इ.स. 2016 मध्ये मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या 20 चरित्र लेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींची माहिती येथे देण्यात आली आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. – famous people of Maharashtra
Most searched personality on Marathi Wikipedia
famous people of Maharashtra – 2016 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
इ.स. 2016 मध्ये मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या 20 चरित्र लेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींची माहिती येथे देण्यात आली आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. यापूर्वी आपण 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 मधील लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत. वेगवेगळ्या 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे, त्यापैकीच एक मराठी विकिपीडिया आहे. मराठी विकिपीडियावर प्रसिद्ध मराठी व्यक्तींबद्दल वाचले जात नाही तर महाराष्ट्रेतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दलही वाचले जाते. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्यापैकी कोणकोणत्या व्यक्ती 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधी दरम्यान टॉप 20 मध्ये समाविष्ट झाल्या आहेत, याविषयीची तुलनात्मक आकडेवारी येथे तुम्हाला बघायला मिळेल. सन 2016 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 लोकप्रिय व्यक्ती – पहिला व दुसरा क्रमांक बघून आपण अचंबित व्हाल!
2016 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 व्यक्तींपैकी 15 व्यक्ती ह्या महाराष्ट्रीय आहेत, तर 5 व्यक्ती (#3, #4, #12, #14 व #18) ह्या इतर भारतीय राज्यांतील आहेत.
लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येनुसार (व्ह्यूज नुसार) त्याची rank ठरली आहे. प्रत्येक फोटोखाली हिरव्या रंगात कोणत्या चरित्रलेखाला वर्षभरात किती वेळा पहिले गेले (म्हणजे किती views मिळाले) ते दिलेले आहे.
Top 20 Most Popular Persons on Marathi Wikipedia in 2016
famous people of Maharashtra – Top 20 most viewed people on Marathi Wikipedia in 2016
41,593 वेळा वाचले गेले
थोरले बाजीराव पेशवे (1700 – 1740) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या शासनात इ.स. 1720 पासून ‘पेशवे’ पदावर होते. थोरला बाजीराव आणि त्यांची प्रेयसी मस्तानी यांच्यावरील बाजीराव मस्तानी हा चित्रपट 2015 च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता आणि 2016 च्या जानेवारी महिन्यात तो खूप प्रसिद्ध पावला. यामुळेच बाजीराव यांचा लेख या सूचीत समाविष्ट होऊ शकला. हा लेख केवळ या एकाच वर्षी टॉप 20 मध्ये समाविष्ट झालेला आहे. मस्तानी यांच्या चरित्रलेखाला सुद्धा वाचकसंख्या वाढली होती, तथापि त्याला केवळ 20 हजार व्ह्यूज मिळाले होते.
थोर मराठी व्यक्ती
19. नागराज मंजुळे
41,800 वेळा वाचले गेले
नागराज पोपटराव मंजुळे (जन्म 1977) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी पिस्तुल्या या लघुपटाचे आणि फॅंड्री व सैराट या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय मराठी चित्रपट सैराट हा 2016 या वर्षीच प्रदर्शित झाला होता. मंजुळे हे केवळ या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहे.
Who are the famous personalities of Maharashtra?
famous people of Maharashtra
18. स्वामी विवेकानंद
42,323 वेळा वाचले गेले
स्वामी विवेकानंद (१८६३ – १९०२) हे भारतीय विचारवंत व हिंदू संन्यासी होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच प्रसिद्ध नाही आहेत, तर ते महाराष्ट्रातील सुद्धा प्रसिद्ध आहे. ते एक बंगाली व्यक्ती होते, तथापि मराठी लोक मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात. त्यामुळेच स्वामींचा लेख प्रत्येक वर्षीच्या (2016, 2017, 2018, 2019, व 2020) मध्ये टॉप 20 लोकप्रिय चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये तर त्यांच्या चरित्रलेख 5 क्रमांकाने प्रगती करत 13व्या स्थानावर होता.
थोर नेत्यांची माहिती
famous political leaders of maharashtra
17. शाहू महाराज
50,121 वेळा वाचले गेले
राजर्षी शाहू महाराज (1874 – 1922) हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारवंत, समाज सुधारक व शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तिमत्व होते. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. 1884 – 1922 दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील जनता शाहू महाराज यांच्याबद्दल मराठी विकिपीडियावर माहिती वाचत असते. मात्र त्यांचा लेख केवळ 2016, 2018 आणि 2020 या वर्षांमध्येच टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे.
थोर मराठी व्यक्ती
famous people of Maharashtra
16. अण्णा भाऊ साठे
56,384 वेळा वाचले गेले
अण्णा भाऊ साठे (1920 — 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. त्यांना साहित्यरत्न म्हटले जाते. साठे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. दर वर्षी मोठ्या संख्येने त्यांना मराठी विकिपीडियावर वाचले जाते. ते 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची रँक 3 क्रमांकाने प्रगती करत 13व्या स्थानावर होती.
थोर मराठी साहित्यिक
15. राणी लक्ष्मीबाई
61,317 वेळा वाचले गेले
राणी लक्ष्मीबाई (1835 – 1858) ही मराठा शासित झाशी राज्याची राणी होती. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या सैन्याशी युद्ध केले आणि रणांगणात शहीद झाल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एक मराठी व्यक्ती होती. केवळ 2016 आणि 2017 (19वे स्थान) मध्ये त्यांचा चरित्रलेख टॉप 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे. मात्र हिंदी विकिपीडियावरील त्यांचा लेख दर वर्षी तेथील टॉप 20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट होत असतो. याचा अर्थ मराठी भाषिकांपेक्षा हिंदी भाषिकांमध्ये लक्ष्मीबाई जास्त लोकप्रिय आहे.
great leaders of maharashtra
famous people of Maharashtra
14. भगतसिंग
63,339 वेळा वाचले गेले
भगतसिंग (1907 – 1931) एक भारतीय क्रांतिकारक व प्रखर बुद्धिवादी होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मराठी व्यक्ती नसलेले भगतसिंग हे महाराष्ट्रात देखील खूप प्रसिद्ध आहेत. मराठी भाषक लोक त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात. यामुळे ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी 4 वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची रँक 2 क्रमांकाने खाली येत 16व्या स्थानावर होती.
भारतातील थोर व्यक्ती
great leaders of maharashtra
13. संभाजी भोसले
63,341 वेळा वाचले गेले
छत्रपती संभाजी महाराज (1657 – 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे. हे वर्ष 2016 वगळता अन्य सर्व वर्षांमध्ये (2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांचा लेख 7 क्रमांकाने प्रगती करत 6व्या स्थानावर आला होता.
Famous Personalities of Maharashtra
12. विराट कोहली
65,939 वेळा वाचले गेले
विराट कोहली (जन्म: 1988) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि 2013पासून भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो. कोहली हा अमराठी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. तो मराठी विकिपीडियाच्या 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची रँक 2 क्रमांकाने प्रगती करत 10व्या स्थानावर आली होती.
Famous Sports personalities of Maharashtra
11. शरद पवार
68,742 वेळा वाचले गेले
शरद गोविंदराव पवार (जन्म: 1940) हे महाराष्ट्रातील एक आघाडीचे राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात प्रभावशाली नाव असले तरी ते केवळ या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहे.
Who are the famous personalities of Maharashtra?
famous people of Maharashtra
10. सावित्रीबाई फुले
71,450 वेळा वाचले गेले
सावित्रीबाई जोतीराव फुले (1831 – 1897) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. सावित्रीबाई फुले या मराठी विकिपीडियावरील आतापर्यंतच्या “सर्वात लोकप्रिय महिला” ठरल्या आहेत. त्यांच्या पेक्षा जास्त व्ह्यूज कोणत्याही स्त्रीला मिळालेले नाहीत. दरवर्षी प्रचंड संख्येने वाचकवर्ग त्यांच्या बद्दलची माहिती मराठी विकिपीडियावर वाचत असतो. वाचकसंख्येच्या दृष्टीने लोकप्रियतेचा विचार केला तर त्या आपले पती महात्मा फुले यांनाही मागे टाकतात. त्या दर वर्षी टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये सामील होतात, एवढेच नाही तर 2016 वगळता पुढील सर्वच वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची रँक पहिल्या पाच मध्ये आलेली आहे. एक महिला म्हणून तर त्या अव्वल आहेच, परंतु एक मराठी व्यक्ती म्हणून सुद्धा त्या तिसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय व्यक्ती आहेत. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची रँक 5 क्रमांकाने प्रगती करत 5व्या स्थानावर आली होती.
थोर समाजसेविका मराठी
9. संत तुकाराम
72,764 वेळा वाचले गेले
संत तुकाराम (1608 – 1650) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम हे एक शिवकालीन मराठी संत असून, ते आजही महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडिया वरील ‘सर्वाधिक लोकप्रिय संत‘ ठरले आहेत. त्यांच्या पेक्षा अधिक वाचकसंख्या कोणत्याही संताच्या लेखाला मिळालेली नाही. 2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान नेहमी 10व्या रँकच्या आतमधेच राहिले आहे. 2017 मध्ये त्यांची रँक 9 वरून 8व्या स्थानावर आली होती.
most powerful person in maharashtra
famous people of Maharashtra
88,410 वेळा वाचले गेले
सचिन तेंडुलकर (जन्म: 1973) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2009 मध्ये त्याने कारकीर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक मराठी व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मराठी विकिपीडियावर मोठ्या संख्येने माहिती वाचली जाते. तो मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय हयात व्यक्ती” म्हणून मान्यता पावलेला आहे. मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये त्याची रँक 8व्या वरून घसरून 11व्या स्थानावर गेली होती.
Famous Sports personalities of Maharashtra
7. ज्ञानेश्वर
89,857 वेळा वाचले गेले
संत ज्ञानेश्वर (1275 – 1296) हे मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी संत आहेत. ते या वर्षीचे “सर्वात लोकप्रिय संत” ठरले आहेत, एरवी नंतरच्या सर्व वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची संत तुकारामांच्या नंतरच आलेली आहे. तसेच ते यावर्षीचे “सर्वात लोकप्रिय जुनी व्यक्ती” ठरले आहेत (त्यांच्या काळातील किंवा त्यांच्या आधीच्या कालखंडातील एकही व्यक्ती या सूचीत समाविष्ट नाही). त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. यामुळे ते 2016 ते 2020 या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढील वर्ष 2017 मध्ये त्याची रँक 7 वरून 12व्या स्थानावर गेली होती.
famous people of Maharashtra
6. महात्मा फुले
92,372 वेळा वाचले गेले
महात्मा जोतीराव फुले (1827 – 1890) हे मराठी लेखक, शिक्षक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. फुले हे सुद्धा एक लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात येते. सर्व वर्षांमध्ये (2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांचा लेख 7व्या स्थानावर आला होता. सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले हे एकमेव असे दांपत्य आहे की, या दोघांचाही समावेश मराठी विकिपीडियाच्या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय लेखांमध्ये झालेला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती
1,25,227 वेळा वाचले गेले
बाळ गंगाधर टिळक (1856 – 1920) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य टिळक असाही त्यांचा उल्लेख केला जातो. टिळक हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय असून मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे. मराठी विकीपीडियावरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे. पुढील वर्ष 2017 मध्ये त्याची रँक 5 वरून 9व्या स्थानावर गेली होती.
freedom fighters of maharashtra
famous people of Maharashtra
1,44,806 वेळा वाचले गेले
मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी हे मराठी किंवा महाराष्ट्रीय व्यक्ती नाहीत, तर ते एक गुजराती आहेत. मात्र तरीही ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरलेले आहेत. 2016 ते 2020 या सर्व वर्षांमध्ये ते मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-20 लेखांमध्ये कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत. त्यांची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज वगळता अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा ते जास्त लोकप्रिय आहेत, इतके जास्त वेळा गांधींना मराठी विकिवर वाचले गेले आहे. 2017 मध्ये त्याची रँक 4 वरून 3ऱ्या स्थानावर गेली होती.
Famous Personalities of Maharashtra
थोर समाज सुधारक मराठी
1,62,778 वेळा वाचले गेले
ए.पी.जे अब्दुल कलाम (1931 – 2015) भारताचे 11वे राष्ट्रपती व एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना “मिसाईल मॅन” असेही म्हणतात. त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे एक तमिळ व्यक्ती, मात्र ते मराठी लोकांमध्येही खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते अलीकडील काळातील व्यक्ती होते. त्यांचा मराठी विकिपीडियाच्या प्रत्येक वर्षीच्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समावेश झाला होता. त्यातही ते सदैव पहिल्या दहा मध्येच राहिले. गांधींनंतर डॉ. कलाम हे यावर्षीचे महाराष्ट्रातील “ सर्वात लोकप्रिय अमहाराष्ट्रीय व्यक्ती” ठरले आहेत. 2017 मध्ये त्याची रँक 3 वरून 4थ्या स्थानावर आली होती.
Great personalities of Maharashtra
famous people of Maharashtra
1,86,689 वेळा वाचले गेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. ते एक मराठी म्हणून अन्य भाषिक विकिपीडियांवरही त्यांची सर्वात जास्त लोकप्रियता आहे. 2016 ते 2020 या वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान कधी दुसरे तर कधी पहिलेच राहिले आहे. शिवाजी महाराज वगळता ते मराठी विकिपीडियावरील अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरले आहेत. बाबासाहेब हे मराठी विकिपीडिया वरील “सर्वाधिक लोकप्रिय समाजसुधारक” तसेच “सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी” व विसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ठरले आहेत. पुढील वर्षी 2017 मध्ये ते शिवाजी महाराजांना मागे टाकत प्रथम स्थानावर आले होते.
Who is hero of Maharashtra?
1,92,811 वेळा वाचले गेले
छत्रपती शिवाजी महाराज (1630 – 1680) हे एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून आपले स्वराज्य स्थापन केले. त्यांनी वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांचा चरित्रलेख हासुद्धा 2016 ते 2020 या वर्षांमध्ये कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर होता. त्यांची लोकप्रियता अफाट असून ते 5 पैकी 4 वर्षांमध्ये प्रथम स्थानावर होते. सतराव्या शतकातील हा शासक एकविसाव्या शतकामध्ये ही अव्वल ठरला आहे. 2017 मध्ये ते द्वितीय स्थानी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथम स्थानी राहिले होते.
Who are the famous personalities of Maharashtra?
हेही वाचलंत का?
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- 2021 (जानेवारी ते जून) मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय 20 व्यक्ती
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2019 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2018 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2017 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2016 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2015 (जुलै ते डिसेंबर) मधील महाराष्ट्रातील Top-20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
- 2016 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2017 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2018 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2019 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- भारत की मशहूर बौद्ध हस्तियां (अभिनेता & गायक) | List of Buddhist Celebrities in India
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख है ‘बी. आर. आंबेडकर”; तथा मराठी विकिपीडिया में ‘शिवाजी महाराज’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- १३०व्या जयंतीच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३० प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- अन्य लेख वाचा
टीप
या सूचित नसलेल्या इतर उल्लेखनीय चरित्रलेखाच्या views आणि rank बद्दल जाणून घेऊ इच्छित असाल तर आपण आम्हाला विचारू शकता.