Last Updated on 29 October 2025 by Sandesh Hiwale
प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025 ची उत्तर पत्रिका सदर लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्य परीक्षा उत्तरपत्रिका (40 प्रश्न)
26 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025 संपन्न झाली. या परीक्षेत एकूण 40 प्रश्न विचारण्यात आले होते. या मुख्य परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे.
टीप:
(1) बरोबर उत्तर गडद हिरव्या रंगात दाखवले आहे आणि त्यासमोर ✅ हे चिन्ह दिलेले आहे.
(2) प्रत्येक प्रश्नाखाली त्याचा संदर्भ दिलेला असून, त्यावर क्लिक करून तुम्ही मूळ स्त्रोतामधील माहिती थेट पाहू शकता.
प्रश्न 1
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
A) दलाई लामा
B) सिद्धार्थ गौतम
C) धर्मानंद कोसंबी
D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅
संदर्भ – ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ
प्रश्न 2
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ एकूण किती खंडांमध्ये लिहिला गेला आहे?
A) 5 खंडांत
B) 6 खंडांत
C) 7 खंडांत
D) 8 खंडांत ✅
संदर्भ – ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ
प्रश्न 3
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ कुणाच्या जीवनावर आधारित आहे?
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B) सिद्धार्थ गौतम ✅
C) आचार्य बुद्धघोष
D) वरीलपैकी सर्व
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
प्रश्न 4
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील खंड 3 चे शीर्षक काय आहे?
A) भगवान बुद्धांनी काय शिकविले? ✅
B) धम्मदीक्षेची मोहीम
C) धर्म (Religion) आणि धम्म
D) संघ
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3
प्रश्न 5
खालील विधाने लक्षात घ्या :
(अ) प्रथम धम्म संगीतीमध्ये भदंत महाकाश्यप यांनी बुद्धांच्या जीवनातील घटनांचे कथन करण्याची आज्ञा दिली होती.
(ब) प्रथम धम्म संगीतीमध्ये भदंत महाकाश्यप यांनी धम्म आणि विनय यासह बुद्धांच्या जीवनाशी संबंधित घटनांचे संकलन करण्याचे सांगितले होते.
पर्याय :
A) केवळ (अ) अचूक
B) दोन्ही अचूक
C) केवळ (ब) चूक
D) दोन्ही चूक ✅
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 1, प्रकरण 1
प्रश्न 6
खालील विधाने लक्षात घ्या :
(विविध मान्यतांच्या मते —)
(अ) मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने जीवांना नरकात जाण्यापासून वाचवणे.
(ब) मोक्ष म्हणजे निर्वाण — म्हणजेच राग, लोभ, मोह इत्यादी विकारांचा निग्रह करणे.
पर्याय :
A) केवळ (अ) अचूक
B) केवळ (ब) अचूक
C) दोन्ही अचूक ✅
D) दोन्ही चूक
संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 1, प्रकरण 2
प्रश्न 7
निब्बाण विषयक खालीलपैकी कोणता विचार अचूक नाही?
अ) आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख
ब) जिवंतपणी मिळणारे सुख
क) विकारज्वालांचा निग्रह
A) वरीलपैकी सर्व
B) केवळ (क)
C) (अ) आणि (ब)
D) वरीलपैकी एकही नाही ✅
संदर्भ — भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 3
प्रश्न 8
‘निब्बाण’ (निर्वाण) या शब्दाचा प्रतिशब्द ‘निर्दोष जीवन’ आहे, असे भगवान बुद्धांनी कोणास स्पष्ट करून सांगितले आहे?
A) भंते राध ✅
B) भंते पटीसेन
C) भंते राहुल
D) वरीलपैकी एकही नाही
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 3
प्रश्न 9
कम्माचे विभाग कोणते आहेत? खालीलपैकी असत्य नसलेला पर्याय ओळखा.
अ) दिट्टधम्मवेदनिय कम्म
ब) उपपज्जवेदनिय कम्म
क) अपरापरियवेदनिय कम्म
A) (अ) आणि (ब)
B) केवळ (ब)
C) (अ) आणि (क)
D) वरील सर्व ✅
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 6
प्रश्न 10
दान आणि त्याग यांविषयी भावना नसल्यास, धम्मात कोणता ‘घात’ सांगितला आहे?
A) परित्यागघात
B) दृष्टीघात ✅
C) शीलघात
D) वरीलपैकी एकही नाही
संदर्भ — भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 1 (घ)
प्रश्न 11
खालीलपैकी कोणते मत चूक नाही?
अ) बुद्ध निर्धनात धन्यता मानतात.
ब) बुद्ध ऐश्वर्याचे (धन-संपत्तीचे) स्वागत करतात.
A) केवळ (अ)
B) केवळ (ब) ✅
C) वरीलपैकी दोन्ही
D) वरीलपैकी कोणतेही नाही
संदर्भ — भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 4
प्रश्न 12
अचूक नसलेले विधान ओळखा.
अ) सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्ययांमुळे उत्पन्न होतात, कारण त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व असते.
ब) हेतू आणि प्रत्ययांचा उच्छेद झाल्यावर वस्तूंचे अस्तित्व उरत नाही.
A) दोन्ही
B) दोन्हीही नाही
C) केवळ (अ) ✅
D) केवळ (ब)
संदर्भ — भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 3, प्रकरण 5
प्रश्न 13
‘ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारित नाही’, हा विचार गौतम बुद्धांनी कुठे मांडला आहे?
A) मनसाकद (जनपद – कोशल) ✅
B) राजगृह (जनपद – मगध)
C) कौशांबी (जनपद – वत्स)
D) वैशाली (जनपद – वज्जी)
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 4, प्रकरण 2
प्रश्न 14
Assertion (A): बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला कारण तो श्रद्धेवर आधारित होता.
Reason (R): श्रद्धेवर आधारित प्रत्येक कल्पना अनुभवसिद्ध सत्य ठरते.
A) (A) आणि (R) दोन्ही योग्य असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
B) (A) आणि (R) दोन्ही योग्य पण (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही
C) (A) योग्य पण (R) चुकीचे ✅
D) दोन्ही चुकीचे
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 4, प्रकरण 2
प्रश्न 15
कूटदंत, उज्जय आणि उदायी या तिन्ही ब्राह्मणांनी भगवान बुद्धांशी कोणत्या विषयावर वाद केला होता?
A) ईश्वराच्या अस्तित्वाविषयी
B) यज्ञयागाविषयी ✅
C) आत्म्याच्या अस्तित्वाविषयी
D) धर्मग्रंथांच्या पावित्र्याविषयी
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 4, प्रकरण 5
प्रश्न 16
“वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पथ अरण्य आणि खरोखर एक नरकच आहे,” असे गौतम बुद्धांनी कोणत्या सुत्तामध्ये म्हटले आहे?
A) ब्राह्मणधम्मसुत्त
B) तेवीज्यसुत्त ✅
C) कालमासुत्त
D) वरीलपैकी एकही नाही
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 4, प्रकरण 8
प्रश्न 17
देवदाहसुत्त आणि सल्लेखसुत्त — या दोन सुत्तांचा उल्लेख ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात कोठे केला आहे?
A) खंड 3, भाग 3
B) खंड 4, भाग 1
C) खंड 4, भाग 4
D) वरीलपैकी एकही नाही ✅
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 5, प्रकरण 2
प्रश्न 18
खालील विधाने लक्षात घ्या.
अ) ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राह्मणी सिद्धांत होता.
ब) ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य — या त्रैवर्णिकांनाच आणि त्यातही केवळ पुरुषांनाच शिक्षणाची अनुज्ञा होती.
क) ब्राह्मणी सिद्धांतानुसार त्रैवर्णिकांतील स्त्रिया, तसेच शूद्र पुरुष आणि स्त्रिया — यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.
A) केवळ (क) बरोबर
B) केवळ (क) चूक
C) सर्व बरोबर ✅
D) सर्व चूक
संदर्भ: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 5, प्रकरण 2, (ब) 1
प्रश्न 19
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथानुसार, वेदप्रणीत समाजरचना (चातुर्वर्ण्य) या विषयावर गौतम बुद्ध यांची खालीलपैकी कोणत्या ब्राह्मणासोबत चर्चा आढळत नाही?
अ) अश्वलायन
ब) वसिष्ठ
क) येसुकारी
A) केवळ (अ)
B) (ब) आणि (क)
C) (अ), (ब) आणि (क)
D) वरीलपैकी एकही नाही ✅
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 3, भाग 5, प्रकरण 2, (घ) 1
प्रश्न 20
“धम्म” आणि “रिलीजन” याबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
1. बुद्धांचा धम्म हा व्यक्तीगत श्रद्धेवर आधारित आहे.
2. रिलीजन हा सामाजिक आहे आणि तो सार्वजनिक जीवनावर अधारित आहे.
3. बुद्धांचा धम्म हा सामाजिक आहे आणि तो आचरणावर आधारित आहे.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
A) फक्त 1
B) फक्त 2
C) फक्त 3 ✅
D) 1 आणि 3
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 1, प्रकरण 2
प्रश्न 21
खालील विधाने विचारात घ्या :
अ) धर्माचा उद्देश वस्तूजातीचा आरंभ समजाविणे हा आहे.
ब) धम्माचा उद्देश वस्तूजातीच्या आरंभाचा साक्षात्कार करणे हा आहे.
क) धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो त्याच्या दुःखाचा नाश होणे हा आहे.
A) फक्त (अ) आणि (क) योग्य आहेत ✅
B) फक्त (ब) आणि (क) योग्य आहेत
C) फक्त (क) योग्य आहे
D) फक्त (ब) योग्य आहे
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 1, प्रकरण 3
प्रश्न 22
खालील विधानांचा विचार करा :
1. धर्माचे प्रयोजन जगताच्या प्रारंभाचे स्पष्टीकरण करणे आहे.
2. धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना करणे आहे.
3. धर्म व धम्म या दोन्हींची प्रयोजने समान स्वरूपाची आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
A) फक्त 1 आणि 2 ✅
B) फक्त 2
C) फक्त 1 आणि 3
D) सर्व चुकीची
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 1, प्रकरण 4
प्रश्न 23
खालील विधानांचा विचार करा —
1. नीती समाजात शिस्त आणते.
2. बंधुता समाजात एकता आणते.
3. बंधुतापेक्षा नीती ही अधिक मानवी व सार्वत्रिक आहे.
योग्य विधान/ने निवडा:
A) फक्त 1 आणि 2 ✅
B) फक्त 2 आणि 3
C) 1, 2 आणि 3 सर्व
D) फक्त 1
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 1, प्रकरण 7
प्रश्न 24
अलगद्दूउप्पम्म सुत्तात बुद्धांनी कोणत्या प्रकारच्या लोकांबद्दल तक्रार केली?
A) जे जैन तीर्थंकरांना मानतात
B) जे ब्राह्मण पुरोहितांना मानतात
C) जे बुद्धांची शिकवण चुकीच्या पद्धतीने सादर करतात ✅
D) जे पुनर्जन्म नाकारतात
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 2, प्रकरण 1
प्रश्न 25
मृत्यूबद्दल बुद्धमताशी विसंगत असलेले विधान ओळखा :
A) मृत्यू म्हणजे ऊर्जेचा संपूर्ण नाश होणे. ✅
B) मृत्यू म्हणजे शरीरातून ऊर्जा विश्वात मिसळणे.
C) मृत्यू म्हणजे शरीरातील ऊर्जानिर्मिती थांबणे.
D) मृत्यू म्हणजे उष्णतेचा प्रवाह थांबणे आणि त्याचे विश्वात रूपांतरण होणे.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 2, प्रकरण 2
प्रश्न 26
बुद्धधर्म आणि ब्राह्मणी धर्मात “कर्म” हा शब्द समान आहे तसेच —
A) दोन्ही अर्थाने समान आहेत
B) दोन्ही अर्थाने भिन्न आहेत ✅
C) दोन्ही असत्य आहेत
D) दोन्ही एकाच वेळी खरे आहेत
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 2, प्रकरण कर्म (1)
प्रश्न 27
बुद्धांनी “चूळ-दुःख सुत्त” मध्ये जैनांना कोणता प्रश्न विचारला होता?
A. आत्म्याचा आकार काय आहे?
B. तुम्हाला पूर्वजन्माची जाणीव आहे का? ✅
C. दुःखाचे मूळ काय आहे?
D. तपस्येचे महत्त्व काय आहे?
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 2, कर्म (3)
प्रश्न 28
“जीवहत्येची आवश्यकता” या बुद्धविचाराशी खालीलपैकी कोणते विधान सुसंगत नाही?
A) आत्मसंरक्षणासाठी हिंसा अनुमेय असू शकते.
B) प्रज्ञेचा उपयोग करून निर्णय घ्यावा.
C) हिंसा नेहमीच पाप आहे. ✅
D) नैतिक रेषा नीतिमान व्यक्ती ठरवू शकते.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 2, प्रकरण अहिंसा (2)
प्रश्न 29
निब्बान म्हणजे काय?
अ) अष्टांग मार्ग
ब) विकारांपासून मुक्ती
A) केवळ (अ)
B) केवळ (ब)
C) (अ) आणि (ब) ✅
D) (अ) आणि (ब) नाही
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड 4, भाग 4, प्रकरण – निब्बाणावरील प्रवचने (1) आणि (2)
प्रश्न 30
भगवान बुद्ध त्यांचा धम्म या ग्रंथातील कोणत्या खंडात आणि कोणत्या भागात “बौद्ध जीवनमार्ग” याबाबत सांगितले आहे?
A) खंड – 4, भाग – 3 ✅
B) खंड – 4, भाग – 4
C) खंड – 3, भाग – 2
D) खंड – 3, भाग – 4
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड – 4, भाग – 3
प्रश्न 31)
खालील विधानांचा विचार करा :
पॅंथिऑनच्या 2025 सालच्या ऐतिहासिक लोकप्रियता निर्देशांकानुसार,
अ) जगाच्या इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये भगवान बुद्ध यांचा क्रमांक दुसरा आहे.
ब) भारतातील सर्वाधिक ख्यातनाम बौद्ध व्यक्तींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दुसरे स्थान प्राप्त झाले आहे.
क) बौद्ध सम्राट हर्षवर्धन यांची लोकप्रियता, प्राचीन बौद्ध शासक अजातशत्रू यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?
A) फक्त अ ✅
B) फक्त ब
C) फक्त क
D) अ, ब आणि क
संदर्भ — धम्म भारत – भारतातील 32 सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्ती!
प्रश्न 32)
2011च्या जनगणनेनुसार, कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीतील (ST) बौद्धांची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
A) उत्तर प्रदेश
B) सिक्कीम
C) महाराष्ट्र
D) पश्चिम बंगाल ✅
संदर्भ — धम्म भारत – भारतातील बौद्धांची प्रवर्गनिहाय लोकसंख्या: SC, ST, OBC आणि General बौद्धांचे विश्लेषण
प्रश्न 33)
2011 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्यातील बौद्ध लोकसंख्येत ओबीसी आणि सामान्य वर्गातील बौद्धांचा हिस्सा (%) सर्वाधिक होता?
अ) केरळ ✅
ब) महाराष्ट्र
क) अरुणाचल प्रदेश
ड) झारखंड
संदर्भ — धम्म भारत – भारतातील बौद्धांची प्रवर्गनिहाय लोकसंख्या: SC, ST, OBC आणि General बौद्धांचे विश्लेषण
प्रश्न 34)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माकडे कोणत्या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे आकर्षित झाले?
A) श्रद्धा आणि समता
B) भक्ती आणि बंधुत्व
C) परंपरागत विधी आणि शांती
D) तर्कशुद्धता आणि विज्ञाननिष्ठता ✅
संदर्भ — धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयी दृष्टिकोन (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म)
प्रश्न 35)
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांमध्ये लोकसंख्येनुसार महार-बौद्ध समाजाला किती जागा अपेक्षित आहेत आणि 2024च्या निवडणुकीत किती महार-बौद्ध आमदार निवडून आले?
A) अपेक्षित 39 → निवडून आले 11
B) अपेक्षित 25 → निवडून आले 10 ✅
C) अपेक्षित 29 → निवडून आले 11
D) अपेक्षित 19 → निवडून आले 10
संदर्भ — धम्म भारत – महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व: विश्लेषण
प्रश्न 36)
2011च्या भारतीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील बौद्ध आणि महार लोकसंख्येंच्या संदर्भात खालील विधाने पाहा:
अ) बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 65 लाख होती.
ब) महार समाजाच्या लोकांची संख्या 80 लाख होती.
क) बौद्ध लोकांमध्ये सुमारे 76 टक्के महार होते.
ड) महार लोकांमध्ये सुमारे 62 टक्के बौद्ध होते.
A) फक्त अ आणि ब बरोबर
B) फक्त क आणि ड बरोबर
C) सर्व बरोबर ✅
D) सर्व चूक
संदर्भ — धम्म भारत – महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व: विश्लेषण
प्रश्न 37)
“महाबोधी टेम्पल ॲक्ट, 1949” संदर्भात खालील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
A) हा कायदा बिहार विधानसभेने तयार केला आहे.
B) या कायद्याअंतर्गत, महाबोधी महाविहार या सर्वोच्च बौद्ध प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समितीत अबौद्ध सदस्यांना स्थान मिळाले आहे.
C) 2010 मध्ये महाबोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटीच्या अध्यक्षपदासाठी (जिल्हाधिकारी) हिंदू असण्याची अट काढून टाकली गेली. ✅
D) 1922च्या गया कॉंग्रेस अधिवेशनात महाबोधी विहाराच्या हिंदू-बौद्ध नियंत्रण मुद्द्यावर चर्चा झाली होती.
संदर्भ — धम्म भारत – महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन: इतिहास आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष!
प्रश्न 38
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
अ) त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे कुटुंब बौद्ध झाले होते.
ब) त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले.
क) त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले.
ड) त्यांचे वडील रामकृष्ण गवई महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
A) फक्त अ योग्य ✅
B) फक्त अ, ब योग्य
C) फक्त ब, क, ड योग्य
D) अ, ब, क, ड योग्य
संदर्भ — धम्म भारत – सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा जीवन परिचय
प्रश्न 39
देशाच्या राष्ट्रीय जनगणनेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
अ) “जात” महार (किंवा इतर SC जात) नोंदवल्यास “धर्म” फक्त हिंदू लिहिता येतो.
ब) “जात” महार (किंवा इतर SC जात) नोंदवल्यास “धर्म” फक्त बौद्ध लिहिता येतो.
क) “जात” महार (किंवा इतर SC जात) नोंदवल्यास “धर्म” बौद्ध किंवा हिंदू यांपैकी एक लिहिता येतो.
A) फक्त क योग्य ✅
B) फक्त ब योग्य
C) फक्त अ योग्य
D) अ, ब, क योग्य
संदर्भ — धम्म भारत – जातनिहाय जनगणना: महार-बौद्ध समाजासाठी संधी आणि रणनीती (SC आरक्षणाचे उपवर्गीकरण केले तर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळेल?)
प्रश्न 40)
2011च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे, महाराष्ट्रातील अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास, महार समाजाला साधारणतः किती टक्के आरक्षण मिळू शकेल?
A) निश्चित सांगता येत नाही (कारण, प्रत्येक अनु. जातीची जातनिहाय जनगणना झालेली नाही)
B) 8.5 टक्के
C) 9.0 टक्के
D) 8.0 टक्के ✅
संदर्भ — धम्म भारत – जातनिहाय जनगणना: महार-बौद्ध समाजासाठी संधी आणि रणनीती (SC आरक्षणाचे उपवर्गीकरण केले तर कोणत्या जातीला किती आरक्षण मिळेल?)
सराव परीक्षा उत्तरपत्रिका (10 प्रश्न)
22 ऑक्टोबर 2025 रोजी धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025 ची सराव परीक्षा (Practice Test) झाली. या परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या सराव परीक्षेची उत्तर पत्रिका खालीलप्रमाणे आहे.
प्रश्न 1.
प्रारंभीच्या अवस्थेत धर्म आणि जादू एकच होते. यावरून खालीलपैकी काय सूचित होते?
A) धर्म हा मानवाच्या अज्ञानातून उद्भवलेला आहे. ✅
B) धर्म हा अंधश्रद्धेचा परिणाम आहे.
C) धर्माचा संबंध विज्ञानाशी आहे.
D) धर्म केवळ समाजरचनेसाठी निर्माण झाला.
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 4, भाग 1, प्रकरण 1
प्रश्न 2.
Assertion (A): बुद्धांना उच्छेदवादी म्हटले गेले.
Reason (R): कारण त्यांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले.
A) आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे योग्य कारण आहे.
B) A आणि R दोन्ही बरोबर आहेत पण R हे A चे योग्य कारण नाही. ✅
C) A बरोबर आहे पण R चुकीचे आहे.
D) A चुकीचे आहे पण R बरोबर आहे.
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 4, भाग 2, प्रकरण 1
प्रश्न 3.
गौतम बुद्धांनी सृष्टीविषयी दिलेल्या शिकवणीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा:
1. बुद्धांच्या मते सृष्टी शून्यातून निर्माण झाली नाही.
2. बुद्धांनी सृष्टीचा निर्माता मानला, पण त्याच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला.
3. बुद्धांचा प्रतिच्चसमुप्पाद सिद्धांत ईश्वराच्या अस्तित्वाचे समर्थन नाकारतो.
वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती आहे/आहेत?
A) 2 आणि 3
B) 1, 2 आणि 3
C) फक्त 1
D) फक्त 2 ✅
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 3, भाग 4, प्रकरण 2
प्रश्न 4.
धार्मिक क्रियाकलाप या अष्टांग मार्गातील कोणत्या तत्त्वाचे शत्रू आहेत?
A) सम्यक दृष्टि ✅
B) सम्यक संकल्प
C) सम्यक कर्मांत
D) सम्यक आजीव
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 3, भाग 4, प्रकरण 2
प्रश्न 5.
खालीलपैकी अहोसी कम्म कोणते?
A) दिट्ठधम्मवेदनिय कम्म
B) उपपज्जवेदनिय कम्म
C) अपरापरियवेदनिय कम्म
D) वरीलपैकी एकही नाही ✅
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 3, भाग 3, प्रकरण 6
प्रश्न 6.
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, या ग्रंथातील खंड 3 किंवा 4 अनुसार, भगवान बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा ____ हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे.
A) विपश्यना
B) चार आर्य सत्य
C) निब्बाण ✅
D) कार्यकारणभाव
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 3, भाग 3, प्रकरण 3
प्रश्न. 7.
खालील तर्कावर विचार करा.
“जर चेतना चार भौतिक तत्त्वांच्या (पृथ्वी, जल, तेज, वायू) संयोगातून निर्माण होत असेल, तर ती स्वतंत्र आत्म्याच्या अस्तित्वाला नाकारते.”
वरील तर्क बुद्धांच्या कोणत्या तात्त्विक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे?
A) प्रत्यक्षवाद (Empiricism) ✅
B) आध्यात्मिक आदर्शवाद (Spiritual Idealism)
C) नैतिक द्वैतवाद (Ethical Dualism)
D) ब्रह्मवाद (Monism)
संदर्भ: भगवन बुद्ध आणि त्यांचा धम्म – खंड 3, भाग 4, प्रकरण 4
प्रश्न. 8.
“भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य” या लेखाच्या तिसऱ्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मुद्द्याचे वर्णन केले आहे?
A) बौद्ध धर्माची हिंदू धर्माशी तुलना
B) बुद्ध मोक्षदाता नव्हे तर मार्गदाता
C) बौद्धधर्माचा प्रचार कसा करावा
D) बौद्धधम्माच्या पुनरुज्जीवनाची आशा ✅
संदर्भ: धम्म भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माविषयी दृष्टिकोन
प्रश्न. 9.
न्या. भूषण गवई हे भारतातील पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत. तसेच या पदावर विराजमान होणारे ते दुसरे कोणत्या समुदायातील व्यक्ती आहेत?
A) अनुसूचित जमाती
B) अनुसूचित जाती ✅
C) हिंदू महार
D) नवबौद्ध समुदाय
संदर्भ: धम्म भारत – सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा जीवन परिचय
प्रश्न. 10.
बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र तीर्थस्थळ – महाबोधी महाविहाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) महाबोधी महाविहार बिहारमधील बोधगया येथे आहे.
B) 2002 मध्ये युनोस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले.
C) महाविहाराच्या व्यवस्थापन समितीमधील 8 सदस्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी सदस्य बौद्ध आहेत. ✅
D) आदिवासी-बौद्ध समाजातून येणारे कॅबिनेट मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या नियंत्रणात असावे अशी मागणी केली नाही.
संदर्भ: धम्म भारत –महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन: इतिहास आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष!
✅ WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल
✅ हेही पाहा
- माहिती ⇒ धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025
- प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित सर्व परीक्षांची यादी
- परीक्षांविषयक सर्व लेख पाहा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
सर आपण प्रबुद्ध t.v मार्फत घेतलेल्या परीक्षेत आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचाही अभ्यास होत आहे आणि बुद्धांचे ज्ञान पसरत आहे तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद जयभीम नामोबुध्दाय
ह्यातील बरीच उत्तरे चुकीची आहेत तुमची कृपया त्यात बदल करा
कोणती आहेत ते सांगा
प्रश क्र. 39. जात महार लिहिली तर धर्म हिंदू येतो
आणी बौद्ध लिहिली तर जात लिहिता येत नाही..करण बौद्ध धम्मत जाती नाहीत.
आपण क पर्याय बरोबर दिला आहे ..
सदर प्रश्नाखाली संदर्भ दिलेला आहे – त्याला क्लिक करून तुम्ही लेखापर्यंत पोहोचू शकता आणि त्यात तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल.
महार ही एक अनुसूचित जात आहे. भारतीय संविधानानुसार, जी व्यक्ती आपण अनुसूचित जातीची असल्याचा दावा करते तिचा धर्म हिंदू, शीख किंवा बौद्ध असू शकतो. यामुळेच जनगणनेमध्ये महार वा इतर अनुसूचित जातीची नोंद केली तर त्यांना धर्मासमोर हिंदू किंवा बौद्ध यापैकी कोणत्याही एकाची नोंद करता येते.
त्यामुळे जनगणनेत धर्मासमोर बौद्ध लिहिता येते आणि त्यासोबतच कोणत्याही अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नोंद करता येते.
परीक्षेचा अनुभव आला. मी इयत्ता 6 वी चा विद्यार्थी आहे.पण वास्तविक बुद्ध आणि धम्म पुस्तक वाचन म्हणते की मला बुद्ध आणि धम्म वाचन आवडले.
मी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला आणि ज्ञान प्राप्त झाले. मी परीक्षा दिली मला अनुभव आला.मी इयत्ता 6 ची विद्याथीनी असुं आपन ही परीक्षा अशीच घावी. जेणे करुं समाज काम होइल ।