बाबासाहेबांचा 206 फूट उंच ‘सामाजिक न्यायाचा पुतळा’

सामाजिक न्यायाचा पुतळा – आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 206 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या भव्य पुतळ्याचे अनावरण 19 जानेवारी 2024 रोजी करणायत आले. हा जगातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या लेखात आपण या पुतळ्याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत. DR BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi 

 यह लेख हिंदी में पढ़ें 

 Read this article in English 

DR BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi 
सामाजिक न्यायाचा पुतळा – DR BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi

Dr BR Ambedkar statue in Vijayawada

19 जानेवारी 2024 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री या राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. हा भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा आहे. यापूर्वी 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगणातील हैदराबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 175 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

हैदराबाद आणि विजयवाडा येथे स्थापित केलेल्या दोन्ही आंबेडकर पुतळ्यांची उंची 125 फूट समान असल्याचे दिसते, परंतु दोन्ही पुतळ्यांच्या व्यासपीठांची (चबुतऱ्यांची) उंची भिन्न आहे.

Dr BR Ambedkar statue in Vijayawada
सामाजिक न्यायाचा पुतळा – Dr BR Ambedkar statue in Vijayawada

सामाजिक न्यायाचा पुतळा : इतिहास

2015 पासून पुढील वर्षात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीची (125 वी) सुरुवात झाली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या पद्धतीने बाबासाहेबांची 125 वी जयंती साजरी करणार होती. त्यातच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांनी आपापल्या राज्यात बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे 125 फुटांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला 2015 मध्ये आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बाबासाहेबांचे भव्य स्मारक आणि त्यात 125 फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकासाठी त्यांनी 100 कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती. पुढे एप्रिल 2017 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशाची नवी राजधानी अमरावती येथे बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु चार वर्षे सत्तेत असताना देखील ते या स्मारकाला पूर्णत्वास नेऊ शकले नाही.

पुढे 2019 मध्ये जेव्हा जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आले, तेव्हा त्यांनी अमरावती मधील बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प सोडून दिला आणि विजयवाडा येथे तत्सम नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 9 जुलै 2020 रोजी विजयवाडा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर स्वराज्य मैदानावर बाबासाहेबांचा 125 फूट उंच पुतळा असलेल्या ‘डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतिवनम‘ या स्मारकाचे भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महोदयांनी स्वराज्य मैदानाचे नाव बदलून ‘डॉ बी आर आंबेडकर स्वराज्य मैदान’ असे केले.

यानंतर बाबासाहेबांच्या विशाल पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले आणि ते काम पुढील 3 वर्षे 6 महिने सुरू राहिले. ऑगस्ट 2023 च्या शेवटच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जवळपास तयार झाला होता. परंतु आंबेडकर स्मारकाचे इतर बांधकाम जानेवारी 2024 मध्ये पूर्ण झाले. 19 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सुमारे 404 कोटी रुपये खर्च संपूर्ण स्मारकासाठी लागला आहे.

डॉ. आंबेडकरांचा पुतळा समता आणि स्वातंत्र्याचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृती वनममध्ये डॉ. आंबेडकरांचे चरित्र संग्रहालय, एक मिनी थिएटर, एक अधिवेशन केंद्र, आकाश प्रकाश, कारंजे, एक वाचनालय यासारख्या अनेक सुविधा आहेत. डॉ. आंबेडकर स्मारकामध्ये 3,000 आसनक्षमता असलेले बहुउद्देशीय अधिवेशन सभागृह, 2,000 आसनक्षमतेचे खुले नाट्यगृह आणि 10,000 पुस्तके असलेले ग्रंथालय आहे.

विजयवाडा येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा चौथरा काही बातम्यांमध्ये 81 फुट उंच असल्याचा सांगितला आहे. त्यामुळे हा भव्य पुतळा 206 फूट उंच आहे.

 

विजयवाडा येथील आंबेडकर पुतळ्याचे रेकॉर्ड

  • बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा
  • भारतातील चौथा सर्वात उंच पुतळा
  • दक्षिण भारतातील दुसरा सर्वात उंच पुतळा
  • भारतातील दुसरा सर्वात उंच उभा असलेला पुतळा
  • हैदराबादच्या आंबेडकर पुतळ्याहून 31 फूट जास्त उंच

 

आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये

Statue of Social Justice
The Statue of Social Justice in Vijayawada, Andra Pradesh (Photo Credit: G.N. RAO)

Dr BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi

विजयवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल काही खास आणि महत्त्वपूर्ण माहिती…

  • स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस” अर्थात “सामाजिक न्यायाचा पुतळा” हे पुतळ्याचे अधिकृत नाव आहे.
  • ‘डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतिवनम’ (डॉ. बी.आर. आंबेडकर स्मारक) उभारण्यासाठी 3 वर्षे 6 महीने इतका कालावधी लागला. (9 जुलै 2020 ला भूमिपूजन आणि 19 जानेवारी 2024 ला अनावरण)
  • 18.81 एकर भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक साकारण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा समता आणि स्वातंत्र्याचे महत्त्व प्रतिबिंबित करतो.
  • स्मारकामधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे 125 फूट उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आहे.
  • हा पुतळा 81 फूट उंचीच्या चबुतर्‍यावर उभा आहे. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एकूण उंची 206 फूट इतकी आहे.
  • हा पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हैदराबाद येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा 31 फुटांनी अधिक उंच आहे. (हैदराबादचा आंबेडकर पुतळा 175 फूट उंच आहे.)
  • बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बुटांची उंची 12 फूट आणि त्यांचे वजन तब्बल 12 टन इतके आहे.

 

  • डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृतिवनममध्ये भव्य पुतळा, उद्यान, पुस्तकालय, संग्रहालय, गॅलरी, संशोधन केंद्र, सभागृह, ध्यान केंद्र इत्यादी संरचना आहेत.

 

  • डॉ. बी.आर. आंबेडकर स्मृती वनममध्ये डॉ. आंबेडकरांचे चरित्र संग्रहालय, एक मिनी थिएटर, एक अधिवेशन केंद्र, स्काई लैटिंग, कारंजे, एक वाचनालय यासारख्या अनेक सुविधा आहेत.

 

  • डॉ. आंबेडकर स्मारकामध्ये 3,000 आसनक्षमता असलेले बहुउद्देशीय अधिवेशन सभागृह, 2,000 आसनक्षमतेचे खुले नाट्यगृह आणि 10,000 पुस्तके असलेले ग्रंथालय आहे.
  • हा पुतळा ब्राँझ धातूपासून बनवण्यात आला आहे. पुतळा बनवण्यासाठी सुमारे 400 मॅट्रिक टन स्टील आणि 212 मॅट्रिक टन पितळ वापरण्यात आले.
  • चेन्नईच्या आयटीने पुतळ्याची डिझाईन तयार केली आहे.
  • सुमारे 404.35 कोटी रुपये खर्च संपूर्ण स्मारकासाठी लागला आहे.

 

  • कच्चा माल मिळवण्यापासून ते डिझाइनिंगपर्यंत, पुतळ्याचे बांधकाम पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत केले गेले. ते तयार करण्यासाठी सुमारे 400 टन स्टील वापरले जाते.

 

  • पुतळ्याच्या जागी स्वराज मैदानासह पुतळ्याच्या परिसराचा पुनर्विकास करण्यात आला. कॅम्पसमधील जलकुंभ आणि इतर सुविधांचीही काळजी घेण्यात आली आहे. याशिवाय संगीतमय पाण्याचे कारंजेही येथे बांधण्यात आले आहेत.

 


सारांश

या लेखात आपण विजयवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची (BR Ambedkar statue in Vijayawada in Marathi) माहिती जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. या पुतळ्याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न किंवा इतर सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवाव्यात. धन्यवाद.


हे ही वाचलंत का?

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!