सुप्रीम कोर्टात बाबासाहेबांचा पुतळा : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात 26 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आहे. यापूर्वी केवळ दोनच व्यक्तींचे पुतळे सुप्रीम कोर्टाच्या आवारात बसवण्यात आले होते. Ambedkar statue in Supreme Court of India
सुप्रीम कोर्टात बाबासाहेबांचा पुतळा
भारताचे सरन्यायधीश डी.वाय. चंद्रचूड आणि मुख्य न्यायधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. संविधान दिनी अर्थात 26 नोव्हेंबर 2023 रोजी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आहे. हा बाबासाहेबांचा एक राष्ट्रीय गौरवच आहे. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात संविधान दिन साजरा झाला, जेथे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती होत्या.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचार (हिंदी)
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवनचरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील आणि कायदेपंडित म्हणून विख्यात आहेत. बाबासाहेबांचा हा पुतळा 7 फुट उंच आहे आणि तो 3 फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे. या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. भारताचे सरन्यायाधीश बसत असलेल्या सर्वोच्च न्यायालय क्रमांक 1 समोर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हरियाणातील मानेसर येथे हा पुतळा बनवण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी या पुतळ्याचे शिल्प तयार केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बहुआयामी विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. ते न्यायशास्त्रज्ञ (कायदेतज्ज्ञ), समाजसुधारक, लेखक, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेते होते. त्यांनी संविधान सभेतील मसुदा समितीचे नेतृत्व करून भारतीय संविधान निर्माण केले. त्यांनी पहिले केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
न्यायालयाच्या संकेतस्थळावर बाबासाहेबांबद्दल विशेष विभाग
पुतळा उभारण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने बाबासाहेबांचा अजून एक महत्त्वपूर्ण सन्मान केला आहे. बाबासाहेबांच्या वकिली कारकीर्दास या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने, संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला आहे.
या वेबपेजवर त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी आहेत. क्लिक करा आणि पाहा → main.sci.gov.in/AMB/home
28 जून 1922 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या ग्रेज इन मधून कायद्याची सर्वोच्च पदवी बॅरिस्टर-ॲट-लॉ मिळवली होती. पुढील वर्षी 5 जुलै 1923 रोजी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या नावाची नोंदणी झाली.
1970च्या दशकापासून होत होती मागणी
आंबेडकरवादी वकिलांच्या एका गटाने केलेल्या मागणीनंतर बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संविधानाच्या शिल्पकाराचा पुतळा बसवण्याची मागणी वकिलांनी यापूर्वी अनेकदा केली होती. 1970च्या दशकात राजकारणी, समाजसेवक आणि आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेला बाबासाहेबांचा पुतळा संसदेत बसवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतरची पुढील पाच दशकं हा संघर्ष सुरू राहिला, आणि जो आता पूर्णत्वास आली आहे.
14 एप्रिल 2023 रोजी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, अधिवक्ता-ऑन-रेकॉर्ड प्रतीक बोंबार्डे यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना निवेदन दिले होते, ज्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात डॉ. आंबेडकरांच्या पुतळा बसवण्याची मागणी केली होती. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशनने (SCACA) पुतळा बसवण्याची मागणीही केली होती. या मागण्यांवर मा. सरन्यायाधीशांनी सकारात्मक विचार केल्याचे आपल्याला दिसते.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॅलेंडरमध्ये 14 एप्रिल रोजी साजरी होणारी आंबेडकर जयंती ही “न्यायालयीन सुट्टी” म्हणून कायमस्वरूपी समाविष्ट करण्याची मागणी देखील आंबेडकरवादी वकील करत आहेत. गेल्या वर्षी 6 डिसेंबर 2022 रोजी आंबेडकरवादी वकिलांनी सरन्यायाधीशांना आणखी एक पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या लॉनवर डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्रही सर्वोच्च न्यायालयात लावण्यात आले आहे. भारताच्या सर्वोच्च न्याय मंदिराने सामाजिक न्यायाच्या थोर शिलेदाराचा गौरव केला आहे. सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा बसवून सर्वोच्च न्यायालयाचीच प्रतिष्ठा वाढली आहे.
याआधी होते टिळक आणि गांधी यांचे पुतळे
सध्या सुप्रीम कोर्टाच्या संकुलात केवळ बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद गांधी (1998 मध्ये) यांचे पुतळे आहेत. यामध्ये आता भीमराव रामजी आंबेडकर यांचा तिसरा पुतळा सामील झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातील कोट्यवधी दलित किंवा उपेक्षित लोकांचे मुक्तिदाता म्हणूनच नव्हे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणूनही आदरणीय आहेत.
लवकरच आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचेही अनावरण
सुप्रीम कोर्टात बाबासाहेबांचा पुतळा स्थापन होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आधुनिक भारताच्या शिल्पकाराचा हा एक राष्ट्रीय गौरव आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही की, पुढील काही महिन्यांत 80 फुट उंच चबुतऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळ्याचे अन्वरन होणार आहे. हा पुतळा आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामध्ये उभारण्यात आला असून तो जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा आहे तसेच भारतातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
- विजयवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा (अनावरण 2024 मध्ये होईल)
- हैदराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळा (अनावरण 14 एप्रिल 2023)
जुन्या संसद भवन परिसरामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा आहे. यासोबतच नवीन संसद भवनामध्ये सुद्धा वल्लभभाई पटेल यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य भित्तचित्र साकारण्यात आले आहे. येथील दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुतळे स्थापन करण्यात आले आहेत. परंतु या पुतळ्यांमध्ये संसदेतील पुतळा आणि सर्वोच्च न्यायालयातील पुतळा विशेष आहेत.
हे ही वाचलंत का?
- भारतातील 10 सर्वात उंच पुतळे
- डॉ. आंबेडकरांचे जगातील तीन सर्वात उंच पुतळे
- ‘या’ देशांमध्ये आहेत डॉ. आंबेडकरांचे पुतळे
- जगभरातील सम्राट अशोक यांचे पुतळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे अन्य लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |