महाराष्ट्रातील खासदारांची जातीनिहाय यादी : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून संसदेत निवडून गेलेल्या 48 खासदारांची सामाजिक पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील खासदारांची जातनिहाय यादी, प्रवर्गनिहाय यादी तसेच पक्षनिहाय यादी बघा…
लोकसभा निवडणूक 2024 : 2024 मध्ये 18व्या लोकसभेची निवडणूक झाली. नेहमीप्रमाणे, महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेवर निवडून आले. आज आपण या सर्व खासदारांची सामाजिक पार्श्वभूमी अर्थात जातनिहाय माहिती जाणून घेत आहोत.
जर आपण प्रवर्गानुसार विचार केला तर सर्वाधिक (म्हणजेच 56 टक्क्यांहून अधिक) खासदार सर्वसाधारण प्रवर्गातून म्हणजेच उच्च वर्णीय (सवर्ण) समाजातून निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 27 खासदार हे उच्चवर्णीय आहेत, ज्यांमध्ये मराठा, ब्राह्मण आणि अग्रवाल (मारवाडी) या तीन जातींच्या खासदारांचा समावेश आहे.
ओपन कास्ट वा सवर्ण जातींनंतर ओबीसी, एससी आणि शेवटी एसटी या प्रवर्गांतून सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत.
राज्यात सहा दलित किंवा अनुसूचित जातीचे (SC) खासदार निवडून आले आहेत, ज्यांमध्ये चांभार, महार, माला जंगम आणि ढोर या चार जातींचे खासदार आहेत. एससी खासदारांमध्ये पाच राखीव आणि एक खुल्या मतदारसंघातून आहेत.
मराठा आणि कुणबी या दोन समुहांचे 28 खासदार (58.3%) आहेत.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 : राज्यातील नवनिर्वाचित 48 खासदारांपैकी 24 खासदार हे मराठा समाजाचे, तर 11 ओबीसी आहेत. ब्राह्मण जातीचे 2 खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे 6, तर अनुसूचित जमातींचे 4 खासदार आहेत. वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव एससी खासदार ठरल्या आहेत. राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून येते.
राजकीय पक्ष उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता आणि मतदारसंघातील संख्यात्मक वर्चस्वशाली जात या घटकांचा विचार प्रामुख्याने करतात.
1998 ते 2024 या सात लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांच्या सामाजिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला असता मराठा समाजाने आपले संख्याबळ टिकवून ठेवल्याचे आढळते.
उत्तरेकडील राज्यात ‘मंडल’नंतर उदयास आलेल्या मध्यम शेतकरी जातींचे प्रतिनिधित्व (उदा. यादव) 2014 पासून कमी होऊन उच्च जातींचे आणि यादवेत्तर कनिष्ठ ओबीसी जातींचे प्रतिनिधित्व वाढताना दिसते. महाराष्ट्रातून तसे न होता मराठा ही शेतकरी जात आपले प्रतिनिधित्व टिकवून ठेवल्याचे दिसते.
सुमारे 30 ते 32 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा-कुणबी समाजाने किमान 50 टक्के जागांवर वर्चस्व ठेवलेले दिसते. त्या तुलनेत ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लीम यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळताना दिसत नाही.
भाजप, शिवसेना (दोन्ही गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) या सहा प्रमुख पक्षांनी उमेदवारी देताना कोणत्या समाजघटकांना प्राधान्य दिले आणि राज्यातील 48 खासदारांची सामाजिक पार्श्वभूमी काय हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे स्पष्ट करता येईल.
प्रवर्गनिहाय – पक्षनिहाय खासदारांची माहिती
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून आले?
- महाविकास आघाडी – 31 खासदार
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 13
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) 8
- अपक्ष 1 (मूलतः काँग्रेसचे)
- महायुती – 17 खासदार
- भारतीय जनता पक्ष 9
- शिवसेना [एकनाथ शिंदे] 7
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष [अजित पवार] 1
आता आपण प्रवर्गानुसार महाराष्ट्रातील खासदारांची पक्षनिहाय माहिती बघू.
♦ सवर्ण समाजाचे 27 खासदार
- महाविकास आघाडी – 15 खासदार
- शिवसेना (उबाठा) 7
- राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 4
- काँग्रेस 3
- अपक्ष 1
- महायुती – 12 खासदार
- शिवसेना 6
- भाजप 6
♦ ओबीसी समाजाचे 11 खासदार
- मविआ – 8 खासदार
- काँग्रेस 4
- राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 3
- शिवसेना (उबाठा) 1
- महायुती – 3 खासदार
- भाजप 2
- शिवसेना 1
♦ अनुसूचित जातीचे 6 खासदार
- मविआ – 6 खासदार
- काँग्रेस 5
- शिवसेना (उबाठा) 1
- महायुती – 0 खासदार
♦ अनुसूचित जमातीचे 4 खासदार
- मविआ – 3 खासदार
- काँग्रेस 2
- राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 1
- महायुती – 1 खासदार
- भाजप 1
प्रवर्गानुसार महाराष्ट्रातील खासदार
महाराष्ट्रातील खासदारांची जातीनिहाय यादी : Category wise and Caste wise list of MPs from Maharashtra
- सवर्ण समाजाचे 27 खासदार (56.3%)
- मराठा – 24 खासदार (50%)
- ब्राह्मण – 2 खासदार (4.2%)
- अग्रवाल – 1 खासदार (2%)
- ओबीसी समाजाचे 11 खासदार (22.9%)
- कुणबी – 4 खासदार (8.4%)
- आगरी – 2 खासदार (4.2%)
- गुर्जर – 1 खासदार (2%)
- तेली – 1 खासदार (2%)
- गवळी – 1 खासदार (2%)
- माळी – 1 खासदार (2%)
- इतर – 1 खासदार (2%)
- अनुसूचित जातीचे 6 खासदार (12.5%)
- चांभार – 2 खासदार (4.2%)
- महार/ बौद्ध – 2 खासदार (4.2%)
- माला जंगम – 1 खासदार (2%)
- ढोर – 1 खासदार (2%)
- अनुसूचित जमातीचे 4 खासदार (8.3%)
- हलबा – 1 खासदार (2%)
- भिल्ल – 1 खासदार (2%)
- कोळी महादेव – 1 खासदार (2%)
- इतर – 1 खासदार (2%)
धर्मानुसार खासदारांचे वर्गीकरण
यंदा, महाराष्ट्रात फक्त तीन खासदार धार्मिक अल्पसंख्याक समुदायातील आहेत, तर बाकीचे जवळपास सर्व हिंदू धर्मीय आहेत. 2024 मध्ये राज्यात एकही मुस्लिम खासदार निवडून आला नाही. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एक मुस्लिम खासदार निवडून आला होता.
- 2 बौद्ध (वर्षा गायकवाड आणि बळवंत वानखेडे)
- 1 जैन (पियुष गोयल)
महाराष्ट्रातील खासदारांची जातीनिहाय यादी
खालील प्रवर्गनिहाय खासदारांच्या नावासमोर त्यांचा मतदारसंघ, पक्ष आणि त्यांच्या जातीचा/ जमातीचा उल्लेख केला आहे.
अनुसूचित जमातीचे खासदार (4)
1) डॉ. नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर – काँग्रेस) — हलबा
2) गोवाल पाडवी (नंदुरबार – काँग्रेस) — भिल्ल
3) भास्कर भगरे (दिंडोरी – राष्ट्रवादी काँग्रेस (SP)) — कोळी महादेव
4) डॉ. हेमंत सावरा (पालघर – भाजप) — ??
(डॉ. हेमंत सावरा हे कोणत्या आदिवासी जमातीचे आहेत, हे कळू शकले नाही.)
अनुसूचित जातीचे खासदार (6)
1) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी – शिवसेना (UBT)) — चांभार
2) श्यामकुमार बर्वे (रामटेक – काँग्रेस) — चांभार
3) बळवंत वानखेडे (अमरावती – काँग्रेस) — महार (बौद्ध)
4) वर्षा गायकवाड (मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस) — महार (बौद्ध)
5) प्रणिती शिंदे (सोलापूर – काँग्रेस) — ढोर
6) डॉ. शिवाजी काळगे (लातूर – काँग्रेस) — माला जंगम (लिंगायत)
ओबीसी खासदार (11)
1) रक्षा खडसे (रावेर – भाजप) — गुर्जर (सासरचे कुटुंब : लेवा-पाटील)
2) अनुप धोत्रे (अकोला – भाजप) — कुणबी-मराठा
3) डॉ. शोभा बच्छाव (धुळे – काँग्रेस) — कुणबी-मराठा
4) डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया – काँग्रेस) — तेली
5) सुनील तटकरे (रायगड – काँग्रेस) — गवळी
6) प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर – काँग्रेस) — धनोजे कुणबी
7) अमर काळे (वर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस (SP)) — कुणबी
8) डॉ. अमोल कोल्हे (शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस (SP)) — माळी
9) सुरेश म्हात्रे (भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेस (SP)) — आगरी
10) संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व – शिवसेना (UBT)) — आगरी कोळी
11) रवींद्र वायकर (मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना) — ??
(रवींद्र वायकर हे कोणत्या ओबीसी जातीचे आहेत, हे कळू शकले नाही.)
सवर्ण समाजाचे खासदार (27)
सवर्ण खासदारांमध्ये आपण ‘मराठा खासदार’ आणि ‘मराठा-नसलेले खासदार’ असे वर्गीकरण करायला हवे.
गैर-मराठा सवर्ण खासदार (3)
1) नितीन गडकरी (नागपूर – भाजप) — ब्राह्मण
2) अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना (UBT)) — सारस्वत ब्राह्मण
3) पीयूष गोयल (मुंबई उत्तर – भाजप) — अग्रवाल (मारवाडी-जैन)
मराठा समाजाचे खासदार (24)
1) धैर्यशील माने (हातकणंगले – शिवसेना)
2) श्रीरंग बारणे (मावळ – शिवसेना)
3) श्रीकांत शिंदे (कल्याण – शिवसेना)
4) नरेश म्हस्के (ठाणे – शिवसेना)
5) प्रतापराव जाधव (बुलढाणा – शिवसेना)
6) संदीपान भुमरे (औरंगाबाद – शिवसेना)
7) स्मिता वाघ (जळगाव – भाजप)
8) नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग – भाजप)
9) उदयनराजे भोसले (सातारा – भाजप)
10) मुरलीधर मोहोळ (पुणे – भाजप)
11) संजय जाधव (परभणी – शिवसेना (UBT))
12) संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम – शिवसेना (UBT))
13) अरविंद सावंत (मुंबई दक्षिण – शिवसेना (UBT))
14) राजाभाऊ वाजे (नाशिक – शिवसेना (UBT))
15) ओमप्रकाश राजेनिंबाळकर (उस्मानाबाद – शिवसेना (UBT))
16) नागेश आष्टीकर (हिंगोली – शिवसेना (UBT))
17) नीलेश लंके (अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेस (SP))
18) सुप्रिया सुळे (बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस (SP))
19) धैर्यशील मोहिते (माढा – राष्ट्रवादी काँग्रेस (SP))
20) बजरंग सोनवणे (बीड – राष्ट्रवादी काँग्रेस (SP))
21) वसंत चव्हाण (नांदेड – काँग्रेस)
22) छ. शाहू महाराज (कोल्हापूर – काँग्रेस)
23) डॉ. कल्याण काळे (जालना – काँग्रेस)
24) विशाल पाटील (सांगली – अपक्ष) मूलतः काँग्रेसचे
24 मराठा खासदारांमध्ये महायुतीचे 10 तर महाविकास आघाडीचे 14 खासदार आहेत. 6 शिंदेंच्या शिवसेनेचे, 4 भाजपचे, 6 ठाकरेंच्या शिवसेनेचे, 4 शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 3 काँग्रेसचे आहेत. तसेच एक अपक्ष आहेत, जे मूळतः काँग्रेसचे आहेत.
टीप : बीबीसी मराठीच्या ‘या‘ बातमीनुसार, 24 मराठा खासदार आणि 4 कुणबी (मराठा-कुणबी) खासदार आहेत.
हे ही वाचलंत का?
- महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असायला हवे ?
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि प्रत्येक जातीची लोकसंख्या
- महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी आणि प्रत्येक जमातीची लोकसंख्या
- ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार
- ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार!
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.