डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील तीन देशांतील पाच राज्यांनी एक ‘अधिकृत दिवस’ म्हणून घोषित केली आहे. या राज्यांनी 14 एप्रिलला ‘समता दिवस’, ‘ज्ञान दिवस’ आणि ‘न्यायबुद्धी दिवस’ अशी तीन वेगवेगळी पण अर्थपूर्ण नावे दिली आहेत. बाबासाहेबांचा असा सन्मान करणारे ते देश आणि ती राज्ये कोणकोणती आहेत, याचा तपशील आपण या लेखात पाहू. world biggest jayanti in marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा भारतातील एक अतिशय प्रसिद्ध सण आहे. आंबेडकर जयंती केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर आज जगभरातील अनेक देशांमध्ये ती साजरी केली जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. आणि आज 14 एप्रिल ही तारीख परदेशातही प्रसिद्ध झाली आहे. ही बाबासाहेबांची वैश्विक ओळख आहे. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व महान आणि अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांचा जगभरात गौरव केला जात आहे.
- समता दिन – Equality Day (इक्वालिटी डे)
- ज्ञान दिन – Knowledge Day (नॉलेज डे)
- न्यायबुद्धी दिन – Equity Day (एक्विटी डे)
Equality Day साठी मराठी भाषेमध्ये अनेकदा ‘समानता दिन’ किंवा ‘समानता दिवस’ हे शब्द वाचायला आणि ऐकायला मिळतात. परंतु Equality Day साठी आपण मराठीमध्ये ‘समता दिन’ हे शब्द वापरायला हवे, समानता दिन नव्हे. ‘समता’ विरुद्ध ‘समानता’ – या दोन शब्दांमधील भेद लेखाच्या शेवटी सांगितला आहे.
- आंबेडकर जयंतीशी संबंधित रंजक तथ्ये व खास गोष्टी
- डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पुरस्कारांचा केंद्र शासनाला विसर!
जगभरातील त्या राज्य सरकारांची माहिती घेण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भारत सरकारने केलेल्या महत्त्वाच्या कामांची थोडक्यात माहिती घेऊ.
भारत – सामाजिक न्याय वर्ष
14 एप्रिल 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 99 व्या जयंतीदिनी त्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले. त्यांना हा सन्मान खूप उशिरा मिळाला (त्यांच्या मृत्यूनंतर 32 वर्षांनी).
याचवेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, केंद्र सरकारने 14 एप्रिल 1990 ते 14 एप्रिल 1991 (99 वी ते 100 वी आंबेडकर जयंती) हा एक वर्षाचा कालावधी ‘इयर ऑफ सोशल जस्टिस’ अर्थात ‘सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. याच वर्षी बाबासाहेबांचे तैलचित्र भारतीय संसदेत लावण्यात आले होते.
डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस कोणत्या सरकारांनी ‘विशेष दिवस’ म्हणून घोषित केला आहे ते आता पाहू.
महाराष्ट्र – ज्ञान दिवस
2017 मध्ये, महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिल ला ज्ञान दिवस अर्थात नॉलेज डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून साजरी केली जात आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असल्याने त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ सुद्धा म्हटले जाते, आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील त्यांचा जन्मदिवस त्यांच्या कर्तुत्वाला साजेल अशा नावाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. world biggest jayanti in marathi
बाबासाहेब हे एक मराठी व्यक्ती होते आणि महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी होती. महाराष्ट्राला “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” म्हणतात, कारण या तीन महान समाज सुधारकांनी महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव टाकला आहे, आणि त्यामुळेच महाराष्ट्र आज ‘पुरोगामी महाराष्ट्र’ म्हणून ओळखला जातो.
ज्ञान दिनाच्या पुढे जाऊन, 27 ऑक्टोबर 2017 रोजी, महाराष्ट्र शासनाने डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ 7 नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिन‘ सुद्धा घोषित केला. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन आहे.
7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. या शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे.
ब्रिटिश कोलंबिया – समता दिवस
चार वर्षांनंतर, 2021 मध्ये, कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया सरकारने डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल ला ‘डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस’ म्हणून घोषित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अशा प्रकारे सन्मान करणारे हे पहिलेच परदेशी राज्य सरकार आहे.
पुढील वर्षी, 2022 मध्ये, ब्रिटिश कोलंबिया सरकारने पुन्हा या दिवसाची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे त्यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्रिटिश कोलंबिया राज्यात ‘समता दिन’ घोषित होण्याच्या एक वर्ष आधी, त्याच राज्यातील बर्नाबी शहरात 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 6 एप्रिल 2020 रोजी बर्नाबी महानगरपालिकेने डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘डॉ. बी. आर. आंबेडकर डे ऑफ इक्वालिटी’ म्हणून घोषित केला.
2022 मध्ये, ब्रिटिश कोलंबिया सरकारने एप्रिल महिन्याला ‘दलित हिस्ट्री मंथ’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दलित हिस्ट्री मंथ’ अर्थात ‘दलित इतिहास महिना’ हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महिना देखील आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंतीला (2022) इतर दोन राज्य सरकारांनी सुद्धा ‘इक्वालिटी डे’ आणि ‘एक्विटी डे’ म्हणून घोषित केले. यापैकी एक राज्य अमेरिकेतील होते तर दुसरे भारतातील होते. world biggest jayanti in marathi
कोलोरॅडो – न्यायबुद्धी दिवस
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेतील कोलोरॅडो राज्याच्या सरकारने 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर इक्विटी डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील एखाद्या राज्यात प्रथमच बाबासाहेबांच्या जयंतीला अशाप्रकारे अधिकृत दिवस म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
कोलोरॅडोमध्ये बाबासाहेबांचा जन्मदिवस ‘समता दिवस’ (इक्वालिटी डे) म्हणून नव्हे तर ‘न्यायबुद्धी दिवस’ (एक्विटी डे) म्हणून घोषित केला. एक्विटी आणि इक्वालिटी या संकल्पनांमध्ये बरेच साम्य आहेत आणि त्या दोन्ही बाबासाहेबांच्या कार्याला लागू पडतात.
मिशिगन – न्यायबुद्धी दिवस
कोलोरॅडो नंतर, 14 एप्रिल 2022 रोजी, अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या सरकारने सुद्धा 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर इक्विटी डे’ (Dr. B. R. Ambedkar Equity Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. संदर्भ
मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर (Gretchen Whitmer) यांनी 14 एप्रिल 2022 हा दिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर इक्विटी डे’ म्हणून घोषित केला; तर मिशिगनच्या सिनेटर (आमदार) दयाना पोलेहंकी (Dayna Polehanki) यांनी डॉ. आंबेडकर यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग जूनियर असे संबोधले. संदर्भ
मिशिगन – सोशल इक्विटी वीक
2023 मध्ये अमेरिकेतील मिशिगन राज्यातही बाबासाहेबांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या स्मरणार्थ मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी 9 ते 15 एप्रिल 2023 हा आठवडा मिशिगनमध्ये “सोशल इक्विटी वीक” अर्थात “सामाजिक समता सप्ताह” म्हणून घोषित केला. संदर्भ
या आठवड्यात महात्मा जोतीराव फुले (11 एप्रिल) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल) यांच्या जयंती आहेत.
तामिळनाडू – समता दिवस
कोलोरॅडो नंतर, 30 एप्रिल 2022 रोजी, भारतातील तामिळनाडू सरकारने देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. समता दिवसाला स्थानिक तमिळ भाषेत ‘समथुवा नाल’ (Samathuva Naal) म्हणतात.
महाराष्ट्रानंतर प्रथमच एका भारतीय राज्याने अशाप्रकारचा निर्णय घेतला. या दोन राज्यांबद्दल खास गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही भारतातील अनुक्रमे पहिली आणि दुसरी श्रीमंत राज्ये आहेत.
बर्नाबी, जर्सी सिटी आणि सरे – समता दिवस
ब्रिटिश कोलंबिया राज्यातील बर्नाबी शहरात 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस’ (डॉ. बी.आर. आंबेडकर डे ऑफ इक्वालिटी) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 6 एप्रिल 2020 रोजी बर्नाबी महानगरपालिकेने डॉ. आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘डॉ. बी. आर. आंबेडकर डे ऑफ इक्वालिटी’ म्हणून घोषित केला.
यानंतर परत आपण अमेरिकेकडे वळू. या वर्षी 2022 मध्ये, अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील जर्सी सिटी या शहरामध्ये 14 एप्रिल ला ‘इक्वालिटी डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. जर्सी सिटीच्या महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच वर्षी, ब्रिटिश कोलंबिया राज्यातील सरे (Surrey) शहराने सुद्धा आंबेडकर जयंतीला ‘डॉ. बी.आर. आंबेडकर डे ऑफ इक्वालिटी’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
राज्य / शहर अधिकृत दिवस (14 एप्रिल) स्थान व ओळख महाराष्ट्र ज्ञान दिवस भारतीय राज्य बर्नाबी डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस कॅनेडियन शहर ब्रिटिश कोलंबिया डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस कॅनेडियन राज्य कोलोरॅडो डॉ. बी.आर. आंबेडकर न्यायबुद्धी दिवस अमेरिकन राज्य तामिळनाडू समता दिवस भारतीय राज्य जर्सी सिटी समता दिवस अमेरिकन शहर सरे डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिवस कॅनेडियन शहर मिशिगन डॉ. बी.आर. आंबेडकर न्यायबुद्धी दिवस अमेरिकन राज्य
आता तुम्हाला माहिती झाले आहे की, 2022 पूर्वी बाबासाहेबांचा जन्मदिवस फक्त महाराष्ट्रात (2017 पासून) आणि ब्रिटिश कोलंबिया (2021 पासून) मध्ये अधिकृतपणे साजरा केला जात होता. मात्र, 2022 मध्ये कोलोरॅडो, मिशिगन आणि तामिळनाडू या तीन नवीन राज्यांनी बाबासाहेबांची जयंती त्याच पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला.
भारत, कॅनडा आणि अमेरिका या तीन देशांतील पाच राज्य सरकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समता दिन, ज्ञान दिन आणि न्यायबुद्धी दिन म्हणून साजरा करतात. भविष्यात आंबेडकर जयंती अधिकृत दिवस म्हणून साजरी करणाऱ्या राज्यांची संख्या नक्कीच वाढेल. महाराष्ट्र, ब्रिटिश कोलंबिया, मिशिगनn कोलोरॅडो आणि तमिळनाडू या राज्यांचे अनुकरण जगभरातील इतरही राज्ये करतील. world biggest jayanti in marathi
डॉ. आंबेडकर जयंती ‘आंतरराष्ट्रीय समता दिवस‘ व्हायला हवा
भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय समता दिवस’ म्हणून घोषित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. भारत सरकारने आवश्यक उपाययोजना करून हा ठराव संयुक्त राष्ट्रसंघात मांडावा.
बाबासाहेबांना ‘जागतिक प्रणेता’संबोधणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तीनदा (2016, 2017 आणि 2018) साजरी केली आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाला बाबासाहेबांच्या कार्यांची प्राथमिक माहिती असेलच.
जर बाबासाहेबांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय समता दिवस’ म्हणून घोषित केल्यास तो त्यांचा सर्वोच्च जागतिक सन्मान ठरेल.
डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस भारतात ‘राष्ट्रीय समता दिन‘ का नाही?
भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘राष्ट्रीय समता दिवस’ म्हणून घोषित करायला हवी. (यावर एक विश्लेषणात्मक स्वतंत्र लेख लिहिला जाईल) world biggest jayanti in marathi
‘समता दिवस’ Vs ‘समानता दिवस’ !
Equality Day साठी मराठी भाषेमध्ये अनेकदा ‘समानता दिन’ किंवा ‘समानता दिवस’ हे शब्द वाचायला आणि ऐकायला मिळतात. परंतु Equality Day साठी आपण मराठीमध्ये ‘समता दिन’ हे हे शब्द वापरायला हवे, समानता दिन नव्हे. Equality साठी मराठी भाषेमध्ये ‘समता‘ हा शब्द प्रयोग करावा, ‘समानता‘ हा शब्दप्रयोग करू नये.
समता या शब्दाचा मूळ अर्थ वा इंग्रजी शब्द Equality आहे. दुसरीकडे समानता हा शब्द प्रामुख्याने सादृश्य, साम्यता, सारखेपणा, एकजिनसीपणा, साधर्म्य अशा आशयासाठी वापरला जातो. Equality साठी समता आणि समानता या दोघांचे अर्थ एक सारखे वाटत असले तरी ते एकमेकांपासून बरेच दूर आहेत. तथापि, हिंदी भाषेत Equality साठी ‘समानता’ हा शब्द योग्य आहे.
ज्ञान दिनाला इंग्लिशमध्ये Knowledge Day म्हणतात, आणि त्याचा योग्य उच्चार ‘नॉलिज डे’ आहे, मात्र भारतीय त्याला ‘नॉलेज डे’ बोलतात आणि लिहितातही. Equity Day म्हणजे न्यायबुद्धी दिन, आणि त्याचा योग्य उच्चार ‘एक्विटी डे’ आहे, मात्र भारतीय त्याला ‘इक्विटी डे’ बोलतात आणि लिहितातही.
सारांश
आंबेडकर जयंतीनिमित्त जगभरातील अधिकृत दिवसांबद्दल माहिती देणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला? लेखात काही माहिती राहिली असल्यास किंवा अन्य काही बदल आवश्यक असल्यास कृपया ई-मेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवावे.
भविष्यात किंवा पुढील वर्षांमध्ये काही नवीन माहिती मिळाली तर हा लेख अद्ययावत केला जाईल. हा लेख आवडल्यास इतरांपर्यंत जरूर शेअर करावा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- आंबेडकर जयंतीशी संबंधित रंजक तथ्ये
- Dr. Ambedkar Family – आंबेडकर परिवार की संपूर्ण जानकारी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
Nice a vishv Greater Dr. B.R. Ambedkar Jayanty so proud of me