष्कृत परिषदेचे सहावे अधिवेशन झाले.
  • 1939 : अंतरवेली (तालुका निफाड जिल्हा नाशिक) येथे सभा झाली.

 

27 मार्च

  • जागतिक रंगभूमी दिन
  • 1930 : नायगाव, मुंबई येथे सुपर मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.
  • 1936 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातपात तोडक मंडळ, लाहोर यांना पत्र पाठवले.

 

28 मार्च

  • 1934 : मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद झाली.
  • मुडके बुवा जाधव स्मृतिदिन

 

29 मार्च

  • 1929 : डिप्रेस्ड्स क्लासेस मिशन अहिल्याश्रम, पुणे येथे मातंग समाजाची जाहीर सभा झाली.

 

30 मार्च

  • 1929 : ‘बहुजन नायक’ साप्ताहिक सुरू झाले.
  • 1942 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्लिप्स साहेबांची भेट झाली. दिल्ली येथे अस्पृश्य नेत्यांची परिषद झाली.

 

31 मार्च 

  • 1928 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूट मधील नोकरी समाप्त झाली.

 

मार्चमध्ये घडलेल्या अन्य घटना 

  • मार्च 1923 मध्ये ‘द प्रोब्लम ऑफ रुपी’ प्रबंधात डॉ. आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे लंडन विद्यापीठाच्या परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. ‘द प्रोब्लम ऑफ रुपी’ (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सादर केला होता. ऑगस्ट 1923 मध्ये डॉ. आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर 1923 मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)

* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *


सारांश

मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण मार्च महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in March) याविषयीची माहिती पाहिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.

सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.

 

हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

6 thoughts on “मार्च महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट

  1. अत्यंत महत्त्वाचे विचार !!
    सर्वांनी अवश्य वाचावे व इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरीत करावे… !!!
    परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावेत… !!!
    यामध्ये सर्व ग्रंथाचा सार आहे… !!!
    धन्यवाद !!!
    जयभीम !!
    जय संविधान !!!

  2. खूप सुंदर अगदी सर्वांना उपयोगी असा अप्रतिम् लेख ज्ञानातही वेगळी भर पडते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!