प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एप्रिल महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in April) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण ऑगस्ट ते मार्च महिन्यांतील जीवनपट लेख बनवलेले आहेत.
Timeline of Dr BR Ambedkar in April
वेगवेगळ्या वर्षांतील एप्रिल महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. एप्रिल महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.
Dr Ambedkar in April – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो — जन्म, ‘बहिष्कृत भारता’ची सुरुवात, गायकवाड वाड्यात समता संघाची शाखा स्थापन, प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन, हिंदू कोड बिल संसदेत सादर, महार वतन बिल मुंबई कौन्सिलपुढे सादर, सविता आंबेडकरांशी दुसरा विवाह, महाराजा सयाजीराव गायकवाड यांची भेट, मुंबईतील अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, सुवर्णजयंती साजरी, आशा-प्रमोद साप्ताहिकात मुलाखत, लखनऊमध्ये संयुक्त प्रांत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे अधिवेशन, अस्पृश्य महिला सुधारक मंडळाची स्थापना, संविधान सभेमध्ये ‘अस्पृश्यता प्रथे’च्या बंदीची मागणी… इत्यादी.
एप्रिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट
1 एप्रिल
- 1921 : मुंबई कायदेमंडळाची पहिली बैठक झाली.
- 1938 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डेव्हिड मिल चाळ येथील सभेत अध्यक्षीय भाषण झाले.
2 एप्रिल
- आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन
- 1894 : राजर्षी छ. शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारली.
- 1948 : सिद्धार्थ कॉलेजमध्ये देवकीबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
- 1959 : तिबेटी धर्मगुरू चौदावे दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला. कारण त्यांचा देश तिबेटवर चीनने कब्जा केला होता.
3 एप्रिल
- 1927 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत‘ पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.
- 1923 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी.एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) व बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदव्या ग्रहण करून भारतात परतले.
- 1952/56 : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ 3 एप्रिल 1956 ते 2 एप्रिल 1962 दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले.
- 1955 : चीनचे राष्ट्रपती यु चान टुन यांच्या सत्कारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
4 एप्रिल
- 1906 : 15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 8 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. हा विवाह मुंबईतील भायखळा येथे संपन्न झाला होता.
- 1913 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती मंजूर केली. बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले.
- 1933 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थी वसतीगृहास भेट दिली.
5 एप्रिल
- आंतरराष्ट्रीय विवेक दिन
- राष्ट्रीय सागरी दिन
- 1910 : शिवराम जानबा कांबळे यांची जेजुरी येथे प्रचंड सभा झाली. या सभेत अस्पृश्यांचा लष्करात प्रवेशाच्या ठराव मंजूर करण्यात आला.
- 1946 : नवी दिल्ली येथे ब्रिटिश त्रिसदस्यीय मंडळाची मुलाखत झाली.
6 एप्रिल
- जागतिक टेबल टेनिस दिन
- 1934 : बोरगाव (अलोडी, जिल्हा वर्धा) येथे अस्पृश्य परिषदेत महिला शिक्षण सवलती व वैवाहिक बाबतीत सुधारणा ठराव पास करण्यात आला.
7 एप्रिल
- जागतिक आरोग्य दिन
- 1930 : नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी एका महिला सत्याग्रहीने पुजाऱ्याच्या तोंडात मारली.
8 एप्रिल
- 1928 : लोकमान्य टिळकांचे पुत्र, श्रीधर पंत टिळक यांनी पुण्यातील गायकवाड वाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समता संघाची शाखा स्थापन केली.
- हेही पहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 130 अनमोल सुविचार
9 एप्रिल
- 1927 : महाड येथील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील परळ, दामोदर हॉलच्या पटांगणात अस्पृश्यांची जाहीर सभा झाली. कारण महाडच्या सत्याग्रहींवर स्पृश्य हिंदूंनी हिंसक हल्ला केला होता.
- गोपाल कृष्ण गोखले जयंती
- राहुल सांकृत्यायन जयंती (1893)
10 एप्रिल
- जागतिक होमिओपॅथी दिन
- 1925 : प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. 10 व 11 एप्रिल 1925 रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. “सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा” असा संदेश देणारे भाषण डॉ आंबेडकरांनी केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले.
- 1948 : ‘समाज सुधारण्याच्या संदर्भात कायद्याचे स्थान’ या विषयावर दिल्ली येथील महाविद्यालयात बाबासाहेबांचे भाषण झाले.
- डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिन
11 एप्रिल
- राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
- जागतिक पार्किन्सन्स दिन
- 1925 : प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. 10 व 11 एप्रिल 1925 रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. “सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा” असा संदेश देणारे भाषण डॉ आंबेडकरांनी केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले.
- 1947 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू कोड बिल सादर केले. हे बील प्रथमतः 1 ऑगस्ट 1946 रोजी संसदेत मांडले गेले होते परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नव्हती.
- महात्मा जोतीराव फुले जयंती (1827)
- Ambedkar in April
12 एप्रिल
- मानवी अंतराळ उड्डाण दिन
- 1925 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन भरले.
- 1928 : आमदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार वतन बिल मुंबई कौन्सिलपुढे सादर केले.
- 1990 : भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
- हेही पहा : भारतीय इतिहासातील 30 सर्वात प्रसिद्ध व्यक्ती
13 एप्रिल
- आंतरराष्ट्रीय पगडी दिन (गुरुनानक जयंती)
- सियाचीन दिन
- 1929 : चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले.
- 1933 : डॉ. सोलंकी यांना मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मानपत्र देण्यात आले.
- बाबासाहेबांची मोठी बहीण तुळसाबाईंचा स्मृतिदिन
14 एप्रिल
- आंबेडकर जयंती
- राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन
- जागतिक चागस रोग दिन
- 1891 : मध्य प्रदेशातील महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. महू या गावचे नामकरण सध्या ‘डॉ. आंबेडकर नगर’ असे करण्यात आले आहे. येरे भीम जन्मभूमी स्मारक भरण्यात आले आहे.
- 1928 : डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी रोजी पुण्यात साजरी केली होती.
- 1929 :रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले.
- 1984 : कांशीराम यांच्याद्वारे बहुजन समाज पक्ष (बसपा) स्थापन करण्यात आला.
- राहुल सांकृत्यायन स्मृतिदिन (1963)
15 एप्रिल
- जागतिक कला दिन
- 1948 : दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. विवाहसमयी बाबासाहेबांचे वय 57 वर्ष तर शारदा कबीर यांचे वय 39 वर्ष होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता त्यावर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर करत होत्या. तेव्हा दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, डॉ. कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. लग्नानंतर शारदा कबीर ह्या ‘सविता आंबेडकर‘ या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. नंतरच्या काळात त्यांना ‘माईसाहेब’ म्हटले जाऊ लागले.
Timeline of Dr Ambedkar in April
16 एप्रिल
- हत्ती वाचवा दिन
- जागतिक आवाज दिन
- 1933 : महार समाज सेवा संघ, मुंबईतर्फे सहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- 1934 : नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत करण्यात आले.
- 1951 : नवी दिल्ली येथे बाबासाहेबांच्या हस्ते आंबेडकर भवनाचा कोनशिला समारंभ झाला.
- हेही पहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक सुविचार
17 एप्रिल
- जागतिक हिमोफि
- 1920 : राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते नाशिक येथील अस्पृश्य वसतीगृहाचा शिलान्यास करण्यात आला.
- 1923 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1922 मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईत परतले.
- 1936 : शीख धर्माच्या प्रचार कार्यासाठी धर्मांतरित कार्यकर्त्यांच्या नेमणुका झाल्या.
18 एप्रिल
- 1913 : 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली होती. त्यांना दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले.
- 1918 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
- 1939 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजकोटचे राज साहेब ठाकूर यांची भेट झाली.
19 एप्रिल
- 1931 : गोलमेज परिषदेतून परतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई, परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय (पुढारी) अस्पृश्य परिषद आयोजित केली. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.
- 1942 : रोहिदास तरुण सुधारक संघ, महिला शाखेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
20 एप्रिल
- 1938 : सातारा येथील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.
- 1942 : चौपाटीवर डॉ. एम.आर. जयकर यांचे अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुवर्णजयंती साजरी करण्यात आली.
21 एप्रिल
- 1940 : आशा-प्रमोद साप्ताहिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली.
- 1936 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली पांढरकवडा येथे अस्पृश्यांची जाहीर सभा झाली.
- हेही पहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
22 एप्रिल
- 1933 : सोपारा, वसई येथील एका सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- 1947 : सरदार वल्लभभाई पटेल यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे सुचवले की आर्थिक नियोजनासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी.
23 मार्च
- 1933 : दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जयंती
24 एप्रिल
- 1933 : कुर्ला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने 24 एप्रिल 1933 रोजी लंडनकडे निघाले आणि 6 मे 1933 रोजी लंडनला पोहोचले.
- 1948 : लखनऊ येथे संयुक्त प्रांत शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या अधिवेशनात बाबासाहेबांचे भाषण झाले.
25 एप्रिल
- 1947 : डॉ. राजेंद्र प्रसाद यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण पत्र पाठवण्यात आले.
26 एप्रिल
- 1929 : 43 गिरण्यांतील पाऊण लाख कामगारांचा संप झाला.
- 1937 : अस्पृश्य महिला सुधारक मंडळाची नागपूर येथे स्थापना करण्यात आली.
27 एप्रिल
- 1938 : मुंबई पोलीस ॲक्ट दुरुस्ती बिलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- 1948 : पंडित जवाहरलाल नेहरूंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र आले.
28 एप्रिल
- 1917 : राजर्षी शाहू महाराजांची दिल्लीतील बुद्ध परिषदेत उपस्थिती होती.
- 1919 : मुंबई इलाका महार वतनदार परिषद संपन्न झाली.
- 1929 : कराड तालुक्यातील उंब्रज येथे सातारा जिल्हा महासंघाची तिसरी बैठक संपन्न झाली.
29 एप्रिल
- 1929 : दामोदर हॉल, मुंबई येथे गिरणी कामगारांची सभा झाली.
- 1947 : भारतीय संविधान सभेमध्ये ‘अस्पृश्यता प्रथा’ बंदीची मागणी करण्यात आली.
- अनागरिक भदंत धम्मपाल स्मृतिदिन
30 एप्रिल
- 1927 : कामाठीपुरा येथे मुन्सिपल मुलांच्या शाळेतील बक्षीस समारंभात महाड प्रकरणावर परिसंवाद झाला.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती
एप्रिलमध्ये घडलेल्या अन्य घटना
- 1946 : एप्रिल 1946 मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)
* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *
सारांश
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण एप्रिल महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in April) याविषयीची माहिती पाहिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर यास तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.
सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर; बघा संपूर्ण यादी…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
Good information about Babasaheb