महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी (VBA candidate list 2024) या लेखामध्ये देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : या निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघांतून एकूण 4,136 उमेदवार उभे होते. त्यांपैकी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार उभे होते.
पण काही अपवाद वगळता, राज्यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होती. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीही पाहायला मिळाली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 213 उमेदवारांना पक्षाचे ‘ए-बी’ अर्ज दिले होते. काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून काहींनी उमेदवारी माघारी घेतली आहे. प्रत्यक्षात ‘वंचित’चे 200 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते.
हेही पाहा : 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना किती मते मिळाली? (तुलनात्मक मते)
हेही पाहा : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक SC जातीची लोकसंख्या
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी खेरीज आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांच्यासह इतर अनेक आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी सुद्धा या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते.
‘वंचित’च्या उमेदवारांमध्ये बाळापूरचे नतीबुद्दीन खतीब आणि गंगाखेड मतदारसंघात सीताराम घनदाट हे दोन माजी आमदार होते. ‘वंचित’ने 17 महिला उमेदवार दिले, तसेच एका तृतीयपंथीयाला (शमीभा पाटील) देखील उमेदवारी दिली होते.
वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे, ज्याने आपले उमेदवार जाहीर करताना त्यांची जात (caste) किंवा समाज (community) देखील नमूद केला.
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी उभे केलेल्या एकूण 200 उमेदवारांपैकी सुमारे 50% उमेदवार अनुसूचित जातीचे होते, त्यातही 90+ बौद्ध उमेदवारांचा समावेश होते. ‘वंचित’ने या वेळी पक्षाचा पाया असलेल्या बौद्ध समाजाला उमेदवारीत प्राधान्य दिले.
VBA Candidates List 2024 : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिकृत दस्ताऐवज अभ्यासल्यानंतर, 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण उमेदवारांची यादी खाली दिली आहे.
विधानसभा मतदारसंघ आणि मतदारसंघाचा क्रमांक, आणि ‘वंचित’च्या उमेदवाराचे नाव खालीलप्रमाणे :
Vanchit Bahujan Aghadi candidate list
धुळे जिल्हा
1. 7-धुळे शहर :- जितेंद्र उंडा शिरसाठ
जळगाव जिल्हा
2. 11-रावेर :- शमीभा भानुदास पाटील
3. 12-भुसावळ :- जगन देवराम सोनवणे
4. 13-जळगाव शहर :- ललीतकुमार रामकिशोर घोगले
5. 14-जळगाव ग्रामीण :- प्रवीण जगन सपकाळे
6. 18-पाचोरा :- अमित मंखा तडवी
7. 20-मुक्ताईनगर :- संजय पंडित ब्राम्हणे
बुलढाणा जिल्हा
8. 21-मलकापूर :- डॉ. मोहम्मद ज़मीर सबीरुद्दीन
9. 22-बुलढाणा :- प्रशांत उत्तम वाघोदे
10. 23-चिखली :- सिद्धेश्वर भगवान परिहार
11. 24-सिंदखेड राजा :- सविता शिवाजी मुंढे
12. 25-मेहकर :- डॉ. ऋतुजा रुशांक चव्हाण
13. 26-खामगाव :- देवराव भाऊराव हिवराळे
14. 27-जळगाव (जामोद) :- डॉ. प्रवीण जनार्दन पाटील
अकोला जिल्हा
15. 28-अकोट :- दीपक रामदास बोडखे
16. 29-बाळापूर :- सैय्यद नातीकोद्दीन खतीब (माजी आमदार)
17. 31-अकोला पूर्व :- ज्ञानेश्वर शंकर सुलताने
18. 32-मूर्तिजापूर :- सुगत ज्ञानेश्वर वाघमारे
हेही वाचा : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती-मविआने दिलेले अनुसूचित जातीचे आणि बौद्ध उमेदवार कोणते?
वाशिम जिल्हा
19. 33-रिसोड :- प्रशांत सुधीर गोळे
20. 34-वाशिम :- मेघा किरण डोंगरे
21. 35-कारंजा :- सुनील केशव धाबेकर
अमरावती जिल्हा
22. 36-धामणगाव रेल्वे :- डॉ. निलेश ताराचंद विश्वकर्मा
23. 37-बडनेरा – लीना घनश्याम ढोले
24. 38-अमरावती :- राहुल लीलाधर मेश्राम
25. 39-तिवसा :- मिलिंद श्रीरामजी तायडे
26. 40-दर्यापूर :- अंकुश साहेबराव वाकपंजर
27. 42-अचलपूर :- प्रदीप साहेबराव मानकर
28. 43-मोर्शी :- जफर खान फत्ते खान
Vba candidate list 2024 vidhan sabha
वर्धा जिल्हा
29. 44-आर्वी :- मारुती गुलाबराव उईके
30. 45-देवळी – कुंदन चोखा जांभूळकर
31. 46-हिंगणघाट :- अश्विन श्रावण तावडे
नागपूर जिल्हा
32. 48-काटोल :- विवेक रामचंद्र गायकवाड
33. 49-सावनेर :- अजय कुंडलिक सहारे
34. 50-हिंगणा :- अनिरुद्ध विठ्ठल शेवाळे
35. 51-उमरेड :- सपना राजेंद्र मेश्राम
36. 52-नागपूर दक्षिण-पश्चिम :- विनय भांगे
37. 53-नागपूर दक्षिण :- सत्यभामा रमेश लोखंडे
38. 54-नागपूर पूर्व :- गणेश ईश्वरजी हरकांडे
39. 56-नागपूर पश्चिम :- यश सुधाकर गौरखेडे
40. 57-नागपूर उत्तर :- मुरलीधर काशिनाथ मेश्राम
41. 58-कामठी – प्रफुल आनंदराव मानके
हेही वाचा : महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असायला हवे?
भंडारा जिल्हा
42. 60-तुमसर :- भगवान भय्या भोंडे
43. 61-भंडारा :- अरुण जाधोजी गोंदणे
44. 62-साकोली :- डॉ. अविनाश रघुनाथ नन्हे
गोंदिया जिल्हा
45. 63-अर्जुनी-मोरगाव :- दिनेश रामरतन पंचभाई
46. 64-तिरोडा :- अतुल मुरलीधर गजभिये
47. 65-गोंदिया :- सतीश सदाराम बनसोड
48. 66-आमगाव – निकेश झाडू गवाड
VBA candidate list 2024 Maharashtra
गडचिरोली जिल्हा
49. 67-आरमोरी :- मोहनदास गणपत पुराम
50. 68-गडचिरोली :- भरत मंगरुजी येरमे
चंद्रपूर जिल्हा
51. 72-बल्लारपूर :- सतीश मुरलीधर मालेकर
52. 73-ब्रम्हपुरी :- डॉ. राहुल कालिदास मेश्राम
53. 74-चिमुर :- अरविंद आत्माराम सांदेकर
54. 75-वरोरा :- अनिल नारायण धानोरकर
यवतमाळ जिल्हा
55. 76-वणी – राजेंद्र कवडुजी निमसतकर
56. 77-राळेगाव :- किरण जयपाल कुमरे
57. 78-यवतमाळ :- डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे
58. 79-दिग्रस :- नाजुकराव उदेभानजी धांदे
59. 81-पुसद :- माधव रुख्माजी वैद्य
60. 82-उमरखेड :- तातेराव मारोती हनवते
नांदेड जिल्हा
61. 83-किनवट :- डॉ. पुंडलिक गोमाजी आमले
62. 84-हदगाव :- दिलीप आला राठोड
63. 85-भोकर :- सुरेश टिकाराम राठोड
64. 86-नांदेड उत्तर :- प्रशांत विराज इंगोले
65. 87-नांदेड दक्षिण :- फारूक अहमद
66. 88-लोहा :- शिवकुमार नारायण नरंगले
67. 89-नायगाव :- डॉ. माधव संभाजीराव विभुते
68. 90-देगलूर :- सुशीलकुमार विठ्ठलराव देगलूरकर
69. 91-मुखेड :- रावसाहेब दिगंबरराव पाटील
हेही वाचा : मावळत्या विधानसभेतील बौद्ध आमदार (2019-2024)
हिंगोली जिल्हा
70. 92-बासमथ :- प्रिती मनोज जयस्वाल
71. 93-कळमनुरी :- डॉ. दिलीप तातेराव मस्के
72. 94-हिंगोली :- प्रकाश दत्तराव थोरात
परभणी जिल्हा
73. 95-जिंतूर :- सुरेश कुंडलिक नागरे
74. 97-गंगाखेड :- सीताराम घनदाट (माजी आमदार)
75. 98-पाथरी :- सुरेश किसनराव फड
वंचित बहुजन आघाडी उमेदवार यादी 2024
जालना जिल्हा
76. 99-परतूर :- रामप्रसाद किशनराव थोरात
77. 100-घनसावंगी :- कावेरी बळीराम खटके
78. 101-जालना :- डेव्हिड प्रल्हाद धुमारे
79. 102-बदनापूर :- सतीश शंकरराव खरात
80. 103-भोकरदन :- दीपक भीमराव बोऱ्हाडे
औरंगाबाद जिल्हा
81. 104-सिल्लोड :- बनेखाँ नूरखाँ पठाण
82. 105-कन्नड :- अय्याज मकबुल शाह
83. 106-फुलंब्री :- महेश कल्याणराव निनाळे
84. 107-औरंगाबाद मध्य :- मो. जावेद मो. इसाक
85. 108-औरंगाबाद पश्चिम :- अंजन लक्ष्मण साळवे
86. 109-औरंगाबाद पूर्व :- अफसर खान यासीन खान
87. 110-पैठण :- अरुण सोनाजी घोडके
88. 111-गंगापूर :- अनिल अशोक चांडालिया
89. 112-वैजापूर :- किशोर भीमराव जेजुरकर
नाशिक जिल्हा
90. 113-नांदगाव :- आनंद सुरेश शिनगारे
91. 115-मालेगाव बाह्य :- किरण नाना मगरे
92. 116-बागलाण :- राजेंद्र आप्पा चौरे
93. 118-चांदवड :- संतोष नामदेव केदारे
94. 122-दिंडोरी :- योगेश उत्तम भुसार
95. 123-नाशिक पूर्व :- रविंद्रकुमार जनार्दन पगारे
96. 124-नाशिक मध्य :- मुशीर मुनिरोद्दीन सय्यद
97. 125-नाशिक पश्चिम :- अमोल अनंत चंद्रमोरे
98. 126-देवळाली :- डॉ. अविनाश निरंजन शिंदे
99. 127-इगतपुरी :- भाऊराव काशिनाथ डगळे
पालघर जिल्हा
100. 132-नालासोपारा :- ॲड. सुचित सुरेश गायकवाड
ठाणे जिल्हा
101. 134-भिवंडी ग्रामीण :- प्रदीप दयानंद हरणे
102. 136-भिवंडी पश्चिम :- झाहिद मुरब्तार अन्सारी
103. 138-कल्याण पश्चिम :- अयाज गुलजार मौलवी
104. 140-अंबरनाथ :- सुधीर पितांबर बागुल
105. 141-उल्हासनगर :- डॉ. संजय के. गुप्ता
106. 142-कल्याण पूर्व :- विशाल विष्णु पावशे
107. 143-डोंबिवली :- सोनिया संजय इंगोले
108. 144-कल्याण ग्रामीण :- विकास प्रकाश इंगळे
109. 146-ओवाळा-माजीवडा :- लोभसिंग गणपतराव राठोड
110. 149-मुंब्रा-कळवा :- पंढरीनाथ शिमग्या गायकवाड
111. 150-ऐरोली :- विक्रांत दयानंद चिकणे
112. 151-बेलापूर :- सुनील प्रभु भोले
Vanchit Bahujan Aghadi candidate List 2024 mumbai
मुंबई उपनगर जिल्हा
113. 153-दहिसर :- कमलाकर खंडू साळवे
114. 154-मागाठाणे :- दीपक शिवाजी हनवटे
115. 155-मुलुंड :- प्रदीप महादेव शिरसाठ
116. 156-विक्रोळी :- अजय रवींद्र खरात
117. 157-भांडुप पश्चिम :- स्नेहल अरुण सोहनी
118. 158-जोगेश्वरी पूर्व :- परमेश्वर अशोक रणशूर
119. 159-दिंडोशी :- राजेंद्र तानाजी ससाणे
120. 160-कांदिवली पूर्व :- विकास सिद्धार्थ शिरसाट
121. 161-चारकोप :- दिलीप गुलाबराव लिंगायत
122. 162-मालाड पश्चिम :- अजय रोकडे
123. 166-अंधेरी पूर्व :- ॲड. संजीवकुमार अप्पाराव कलकोरी
124. 167-विलेपार्ले :- संतोष गणपत अंबुलगे
125. 169-घाटकोपर पश्चिम :- सागर रमेश गवई
126. 170-घाटकोपर पूर्व :- सुनिता संजय गायकवाड
127. 171-मानखुर्द शिवाजीनगर :- मोहम्मद सिराज शेख
128. 172-अनुशक्ती नगर :- सतीश वामन राजगुरू
129. 173-चेंबूर :- आनंद भीमराव जाधव
130. 174-कुर्ला :- स्वप्नील राजेंद्र जवळेकर
131. 175-कलिना :- मोहम्मद लुकमान सिद्धिकी
132. 176-वांद्रे पूर्व :- प्रतीक विजय जाधव
मुंबई शहर जिल्हा
133. 179-सायन कोळीवाडा :- ॲड. राजगुरू बाळकृष्ण कदम
134. 182-वरळी :- अमोल आनंद निकाळजे
135. 183-शिवडी :- मिलिंद देवराव कांबळे
वंचित बहुजन आघाडी उमेदवार यादी
रायगड जिल्हा
136. 191-पेण :- देवेंद्र मारुती कोळी
137. 194-महाड :- आनंदराज रवींद्र घाडगे
पुणे जिल्हा
138. 195-जुन्नर :- देवराम सखाराम लांडे
139. 196-आंबेगाव :- दीपक राजकुमार पंचमुख
140. 197-खेड आळंदी :- रवींद्र राहुल रंधवे
141. 201-बारामती :- मंगलदास तुकाराम निकाळजे
142. 202-पुरंदर :- कीर्ती श्याम माने
143. 206-पिंपरी :- मनोज भास्कर गरबडे
144. 208-वडगाव शेरी :- विवेक कृष्णा लोंढे
145. 209-शिवाजीनगर :- परेश शंकर सिरसांगे
146. 210-कोथरूड :- योगेश दीपक राजापुरकर
147. 211-खडकवासला :- संजय जयराम धिवर
148. 212-पर्वती :- सुरेखा मगरध्वज गायकवाड
149. 213-हडपसर :- ॲड. अफरोज मुल्ला
150. 214-पुणे छावणी :- निलेश सुरेश आल्हाट
151. 215-कसबा पेठ :- प्रफुल्ल सोमनाथ गुजर
हेही वाचा : महाराष्ट्रात 8.5 टक्के बौद्धांची लोकसंख्या, पण मावळत्या विधानसभेत होते फक्त 9 बौद्ध आमदार
अहमदनगर जिल्हा
152. 217-संगमनेर :- अझीज अब्दुल व्होरा
153. 218-शिर्डी :- राजू सादिक शेख
154. 219-कोपरगाव :- शकील बाबुभाई चोपदार
155. 220-श्रीरामपूर :- अण्णासाहेब आप्पाजी मोहन
156. 221-नेवासा :- पोपट रामभाऊ सरोदे
157. 222-शेवगाव :- किसन जगन्नाथ चव्हाण
158. 223-राहुरी :- अनिल भिकाजी जाधव
159. 225-अहमदनगर शहर :- हनीफ जैनुद्दीन शेशहर
160. 226-श्रीगोंदा :- अण्णासाहेब सीताराम शेलार
161. 227-कर्जत जामखेड :- सोमनाथ हरिभाऊ भैलुमे
बीड जिल्हा
162. 228-गेवराई :- प्रियांका शिवप्रसाद खेडकर
163. 229-माजलगाव :- मंजूर शेख चांद साहब शेख
164. 230-बीड :- पुरुषोत्तम नारायणराव वीर
165. 231-आष्टी :- दिलीप महादेव माने
लातूर जिल्हा
166. 234-लातूर ग्रामीण :- डॉ. विजय रघुनाथ अजनिकार
167. 235-लातूर शहर :- विनोद सोमप्रकाश खटके
168. 237-उदगीर :- डॉ. शिवाजी मरेप्पा देवनाळे
169. 238-निलंगा :- मंजू हिरालाल निंबाळकर
Vanchit Bahujan Aghadi candidates list 2024
उस्मानाबाद जिल्हा
170. 240-उमरगा :- राम सैदा गायकवाड
171. 241-तुळजापूर :- डॉ. स्नेहा आप्पाराव सोनकाटे
172. 242-उस्मानाबाद :- ॲड. प्रणित शामराव डिकले
173. 243-परांडा :- प्रवीण परमेश्वर रणबागुल
सोलापूर जिल्हा
174. 245-माढा :- राहुल गौतम चव्हाण
175. 246-बार्शी :- धनंजय आनंदराव जगदाळे
176. 248-सोलापूर शहर उत्तर : विक्रांत श्रीकांत गायकवाड
177. 249-सोलापूर शहर मध्य :- श्रीनिवास रंगप्पा संगेपाग
178. 250-अक्कलकोट :- संतोषकुमार खंडू इंगळे
179. 251-सोलापूर दक्षिण :- संतोष सेवू पवार
180. 252-पंढरपूर :- अशोक रंगनाथ माने
181. 254-माळशिरस :- राज यशवंत कुमार
सातारा जिल्हा
182. 255-फलटण :- सचिन जालंदर भिसे
183. 256-वाई :- अनिल मारुती लोहार
184. 257-कोरेगांव :- चंद्रकांत जानू कांबळे
185. 258-माण :- इम्तियाज जाफर नदाफ
186. 259-कराड उत्तर :- अन्सारली महमुद पटेल
187. 260-कराड दक्षिण :- संजय कोंडीबा गाडे
188. 261-पाटण :- बाळासो रामचंद्र जगताप
189. 262-सातारा :- बबन गणपत करडे
कोल्हापूर जिल्हा
190. 271-चंदगड :- अर्जुन मारुती दुंडगेकर
191. 273-कागल :- धनाजी रामचंद्र सेनापतीकर
192. 275-करवीर :- दयानंद मारुती कांबळे
193. 278-हातकणंगले :- डॉ. क्रांती दिलीप सावंत
194. 279-इचलकरंजी :- शमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन
सांगली जिल्हा
195. 281-मिरज :- विज्ञान प्रकाश माने
196. 282-सांगली :- अल्लाउद्दीन हयातचाँद काजी
197. 283-इस्लामपूर :- राजेश शिवाजी गायगवाळे
198. 285-पलूस-कडेगांव :- जीवन किसन करकटे
199. 286-खानापुर :- संग्राम कृष्णा माने
200. 287-तासगाव-कवठे महांकाळ :- दत्तात्रय बंडू आठवले
वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली हे जाणून घेण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करावे.
- भारताच्या निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ ⇒ eci.gov.in
2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने 238 उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. यावेळी हा आकडा 200 आहे.
वंचितला मिळालेली मते
2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, महाराष्ट्रातील एकूण 9,70,25,119 मतदारांपैकी 6,40,88,195 मतदारांनी (66.05 टक्के) मतदान केले.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या 200 उमेदवारांना एकूण 14,13,961 मते (किंवा 2.21 टक्के) मिळाली.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते पाहण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करावे.
हेही पाहा : 2019 आणि 2024 च्या लोकसभेमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना किती मते मिळाली?
‘वंचित’चे अर्धे उमेदवार बौद्ध!
दैनिक लोकसत्ताच्या ‘या‘ बातमीनुसार, प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजे तब्बल 94 बौद्ध उमेदवार (48 टक्के) दिले होते. प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते, ज्यांमध्ये 94 उमेदवार बौद्ध, 23 उमेदवार मुस्लिम, 17 उमेदवार इतर मागासवर्गीय आणि 15 उमेदवार भटके-विमुक्त गटातील आहेत. याखेरीज वंचितने 5 मराठा, 1 चांभार आणि 4 मातंग उमेदवार सुद्धा दिले होते. (बातमी पाहा)
वाचकांसाठी : हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवावे. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
100. 128-डहाणू :- सुरेश अर्जुन पाडवी
He vanchit che umedvar nahit