विधानसभा निवडणूक 2024 : युती-आघाडीच्या दलित आणि बौद्ध उमेदवारांची संपूर्ण यादी; बौद्ध, चांभार, मातंग उमेदवार किती?

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेले अनुसूचित जातीचे आणि बौद्ध उमेदवार आणि त्यांच्या जाती या विषयाची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. 

महायुती आणि मविआचे 59 दलित व बौद्ध उमेदवार !
2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआचे 59 अनुसूचित जातीचे आणि बौद्ध उमेदवार कोणते?

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर विविध जाती-धर्माचे उमेदवार उभे आहेत. या लेखामध्ये आपण केवळ महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांची तसेच बौद्ध धर्मीय उमेदवारांची माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 29 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी (SC) तर 25 जागा अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव असतात.

29 राखीव जागेवर सर्वच पक्षांनी अनुसूचित जातीचे उमेदवार दिले आहेत. तथापि आपण येथे केवळ महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेल्या उमेदवारांच्या जातीची माहिती (SC caste) जाणून घेऊ.

महायुती आणि महाविकास आघाडीने राखीव मतदारसंघांमध्ये दिलेल्या एकूण 58 एससी उमेदवारांमध्ये 30 हिंदू दलित (51.72%) आणि 23 नवबौद्ध (39.66%) उमेदवार आहेत, तर 5 एससी (8.62%) उमेदवारांच्या जातीची माहिती उपलब्ध नाही आहे.

Hindu Dalit and Neo-Buddhist Candidates of Mahayuti and Mahavikas Aghadi in 2024 Assembly Elections of Maharashtra
2024 विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे हिंदू दलित आणि नवबौद्ध उमेदवार – Hindu Dalit and Neo-Buddhist Candidates of Mahayuti and Mahavikas Aghadi in 2024 Assembly Elections of Maharashtra

महायुती-महाविकास आघाडीने दिलेल्या अनु. जातीच्या आणि बौद्ध उमेदवारांची संपूर्ण यादी 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेले अनुसूचित जातीचे व बौद्ध उमेदवार यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

राखीव जागा 

1) भुसावळ 12

संजय सावकारे (भाजप) – चांभार
राजेश मानवरकर (काँग्रेस) – बौद्ध

 

2) मेहकर 25

संजय रायमुलकर (शिवसेना) – बलाई
सिद्धार्थ खरात (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

3) मूर्तिजापूर 32

हरीश पिंपळे (भाजप) – ??? / लिंगायत
सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

4) वाशिम 34

श्याम खोडे (भाजप) – चांभार
सिद्धार्थ देवळे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

5) दर्यापूर 40

अभिजीत अडसूळ (शिवसेना) – चांभार
गजानन लवटे (शिवसेना (उबाठा)) – खाटीक

 

6) उमरेड 51 (बातमी)

सुधीर पारवे (भाजप) – खाटीक
संजय मेश्राम (काँग्रेस) – बौद्ध

 

7) नागपूर उत्तर 57

मिलिंद माने (भाजप) – बौद्ध
नितीन राऊत (काँग्रेस) – बौद्ध

 

8) भंडारा 61 (बातमी)

नरेंद्र भोंडेकर (शिवसेना) – चांभार
पूजा ठवकर (काँग्रेस) – चांभार ?

 

9) अर्जुनी मोरगाव 63

राजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
दिलीप बनसोडे (काँग्रेस) – बौद्ध

 

10) चंद्रपूर 71

किशोर जोरगेवार (भाजप) – बुरुड
प्रवीण पाडवेकर (काँग्रेस) – बौद्ध

 

11) उमरखेड 82

किसन वानखेडे (भाजप) – बौद्ध ?
साहेबराव कांबळे (काँग्रेस) – बौद्ध

 

12) देगलूर 90

जितेश अंतापुरकर (भाजप) – मांग
निवृत्ती कांबळे (काँग्रेस) – बौद्ध

 

13) बदनापूर 102

नारायण कुचे (भाजप) – चांभार
रूपकुमार चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – भंगी ?

 

14) औरंगाबाद पश्चिम 108

संजय शिरसाठ (शिवसेना) – बौद्ध
राजू शिंदे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

15) देवलाली 126

सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – चांभार
योगेश घोलप (शिवसेना (उबाठा)) – चांभार

 

16) अंबरनाथ 140

बालाजी किनीकर (शिवसेना) – बौद्ध
राजेश वानखेडे (शिवसेना (उबाठा)) – बौद्ध

 

17) कुर्ला 174

मंगेश कुदळकर (शिवसेना) – चांभार
प्रवीणा मोरजकर (शिवसेना (उबाठा)) – ???

 

18) धारावी 178

राजेश खंदारे (शिवसेना) – ???
ज्योती गायकवाड (काँग्रेस) – बौद्ध

 

19) पिंपरी 206

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
सुलक्षणा शीलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

20) पुणे छावणी 214

सुनील कांबळे (भाजप) – मांग
रमेश बागवे (काँग्रेस) – मांग

 

21) श्रीरामपूर 220

भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) – चांभार
हेमंत ओगले (काँग्रेस) – ???

 

22) केज 232

नमिता मुंदडा (भाजप) – चांभार
पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – मांग

 

23) उदगीर 237

संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध
सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – मांग

 

24) उमरगा 240

ज्ञानराज चौगुले (शिवसेना) – कक्कय्या
प्रवीण स्वामी (शिवसेना (उबाठा)) – बेडा/ माला जंगम

 

25) मोहोळ 247

यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस) – कक्कय्या
राजू खरे (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – बौद्ध

 

26) माळशिरस 254

राम सातपुते (भाजप) – चांभार
उत्तम जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – खाटीक (धनगर)

 

27) फलटण 255

सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – बौद्ध ?
दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस-श.प.) – ???

 

28) हातकणंगले 278

अशोक माने (जनसुराज्य शक्ती) – चांभार
राजू आवळे (काँग्रेस) – मांग

 

29) मिरज 281

सुरेश खाडे (भाजप) – चांभार
तानाजी सातपुते (शिवसेना (उबाठा)) – चांभार

 

सर्वसाधारण जागा

30) भायखळा 184

यामिनी जाधव (शिवसेना) – बौद्ध

 

31) उल्हासनगर 141

भगवान भालेराव (मनसे) – बौद्ध


टीप : (1) प्रत्येक विधानसभा मतदारसंघासमोर त्यांचा “क्रमांक” दिला आहे; (2) ज्या उमेदवाराची जात माहिती नाही, जातीच्या जागी “???” चिन्ह वापरले आहे; आणि (3) उमेदवाराची जात माहिती आहे, पण त्याचा ठोस पुरावा नाही, अशावेळी जातीसोबत “?” चिन्ह वापरले. (4) ‘बौद्ध‘ म्हणून नोंद केलेले उमेदवार हे महार या अनुसूचित जातीचे आहेत.


पक्षनिहाय अनु. जातीचे आणि बौद्ध उमेदवार

महाविकास आघाडी आणि महायुतीने दिलेल्या अनु. जातीच्या उमेदवारांची संख्या, त्यांपैकी बौद्धांची संख्या ही माहिती खालीलप्रमाणे आहे :

महायुती – 30 SCs (9 Buddhists)

भाजप – 13 SCs (2 Buddhists)
शिवसेना – 10 SCs (3 Buddhists)
राष्ट्रवादी काँग्रेस – 6 SCs (4 Buddhists)
जनसुराज्य शक्ती – 1 SC (0 Buddhist)

 

महाविकास आघाडी – 29 SCs (15 Buddhists)

काँग्रेस – 12 SCs (8 Buddhists)
शिवसेना (उबाठा) – 9 SCs (4 Buddhists)
राष्ट्रवादी काँग्रेस-श.प. – 8 SCs (3 Buddhists)

 

वंचित बहुजन आघाडी – 99 SCs (94 Buddhists)

‘वंचित’चे निम्मे उमेदवार बौद्ध – प्रकाश आंबेडकर यांनी या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे तब्बल 94 बौद्ध उमेदवार (48 टक्के) दिले आहेत. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये 94 उमेदवार बौद्ध, 23 उमेदवार मुस्लिम, 17 उमेदवार इतर मागासवर्गीय आणि 15 उमेदवार भटके-विमुक्त गटातील आहेत. याखेरीज वंचितने पाच मराठा, एक चांभार आणि चार मातंग उमेदवार सुद्धा दिले आहेत. (बातमी पाहा)

हेही पाहा : विधानसभा 2024 : वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण उमेदवारांची यादी

 

कोणत्या जातीचे किती उमेदवार ?

सर्वाधिक एससी आणि बौद्ध उमेदवार वंचित बहुजन आघाडी दिले आहेत परंतु निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता महायुती व मविआच्या उमेदवारांची आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीने एकूण 59 अनुसूचित जातीचे उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत, ज्यामध्ये 58 उमेदवार (29 x 2) राखीव मतदारसंघांतून आणि तर एक उमेदवार हा सर्वसाधारण मतदारसंघातून (भायखळा येथून) उभा आहे.

24 बौद्ध (महार), 15 चांभार, 6 मांग, 3 खाटीक, 2 कक्कय्या, प्रत्येकी 1 बुरुड, बलाई, भंगी व जंगम. (उर्वरित 5 उमेदवारांच्या जाती अज्ञात आहेत)

हरीश पिंपळे (मुर्तीजापुर), प्रवीणा मारोजकर (कुर्ला), राजेश खंदारे (धारावी), हेमंत ओगले (श्रीरामपूर) व दीपक चव्हाण (फलटण) या पाच एससी उमेदवारांच्या जातींची माहिती मिळू शकली नाही. 

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू). Neo-Buddhists vs Hindu Dalits population in Maharashtra
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे दोन धार्मिक गट – नवबौद्ध (एससी बौद्ध) आणि हिंदू दलित (एससी हिंदू). 2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींमध्ये महारांसह नवबौद्धांचे प्रमाण 62% आणि हिंदू दलितांचे प्रमाण 38% आहे. (62% नवबौद्धांमध्ये एकट्या महार समाजाचे प्रमाण 60% तर उर्वरित 2 टक्क्यांमध्ये इतर 52 अनुसूचित जातीच्या बौद्धांचा समावेश होतो.)

कोणत्या पक्षाने कोणत्या अनुसूचित जातीचे किती उमेदवार दिले?

24 बौद्ध उमेदवार : काँग्रेसने सर्वाधिक बौद्ध उमेदवार दिले आहे. 24 बौद्ध उमेदवारांमध्ये महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 15 उमेदवार आहेत. काँग्रेसचे 8, शिवसेना (उबाठा) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 4, राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार आणि शिवसेना (शिंदे) यांचे प्रत्येकी तीन, तर भाजपने 2 उमेदवार बौद्ध आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसघांमध्ये युती-आघाडीच्या बौद्ध उमेदवारांची संख्या 23 आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने एक बौद्ध उमेदवार सर्वसाधारण खुल्या मतदारसंघातून दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकूण बौद्ध उमेदवारांची संख्या 24 आहे.

15 चांभार उमेदवार : एकूण 15 उमेदवारांपैकी, सर्वाधिक (11) चांभार उमेदवार हे महायुतीने दिले आहेत. भाजपने 5, शिवसेना (शिंदे)ने 4, शिवसेना (उबाठा) 2, आणि काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, JSS यांचे प्रत्येकी एक उमेदवार चांभार आहेत. 

6 मांग उमेदवार : या निवडणुकीत महायुतीने दोन तर महाविकास आघाडीने चार मांग व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार मातंग समाजाचे दिले आहेत.

3 खाटीक उमेदवार : तीन खाटीक उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत. भाजप, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार खाटीक दिला आहे.

राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार हा मूळचा “धनगर” समाजाचा असून तो “खाटीक” या अनुसूचित जातीचे खोटे जात प्रमाणपत्र काढले आहे. 

धनगर समाजाला स्वतंत्रपणे एनटी-सी (ओबीसी) अंतर्गत 3.5 टक्के आरक्षण आहे, मात्र तरी उत्तम जानकर या धनगर नेत्याने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेणे अत्यंत धक्कादायक आहे.

2 कक्कय्या उमेदवार : कक्कय्या जातीचे दोन्ही उमेदवार महायुतीने (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) दिले आहेत.

प्रत्येकी 1 बुरुड, बलाई, जंगम व भंगी उमेदवार : त्यानंतर भाजपने बुरुड जातीच्या व्यक्तीला, तर शिवसेना (उबाठा)ने बलाई व जंगम व्यक्तीला, आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने एका भंगी उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत.

इतर उमेदवार : अद्याप, 5 एससी उमेदवारांच्या जातींची माहिती मिळाली नाही. या उमेदवारांच्या जातींची माहिती मिळाल्यानंतर वरील समीकरणांमध्ये सुद्धा बदल होईल.)

 

कोणत्या जातीचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात?

महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध उमेदवारांमध्ये कोणत्या जातीचे कमाल किती उमेदवार उमेदवार निवडणुकीत जिंकू शकतात, त्याची शक्यता खालीलप्रमाणे आहे.

24 बौद्ध (महार) उमेदवारांपैकी कमाल 18 उमेदवार जिंकू शकतात. (6 ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत आहे.)

15 चांभार उमेदवारांपैकी कमाल 12 उमेदवार जिंकू शकतात. (3 ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत आहे.)

6 मांग उमेदवारांपैकी कमाल कमाल 5 उमेदवार जिंकू शकतात. (एका ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढत आहे.)

तीन खाटीक, दोन कक्कया, एक बुरुड, एक बलाई, एक भंगी आणि एक जंगम हे सर्व एससी उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. (कारण या जातींच्या उमेदवारांची लढत एकमेकांविरुद्ध नाही.)

Three Largest Scheduled Castes in Maharashtra
2011 ची जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींमध्ये एकट्या महार (बौद्ध) समाजाचे प्रमाण 60 टक्क्यांहून थोडीसे अधिक आहे, उर्वरित 58 जातींची लोकसंख्या सुमारे 40% आहे.

हिंदू दलित आणि नव-बौद्ध उमेदवार !

महायुती आणि महाविकास आघाडीने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 मतदारसंघात किती हिंदू दलित आणि नवबौद्धांना उमेदवारी दिली ते जाणून घेऊया.

29 राखीव मतदारसंघांमध्ये, महायुतीने 19 हिंदू दलित उमेदवार (राखीव जागांच्या 65.52%) आणि 8 नव-बौद्ध उमेदवार (27.59%) उभे केले. तसेच महायुतीचे आणखी दोन (6.90%) दलित उमेदवार आहेत, ज्यांच्या जातीची माहिती मिळू शकली नाही. याशिवाय महायुतीने सर्वसाधारण खुल्या मतदारसंघातून आणखी एक अनुसूचित जातीचा बौद्ध (नवबौद्ध) उमेदवार दिला आहे.

दुसरीकडे, 29 राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीने 11 हिंदू दलित उमेदवार (राखीव जागांच्या 37.93%) आणि 15 नव-बौद्ध उमेदवार (51.72%) उभे केले आहेत. मविआच्या उर्वरित तीन (10.34%) दलित उमेदवारांच्या जातीबद्दल माहिती मिळू शकली नाही.

 

राखीव मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे उभे केलेल्या एकूण 58 SC उमेदवारांपैकी 30 हिंदू दलित (51.72%) आणि 23 नव-बौद्ध (39.66%) उमेदवार आहेत, तर 5 (8.62%) SC उमेदवारांच्या जातीची माहिती उपलब्ध नाही.

राज्यातील अनुसूचित जातींमध्ये, हिंदू दलित समाज, ज्याची संख्या साधारणपणे 38-40 टक्के आहे, त्यांना 52% उमेदवारी दिली आहे; तर नव-बौद्ध (प्रामुख्याने महार) समाज, ज्यांचे प्रमाण 60-62 टक्के आहे, त्यांना केवळ 40 टक्के उमेदवारी मिळाली आहे.

Hindu Dalit and Neo-Buddhist Candidates of Mahayuti and Mahavikas Aghadi in 2024 Assembly Elections and Religious Population of Scheduled Castes in Maharashtra
2024 विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे हिंदू दलित आणि नवबौद्ध उमेदवार आणि राज्यातील अनुसूचित जातीची धार्मिक लोकसंख्या – Hindu Dalit and Neo-Buddhist Candidates of Mahayuti and Mahavikas Aghadi in 2024 Assembly Elections and Religious Population of Scheduled Castes in Maharashtra

निवडणुकीतील एससी उमेदवारांचे आमने-सामने!

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या एससी उमेदवारांमध्ये रंजक लढत होणार आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 29 मतदार संघांपैकी 10 मतदारसंघांमध्ये “हिंदू दलित विरुद्ध हिंदू दलित” उमेदवार, 8 मतदारसंघांमध्ये “हिंदू दलित विरुद्ध नवबौद्ध” आणि 6 मतदारसंघांमध्ये “नवबौद्ध विरुद्ध नवबौद्ध” अशी लढत होणार आहे. (उर्वरित 5 राखीव मतदारसंघांमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्हीपैकी एकाच्या एससी उमेदवारांच्या जातीची माहिती उपलब्ध नाही.)

महायुती आणि महाविकास आघाडीने राखीव मतदारसंघांमध्ये दिलेल्या एकूण 58 एससी उमेदवारांमध्ये 30 हिंदू दलित (51.72%) आणि 23 नवबौद्ध (39.66%) उमेदवार आहेत, तर 5 एससी (8.62%) उमेदवारांच्या जातीची माहिती उपलब्ध नाही आहे.

राज्यातील अनुसूचित जातींमध्ये साधारणपणे 38-40 टक्के प्रमाण असणाऱ्या हिंदू दलित समुदायाला 52% उमेदवारी दिली आहे, तर 60-62 टक्के प्रमाण असणाऱ्या नवबौद्ध अर्थात महार समुदायाला अवघी 40% उमेदवारी मिळाली आहे.

 

बौद्ध विरुद्ध बौद्ध” अशी लढत नागपूर उत्तर, अर्जुनी मोरगाव, उमरखेड, औरंगाबाद पश्चिम, अंबरनाथ व पिंपरी या 6 मतदारसंघांमध्ये होत आहे.

चांभार विरुद्ध चांभार” अशी लढत भंडारा, देवलाली आणि मिरज या 3 मतदारसंघांमध्ये होणार आहे.

मांग विरूद्ध मांग” अशी लढत केवळ पुणे छावणी मतदारसंघामध्ये होत आहे.

 

अशाही लढत होईल…

चांभार विरुद्ध बौद्ध – भुसावळ आणि वाशिम

चांभार विरुद्ध मांग – केज आणि हातकणंगले

चांभार विरुद्ध खाटीक – दर्यापूर आणि माळशिरस

चांभार विरुद्ध भंगी – बदनापूर

बौद्ध विरुद्ध खाटीक – उमरेड

बौद्ध विरुद्ध मांग – देगलूर आणि उदगीर

बौद्ध विरुद्ध बुरुड – चंद्रपूर

बौद्ध विरुद्ध कक्कय्या – मोहोळ

बौद्ध विरुद्ध बलाई – मेहकर 

जंगम विरुद्ध कक्कय्या – उमरगा

 

विधानसभेत दलितांना-बौद्धांना प्रतिनिधित्व किती?

सध्याच्या [2019-24 कार्यकाळातील] 14व्या विधानसभेत 288 मध्ये 9 बौद्ध आमदार (एकूण आमदारांच्या 3.1%) होते. महाराष्ट्रात महारांसह बौद्धांची लोकसंख्या 8.5 टक्के आहे, पण विधानसभेत प्रतिनिधित्व 3 टक्के आहे.

14व्या महाराष्ट्र विधानसभेत 29 राखीव जागांपैकी 8 बौद्ध आमदार (एकूण एससी आमदारांच्या 27.59%) होते. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये महार आणि नवबौद्धांची अर्थात एससी बौद्धांची लोकसंख्या 65 टक्के आहे, पण विधानसभेत त्यांना अवघे 27.6 टक्के प्रतिनिधित्व आहे.

मग विधिमंडळात बौद्धांचे प्रश्न कोण मांडणार? एका बाजूला आर्थिक भ्रांत, संधीचा शोध आणि दुसरीकडे जातीय तेढीच्या राजकारणात अडकणं ही महाराष्ट्राच्या बौद्धांची शोकांतिका आहे.

Mahars and neo-Buddhists have the highest proportion of Dalits
दलितांमध्ये सर्वाधिक प्रमाण महार अन् नवबौद्धांचे – Mahars and neo-Buddhists have the highest proportion of Dalits

23 नोव्हेंबर 2024 रोजी निकालानंतर, आगामी 15व्या विधानसभेत कोण-कोणते एससी व बौद्ध उमेदवार निवडून येतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. निकालानंतर अनुसूचित जातीच्या आणि बौद्धांच्या विधानसभेतील प्रतिनिधित्वात किती बदल होतो हे सुद्धा कळेल.

महाराष्ट्र एकूण 59 अनुसूचित जाती (आणि उपजाती) आहेत. तथापि त्यांचे दोन प्रमुख गट करायचे झाले तर ते ‘दलित हिंदू’ आणि ‘नवबौद्ध’ असे आहेत.

दलित हिंदू म्हणजेच अनुसूचित जातीची हिंदू धर्मीय व्यक्ती (SC Hindu) आणि नवबौद्ध म्हणजेच अनुसूचित जातीची बौद्ध धर्मीय व्यक्ती (SC Buddhist) होय. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये हिंदू दलितांची लोकसंख्या 35 टक्के आणि महारांसह नवबौद्धांची संख्या 65 टक्के आहे. पण बौद्धांना मिळणारे राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे 13 टक्के आहे. लोकसंख्येचे प्रमाणानुसार अनुसूचित जातीचे 37 आमदार विधानसभेत असायला हवे. पण सद्यस्थितीत अनुसूचित जातींसाठी 29 राखीव जागा आहेत, जर एखाद्या सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार निवडून आला तर विधानसभेत फक्त 30 जागा अनुसूचित जातीचे आमदार असू शकतात, जे की प्रतिधित्वानुसार कमी आहे.

केवळ महार + बौद्ध या दोन समूहांचा विचार केला तर त्यांना (8.5%) लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विधानसभेत 24 ते 25 जागा मिळायला हव्यात. पण या समूहासाठी मिळणाऱ्या जागा 10 च्या आसपास असतात. 

खुल्या गटातील 13 लाख बौद्ध : 2011 च्या जनगणनेत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 एक 33 लाख (11.8%) होती, तर एससी-एसटी म्हणून नोंद झाली नाही अशा बौद्धांची लोकसंख्या सुमारे 13 लाख होती. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये जर या 13 लाख बौद्धांपैकी 10 लाख जरी समाविष्ट केले तरी राज्यातील एससी लोकसंख्या 13% पर्यंत जाते.

10 लाख बौद्ध = महार मूळच्या लाखो लोकांनी जनगणनेत त्यांची [59 पैकी एक] ‘अनुसूचित जात’ नोंदवली नाही तर केवळ ‘धर्म’ कॉलममध्ये बुद्धिस्ट नोंदवले. (2011 च्या जनगणनेनुसार, राज्यात एकूण बौद्ध लोकसंख्या 65 लाख होती, त्यांपैकी एससी बौद्ध 52 लाख, आणि एसटी बौद्ध 21 हजार होते. उर्वरित 13 लाख बौद्ध हे सर्वसाधारण प्रवर्गात गणले गेले होते.)


टिप : बौद्ध, नवबौद्ध व महार या शब्दप्रयोगाबद्दल :

या लेखामध्ये जाणीवपूर्वक “अनुसूचित जातीच्या बौद्धांसाठी” ‘नवबौद्ध‘ शब्द वापरण्यात आला आहे, कारण येथे ‘बौद्ध‘ शब्द अनुचित ठरला असता. ज्याप्रमाणे ‘दलित हिंदू‘ किंवा ‘हिंदू दलित‘ या शब्दांतून “अनुसूचित जातीची हिंदू व्यक्ती” (एससी हिंदू) असा अर्थ निघतो, त्याचप्रमाणे “अनुसूचित जातीची बौद्ध व्यक्ती” (एससी बौद्ध) यासाठी ‘नवबौद्ध‘ हा शब्दप्रयोग वापरला जातो.

दलित बौद्ध‘ किंवा ‘बौद्ध दलित‘ ऐवजी ‘नवबौद्ध‘ शब्दप्रयोग करणे अधिक श्रेयस्कर आहे. “बौद्ध व्यक्ती” या शब्दातून ती व्यक्ती ‘अनुसूचित जाती‘ची आहे किंवा नाही तसेच ती व्यक्ती ‘महार‘ जातीची आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नाही.

खरंतर ‘नवबौद्ध‘ ही अनुसूचित जात नाही, तर तो 59 अनुसूचित जातीतल्या बौद्ध धर्मीय व्यक्तींसाठी समूहवाचक शब्द आहे. ‘महार’ ही अनुसूचित जात आहे, त्यामुळे येथे नवबौद्ध, बौद्ध, आणि महार असे तीनही शब्दप्रयोग आवश्यकतेनुसार करण्यात आले आहेत.


वाचकांसाठी : हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला लेखातील एससी उमेदवारांच्या जाती माहिती असल्यास तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!