महाराष्ट्रातील बौद्ध आमदार (2019-2024)

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 9 बौद्ध आमदार निवडून आले होते. 2019 ते 2024 या कार्यकाळातील चौदाव्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील बौद्ध समाजातील आमदारांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

महाराष्ट्रातील बौद्ध आमदार 2019 - Buddhist MLAs in Maharashtra 2019-2024
महाराष्ट्रातील बौद्ध आमदार 2019 – Buddhist MLAs in Maharashtra 2019-2024

यापूर्वी आपण 2019 च्या महाराष्ट्रातील बौद्ध खासदारांबदद्ल जाणून घेतले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक बौद्ध आमदार झालेले आहेत. त्यांपैकी काहींनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री म्हणून देखील काम केले आहे. तथापि, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यातील बौद्ध समाजाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात (विधान परिषद आणि विधानसभा) योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. 

‘आमदार’ म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होय. राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद या तिघांचे मिळून राज्य विधिमंडळ होते. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य हे आमदार असतात, ज्यांना हिंदीत ‘विधायक’ म्हटले जाते.

मात्र इंग्रजीत मात्र विधानसभेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली’ (एमएलए) तर विधान परिषदेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’ (एमएलसी) म्हणतात. – Current Buddhist MLAs and MLCs from Maharashtra

2019 ते 2024 या कार्यकाळात चौदावी महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात होती. या विधानसभेत एकूण 9 बौद्ध आमदार होते. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर देखील एक बौद्ध आमदार होता. 

 

महाराष्ट्रातील बौद्ध आमदार – विधानसभा

1. नितीन राऊत (1999-2014; 2019-वर्तमान)

नागपूर उत्तरचे बौद्ध आमदार डॉ. नितीन राऊत - Dr Nitin Raut Buddhist MLA
नागपूर उत्तरचे बौद्ध आमदार डॉ. नितीन राऊत – Dr Nitin Raut Buddhist MLA

नितीन काशिनाथ राऊत हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि एससी विभागासाठी AICC (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) चे अध्यक्ष आहेत.

नागपूर जिल्ह्यातील नागपूर उत्तर मतदारसंघातून ते चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने नितीन राऊत यांचे कुटुंब बौद्ध धर्माचे अनुसरून करते आणि त्यांचा बौद्ध तत्त्वज्ञानावर विश्वास आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील ते निवडून आले. 

नितीन राऊत यांनी भूषवलेली राजकीय पदे

  • 1999 – 2004: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली टर्म)
  • 2004 – 2009: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी टर्म)
    • 2008 – 2009 : गृह, कारागृह, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र राज्यमंत्री
  • 2009 – 2014: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (तिसरी टर्म)
    • 2009 – 2014 : महाराष्ट्राचे फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार हमी योजना आणि जलसंपदा मंत्री
    • 2009 – 2014 : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री
  • 2019 – 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी टर्म)
    • 2019 – 2019 : सार्वजनिक बांधकाम (पीएसयू वगळून), आदिवासी विकास, महिला आणि बालविकास, वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, वंचित जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय कल्याण कॅबिनेट मंत्री
    • 2019 – 2022 : महाराष्ट्राचे अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री
    • 2020 – 2022 : नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री

नितीन राऊत यांनी लिहिलेली महत्त्वपूर्ण पुस्तके खालील प्रमाणे आहेत.

  • Buddhist Marriage and Succession Act, 2007
  • Dr. Babasaheb Ambedkar’s views on Birth Control and its Relevance with Modern India
  • Buddhism and Dalit: Social Philosophy and Tradition

 

2. वर्षा गायकवाड (2004-2024)

Varsha Gaikwad Buddhist MP
Varsha Gaikwad Buddhist MP

वर्षा एकनाथ गायकवाड या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत. त्या 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री होत्या. मुंबईतील [एस्सी राखीव] धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या सलग चार वेळा निवडून आल्या आहेत. 2004 ते 2024 या काळात त्या आमदार होत्या. सद्यस्थितीत त्या माजी आमदार आणि विद्यमान खासदार आहेत.

त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे देखील तीन वेळा खासदार होते. वर्षा गायकवाड या आंबेडकरवादी बौद्ध कुटुंबातील आहे. त्या मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या. 

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या संसदेवर निवडून गेल्या. मुंबई उत्तर मध्ये या खुल्या मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. त्यांनी भाजपच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत धारावी मतदार संघातून वर्ष गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड निवडून आली आहे.

वर्षा गायकवाड यांनी भूषवलली राजकीय पदे 

  • 2004– 2009 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
  • 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
    • 2009 – 2010 : वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन, विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री
    • 2010 – 2014 : महिला आणि बालविकास विभागाच्या 
  • 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (तिसरी वेळ)
  • 2019 – 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी वेळ)
    • 2019 – 2022 : शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री
  • 2024 – वर्तमान – संसद सदस्य (लोकसभा खासदार)

 

3. संजय बनसोडे (2019-वर्तमान)

उदगीरचे बौद्ध आमदार संजय बनसोडे - Sanjay Bansode Buddhist MLA
उदगीरचे बौद्ध आमदार संजय बनसोडे – Sanjay Bansode Buddhist MLA

संजय बाबुराव बनसोडे (जन्म 31 डिसेंबर 1973) हे भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते 14 जुलै 2023 पासून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी देखील 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 या कालावधीत महाराष्ट्राचे मंत्री होते. संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील एका आंबेडकरी बौद्ध कुटुंबातील आहेत.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. अनिल कांबळे यांचा पराभव करून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (आमदार) झाले. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत देखील भाग घेतला होता.

2024 च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा विजय झाला आणि ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.

 

4. संजय शिरसाट (2009-वर्तमान)

औरंगाबाद पश्चिमचे बौद्ध आमदार संजय शिरसाठ - Buddhist MLA Sanjay Shirsat
औरंगाबाद पश्चिमचे बौद्ध आमदार संजय शिरसाठ – Buddhist MLA Sanjay Shirsat

संजय पांडुरंग शिरसाट हे भारतीय राजकारणी आणि शिवसेनेचे सदस्य आहेत. ते सलग तीन वेळा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत. संजय शिरसाठ हे महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार आहेत.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

संजय शिरसाट यांनी भूषवलेली राजकीय पदे

  • 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
  • 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
  • 2019 – 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (तिसरी वेळ)
  • 2024 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी वेळ)

 

5. बालाजी किणीकर (2009-वर्तमान)

अंबरनाथचे बौद्ध आमदार बालाजी किणीकर - Balaji Kinikar Buddhist MLA
अंबरनाथचे बौद्ध आमदार बालाजी किणीकर – Balaji Kinikar Buddhist MLA

बालाजी किणीकर हे भारतीय राजकारणी असून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेचे सदस्य आहेत. ते सलग तीन वेळा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विजय झालेले आहेत. आमदार बालाजी किनीकर सुद्धा बौद्ध समाजातून येतात.

बालाजी किनीकर यांनी भूषवलेली राजकीय पदे

  • 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
  • 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
  • 2019 – 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (तिसरी वेळ)
  • 2024 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी वेळ)

 

6. अण्णा बनसोडे (2009-14; 2019-वर्तमान)

पिंपरीचे बौद्ध आमदार अण्णा बनसोडे - Anna Bansode is Buddhist MLA
पिंपरीचे बौद्ध आमदार अण्णा बनसोडे – Anna Bansode is Buddhist MLA

अण्णा दादू बनसोडे हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. 24 ऑक्टोबर 2019 पासून ते पुणे जिल्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यापूर्वी ते 2009 मध्ये पिंपरीतून निवडून आले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.

  • 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
  • 2019 – 2029 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
  • 2024 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (तिसरी वेळ)

 

7. बळवंत वानखेडे (2019-2024)

Balwant Wankhade Buddhist MP
Balwant Wankhade Buddhist MP

बळवंत बसवंत वानखडे हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. 2019 च्या निवडणुकीत ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. ते महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार आहेत.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या संसदेवर निवडून गेल्या. मुंबई उत्तर मध्ये या खुल्या मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. त्यांनी भाजपच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.

बळवंत वानखेडे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची लढत भाजपच्या नवनीत राणा (मोची/चांभार) यांच्या सोबत होती. 

 

8. मनोहर चंद्रिकापुरे (2019-2024)

Manohar Chandrikapure Buddhist MLA
Manohar Chandrikapure Buddhist MLA

मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे एक भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून निवडून आलेले 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दोन वेळा विजेते व माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव केला. मनोहर चंद्रकापुरे आणि राजकुमार बडोले हे दोन्ही आजी-माजी आमदार बौद्ध होते.

 

9. यामिनी जाधव (2019-2024)

Yamini Jadhav Buddhist MLA
Yamini Jadhav Buddhist MLA

यामिनी यशवंत जाधव या भारतीय राजकारणी आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्या म्हणून त्या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. भायखळा हा खुला मतदारसंघ असून खुल्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या एकमेव बौद्ध आमदार होत्या.

2012 मध्ये त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. वर्षा गायकवाडानंतर यामिनी जाधव ह्या दुसऱ्या विद्यमान बौद्ध महिला आमदार आहेत.

 

महाराष्ट्रातील बौद्ध आमदार – विधान परिषद

10. विजय गिरकर (2012-2024)

Vijay Girikar Buddhist MLC
विधानपरिषदेचे बौद्ध आमदार विजय गिरकर – Vijay Girikar Buddhist MLC

विजय विठ्ठल गिरकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते विधानसभा सदस्य कोट्यातून निवडून आलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मनोहर जोशी मंत्रिमंडळात (1995-99) ते महाराष्ट्राचे राज्य मंत्रीही होते.

त्यांना ‘भाई’ (भाई गिरकर) म्हणून देखील ओळखले जाते. विजय गिरकर हे महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार असून ते विधान परिषदेत एकमेव बौद्ध सभासद आहेत. त्यांच्या पत्नी काल. शैलजा विजय गिरकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर होत्या.

  • 1995 – 1999 : महाराष्ट्राचे राज्यमंत्री
  • जुलै 2012 ते जुलै 2018 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (पहिली टर्म)
  • जुलै 2018 ते जुलै 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (दुसरी टर्म)

बौद्ध आमदारांचे पक्षनिहाय वर्गीकरण

14व्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील 9 बौद्ध आमदारांपैकी 3 काँग्रेसचे, 3 शिंदेंच्या शिवसेनेचे आणि 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होते. विधान परिषदेतील एकमेव बौद्ध आमदार हे भाजपचा होते.


महाराष्ट्रात बौद्ध आमदार किती असायला हवे ?

आता आपल्याला माहिती झाले असेल की महाराष्ट्रात विधानसभेवर आठ आणि विधान परिषदेवर एक असे एकूण नऊ आमदार बौद्ध समाजाचे आहेत. पण बौद्धांना मिळालेले हे प्रतिनिधित्व लोकसंख्येचे प्रमाणात आहे का? लोकसंख्येच्या प्रमाणानुसार महाराष्ट्रात बौद्ध समाजाची किती आमदार असायला हवे?

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बौद्ध आणि महार समाजाची एकत्रित लोकसंख्या 8.5 टक्के आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, महाराष्ट्र विधानसभेत 24 किंवा 25 जागांवर बौद्ध समाजाचे आमदार असायला हवे होते, पण सध्या 9 जागांवर (3.1%) आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 6 किंवा 7 आमदार बौद्ध असायला हवेत, पण सध्या एकच बौद्ध आमदार (1.3 टक्के) आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 29 विधानसभा मतदारसंघांपैकी 19 मतदारसंघ (62%) हे एससी बौद्धांसाठी (महार + इतर एससी बौद्ध) असायला पाहिजे. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 8 बौद्ध उमेदवार (27%) या राखीव मतदारसंघांमधून विधानसभेत निवडून गेले.

महाराष्ट्र विधिमंडळात (विधानसभा + विधान परिषद दोन्ही मिळून) 30 आमदार हे बौद्ध समाजाचे असावेत, पण आता फक्त 10 (2.7%) आहेत. योग्य प्रतिनिधित्वासाठी बौद्ध समाजाचे अजून 20 आमदार राज्यात असायला पाहिजे होते.

 


तुमचा अभिप्राय

तुम्हाला हा लेख वाटला याविषयी आम्हाला जरूर कळवा. जर तुम्हाला लेख आवडला असेल तर तो इतरांसोबत नक्की शेअर करा. या लेखाबद्दल तुमचे काही विचार/मत किंवा काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद



धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!