डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ (Dr. Babasaheb Ambedkar : The Untold Truth) हा 2000 मधील डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी साकारलेली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी खेरीज मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती अशा अनेक भाषांत डब झालेला आहे. – dr babasaheb ambedkar film in marathi
आता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – The Untold Truth’ मराठी चित्रपट तुम्हाला सहज बघता येईल
YouTube वर या चित्रपटाची इंग्लिश, हिंदी आणि तमिळ आवृत्ती उपलब्ध आहे, परंतु तेथे मोठ्या कालावधीपासून मराठी आवृत्ती उपलब्ध नव्हती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त 14 एप्रिल 2021 रोजी सर्वप्रथम डीडी सह्याद्रीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाची मराठी आवृत्ती आपल्या युट्युब चॅनलवर प्रकाशित केली होती. (मात्र काही दिवसांनी हा चित्रपट युट्युब चॅनलवरुन काढण्यात आला)
या link वर जाऊन आपण हा चित्रपट बघू शकत होता. पहिल्यांदाच जब्बार पटेल दिग्दर्शित बाबासाहेबांचा मराठी चित्रपट (Dr Babasaheb Ambedkar film in Marathi) आपल्याला युट्युबवर बघायला मिळेल.
खरं तर हा चित्रपट 1998 मध्येच तयार झाला होता. परंतु त्याचे प्रकाशन सन 2000 मध्ये झाले. त्यानंतर त्याची हिंदी आवृत्तीही निघाली, आणि 2002 मध्ये या चित्रपटाची मराठी आवृत्ती प्रसिद्ध झाली, तथापि विविध भाषांमधील हा चित्रपट केवळ सरकारी चैनल वरच दिसला आहे.
बाबासाहेबांच्या चित्रपटाचे मूळ नाव “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ” असे आहे, म्हणजेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : न सांगितलेले सत्य“.
हे सुद्धा बघा : आंबेडकर जयंती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर बनी हैं 10 से भी अधिक फिल्में
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यांतील सिनेमागृहांत प्रसिद्ध झाला होता. महाराष्ट्र आणि गुजरात खेरीज भारतातील अन्य कुठल्याही राज्यातील सिनेमागृहांत हा चित्रपट प्रकाशित झालेल्या नाही.
भारतात आज शेकडो-हजारोंच्या संख्येनी चित्रपटांचे चॅनल्स उपलब्ध आहेत. परंतु भारत सरकार आणि अन्य घटक राज्ये यांच्या सरकारी चॅनल खेरीज अन्य कुठलेही खाजगी चित्रपट चॅनल व बाबासाहेबांचा चित्रपट प्रकाशित करीत नाही. बाबासाहेबांच्या जयंती दिनी, महापरिनिर्वाण दिनी, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी, संविधान दिवस या दिवशी सुद्धा चित्रपट प्रकाशित केले जात नाहीत.
dr babasaheb ambedkar film in marathi
Movie marathi dubb asel tr plz share kara