महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत सध्या बौद्ध आमदार (current Buddhist members of Maharashtra legislature) किती व कोणते आहेत, याविषयीची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार!
यापूर्वी आपण महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार जाणून घेतले आहेत. महाराष्ट्रात अनेक बौद्ध आमदार झालेले आहेत. त्यांपैकी काहींनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री म्हणून देखील काम केले आहे. तथापि, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यातील बौद्ध समाजाला महाराष्ट्र विधिमंडळात (विधान परिषद आणि विधानसभा) योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सध्या त्याच्या खूप कमी प्रतिनिधीत्व त्यांना मिळाले आहे.
‘आमदार’ म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होय. राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद या तिघांचे मिळून राज्य विधिमंडळ होते. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य हे आमदार असतात, ज्यांना हिंदीत ‘विधायक’ म्हटले जाते. इंग्रजीत मात्र विधानसभेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली’ (एमएलए) तर विधान परिषदेच्या सदस्यांना ‘मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’ (एमएलसी) म्हणतात. – Current Buddhist MLAs and MLCs from Maharashtra
2019 मध्ये महाराष्ट्रात चौदावी विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत बौद्ध समाजाचे एकूण आठ उमेदवार निवडून आले, हेच आज महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार आहेत. यांपैकी एक बौद्ध आमदार मंत्री सुद्धा आहे. अजुन एक बौद्ध आमदार हा विधान परिषदेचा सुद्धा सदस्य आहे. चला तर जाणून घेऊया विद्यमान बौद्ध आमदारांविषयी….
महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार
1. विजय गिरकर (विधानपरिषद आमदार, 2012-2024)
विजय विठ्ठल गिरकर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते विधानसभा सदस्य कोट्यातून निवडून आलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मनोहर जोशी मंत्रिमंडळात (1995-99) ते महाराष्ट्राचे राज्य मंत्रीही होते.
त्यांना ‘भाई’ (भाई गिरकर) म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या पत्नी काल. विजय गिरकर हे महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार असून ते विधान परिषदेत एकमेव बौद्ध सभासद आहेत. त्यांच्या पत्नी काल. शैलजा विजय गिरकर या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर होत्या.
- 1995 – 1999 : महाराष्ट्राचे राज्यमंत्री
- जुलै 2012 ते जुलै 2018 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (पहिली टर्म)
- जुलै 2018 ते जुलै 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (दुसरी टर्म)
2. नितीन राऊत (विधानसभा आमदार, 1999-2014; 2019-वर्तमान)
नितीन काशिनाथ राऊत हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि एससी विभागासाठी AICC (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) चे अध्यक्ष आहेत.
नागपूर जिल्ह्यातील नागपूर उत्तर मतदारसंघातून ते चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने नितीन राऊत यांचे कुटुंब बौद्ध धर्माचे अनुसरून करते आणि त्यांचा बौद्ध तत्त्वज्ञानावर विश्वास आहे.
नितीन राऊत यांनी भूषवलेली राजकीय पदे
- 1999 – 2004: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली टर्म)
- 2004 – 2009: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी टर्म)
- 2008 – 2009 : गृह, कारागृह, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र राज्यमंत्री
- 2009 – 2014: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (3री टर्म)
- 2009 – 2014 : महाराष्ट्राचे फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार हमी योजना आणि जलसंपदा मंत्री
- 2009 – 2014 : यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री
- 2019 – वर्तमान: महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी टर्म)
- 2019 – 2019 : सार्वजनिक बांधकाम (पीएसयू वगळून), आदिवासी विकास, महिला आणि बालविकास, वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, वंचित जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय कल्याण कॅबिनेट मंत्री
- 2019 – 2022 : महाराष्ट्राचे अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री
- 2020 – 2022 : नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
नितीन राऊत यांनी लिहिलेली महत्त्वपूर्ण पुस्तके खालील प्रमाणे आहेत.
- Buddhist Marriage and Succession Act, 2007
- Dr. Babasaheb Ambedkar’s views on Birth Control and its Relevance with Modern India
- Buddhism and Dalit: Social Philosophy and Tradition
3. वर्षा गायकवाड (विधानसभा आमदार, 2004-2024)
वर्षा एकनाथ गायकवाड या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्या आहेत. त्या 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री होत्या. मुंबईतील [एस्सी राखीव] धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या सलग चार वेळा निवडून आल्या आहेत. वर्षा यांचे वडील एकनाथ गायकवाड हे देखील तीन वेळा खासदार होते. वर्षा गायकवाड या आंबेडकरवादी बौद्ध कुटुंबातील आहे. त्या मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या संसदेवर निवडून गेल्या. मुंबई उत्तर मध्ये या खुल्या मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. त्यांनी भाजपच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.
वर्षा गायकवाड यांनी भूषवलली राजकीय पदे
- 2004– 2009 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
- 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
- 2009 – 2010 : वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन, विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री
- 2010 – 2014 : महिला आणि बालविकास विभागाच्या
- 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (3री वेळ)
- 2019 – 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (चौथी वेळ)
- 2019 – 2022 : शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री
- 2024 – वर्तमान – संसद सदस्य (लोकसभा खासदार)
4. संजय बनसोडे (विधानसभा आमदार, 2019-वर्तमान)
संजय बाबुराव बनसोडे (जन्म 31 डिसेंबर 1973) हे भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते 14 जुलै 2023 पासून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी देखील 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 या कालावधीत महाराष्ट्राचे मंत्री होते. संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील एका आंबेडकरी बौद्ध कुटुंबातील आहेत.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉ. अनिल कांबळे यांचा पराभव करून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (आमदार) झाले. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत देखील भाग घेतला होता.
5. संजय शिरसाट (विधानसभा आमदार, 2009-वर्तमान)
संजय पांडुरंग शिरसाट हे भारतीय राजकारणी आणि शिवसेनेचे सदस्य आहेत. ते सलग तीन वेळा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत. संजय शिरसाठ हे महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार आहेत.
संजय शिरसाट यांनी भूषवलेली राजकीय पदे
- 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
- 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
- 2019 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (3री वेळ)
6. बालाजी किनीकर (विधानसभा आमदार, 2009-वर्तमान)
बालाजी किणीकर हे भारतीय राजकारणी असून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेचे सदस्य आहेत. ते सलग तीन वेळा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विजय झालेले आहेत. आमदार बालाजी किनीकर सुद्धा बौद्ध समाजातून येतात.
बालाजी किनीकर यांनी भूषवलेली राजकीय पदे
- 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
- 2014 – 2019 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
- 2019 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (3री वेळ)
7. अण्णा बनसोडे (विधानसभा आमदार, 2009-14; 2019-वर्तमान)
अण्णा दादू बनसोडे हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. 24 ऑक्टोबर 2019 पासून ते पुणे जिल्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यापूर्वी ते 2009 मध्ये पिंपरीतून निवडून आले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.
- 2009 – 2014 : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (पहिली वेळ)
- 2019 – वर्तमान : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (दुसरी वेळ)
8. बळवंत वानखेडे (विधानसभा आमदार, 2019-2024)
बळवंत बसवंत वानखडे हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. 2019 च्या निवडणुकीत ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. ते महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध आमदार आहेत.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या संसदेवर निवडून गेल्या. मुंबई उत्तर मध्ये या खुल्या मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या त्या एकमेव खासदार आहेत. त्यांनी भाजपच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.
बळवंत वानखेडे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची लढत भाजपच्या नवनीत राणा (मोची/चांभार) यांच्या सोबत होती.
9. मनोहर चंद्रिकापुरे (विधानसभा आमदार, 2019-वर्तमान)
मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे हे एक भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून निवडून आलेले 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दोन वेळा विजेते व माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव केला. मनोहर चंद्रकापुरे आणि राजकुमार बडोले हे दोन्ही आजी-माजी आमदार बौद्ध आहेत.
10. यामिनी जाधव (विधानसभा आमदार, 2019-वर्तमान)
यामिनी यशवंत जाधव या भारतीय राजकारणी आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्या म्हणून त्या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. भायखळा हा खुला मतदारसंघ असून खुल्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या एकमेव बौद्ध आमदार आहेत. 2012 मध्ये त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. वर्षा गायकवाडानंतर यामिनी जाधव ह्या दुसऱ्या विद्यमान बौद्ध महिला आमदार आहेत.
बौद्ध आमदारांचे पक्षनिहाय वर्गीकरण
सध्या महाराष्ट्र विधानसभेतील 9 बौद्ध आमदारांपैकी तीन काँग्रेसचे, तीन शिंदेंच्या शिवसेनेचे आणि तीन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. विधान परिषदेत एकमेव बौद्ध आमदार हा भाजपचा आहे.
महाराष्ट्रात बौद्ध आमदार किती असायला हवे ?
आता आपल्याला माहिती झाले असेल की महाराष्ट्रात विधानसभेवर आठ आणि विधान परिषदेवर एक असे एकूण नऊ आमदार बौद्ध समाजाचे आहेत. पण बौद्धांना मिळालेले हे प्रतिनिधित्व लोकसंख्येचे प्रमाणात आहे का? लोकसंख्येच्या प्रमाणानुसार महाराष्ट्रात बौद्ध समाजाची किती आमदार असायला हवे?
2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बौद्ध आणि महार समाजाची एकत्रित लोकसंख्या 8.5 टक्के आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, महाराष्ट्र विधानसभेत 24 किंवा 25 जागांवर बौद्ध समाजाचे आमदार असायला हवे होते, पण सध्या 9 जागांवर (3.1%) आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 6 किंवा 7 आमदार बौद्ध असायला हवेत, पण सध्या एकच बौद्ध आमदार (1.3 टक्के) आहे.
महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 33 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 मतदारसंघ (61%) हे एससी बौद्धांसाठी (महार + इतर एससी बौद्ध) असायला पाहिजे. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 8 बौद्ध उमेदवार (24%) या राखीव मतदारसंघांमधून विधानसभेत निवडून गेले.
महाराष्ट्र विधिमंडळात (विधानसभा + विधान परिषद दोन्ही मिळून) 31 किंवा 32 आमदार हे बौद्ध समाजाचे असावेत, पण आता फक्त 10 (2.7%) आहेत. योग्य प्रतिनिधित्वासाठी बौद्ध समाजाचे अजून 21 ते 22 आमदार राज्यात असायला पाहिजे होते.
- सविस्तर माहिती वाचा : महाराष्ट्रात बौद्ध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व किती असायला हवे आणि किती आहे?
- 2009 च्या विधानसभेचे रंगरूप: राज्यातील अनुसूचित जातीचे पुढारपण चर्मकारांच्या हाती (दै. दिव्य मराठी)
तुमचा अभिप्राय
तुम्हाला हा लेख वाटला याविषयी आम्हाला जरूर कळवा. जर तुम्हाला लेख आवडला असेल तर तो इतरांसोबत नक्की शेअर करा. या लेखाबद्दल तुमचे काही विचार/मत किंवा काही प्रश्न असल्यास, कृपया आम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद
- ‘हे’ आहेत महाराष्ट्रातील विद्यमान बौद्ध खासदार
- जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
- भारतातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- हे आहेत 40 मराठी बौद्ध कलाकार
- भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची धर्मनिहाय लोकसंख्या
- बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या
- सर्व आरक्षण रद्द केले तर काय होईल?
- महाराष्ट्रातील जातीनिहाय लोकसंख्या
- भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?
- बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.