द. आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती आणि कृष्णवर्णीयांचे नेते नेल्सन मंडेला यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि अस्पृश्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. एक शोषितांचा नेता दुसऱ्या शोषितांच्या नेत्याबद्दल काय म्हणतो किंवा एक भारतरत्न दुसऱ्या भारतरत्नाबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेणे खरोखर महत्त्वपूर्ण आहे. – Nelson Mandela on Babasaheb Ambedkar
Nelson Mandela on Dr Ambedkar
दक्षिण आफ्रिकेचे नेते डॉ. नेल्सन मंडेला (1918-2013) यांनी कृष्णवर्णीयांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना जगभरात ओळखले जाते आणि त्यांच्या योगदानाचेही कौतुक केले जाते. ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत.
डॉ. आंबेडकर आणि मंडेला यांच्यात अनेक साम्य आहेत, त्यांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार आणि इतर अनेक बाबतीत दोघांमध्ये साम्य आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि अस्पृश्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नेल्सन मंडेला काय म्हणाले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
- मराठी बौद्ध कलाकारांची यादी
- गौतम बुद्धांबद्दल स्वामी विवेकानंदांचे विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विचार
Nelson Mandela on Dr Babasaheb Ambedkar
1990 मध्ये व्हीपी सिंग सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला या दोघांनाही ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले. याशिवाय मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे.
आंबेडकर आणि मंडेला दोघेही शांतता आणि अहिंसेच्या बाजूने होते. मंडेला यांना कधी महात्मा गांधी तर कधी जवाहरलाल नेहरूंकडून प्रेरणा मिळाली होती, असे सांगण्यात येते. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून आणि त्यांच्या संघर्षातूनही त्यांना प्रेरणा मिळाली होती, हेही खरे आहे.
पण त्यांनी ज्या पद्धतीने गांधींना वाचले आणि ओळखले तसे त्यांनी डॉ. आंबेडकरांना वाचले नाही! मंडेला यांना डॉ. आंबेडकर वाचायला वेळ मिळाला असता, तर मला खात्री आहे की त्यांनी आंबेडकरांच्या प्रदीर्घ संघर्षाचे कौतुक केले असतेच, पण यापुढे जाऊन ते जाहिरपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सुद्धा बनले असते.
मंडेला यांचे डॉ. आंबेडकरांबद्दलचे विचार
Quote 1 :
12 एप्रिल 1990 रोजी नवी दिल्ली येथील भारतीय संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण होत असताना नेल्सन मंडेला यांनी म्हटले होते की,
“आम्ही डॉ. आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवू ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.”
“We will take inspiration from the life and work of Dr. Ambedkar and run our struggle on the basis on which Dr. Ambedkar tried to change the society in India and got success.” – Dr. Nelson Mandela
While the Dr. Ambedkar’s portrait was being unveiled in the Central Hall of the Indian Parliament, New Delhi (12 April 1990)
Quote 2 :
याशिवाय नेल्सन मंडेला यांनी आपल्या देशाची राज्यघटना भारतीय राज्यघटनेपासून प्रेरित असल्याचे वर्णन केले आणि डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्मिती आणि सामाजिक न्याय आणि दीनदलितांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाचेही कौतुक केले.
मंडेला म्हणाले की,
“भारतीय राज्यघटना दक्षिण आफ्रिकेच्या नवीन राज्यघटनेसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. आम्हाला आशा आहे की भारताच्या या महान सुपुत्राचे विचार आणि कार्य आम्हाला आमची राज्यघटना बनवण्यात मार्गदर्शक ठरतील. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने केलेले ऐतिहासिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात एक ॠणानुबंध निर्माण झाला आहे. कारण दोघेही एकसारख्या अन्यायाचे बळी आहेत. भारतातील शोषित वर्गाच्या मसिहाची जन्मशताब्दी साजरी करणार्या भारतीय समितीच्या सदस्यांसोबत आम्हाला सहवास लाभला ही आमच्यासाठी खूप आनंदाची घटना आहे.”
“The Indian Constitution provides inspiration in preparation of a new South African Constitution. We hope that our efforts in formulation of a new constitution will reflect the work and ideas of this great son of India. Dr. Ambedkar’s contribution to social justice and to the upliftment of the oppressed is worthy of emulation.” – Dr. Nelson Mandela
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- मुझे डॉ. बाबासाहेब आंबेडकर से बहुत प्रेरणा मिली है – आमिर खान
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगतील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)