राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र

राजरत्न अशोक आंबेडकर हे भारतातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत, जे सक्रिय सामाजिक-राजकीय आणि बौद्ध कार्यकर्ते आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (BSI) अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे विचार भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

 इस लेख को हिंदी में पढ़ें 

 Read this article in English 

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (युनायटेड किंग्डम) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना राजरत्न आंबेडकर – Facebook

राजरत्न अशोक आंबेडकर यांचा जन्म 8 डिसेंबर 1982 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अशोक आंबेडकर तर आईचे नाव अश्विनी आंबेडकर आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ – आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत, तर मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू आहेत. (Great grand nephew of Dr. Babasaheb Ambedkar)

Rajratna Ambedkar Biography in Marathi

राजरत्न आंबेडकर

जन्म

8 डिसेंबर1982

शिक्षण

BCom, DBM, ADM, MBA

धर्म

बौद्ध धर्म

व्यवसाय

सामाजिक, राजकीय व  कार्यकर्ता

संस्था

भारतीय बौद्ध महासभा (अध्यक्ष)

माता-पिता

अश्विनी आंबेडकर व अशोक मुकुंदराव आंबेडकर

पत्नी

अमिता आंबेडकर

मुले

एक मुलगी (प्रिशा) आणि एक मुलगा

यापूर्वी मी हिंदीमध्ये राजरत्न आंबेडकरांचा लेख लिहिलेला आहे (येथे पहा). तसेच मराठी विकिपीडियावर देखील मी त्यांचे पेज (लेख) लिहिलेला आहे, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिली आहे. 

कौटुंबिक पार्श्वभूमी

राजरत्न यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नाते –

खरं तर, राजरत्न आंबेडकर हे आनंदराव यांचे पणतू आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू होते. या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजरत्न आंबेडकरांचे चुलत पंजोबा ठरतात, तर त्यांचे वास्तविक पंजोबा आनंदराव आंबेडकर हे होत. आनंदराव यांचा मुलगा मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचा पुतण्या) हे राजरत्न आंबेडकरांचे आजोबा आहेत. Rajratna Ambedkar relation with Babasaheb Ambedkar

rajratna ambedkar family tree

पुढे मुकुंदरावांना (1913 – 1958) चार अपत्ये झाली, ज्यापैकी अशोक आंबेडकर (1950—2017) हे त्यांचे पहिले अपत्य होते. अशोक आंबेडकर यांचा विवाह अश्विनी आंबेडकरांशी  झाला आणि या दांपत्याच्या पोटी राजरत्न यांचा जन्म झाला.

अशाप्रकारे, राजरत्न हे आंबेडकर घराण्याच्या चौथ्या पिढीतील सदस्य असल्याचे आपणास दिसते. त्यांचा विवाह अमिता आंबेडकरांशी झाला आणि या दांपत्यास एक मुलगी (प्रिशा) आणि एक मुलगा आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली होती, त्यामध्ये त्यांचा केवळ पहिला पुत्र यशवंत हाच जिवंत राहिलेला आहे. बालपणीच निधन झालेल्या त्यांच्या चार अपत्यांमध्ये एकाचे नाव ‘राजरत्न’ होते आणि हे मूल बाबासाहेबांचे अतिशय आवडते होते. याच ‘राजरत्न’ मुलाच्या नावावर आजच्या राजरत्न अशोक आंबेडकर यांचे नाव ठेवण्यात आले आहे.

 

राजरत्न आंबेडकरांचे प्रकाश आंबेडकरांशी नाते –

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि यशवंत आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत. प्रकाश आंबेडकर हे दलित राजकारणातील मोठे नाव असून ते राजरत्न आंबेडकर यांचे चुलत काका लागतात. तर सुजात आंबेडकर हे राजरत्न यांचे चुलत भाऊ आहेत. सुजात हा प्रकाश आंबेडकर यांचा एकुलता एक मुलगा आहे.

Rajaratna Ambedkar is Great Grandson of Dr Babasaheb Ambedkar
आंबेडकर घराण्याची वंशावळ : पिवळ्या रंगात राजरत्न आणि बाबासाहेब यांचा उल्लेख करण्यात आला आहे. rajratna ambedkar family tree

बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केले होते, मात्र आज या संघटनेचे अनेक तुकडे झालेले आढळतात. त्यात प्रमुख दोन गट आहेत.

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष अशी ओळख राजरत्न अशोक आंबेडकर सांगताना दिसतात तर, प्रकाश आंबेडकर यांच्या आई आणि बाबासाहेबांच्या सून मीरा आंबेडकर यासुद्धा आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा असल्याचा दावा करतात. मीरा आंबेडकर यांचा मुलगा भीमराव यशवंत आंबेडकर हे या संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतात.

 

शिक्षण

राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन 2003 मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन 2008 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲंन्ड फायनन्शल अकाउंटंडंट ऑफ इंडिया – देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन 2008 मध्ये एडीएम व सन 2010 मध्ये एमबीए झाले.

व्यवस्थापनात ॲडव्हान्स्ड पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.

 

धार्मिक कारकीर्द

भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही 4 मे 1955रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे. याचे मुख्यालय मुंबईमध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत. ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना ‘द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स’ची सदस्य आहे. ते बँकॉक, थायलंड मधील ‘द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ या जागतिक बौद्ध संघटनेचे सचिव आहेत. 

23 सप्टेंबर 2015 रोजी, राजरत्न आंबेडकरांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याद्वारे श्रामणेर दीक्षा ग्रहन केली होती. त्यानंतर त्यांचे “धम्म आंबेडकर” असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी 23 सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना गुजरात (संकल्प भूमी) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता.

भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बौद्ध’ म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी ‘दलित’ व ‘नवबौद्ध’ यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न अशोक आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत यशवंत आंबेडकरांनीही मांडले होते.

 

राजकीय कारकीर्द

राजरत्न अशोक आंबेडकर तीन वेळा निवडणूक लढले आहेत. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले आहेत, मात्र त्यांना तृतीत क्रमांकाची मते मिळाली, व प्रथम स्थानी असलेले अशोक चव्हाण विजयी झाले.

 

सोशल मीडियावर

राजरत्न आंबेडकर सोशल मीडियावर देखील सक्रिय आहेत, आणि तेथे ते डॉ. आंबेडकर, आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धर्माशी संबंधित माहिती शेअर करतात.

  • Facebook वर त्यांचे 5.84 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
  • YouTube वर त्यांचे 46 हजार सबस्क्राइबर्स आहेत.
  • Twitter वर त्यांचे 75 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

सारांश

राजरत्न आंबेडकर यांचा हा चरित्रलेख (Rajratna Ambedkar Biography in Marathi) तुम्हाला कसा वाटला? लेखात काही माहिती अपूर्ण आढळल्यास किंवा अन्य बदल वा सुधारणा आवश्यक वाटत असल्यास कृपया ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे. मराठी विकिपीडियावर त्यांचा लेख सुद्धा मीच लिहिलेला असल्याने या लेखामध्ये आणि विकिपीडिया वरील लेखामध्ये बरेच साधर्म्य आढळेल.

 

हे ही वाचलंत का?

 

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!