आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो. – facts about ambedkar jayanti
Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi
@130 Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीशी संबंधित रंजक तथ्ये
आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो.
बाबासाहेब हे मानवी हक्क चळवळ, राज्यघटनेची निर्मिती, शोषितांचे थोर उद्धारक आणि त्यांच्या प्रकांड विद्वतेसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जन्मस्थान भीम जन्मभूमी (महू), बौद्ध धम्म दीक्षास्थळ दीक्षाभूमी (नागपूर), त्यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी (मुंबई) आणि इतर अनेक स्थानिक ठिकाणी त्यांचे कोट्यवधी अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
आंबेडकरांची जयंती भारतातील सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि बौद्ध विहारांमध्ये देखील साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीशी संबंधित काही अज्ञात आणि रंजक तथ्ये जाणून घेऊया…
Interesting Facts about Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बद्दल खास गोष्टी
1) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 100 हून अधिक देशांमध्ये साजरी केली जाते. world biggest jayanti in marathi
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय व समानतेसाठी संघर्ष केला, म्हणून त्यांचा वाढदिवस भारतात ‘राष्ट्रीय समता दिन’ (Equality Day) म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस बर्याच कालावधीपासून ‘आंतरराष्ट्रीय समता दिन’ (International Equality Day) किंवा ‘जागतिक समता दिन’ (World Equality Day) म्हणून जाहीर करावा अशी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) मागणी आहे.
Ambedkar Jayanti 2021: Interesting facts
3) इंडिया पोस्टने (भारतीय डाक) 1966, 1973, 1991, 2001 आणि 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित विशेष टपाल तिकिटे काढली होती. तसेच 2009, 2015, 2016, 2017 आणि 2020 मध्ये इतर टपाल तिकिटांवरही त्यांना चित्रित केले होते.
4) 14 एप्रिल 1990 रोजी बाबासाहेबांच्या 99व्या जयंतीनिमित्त त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे (portrait) अनावरणही करण्यात आले. 14 अप्रैल 1990 ते 14 अप्रैल 1991 हा कालावधी बाबासाहेबांच्या स्मृतीत ‘सामाजिक न्यायाचे वर्ष‘ (Year of Social Justice) म्हणून साजरा केला गेला.
B R Ambedkar: Little-Known Facts About His Extraordinary
5) संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) 2016, 2017 और 2018 अशी सलग तीन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. 2016 मध्ये, त्यांची 125वी जयंती जगातील 102 देशांमध्ये आणि संयुक्त राष्ट्राने 156 देशांच्या प्रतिनिधींसोबत साजरी केली. संयुक्त राष्ट्रसंघाने बाबासाहेबांना “जगाचा अग्रदूत” म्हटले.
6) कोणत्याही ऐतिहासिक वा पौराणिक व्यक्तीच्या तुलनेत भारतातील सर्वाधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाबासाहेबांचा वाढदिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. आंबेडकर जयंतीला भारतातील 25 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक सुट्टी आहे. यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख, मध्य प्रदेश महाराष्ट्र, ओडिशा, पांडिचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इ. या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
7) 2020 मध्ये, कॅनडामधील बर्नाबी शहरात 14 एप्रिल हा दिवस “डॉ. बी.आर. आंबेडकर समानतेचा दिवस” (Dr. B.R. Ambedkar Day of Equality) म्हणून साजरा करण्यात आला होता. हा निर्णय बर्नाबीच्या महानगरपालिकेने घेतला आहे.
8) 2021 मध्ये, कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया राज्याच्या सरकारने 14 एप्रिलला आपल्या ब्रिटीश कोलंबिया राज्यात “डॉ. बी. आर. आंबेडकर समानता दिवस” (Dr. B. R. Ambedkar Equality Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये सुद्धा असाच निर्णय घेतला गेला.
facts about ambedkar jayanti
9) बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील कोट्यवधी रुपयांची पुस्तके एकाच दिवशी खरेदी केली जातात. आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी ज्या ठिकाणी (मुख्यतः स्थानिक) लोक जमतात तेथे बरेच पुस्तकांचे स्टॉल्स लावलेले असतात. नागपुरातील दीक्षाभूमी आणि मुंबईतील चैत्यभूमी येथे प्रचंड प्रमाणात पुस्तके विकली व खरेदी केली जातात.
10) डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देश-विदेशातील कोट्यवधी लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या लाखो पुतळ्यांना, प्रतिमांना व स्मारकांना भेटी देतात. यात रंजक गोष्ट ही आहे की, बाबासाहेबांखेरीज अन्य कुठल्याही व्यक्तीसाठी एका दिवसात एवढ्या प्रचंड संख्येने लोक एकत्र येत त्यांच्या लाखो स्मरण स्थळांना भेटी देत नाहीत.
how many statue of babasaheb ambedkar in world
11) देशातील अन्य राष्ट्रीय नेत्यांच्या जन्म दिवसांच्या तुलनेत आंबेडकर जयंतीदिनी बाबासाहेबांबद्दलची सर्वात जास्त माहिती इंटरनेट आणि विकिपीडियावर शोधली व वाचली जात असते. म्हणजेच वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, शिवाजी महाराज, भगत सिंग, प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर यांच्यापेक्षा जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकिपीडियावर वाचले जातात.
12) आंबेडकर जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांची माहिती जगभरातल्या विविध भाषांमध्ये वाचली जाते, आणि यांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी या पहिल्या तीन भाषा आहेत.
Interesting facts about Dr. B.R. Ambedkar
13) 14 एप्रिल 1928 रोजी पुणे शहरात सर्वप्रथम सार्वजनिकपणे आंबेडकर जयंती साजरी केली गेली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेले सदाशिव रणपिसे यांनी ही आंबेडकर जयंतीची प्रथा सुरू केली होती.
14) 2017 मध्ये बाबासाहेबांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिलला ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
15) 14 एप्रिल 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 124व्या वाढदिवसासाठी Google डूडल प्रकाशित केले गेले. हे डूडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये अशा तीन खंडांच्या 7 देशांमध्ये प्रसिद्ध केले गेले होते.
Ambedkar Jayanti: Some interesting facts
16) अमेरिकेतील (USA) कोलोरॅडो सरकारने आपल्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर न्यायबुद्धी दिन‘ (Dr. B.R. Ambedkar Equity Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
17) 13 एप्रिल 2022 रोजी, तामिळनाडू सरकारने राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ‘समानता दिवस‘ (Equality Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
18) 2022 मध्ये, न्यू जर्सी या अमेरिकन राज्यातील जर्सी सिटी या शहराच्या महानगरपालिकेने बाबासाहेबांचा जन्म दिवस ‘समानता दिवस‘ (Equality Day) म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. world biggest jayanti in marathi
19) 2022 मध्ये, ब्रिटिश कोलंबिया राज्यातील city of Surrey या शहराच्या महानगरपालिकेने सुद्धा बाबासाहेबांचा जन्म दिवस ‘समानता दिवस‘ (Equality Day) म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
हेही वाचलतं का?
- समता दिन : आंबेडकर जयंती ही अमेरिका, कॅनडासह जगातील 4 राज्यांमध्ये ‘अधिकृत दिन’ आहे
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख है ‘बी. आर. आंबेडकर”; तथा मराठी विकिपीडिया में ‘शिवाजी महाराज’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15+ चित्रपट; या अभिनेत्यांनी साकारल्या बाबासाहेबांच्या भूमिका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर बनी हैं 15+ फिल्में; इन अभिनेताओं ने निभाई बाबासाहेब की भूमिकाएं
- 130व्या जयंती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- डॉ. आंबेडकर के वंशज – राजरत्न आंबेडकर का जीवन परिचय
- डॉ. बाबासाहब आंबेडकर से जुड़ी सभी फिल्में एवं डॉक्यूमेंट्रीज के videos देखिए यहां पर
- अन्य लेख वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |