आज पौष पौर्णिमा : बौद्ध धर्मात पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. या लेखात आपण पौष पौर्णिमेचे महत्त्व आणि त्याचा गौतम बुद्धांशी असलेला संबंध जाणून घेणार आहोत.
पौर्णिमा (किंवा बौद्ध पौर्णिमा) या तथागत बुद्ध आणि त्यांच्या जीवन कार्याशी संबंधित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मात पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि जगभरातील बौद्ध अनुयायी हा दिवस ‘उपोसथ दिवस‘ म्हणून साजरा करतात.
पौष पौर्णिमा
साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमा येते. बौद्ध धम्मामध्ये पौष पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. या पौर्णिमेच्या दिवशी मगधचा राजा बिंबिसाराने 1 लाख 20 हजार नागरिकांसह यष्ठीवनामध्ये भगवान बुद्धांचे स्वागत केले. यावेळी बिंबिसार राजाने आपल्या सर्व प्रजेसह धम्म दीक्षा घेतली.
श्रीलंकेच्या इतिहासात देखील पौष पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी संबोधी (बुद्धत्व) प्राप्तीनंतर नवव्या महिन्यात भगवान बुद्धांचे श्रीलंकेत आगमन झाल्याचे मानले जाते.
भगवान बुद्ध स्वतः तीन वेळा श्रीलंकेत आले. त्यांनी शोधून काढलेल्या धम्माची स्थापना करण्यासाठी ते येथे आले होते. ही भूमी पुढील अनेक वर्षे मानवजातीच्या कल्याणासाठी धम्माचे रक्षण आणि जतन करेल हे कदाचित त्यांना माहीत होते.
श्रीलंकेतील ‘उवा’ प्रदेशातील ‘महियांगण’ परिसराला सर्वप्रथम बुद्धांच्या चरण स्पर्शाचे भाग्य लाभले. भगवान बुद्धांनी स्वतः दिलेल्या केसांच्या धातूवर येथे एक भव्य स्तूप बांधण्यात आला. बुद्धांचे केश धातू जतन असलेला हा स्तूप आजही अस्तित्वात असून तो खूप पवित्र मानला जातो.
भगवान बुद्धांचे भौतिक अवशेष अत्यंत पवित्र मानले जातात आणि त्यांच्याबद्दल सर्वोच्च आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.
अशा प्रकारे बिंबिसार राजाची धम्मदीक्षा आणि बुद्धांचे श्रीलंका आगमन या गोष्टींमुळे पौष पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये महत्त्व आहे. म्हणून आपण या दिवशी अत्यंत धम्माचे आचरण करावे आणि जीवन पुणीत करावे.
हे ही वाचलंत का?
- भारतातील 10 सर्वात उंच पुतळे
- डॉ. आंबेडकरांचे तीन सर्वात उंच पुतळे
- ‘या’ देशांमध्ये आहेत डॉ. आंबेडकरांचे पुतळे
- दिल्लीतील 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळे
- डॉ. आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- 2022 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |