भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या यांच्यावर तीन महापुरुषांवर प्रभाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन राष्ट्रपुरुष द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्त्रोत आहेत.
द्रौपदी मुर्मू यांनी 25 जुलै 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती ठरल्या.द्रौपदी मुर्मू यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक शालेय शिक्षिका म्हणून झाली. पुढे त्या राजकीय क्षेत्रात आल्या आणि ओडिसाच्या आमदार, ओडिसाच्या मंत्री आणि झारखंडच्या राज्यपाल अशा राजकीय पदांवर त्यांनी काम केले. त्यानंतरच त्यांचा सर्वात महत्त्वाचा राजकीय टप्पा म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणं.
ज्या महामानवांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपले प्रेरणास्थान मानले, त्या व्यक्ती आहेत – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. या तीन व्यक्तींनी मुर्मू यांना सर्वात जास्त प्रभावित केले आहे. यापूर्वीचे बरेच भारतीय राष्ट्रपती सुद्धा या तीन महापुरुषांपासून प्रभावित झालेले आपल्याला आढळून येतात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्त्रोत
या तीन महापुरुषांना राष्ट्रपती महोदय आपले प्रेरणास्त्रोत का मानतात, हे आपण या लेखामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाविष्ट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दीन-दलितांचे व शोषितांचे थोर उद्धारक आहेत तसेच ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते सुद्धा आहेत. त्यांचे शोषितांसाठीचे कार्य आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, अतुलनीय आहे. या काही प्रमुख बाबींमुळे द्रौपदी मुर्मू बाबासाहेबांपासून प्रभावीत झालेल्या आहेत. आंबेडकर हे दलितांचे नेते तर मुर्मू ह्या आदिवासी नेत्या, हे दोघेही तळागाळातील समाजातून वर येतात आणि देशाच्या सर्वोच्च स्थानांवर विराजमान होतात. राष्ट्रपती बनण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद देखील घेतला होता.
महात्मा गांधी
महात्मा गांधीं हे सुद्धा द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्थान आहेत. गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सत्याचा संदेश दिला आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अहिंसाचा मार्ग अवलंबला. शिवाय त्यांची वैश्विक ओळख किंवा लोकप्रियता प्रचंड आहे. यासारख्या अनेक गोष्टी राष्ट्रपती महोदयांना भावल्या आणि महात्मा गांधी हे त्यांचे एक प्रेरणास्त्रोत बनले. राष्ट्रपतींनी राष्ट्रपती बनण्यापूर्वी गांधीजींना सुद्धा अभिवादन केले होते.
जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यता चळवळीत प्रमुख नेते आणि भारताचे पहिले प्रधानमंत्री होते. त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला आणि अनेक महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना देशात राबवल्या. नेहरूंना भाजप पक्षातील राजकारणी लोकांकडून अनेकदा टीका सहन करावी लागते. तथापि, मुर्मु त्यापैकी नाहीत. राष्ट्रपतींना पंडित नेहरू आवडतात, त्या पंडित नेहरूंचे देशासाठीचे योगदान नाकारत नाहीत. त्यांचे विचार आणि कार्य यांमुळे राष्ट्रपती त्यांच्यावर प्रभावित झालेल्या आहेत.
अशाप्रकारे महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू ही भारतीय इतिहासातील अतिशय दिग्गज व्यक्तिमत्त्वे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्थान आहेत.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि पंतप्रधान
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)