Last Updated on 4 October 2025 by Sandesh Hiwale
महाराष्ट्र राज्यात एकूण 59 अनुसूचित जाती (Scheduled Caste/ SC) आहेत. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि 2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्यांचे अनुसूचित जाती मधील प्रमाण (टक्केवारी) या लेखात दिली आहे. — List of Scheduled Castes in Maharashtra

अनुसूचित जाती म्हणजे काय?
राज्यातील अनुसूचित जातींची यादी जाणून घेण्यापूर्वी आपण अनुसूचित जाती म्हणजे काय ते समजून घेऊयात.
अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे काय? अनुसूचित जाती (शेड्युल्ड कास्ट) ही संज्ञा प्रथम सायमन कमिशनने वापरली व तीच पुढे 1935च्या कायद्यात अंतर्भूत करण्यात आली. सामान्यतः अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा समावेश अनुसूचित जातीत होतो. 1935च्या कायद्याच्या परिशिष्टात अशा अनुसूचित जातींची पहिली अधिकृत यादी प्रकाशित करण्यात आली.
भारतीय लोकसंख्येमध्ये पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचे म्हणजे आजच्या दलितांचे / अनुसूचीत जातींचे प्रमाण 16.6 टक्के आहे. वासाहतिक सत्ताधाऱ्यांनी 1850 पासून 1936 पर्यंत दलितांना ढोबळपणे ‘डिप्रेस्ड क्लासेस‘ असे संबोधले होते. 1931-32 मधल्या गोलमेज परिषदेनंतर झालेल्या सांप्रदायिक निवाड्याचा परिणाम म्हणून वासाहतिक सत्ताधाऱ्यांनी अस्पृश्य जातींसाठी एक सूची तयार केली. त्यातून ‘अनुसूचीत जाती’ (शेड्युल्ड कास्ट्स) ही एक प्रशासकीय कोटी निर्माण झाली. वसाहतोत्तर भारताने ‘घटना (अनुसूचीत जाती) आदेश, 1950 अनुसार ही सूची स्वीकारली. त्यामध्ये 29 राज्यांमधील 1,108 जातींची नोंदणी करण्यात आलेली होती.
आधीच प्रचंड संख्या असलेल्या या सूचीतील जातींचा आकडा अंतिम स्वरूपाचा मात्र नाही. यातील प्रत्येक जातीच्या आणखी डझनावारी उपजाती आणि उप-उपजाती असू शकतात, त्यांच्यात अंतर्गत उतरंडीची भावना असू शकते.
अनुसूचित जातींची लोकसंख्या
SC Caste List in Maharashtra Marathi : 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील Scheduled Caste (SC) अर्थात अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,32,75,898 आहे जी राज्याच्या लोकसंख्येच्या 11.81% आहे. भारतातील अनुसूचित जातीची लोकसंख्या 20,13,78,086 किंवा 16.6% आहे (2011 च्या जनगणनेनुसार). भारतातील एकूण 20.14 कोटी अनुसूचित जातींपैकी 6.6% महाराष्ट्रात आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,32,75,898 होती, जी राज्याच्या एकूण लोकसंख्येत 11.8% आहे. अनुसूचित जातींपैकी 67,67,759 पुरुष आणि 65,08,139 स्त्रिया होत्या.

अनुसूचित जातींची यादी (लोकसंख्येसह)
अनुसूचित जाती लिस्ट महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यात एकूण 59 अनुसूचित जाती आहेत. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी आणि 2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक अनुसूचित जातीची लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे.
जाती क्र. जाती/ जातसमूह लोकसंख्या (2011)
प्रमाण (%) 01 अगेर 896 0.007 02 अनमुक 68 0.0005 03 आरे माला 350 0.003 04 अरवा माला 503 0.004 05 बहना, बहाना 210 0.002 06 बाकड, बंट 1,649 0.013 07 बलाही, बलाई 16,957 0.132 08 बसोर, बुरुड, बांसोर, बांसोडी 55,564 0.432 09 बेडा जंगम, बुडगा जंगम 27,168 0.211 10 बेडर 14,029 0.109 11 भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार 14,11,072 10.967 12 भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला 2,17,166 1.688 13 बिंदला 625 0.005 14 ब्यागारा 379 0.003 15 चलवादी, चन्नय्या 3,309 0.026 16 चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी 608 0.005 17 डक्कल, डोक्कलवार 950 0.007 18 ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर 1,16,287 0.904 19 डोम, डुमार 3,690 0.029 20 येल्लमलवार, येल्लमलवंडलु 3,306 0.026 21 गंडा, गंडी 585 0.005 22 गरोड, गारी 601 0.005 23 घासी, घासीया 1,989 0.016 24 हल्लीर 102 0.001 25 हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार 148 0.001 26 होलार, व्हलार 1,08,908 0.846 27 होलय, होलेर, होलेया, होलिया 18,263 0.141 28 कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील तसेच राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील) 5,599 0.044 29 कटिया, पथरिया 5,207 0.041 30 खंगार, कनेरा, मिरधा 2,020 0.016 31 खाटीक, चिकवा, चिकवी 1,08,491 0.843 32 कोलूपूल-वंडलु 33 0.0003 33 कोरी 16,018 0.125 34 लिंगडेर 5,298 0.041 35 मादगी 56,481 0.439 36 मादिगा 15,318 0.119 37 महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू 80,06,060 62.223 38 माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर 14,939 0.116 39 माला 15,266 0.119 40 माला दासरी 1,789 0.014 41 माला हन्नाई 27 0.0002 42 माला जंगम 8,491 0.066 43 माला मस्ती 17 0.0001 44 माला साले, नेटकानी 269 0.002 45 माला सन्यासी 46 0.0004 46 मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग 24,88,531 19.341 47 मांग-गारोडी, मांग-गारुडी 39,993 0.311 48 मन्ने 2,542 0.020 49 मस्ती 69 0.0005 50 मेंघवाल, मेंघवार 40,416 0.314 51 मिठा, अय्यलवार 38 0.0003 52 मुक्री 54 0.0004 53 नाडीया, हादी 333 0.003 54 पासी 24,664 0.192 55 सांसी 491 0.004 56 शेणवा, चेणवा, सेडमा, रावत 1,326 0.010 57 सिंधोल्लू, चिंदोल्लू 1,002 0.008 58 तिरगार, तिरबंदा 80 0.0006 59 तुरी 490 0.004 * सामान्य जाती (Generic Castes) 4,09,118 - ** एकूण (1-59 जाती) 12866780 100 *** एकूण (Generic Castes सह) 13275898 -
क्र. जाती लोकसंख्या 1 अगेर 896 2 अनमुक 68 3 आरेमाला 350 4 अरवा माला 503 5 बहना, बहाना 210 6 बाकड, बंट 1,649 7 बलाही, बलाई 16,957 8 बसोर , बुरुद, बांसोर, बांसोडी 55,564 9 बेडा जंगम, बुडगा जंगम 27,168 10 बेडर 14,029 11 भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चमार 14,11,072 12 भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला 2,17,166 13 बिंदला 625 14 ब्यागारा 379 15 चलवादी, चन्नय्या 3,309 16 चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी 608 17 डक्कल, डोक्कलवार 950 18 ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर 1,16,287 19 डोम, डुमार 3,690 20 येल्लमलवार, येल्लमलवंडलु 3,306 21 गंडा, गंडी 585 22 गरोड, गारी 601 23 घासी, घासीया 1,989 24 हल्लीर 102 25 हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार 148 26 होलार, व्हलार 1,08,908 27 होलय, होलेर, होलेया, होलिया 18,263 28 कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील तसेच राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील) 5,599 29 कटिया, पथरिया 5,207 30 खंगार, कनेरा, मिरधा 2,020 31 खाटीक, चिकवा, चिकवी 1,08,491 32 कोलूपूल-वंडलु 33 33 कोरी 16,018 34 लिंगडेर 5,298 35 मादगी 56,481 36 मादिगा 15,318 37 महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू 80,06,060 38 माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर 14,939 39 माला 15,266 40 माला दासरी 1,789 41 माला हन्नाई 27 42 माला जंगम 8,491 43 माला मस्ती 17 44 माला साले, नेटकानी 269 45 माला सन्यासी 46 46 मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग 24,88,531 47 मांग-गारोडी, मांग-गारुडी 39,993 48 मन्ने 2,542 49 मष्टी 69 50 मेंघवाल, मेंघवार 40,416 51 मिठा, अय्यलवार 38 52 मुक्री 54 53 नाडीया, हादी 333 54 पासी 24,664 55 सांसी 491 56 शेणवा, चेणवा, सेडमा, रावत 1,326 57 सिंधोल्लू, चिंदोल्लू 1,002 58 तिरगार, तिरबंदा 80 59 तुरी 490
महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या 1,32,75,898 आहे. यामध्ये दोन गटांचा समावेश होतो –
-
59 अनुसूचित जातींची लोकसंख्या: 1,28,66,780
-
Generic Castes (सामान्य जाती): 4,09,118
एकूण अनुसूचित जातींच्या लोकसंख्येमधून एखाद्या SC जातीचे प्रमाण काढायचे असल्यास, ते फक्त 59 अनुसूचित जातींच्या एकत्रित लोकसंख्येमधूनच (1,28,66,780) काढले जाते, त्यामध्ये generic castes ची लोकसंख्या जोडली जात नाही. कारण generic castes (सामान्य जाती) या 59 जातींव्यतिरिक्त स्वतंत्र स्वरूपात नोंदल्या गेल्या असून, त्या 59 जातींच्या तुलनात्मक अभ्यासासाठी सुसंगत ठरत नाहीत.
बार्टीने देखील आपल्या अहवालात याच पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांनी SC जातींचे प्रमाण काढताना एकूण 59 अनुसूचित जातीसह generic castes ची लोकसंख्या (1,32,75,898) विचारात घेतल्या नाहीत आणि केवळ 59 जातींच्या लोकसंख्येच्या आधारे मोजमाप केले आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11,23,74,333 असून त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,32,75,898 (11.81%) आहे. 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना झाली नाही, त्यामुळे 2011 ची जनगणना ही नवीनतम जनगणना आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण 82.91 टक्के आहे तर अनुसूचित जातीचे 79.66% आहे.
लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीचे वर्गीकरण
महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 25 अशा आहेत ज्यांची लोकसंख्या 1,000 पेक्षा कमी आहे, तर 1,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 9 अनुसूचित जाती आहेत.
- 1 ते 100 लोकसंख्या – 9 जाती
- 101 ते 1,000 लोकसंख्या – 16 जाती
- 1,001 ते 10,000 लोकसंख्या – 14 जाती
- 10,001 ते 50,000 लोकसंख्या – 11 जाती
- 50,001 ते 1,00,000 लोकसंख्या – 2 जाती
- 1,00,001 ते 5,00,000 लोकसंख्या – 4 जाती
- 5,00,001 ते 25,00,000 लोकसंख्या – 2 जाती
- 25,00,001 ते 85,00,000 लोकसंख्या – 1 जात

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 अनुसूचित जाती
2011 च्या जनगणनेनुसार, सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी खालीलप्रमाणे आहेत :
- महार – 80,06,060 (62.22%)
- मांग – 24,88,531 (19.34%)
- चांभार – 14,11,072 (10.97%)
- भंगी – 2,17,166 (1.69%)
- ढोर – 1,16,287 (0.90%)
- होलार – 1,08,908 (0.85%)
- खाटीक – 1,08,491 (0.84%)
- मादगी – 56,481 (0.44%)
- बसोर – 55,564 (0.43%)
- मेंघवाल – 40,416 (0.31%)
2011 च्या जनगणनेनुसार, महार, मांग आणि चांभार हे तीन जातसमूह एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या 92.53 टक्के आहेत. तर उर्वरित 56 अनुसूचित जाती लोकसंख्येच्या 7.47 टक्के आहेत.
मागील अर्थात 2001 च्या जनगणनेनुसार, महार (57.8%), मांग (20.4%), व चांभार (12.6%) या अनुसूचित जातींमधील तीन प्रमुख समुदायांची लोकसंख्या 91.8% होती. तर उर्वरित 56 अनुसूचित जाती लोकसंख्येच्या 9.2 टक्के आहेत.
2001 ते 2011 या दरम्यान, अनुसूचित जातींमधील महारांचे प्रमाण वाढले आहे (57 टक्के वरून 62 टक्के). तर मांग (20 टक्के वरून 19 टक्के) आणि चांभार (12 टक्के वरून 11 टक्के) या जातींचे प्रमाण घटल्याचे दिसून येते.
2011 च्या जनगणनेनुसार, लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातीचे सर्वाधिक प्रमाण (19.4%) आहे. पुणे जिल्ह्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक (11.81 लाख) आहे.
- हेही पाहा : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण केले तर कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण मिळेल?
- हेही पाहा : Caste census of Bombay 1951 (pdf)
लोकसंख्येबाबत गावनिहाय माहिती
अनुसूचित जातीच्या लोकसंख्येबाबत गावनिहाय माहिती खालीलप्रमाणे:
100% अनु. जाती — 34 गावे
75 ते 100% अनु. जाती — 168 गावे
50 ते 75% अनु. जाती — 500 गावे
1 ते 50% अनु. जाती — 32,416 गावे
0% अनु. जाती — 7,841 गावे
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र राज्यातील एकूण गावांची संख्या 40,959 आहे, ज्यांपैकी 702 गावांमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. महाराष्ट्रातील एकूण दलित वस्त्या 40,587 आहेत.
दारिद्र रेषेखालील कुटुंबे
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात 2,38,30,580 कुटुंबे आहेत, त्यापैकी 33,11,405 कुटुंबे अनुसूचित जातीची आहेत.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंब सर्वेक्षण (2002 ते 2007) नुसार, महाराष्ट्र राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे 45,02,450 आहेत, त्यापैकी अनुसूचित जातीची कुटुंबे 10,12,000 (22.48%) आहेत.
2011 ची जनगणना आणि 2002-07 चे कुटुंब सर्वेक्षण यांच्यातील आकडेवारी एकत्रित अभ्यासली असता आढळते की, राज्यातील 30% पेक्षा अधिक अनुसूचित जातीची कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच अत्यंत गरीब आहेत.
भूधारकांची संख्या
कृषी गणना 2005-06 नुसार, महाराष्ट्रात एकूण भूधारकांची संख्या 11 कोटी 43 लाख आहे, यांमध्ये अनुसूचित जातीच्या भूधारकांची संख्या 10.57 लाख (9.25%) आहे. राज्यातील भूधारकांकडे एकूण जमीन 168.94 लाख हेक्टर असून त्यामध्ये अनुसूचित जातीच्या भूधारकांकडे एकूण जमीन 12.20 लाख हेक्टर (7.22%) आहे.
अनुसूचित जातींना आरक्षण
महाराष्ट्रात, शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी (SC, ST, OBC) एकूण 62 टक्के आरक्षण आहे. त्यापैकी 13 टक्के आरक्षण अनुसूचित जातीसाठी आहे. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच लोकसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 33 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
‘एससी आरक्षणातील उपवर्गीकरण’ हा महत्त्वाचा मुद्दा सध्या अनुसूचित जातींमध्ये चर्चेचा विषय आहे. आरक्षणातील उपवर्गीकरणानंतर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळू शकते हे ‘इथे’ पाहा.
धर्मनिहाय लोकसंख्या
“संविधानाच्या परिच्छेद 3 नुसार, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसूचित जातीचे मानले जाणार नाही. म्हणजेच धर्माने केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असलेली व्यक्तीच अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकते. “ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला आहे, त्याला कोणत्याही अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. त्याला शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. 1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसूचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदू धर्मावर आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्येची व्याप्ती वाढवून हिंदू धर्मासह शीख आणि बौद्ध धर्मांचाही यात समावेश करण्यात आला होता.
कायदेशीररीत्या, अनुसूचित जातीची व्यक्ती धर्माने केवळ हिंदू, बौद्ध किंवा शीख असू शकते, या तिघांव्यतिरिक्त अन्य नाही. म्हणून, 59 अनुसूचित जातींमध्ये, प्रत्येक जातीची लोकसंख्या हिंदू, बौद्ध आणि शीख या तीन धर्मांमध्ये विभागली गेली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या खालीलप्रमाणे आहे. (संदर्भ)
- हिंदू : 80,60,130 (60.71%)
- बौद्ध : 52,04,284 (39.20%)
- शीख : 11,484 (0.09%)
- एकूण : 1,32,75,898 (100%)
2011 च्या जनगणनेनुसार, राज्यात महारांची लोकसंख्या 80,06,060 असून त्यापैकी 49,43,821 बौद्ध, 30,54,158 हिंदू आणि 8,081 शीख आहेत. जर या 30.54 लाख ‘हिंदू महार’ लोकांची नोंदणी ‘बौद्ध महार’ म्हणून झाली असती तर खालीलप्रमाणे आकडेवारी असली असती.
- हिंदू : 50,05,972 (37.71%)
- बौद्ध : 82,58,442 (62.21%)
- शीख : 11,484 (0.09%)
- एकूण : 1,32,75,898 (100%)

अनेक महार, मांग लोकांनी तसेच इतर अनुसूचित जातींच्या लोकांनी जनगणनेत त्यांचा धर्म ख्रिश्चन धर्म (किंवा इस्लाम) म्हणून नोंदवला, परंतु त्यामुळे सरकारने त्यांची अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये गणना केली नाही.
अनुसूचित जातींशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी
2011 च्या जनगणनेनुसार, अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले तीन जिल्हे खालीलप्रमाणे :
- पुणे जिल्हा (11.81 लाख/ 8.89%)
- नागपूर जिल्हा (8.68 लाख/ 6.34%)
- सोलापूर जिल्हा (6.5 लाख/ 4.89%)
अनुसूचित जातींची सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले तीन जिल्हे खालीलप्रमाणे :
- नंदुरबार जिल्हा (47,985)
- सिंधुदुर्ग जिल्हा (55,586)
- रत्नागिरी जिल्हा (66,948)
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.