Last Updated on 7 August 2025 by Sandesh Hiwale
भारतातील बौद्ध लोकसंख्या ही सर्व सामाजिक प्रवर्गांमध्ये आढळते. या लेखात, भारतातील बौद्धांची प्रवर्गनिहाय लोकसंख्या अर्थात भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील बौद्ध लोकसंख्येची प्रवर्गनिहाय (SC, ST, OBC & General) माहिती दिली आहे.

भारत हा विविध धर्म आणि संस्कृतींचा देश आहे, ज्यामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी देखील मोठ्या संख्येने आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्या सुमारे 84.43 लाख होती, जी एकूण लोकसंख्येच्या 0.7% होती.
या लेखात, 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील बौद्ध लोकसंख्येचे प्रवर्गनिहाय (अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय/सर्वसाधारण (OBC & General)) विश्लेषण आणि टक्केवारीसह माहिती दिली आहे.
ही आकडेवारी बौद्ध धर्माच्या भौगोलिक वितरणाबद्दल आणि त्याच्या सामाजिक संरचनेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते.
भारतातील बौद्ध धर्माचा संक्षिप्त परिचय
बौद्ध धर्म हा भारतात जन्मलेला एक प्राचीन धर्म आहे, जो गौतम बुद्ध यांनी ख्रिस्त पूर्व 6व्या शतकात स्थापित केला. आज भारतात बौद्ध धर्माचे अनुयायी प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, लडाख, पश्चिम बंगाल, आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये आढळतात.
बौद्ध धर्माचे अनुयायी विविध सामाजिक प्रवर्गांमधून येतात, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि सर्वसाधारण (General) यांचा समावेश आहे.
खालील भागात, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील बौद्ध लोकसंख्येची प्रवर्गनिहाय माहिती दिली आहे.
भारतातील बौद्धांची प्रवर्गनिहाय लोकसंख्या
Category-wise Buddhist Population in India
No. | States and Union Territories | Total Buddhist | SC Buddhist | ST Buddhist | Other Buddhist |
1 | Andhra Pradesh (incl. Telangana) | 36,692 | 27,552 | 608 | 8,532 |
2 | Arunachal Pradesh | 167,216 | — | 96,391 | 70,825 |
3 | Assam | 54,993 | 541 | 7,667 | 46,785 |
4 | Bihar | 25,453 | 2,585 | 252 | 22616 |
5 | Chhattisgarh | 70,467 | 63,966 | 1,078 | 5,423 |
6 | Goa | 1,095 | 177 | 62 | 856 |
7 | Gujarat | 30,483 | 11,348 | 1,000 | 18,135 |
8 | Haryana | 7,514 | 2,250 | — | 5,264 |
9 | Himachal Pradesh | 78,659 | 3,679 | 45,998 | 28,982 |
10 | Jharkhand | 8,956 | 1,346 | 2,946 | 4,664 |
11 | Karnataka | 95,710 | 53,903 | 472 | 41,335 |
12 | Kerala | 4,752 | 225 | 44 | 4,483 |
13 | Madhya Pradesh | 216,052 | 199,426 | 1,796 | 14,830 |
14 | Maharashtra | 6,531,200 | 5,204,284 | 20,798 | 13,06,118 |
15 | Manipur | 7,084 | 51 | 2,326 | 4,707 |
16 | Meghalaya | 9,864 | 109 | 6,886 | 2,869 |
17 | Mizoram | 93,411 | 107 | 91,054 | 2,250 |
18 | Nagaland | 6,759 | — | 4,901 | 1,858 |
19 | Odisha | 13,852 | 940 | 1,959 | 10,953 |
20 | Punjab | 33,237 | 27,390 | — | 5,847 |
21 | Rajasthan | 12,185 | 6,772 | 445 | 4,968 |
22 | Sikkim | 167,216 | 244 | 1,36,041 | 30,931 |
23 | Tamil Nadu | 11,186 | 1,085 | 50 | 10,051 |
24 | Tripura | 125,385 | 104 | 1,19,894 | 5,387 |
25 | Uttar Pradesh | 206,285 | 137,267 | 353 | 68,665 |
26 | Uttarakhand | 14,926 | 916 | 1,142 | 12,868 |
27 | West Bengal | 282,898 | 5,207 | 220,963 | 56,728 |
28 | Andaman and Nicobar Islands | 338 | — | 85 | 253 |
29 | Chandigarh | 1,160 | 144 | — | 1,016 |
30 | Dadra and Nagar Haveli | 634 | 139 | 12 | 483 |
31 | Daman and Diu | 217 | 41 | 1 | 175 |
32 | Jammu and Kashmir (incl. Ladakh) | 112,584 | 183 | 100,803 | 11,598 |
33 | Lakshadweep | 10 | — | 2 | 8 |
34 | Delhi | 18,449 | 5,564 | — | 12,885 |
35 | Puducherry | 451 | 31 | — | 420 |
- | India | 8,442,972 (100%) | 5,757,576 (68.19%) | 866,029 (10.26%) | 1,819,367 (21.55%) |
अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांमध्ये तसेच अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणतीही जात/जमात ‘अनुसूचित जाती’ म्हणून अधिसूचित नाही; त्यामुळे येथे अनुसूचित जातींची लोकसंख्या अस्तित्वात नाही.
पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तसेच दिल्ली, चंदीगड आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणतीही जमात ‘अनुसूचित जमाती’ म्हणून अधिसूचित नाही; त्यामुळे येथे अनुसूचित जमातींची लोकसंख्या अस्तित्वात नाही.

राज्य (States)
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 36,692
SC बौद्ध: 27,552 (75.08%)
ST बौद्ध: 608 (1.66%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 8,532 (23.26%)
आंध्र प्रदेश राज्याच्या वरील आकडेवारीत सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची बौद्ध लोकसंख्या समाविष्ट आहे.
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,67,216
SC बौद्ध: 0 (0.00%)
ST बौद्ध: 96,391 (57.64%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 70,825 (42.36%)
आसाम (Assam)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 54,993
SC बौद्ध: 541 (0.98%)
ST बौद्ध: 7,667 (13.94%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 46,785 (85.08%)
बिहार (Bihar)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 25,453
SC बौद्ध: 2,585 (10.16%)
ST बौद्ध: 252 (0.99%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 22,616 (88.85%)
छत्तीसगड (Chhattisgarh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 70,467
SC बौद्ध: 63,966 (90.77%)
ST बौद्ध: 1,078 (1.53%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 5,423 (7.70%)
गोवा (Goa)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,095
SC बौद्ध: 177 (16.16%)
ST बौद्ध: 62 (5.66%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 856 (78.17%)
गुजरात (Gujarat)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 30,483
SC बौद्ध: 11,348 (37.23%)
ST बौद्ध: 1,000 (3.28%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 18,135 (59.49%)
हरियाणा (Haryana)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 7,514
SC बौद्ध: 2,250 (29.94%)
ST बौद्ध: 0 (0.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 5,264 (70.06%)
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 78,659
SC बौद्ध: 3,679 (4.68%)
ST बौद्ध: 45,998 (58.47%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 29,982 (38.12%)
जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,12,584
SC बौद्ध: 183 (0.16%)
ST बौद्ध: 1,00,803 (89.54%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 11,598 (10.30%)
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वरील आकडेवारीत सध्याच्या जम्मू आणि काश्मीर, आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या समाविष्ट आहे.
झारखंड (Jharkhand)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 8,956
SC बौद्ध: 1,346 (15.03%)
ST बौद्ध: 2,946 (32.89%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 4,664 (52.08%)
कर्नाटक (Karnataka)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 95,710
SC बौद्ध: 53,903 (56.32%)
ST बौद्ध: 472 (0.49%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 41,335 (43.19%)
केरळ (Kerala)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 4,752
SC बौद्ध: 225 (4.73%)
ST बौद्ध: 44 (0.93%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 4,483 (94.34%)
मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 2,16,052
SC बौद्ध: 1,99,426 (92.31%)
ST बौद्ध: 1,796 (0.83%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 14,830 (6.86%)
महाराष्ट्र (Maharashtra)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 65,31,200
SC बौद्ध: 52,04,284 (79.68%)
ST बौद्ध: 20,798 (0.32%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 13,06,118 (20.00%)
हेही पाहा : महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय बौद्ध लोकसंख्या (प्रत्येक अनुसूचित जाती आणि जमातीतील बौद्ध)
मणिपूर (Manipur)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 7,084
SC बौद्ध: 51 (0.72%)
ST बौद्ध: 2,326 (32.84%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 4,707 (66.44%)
मेघालय (Meghalaya)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 9,864
SC बौद्ध: 109 (1.10%)
ST बौद्ध: 6,886 (69.79%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 2,869 (29.09%)
मिझोरम (Mizoram)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 93,411
SC बौद्ध: 107 (0.11%)
ST बौद्ध: 91,054 (97.49%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 2,250 (2.41%)
नागालँड (Nagaland)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 6,759
SC बौद्ध: 0 (0.00%)
ST बौद्ध: 4,901 (72.50%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 1,858 (27.50%)
ओडिशा (Odisha)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 13,852
SC बौद्ध: 940 (6.79%)
ST बौद्ध: 1,959 (14.14%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 10,953 (79.07%)
पंजाब (Punjab)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 33,237
SC बौद्ध: 27,390 (82.40%)
ST बौद्ध: 0 (0.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 5,847 (17.60%)
राजस्थान (Rajasthan)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 12,185
SC बौद्ध: 6,772 (55.58%)
ST बौद्ध: 445 (3.65%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 4,968 (40.77%)
सिक्किम (Sikkim)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,67,216
SC बौद्ध: 2,44 (0.15%)
ST बौद्ध: 1,36,041 (81.35%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 30,931 (18.50%)
तामिळनाडू (Tamil Nadu)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 11,186
SC बौद्ध: 1,085 (9.70%)
ST बौद्ध: 50 (0.45%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 10,051 (89.85%)
त्रिपुरा (Tripura)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,25,385
SC बौद्ध: 104 (0.08%)
ST बौद्ध: 1,19,894 (95.60%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 5,387 (4.30%)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 2,06,285
SC बौद्ध: 1,37,267 (66.54%)
ST बौद्ध: 353 (0.17%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 68,665 (33.29%)
उत्तराखंड (Uttarakhand)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 14,926
SC बौद्ध: 916 (6.14%)
ST बौद्ध: 1,142 (7.65%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 12,868 (86.21%)
पश्चिम बंगाल (West Bengal)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 2,82,898
SC बौद्ध: 5,207 (1.84%)
ST बौद्ध: 2,20,963 (78.11%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 56,728 (20.05%)
केंद्रशासित प्रदेश (Union Territories)
अंदमान आणि निकोबार बेटे (Andaman and Nicobar Islands)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 338
SC बौद्ध: 0 (0.00%)
ST बौद्ध: 85 (25.15%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 253 (74.85%)
चंदीगड (Chandigarh)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 1,160
SC बौद्ध: 144 (12.41%)
ST बौद्ध: 0 (0.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 1,016 (87.59%)
दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 634
SC बौद्ध: 139 (21.92%)
ST बौद्ध: 12 (1.89%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 483 (76.18%)
दमण आणि दीव (Daman and Diu)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 217
SC बौद्ध: 41 (18.89%)
ST बौद्ध: 1 (0.46%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 175 (80.65%)
दिल्ली (Delhi)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 18,449
SC बौद्ध: 5,564 (30.17%)
ST बौद्ध: 0 (0.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 12,885 (69.83%)
लक्षद्वीप (Lakshadweep)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 10
SC बौद्ध: 0 (0.00%)
ST बौद्ध: 2 (20.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 8 (80.00%)
पुदुच्चेरी (Puducherry)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 451
SC बौद्ध: 31 (6.87%)
ST बौद्ध: 0 (0.00%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 420 (93.13%)
भारत (India)
एकूण बौद्ध लोकसंख्या: 84,42,972
SC बौद्ध: 57,57,576 (68.19%)
ST बौद्ध: 8,66,029 (10.26%)
OBC आणि सर्वसाधारण बौद्ध: 18,19,367 (21.55%)
2011 च्या जनगणनेत बौद्ध लोकसंख्येचे वर्गीकरण अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर (Other) अशा तीन गटांमध्ये किंवा प्रवर्गांमध्ये करण्यात आले होते. या जनगणनेत ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग स्वतंत्रपणे वेगवेगळे नमूद केले गेले नव्हते, तर ते “इतर” या वर्गात एकत्रितपणे समाविष्ट केले गेले.
याउलट, 2025-26 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेत बौद्ध लोकसंख्येचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण अशा चार स्वतंत्र प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करणे शक्य होईल.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेली पाच राज्ये
2011 च्या जनगणनेनुसार, प्रत्येक प्रवर्गासाठी भारतातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेली पाच राज्ये/ केंद्रशासित प्रदेश खाली नमूद केले आहेत:
1. बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच राज्ये
- महाराष्ट्र: 65,31,200 (77.36%)
- पश्चिम बंगाल: 2,82,898 (3.35%)
- मध्य प्रदेश: 2,16,052 (2.56%)
- उत्तर प्रदेश: 2,06,285 (2.44%)
- सिक्किम: 1,67,216 (1.98%)
2. अनुसूचित जातीच्या (SC) बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच राज्ये
- महाराष्ट्र: 52,04,284 (90.39%)
- मध्य प्रदेश: 1,99,426 (3.46%)
- उत्तर प्रदेश: 1,37,267 (2.38%)
- छत्तीसगड: 63,966 (1.11%)
- कर्नाटक: 53,903 (0.94%)
3. अनुसूचित जमातीच्या (ST) बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच राज्ये
- पश्चिम बंगाल: 2,20,963 (25.51%)
- सिक्किम: 1,36,041 (15.71%)
- त्रिपुरा: 1,19,894 (13.84%)
- जम्मू आणि काश्मीर: 1,00,803 (11.64%)
- अरुणाचल प्रदेश: 96,391 (11.13%)
4. OBC आणि सर्वसाधारण बौद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच राज्ये
- महाराष्ट्र: 13,06,118 (71.79%)
- अरुणाचल प्रदेश: 70,825 (3.89%)
- उत्तर प्रदेश: 68,665 (3.77%)
- पश्चिम बंगाल: 56,728 (3.12%)
- आसाम: 46,785 (2.57%)
- महाराष्ट्र हे एकूण बौद्ध लोकसंख्या आणि SC तसेच OBC-सर्वसाधारण प्रवर्गात सर्वात पुढे आहे, जे दलित बौद्ध चळवळीचा प्रभाव दर्शविते.
- पश्चिम बंगाल आणि सिक्किम यांचा ST बौद्ध लोकसंख्येत मोठा वाटा आहे, जो ईशान्य भारतातील बौद्ध धर्माच्या पारंपरिक प्रभावाचे द्योतक आहे.
- पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे एकूण आणि OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गातही महत्त्वाचे आहेत.
विश्लेषण आणि निरीक्षण
महाराष्ट्रातील बौद्ध लोकसंख्येचे वर्चस्व: महाराष्ट्रात सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या 65 लाख आहे, जी भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येच्या 77% आहे. राज्यात 80% बौद्ध SC प्रवर्गातील आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवबौद्ध चळवळीचा प्रभाव दर्शविते.
भारतातील SC बौद्धांचे प्रमाण: SC बौद्धांचे प्राबल्य मध्य प्रदेश (92%), छत्तीसगड (91%), पंजाब (82%), महाराष्ट्र (80%), आंध्र प्रदेश (75%), उत्तर प्रदेश (67%), राजस्थान (56%) आणि कर्नाटक (56%) या आठ राज्यांमध्ये दिसून येते. यांपैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे SC बौद्धांचे प्रमुख केंद्र आहेत, जिथे नवबौद्ध चळवळीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.
भारतातील ST बौद्धांचे प्रमाण: मिझोरम (97%), त्रिपुरा (96%), जम्मू आणि काश्मीर (90%), सिक्किम (81%), पश्चिम बंगाल (78%), नागालँड (72%), मेघालय (70%), अरुणाचल प्रदेश (58%) आणि हिमाचल प्रदेश (58%) या नऊ राज्यांमध्ये ST बौद्धांचे प्रमाण जास्त आहे.
OBC आणि सर्वसाधारण बौद्धांचे योगदान: केरळ (94%), तमिळनाडू (90%), बिहार (89%), उत्तराखंड (86%), आसाम (85%), ओडिसा (79%), गोवा (78%), हरियाणा (70%), मणिपूर (66%), गुजरात (60%) आणि झारखंड (52%) या अकरा राज्यांमध्ये OBC आणि General प्रवर्गातील बौद्धांचे प्रमाण लक्षणीय आहे.
केंद्रशासित प्रदेशांमधील कमी लोकसंख्या: लक्षद्वीप (10) आणि दमण आणि दीव (217) यासारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये बौद्ध लोकसंख्या अत्यंत कमी आहे, परंतु सर्वच सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गातील बौद्ध अधिक आहे.
निष्कर्ष
भारतातील बौद्ध लोकसंख्या त्याच्या सामाजिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रात SC बौद्धांचे वर्चस्व आहे, तर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ST बौद्धांचे प्रमाण जास्त आहे. OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गातील बौद्ध लोकसंख्या अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महत्त्वपूर्ण आहे.
ही आकडेवारी बौद्ध धर्माच्या सामाजिक संरचनेचा आणि त्याच्या भारतातील वितरणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. भविष्यात, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या संदर्भात बौद्ध समुदायाच्या योगदानाचा अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.
अधिकृत संदर्भ:
वाचकांचा अभिप्राय
भारतातील बौद्ध लोकसंख्येच्या प्रवर्गनिहाय विश्लेषणाबद्दल माहिती सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मते, बौद्ध समुदायाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल आणखी कोणती माहिती समाविष्ट करावी? कृपया तुमचे विचार आणि सूचना खालील टिप्पणी विभागात शेअर करा. तुमचा अभिप्राय आम्हाला अधिक चांगले आणि माहितीपूर्ण लेख तयार करण्यास मदत करेल!
हे ही वाचलंत का?
- पेरियार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषण
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध धर्मातील जाती कोणत्या? महाराष्ट्रातील बौद्धांची जातनिहाय लोकसंख्या पाहा!
- देहू रोड येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण (25 डिसेंबर 1954)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारनाथ येथील भाषण (24 नोव्हेंबर 1954)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
Very Good Information
Thank you very much
Thank you sir