जगातील जवळपास सर्व देशांमध्ये बौद्ध अनुयायी आढळतात. जगातील 18 असे देश व गणराज्य आहेत ज्यांची बहुसंख्य लोकसंख्या बौद्ध आहे. या लेखामध्ये आपण जगातील 10 सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना बौद्ध जगात (Buddhist world) महत्त्वाचे स्थान आहे. – most populous buddhist countries
Most populous Buddhist countries – Top 10 Countries with Highest Buddhist Population
बौद्ध धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म असून त्याचा उगम मगध (आता बिहारमध्ये) या प्राचीन राज्यामध्ये आणि त्याच्या आसपास झाला आहे. बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे, ज्यांना “बुद्ध” (जागृत मनुष्य) म्हणून ओळखले जाते. बुद्धांच्या हयातीतच बौद्ध धर्म मगधच्या बाहेर दूरवर पसरला. आज 2021 मध्ये, जगातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या 1.73 अब्ज ते 2 अब्ज (22% – 25%) इतकी आहे. यातील बहुसंख्य अनुयायी महायान बौद्ध पंथाचे आहेत आणि इतर थेरवाद व अन्य पंथाचे आहेत. – most populous buddhist countries
लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धम्म हा जगातील “दुसरा” किंवा “तिसरा” सर्वात मोठा धर्म आहे. तथापि, अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात, 2010 मध्ये, जगातील बौद्धांची संख्या केवळ 52 कोटी किंवा 7% इतकी सांगितली होती. यामुळे बौद्ध धर्माला “चौथा” सर्वात मोठा धर्म सांगण्यात आले आहे. या अहवालामध्ये चीन, जपान, व्हिएतनाम यासारख्या अनेक देशांमधील बौद्धांची संख्या ही वास्तविक संख्येच्या तुलनेत किंवा सरकारी आकडेवारीच्या तुलनेत खूप कमी दाखवण्यात आली होती!
जगातील जवळपास सर्व देशांमध्ये बौद्ध अनुयायी आढळतात. जगातील 18 असे देश व गणराज्य आहेत ज्यांची बहुसंख्य लोकसंख्या बौद्ध आहे. या लेखामध्ये आपण जगातील 10 सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल (most populous buddhist countries) जाणून घेणार आहोत. या टॉप 10 देशांची यादी दया हेवापाथीरने यांच्या अभ्यासाच्या आकडेवारीनुसार बनवली आहे.
टीप: मोबाईल धारकांनी खालील तक्ता desktop view मधून बघितल्यास उत्तम दिसेल.
Rank | देश | बौद्ध लोकसंख्या (2021) | देशातील बौद्धांचे प्रमाण (%) | जगातील बौद्ध लोकसंख्येतील प्रमाण (%) |
1 | चीन | 1,15,00,00,000 | 80% | 66% |
2 | जपान | 12,10,00,000 | 96% | 7% |
3 | व्हिएतनाम | 7,37,00,000 | 75% | 4% |
4 | थायलंड | 6,65,00,000 | 95% | 4% |
5 | म्यानमार | 5,00,00,000 | 90% | 3% |
6 | भारत | 4,18,00,000 | 3% | 3% |
7 | दक्षिण कोरिया | 2,57,00,000 | 50% | 2% |
8 | तैवान | 2,18,00,000 | 93% | 1% |
9 | कंबोडिया | 1,67,00,000 | 98% | 1% |
10 | श्रीलंका | 1,57,00,000 | 70% | 1% |
एकूण | 1,58,00,00,000 | 91% | ||
जगातील उर्वरित बौद्ध | 15,00,00,000 | 9% | ||
जगातील एकूण बौद्ध | 1,73,00,00,000 | 100% |
जगातील 10 सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश (Top 10 Largest Buddhist Populations in the World)
#1 चीन (72 – 115 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : People’s Republic of China
- क्षेत्रफळ : 95,96,961 चौरस किलोमीटर
- लोकसंख्या : 1.44 अब्ज
- बौद्ध लोकसंख्या : 72 कोटी – 1.15 अब्ज (50-80%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : महायान बौद्ध धर्म
चीन हा पूर्व आशियातील एक देश आहे. 1.4 अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्येसह, हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. चीनमधील 50% ते 80% रहिवासी बौद्ध आहेत. अशा प्रकारे बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या बाबतीत चीन जगातील #1 बौद्ध लोकसंख्या बनला आहे.
बौद्ध धर्म हान राजवंशाच्या काळात सुमारे 2,000 वर्षांपूर्वी भारतातून पहिल्यांदा चीनमध्ये आला होता आणि तो चीनी जनजीवनात अत्यंत लोकप्रिय झाला. बौद्ध धर्म हा चीनमधील सर्वात संघटित धर्म आहे आणि आज चीनमध्ये संपूर्ण जगात बौद्ध अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे.
चीनमध्ये महायान बौद्ध धर्म प्रचलित आहे. अनेक चिनी लोक ताओ आणि बौद्ध हे दोन्ही धर्म एकत्र पाळतात. लोकसंख्या आणि आकारमानाच्या बाबतीत चीन हा जगातील सर्वात मोठा बौद्ध देश आहे.
Countries with Highest Buddhist Population – जगातील (1.7 अब्ज किंवा 173 कोटी) एकूण बौद्ध लोकसंख्येमध्ये चीनचा वाटा 66% आहे. बौद्धांची सर्वाधिक संख्या चीनच्या 3 स्वायत्त प्रांतांमध्ये सुद्धा आहे – हाँगकाँग (67-91%), मकाऊ (80%), आणि तिबेट (80-90%).
चीनमध्ये जवळपास सर्वच धर्मांचे अनुयायी आहेत. बौद्ध, ताओ, ख्रिश्चन आणि इस्लाम हे येथील चार मुख्य धर्म आहेत. चीनमध्ये हिंदू धर्मीय सुद्धा आहेत. चीनमधील चिनी बौद्ध धर्माचा चिनी स्थानिक धर्मांवर (Chinese folk religions) प्रभाव आहे, त्यामुळे बहुतेक चीनमधील नागरिक चिनी लोक धर्मांसोबतच चिनी बौद्ध धर्माचेही (Chinese Buddhism) पालन करतात.
एका सर्वेक्षणानुसार चीनची 50 ते 80 टक्के लोकसंख्या किंवा 72 कोटी ते 1.15 अब्ज लोक बौद्ध आहेत तर ताओ केवळ 30 टक्के किंवा फक्त 43 कोटी आहेत. बहुतांश चिनी लोक हे दोन्ही धर्मांचे पालन करत असल्याने, या आकडेवारीमध्ये दोन्हीचा समावेश असू शकतो (50% बौद्ध आणि 30% ताओ).
तथापि, प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज आहे की चीनच्या लोकसंख्येपैकी केवळ 18.2% किंवा 25.60 कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत; आणि या अंदाजामुळे जगातील बौद्ध लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट आल्याचे पाहिले जाऊ शकते. बौद्ध धर्माला चीनी सरकारकडून स्पष्ट पाठिंबा मिळतो. चीनमधील बौद्ध धर्माशी संबंधित सर्व पर्वतांवरील खोदकामावर बंदी घालण्यात आली आहे.
लेनिन आणि माओ यांच्या काळात धार्मिक श्रद्धा आणि त्यांचे पालन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. सर्व धार्मिक स्थळे (विहारे-मंदिरे, पॅगोडा, मशिदी आणि चर्च) अधार्मिक इमारतींमध्ये रूपांतरित करण्यात आली. 1970च्या उत्तरार्धात लोकांना धर्म पाळण्याची परवानगी दिली जाऊ लागली. 1990 पासून, संपूर्ण चीनमध्ये बौद्ध आणि ताओ मंदिरांच्या पुनर्बांधणीचा एक मोठा कार्यक्रम सुरू झाला. 2007 मध्ये, नागरिकांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणून धर्माला मान्यता देण्यासंदर्भात चीनी राज्यघटनेत एक नवीन कलम जोडण्यात आले.
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन आणि हू जिंताओ यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. बौद्ध धर्माच्या प्रचारातून शांतताप्रिय राज्याची प्रतिमा निर्माण होते, असे त्यांना वाटले. यातून CCP अर्थात चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या सुसंवादी समाजाचे ध्येय पूर्ण होण्यास मदत मिळते, तसेच तैवानशी संबंध सुधारण्यासही मदत होते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतरही चीनी सरकारने बौद्ध धर्माचा प्रचार केला. शी जिनपिंग यांनी जाहीरपणे बौद्ध धर्म, कन्फ्युशियनवाद आणि ताओवाद यांमुळे देशाच्या नैतिक अधःपतनावर नियंत्रण राहिल्याचे सांगितले आहे. [संदर्भ]
#2 जपान (12.10 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Nippon-koku
- क्षेत्रफळ : 3,77,975 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 12.60 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 8.40 कोटी – 12.10 कोटी (67% – 96%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : महायान बौद्ध धर्म
जपान हा पूर्व आशियातील एक देश आहे, जो वायव्य प्रशांत महासागरात स्थित आहे. 90 ते 121 दशलक्ष बौद्धांसह जपानमध्ये चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची बौद्ध लोकसंख्या आहे. जपानमध्ये इसवी सनाच्या 6व्या शतकापासून बौद्ध धर्म अनुसरला जात आहे. जपानी बौद्ध धर्माने (Japanese Buddhism) अनेक नवीन बौद्ध पंथांना जन्म दिला आहे. जपानी समाज आणि संस्कृतीवर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव पडला आहे आणि आजही तो प्रभावशाली पैलू आहे.
जपानमध्येही महायान बौद्ध धर्म प्रचलित आहे. काही अहवालांनुसार, जपानची 96% (12.01 कोटी) लोकसंख्या बौद्ध आहे. दुसऱ्या एका अहवालात 84% अर्थात 10 कोटी जपनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. जपान सरकारच्या सांस्कृतिक व्यवहार एजन्सीच्या 2015 च्या आकडेवारीनुसार, जपानी लोकसंख्येपैकी 69.8% (9 कोटी) लोक बौद्ध आहेत. जपानी सरकारच्या सांस्कृतिक व्यवहार एजन्सीच्या अंदाजानुसार, 2018 च्या अखेरीस, जपानमधील सुमारे 8.40 कोटी लोक किंवा जपानी लोकसंख्येपैकी सुमारे 67% बौद्ध आहेत. तथापि, प्यू रिसर्च सेंटरचा 2010 मध्ये अंदाज आहे की, जपानची 36.2% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे.
#3 व्हिएतनाम (7.37 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Socialist Republic of Vietnam
- क्षेत्रफळ : 3,31,699 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 9.83 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 7.37 – 7.86 कोटी (75 – 80%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : महायान बौद्ध धर्म
बौद्ध धर्म व्हिएतनाममधील 75 – 80% लोकांद्वारे पाळला जातो, जो मुख्यतः महायान परंपरेचा आणि देशाचा मुख्य धर्म आहे. बौद्ध धर्म पहिल्यांदा भारतीय उपखंडातून इ.स.पू. 3र्या किंवा 2र्या शतकात किंवा चीनमधून इ.स.पू. 1ल्या किंवा 2र्या शतकात व्हिएतनाममध्ये आला होता.
Đinh dynasty – दिन राजवंश (968-980) दरम्यान, बौद्ध धर्माला राज्याने अधिकृत धर्म (~971) म्हणून मान्यता दिली होती, जो व्हिएतनामी राजांचा बौद्ध धर्माला दिलेला उच्च सन्मान दर्शवितो. ली राजवंश (1009-1225) दरम्यान व्हिएतनामी बौद्ध धर्म त्याच्या शिखरावर पोहोचला, त्याची सुरुवात संस्थापक ली थाई तू पासून झाली. ले घराण्याच्या काळात सर्व राजांनी बौद्ध धर्म हा राज्यधर्म म्हणून स्वीकारला, आणि हे ट्रॉन राजवंश (1225-1400) मध्ये टिकून राहिले.
आज, संपूर्ण व्हिएतनाममध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बौद्ध आढळतात. बौद्ध धर्म हा व्हिएतनाममधील एकमेव सर्वात मोठा संघटित धर्म आहे, ज्यात 75% लोक बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. काहींनी असा युक्तिवाद केला की संख्या नोंदवलेल्यापेक्षा जास्त आहे, कारण अनेकांनी स्वतःला नास्तिक घोषित केले परंतु ते बौद्ध कार्यात भाग घेतात. काही सर्वेक्षणे दर्शवतात की व्हिएतनामच्या लोकसंख्येत 75% ते 85% (7.37 – 8.36 कोटी) बौद्ध आहेत. सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये (most populous buddhist countries) व्हिएतनामचा तिसरा क्रमांक लागतो.
व्हिएतनामचा कम्युनिस्ट पक्ष अधिकृतपणे निरीश्वरवादाचा प्रचार करत असला तरी, तो सामान्यतः बौद्ध धर्माच्या बाजूने आहे, कारण बौद्ध धर्म हा व्हिएतनामच्या दीर्घ इतिहासाशी संबंधित आहे. शिवाय, बौद्ध आणि सरकार यांच्यात क्वचितच वाद झाले; कम्युनिस्ट सरकारही बौद्ध धर्माकडे व्हिएतनामी देशभक्तीचे प्रतीक म्हणून पाहते. बौद्ध सणांना अधिकृतपणे सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते आणि याच्या विपरीत ख्रिश्चन, मुस्लिम आणि इतर धार्मिक सणांना काही निर्बंध आहेत.
#4 थायलंड (6.65 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Kingdom of Thailand
- क्षेत्रफळ : 5,13,120 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 7 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 6.65 कोटी (95%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : थेरवाद बौद्ध धर्म
थायलंड हा आग्नेय आशियातील एक देश आहे, ज्याच्या लोकसंख्येपैकी सुमारे 95 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. सुमारे 66.5 दशलक्ष बौद्धांसह, थायलंडमध्ये चीन, जपान आणि व्हिएतनाम नंतर जगातील चौथ्या क्रमांकाची बौद्ध लोकसंख्या आहे. या देशात बौद्ध धर्मातील थेरवाद पंथाचा प्रभाव आहे.
थायलंडमधील बौद्ध धर्म देखील लोक धर्मांसोबतच (Thai folk religions) मोठ्या थाई चिनी लोकसंख्येच्या चिनी धर्मांशी (chinese folk religions) एकरूप झाला आहे. थायलंडमधील बौद्ध मंदिरे उंच सोनेरी स्तूप वैशिष्ट्यीकृत आहेत आणि थायलंडची बौद्ध वास्तुकला इतर दक्षिणपूर्व आशियाई देशांसारखीच आहे, विशेषत: कंबोडिया आणि लाओस, ज्यासह थायलंड सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सामायिक करतो.
थायलंडमध्ये बौद्ध धर्माचे आगमन भारतीय सम्राट अशोकांच्या काळात ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात झाल्याचे मानले जाते. तेव्हापासून, थाई संस्कृती आणि थाई समाजात बौद्ध धर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बौद्ध धर्म आणि थाई राजेशाही हे अनेकदा एकमेकांशी जोडले गेले आहेत, थाई राजांना ऐतिहासिकदृष्ट्या थायलंडमधील बौद्ध धर्माचे मुख्य संरक्षक म्हणून पाहिले जाते.
थाई बौद्ध धर्म प्रत्येक थाई व्यक्तीसाठी तत्कालिक समन्वयावर भर देण्यासाठी आणि थाई राज्य आणि थाई संस्कृतीशी घनिष्ठ संबंध म्हणून ओळखला जातो. थाई बौद्ध धर्माच्या दोन अधिकृत शाखा किंवा निकाय (संस्था) आहेत – शाही समर्थित ‘धम्मयुत्तिका निकाय‘ आणि मोठी ‘महानिकाय’.
#5 म्यानमार (5 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Republic of the Union of Myanmar
- क्षेत्रफळ : 6,76,578 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 5.50 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 5 कोटी (90%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : थेरवाद बौद्ध धर्म
म्यानमार (बर्मा किंवा ब्रह्मदेश) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. बौद्ध धर्म हा म्यानमारचा अधिकृत धर्म आहे. म्यानमारच्या लोकसंख्येपैकी सुमारे 90% लोक बौद्ध आहेत, जे मुख्यतः थेरवाद परंपरेचे आहेत. लोकसंख्येतील बौद्ध भिक्खूंचे प्रमाण आणि धर्मावर खर्च केलेल्या उत्पन्नाच्या बाबतीत हा सर्वात धार्मिक बौद्ध देश आहे.
म्यानमारमधील बौद्ध धर्माचा प्रारंभिक इतिहास समजणे थोडे कठीण आहे. पाली इतिहासलेखनात असे म्हटले आहे की, चक्रवर्ती सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माच्या प्रसाराचा एक भाग म्हणून सोना और उत्तरा या दोन भिक्षूंना इ.स.पू. 228च्या आसपास इतर भिक्षू आणि पवित्र ग्रंथांसह “सुवर्णभूमी” येथे पाठवले. हा प्रदेश प्राचीन आग्नेय आशियातील खालच्या म्यानमारमधील थाटन किंवा थायलंडमधील नाकोन पाथोम येथे असल्याचे मानले जाते.
म्यानमारची संस्कृती बौद्ध धर्माशी अविभाज्य आहे. अनेक बर्मी पारंपारिक उत्सव वर्षभर होतात आणि त्यापैकी बहुतांश बौद्ध धर्माशी संबंधित असतात. जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये (Top 10 Largest Buddhist Populations In The World) म्यानमार पाचव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेल्या देश (most populous buddhist countries)
#6 भारत (4.18 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Republic of India
- क्षेत्रफळ : 32,87,263 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 1.45 अब्ज
- बौद्ध लोकसंख्या : 1 कोटी – 4.18 कोटी – 7 कोटी (1% – 3% – 5%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : नवयान बौद्ध धर्म
भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे. क्षेत्रफळानुसार हा सातवा सर्वात मोठा देश आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश तसेच सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. भारत ही “बुद्ध भूमी” आहे कारण येथेच बुद्ध आणि बौद्ध धर्माचा जन्म झाला. बौद्ध धर्माची सुरुवात सुमारे 2600 वर्षांपूर्वी भारतात झाली आणि अल्पावधीतच हा धर्म जगाच्या अनेक भागांमध्ये पसरला.
बौद्ध धर्म हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे, ज्याचा उगम मगध (आताचे बिहार) या प्राचीन राज्यामध्ये झाला आहे आणि तो गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे. बुद्धाच्या हयातीत बौद्ध धर्म मगधच्या पलीकडे दूरपर्यंत पसरला होता. अनेक शतके, भारत एक ‘बौद्ध राष्ट्र’ होता, म्हणजेच तेव्हा बौद्ध धर्म हा भारतातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठा धर्म होता. मात्र, आज या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि बौद्ध अल्पसंख्य राहिले आहेत.
चक्रवर्ती सम्राट अशोकासह काही भारतीय राजांनी बौद्ध धर्माचे समर्थन केले आणि त्याला देशाचा ‘राज्यधर्म’ किंवा ‘अधिकृत धर्म’ बनवले. 12व्या ते 13व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा भारतातील प्रमुख धर्म होता, त्यानंतर काही हिमालयीन प्रदेश आणि पूर्वेकडील राज्ये वगळता भारतातील इतर राज्यांमध्ये बौद्ध धर्म अल्पसंख्याकांमध्ये आला.
1956 मध्ये जगाच्या बौद्ध इतिहासात एक महान क्रांती घडली, ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर आणि चंद्रपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 11 लाख अनुयायांना बौद्ध बनवले आणि आजही हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांच्या मार्गावर दरवर्षी कितीतरी लोक बौद्ध होत आहेत. भारतीय बौद्ध लोकसंख्येपैकी 90-95% पेक्षा जास्त आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यापैकी बहुतेक ‘अनुसूचित जाती’चे आहेत.
एक अहवालानुसार, भारतात 3% पेक्षा जास्त बौद्ध आहेत, ज्यांची लोकसंख्या 4 कोटीपेक्षा अधिक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2021 च्या लोकसंख्येकडे पाहता, भारतात 1% किंवा 1 कोटीहून अधिक बौद्ध आहेत. तथापि, इतर काही दाव्यांनुसार, देशात 6 ते 7 कोटी बौद्ध (5% – 5.5%) आहेत, तर काही बौद्ध विचारवंतांनी भारतात 10 कोटी बौद्ध असल्याचा दावा केला आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी 2025 पर्यंत भारतात 10 कोटी ‘अधिकृत बौद्ध’ बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ ऐवजी ‘बौद्ध’ असे लिहिण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष एम. व्यंकटस्वामी आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही असेच ध्येय समोर ठेवले आहे.
#7 दक्षिण कोरिया (2.57 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Republic of Korea
- क्षेत्रफळ : 1,00,363 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 5.13 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 2.57 कोटी (50%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : महायान बौद्ध धर्म
दक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे, जो कोरियन द्वीपकल्पाचा दक्षिण भाग आहे आणि उत्तर कोरियाशी जमीन सीमा सामायिक करतो. तीन राज्यांच्या काळात (372 किंवा चौथे शतक) बौद्ध धर्म चीनमधून कोरियात दाखल झाला.
उत्तर-दक्षिण राज्यांच्या काळात (698-926) आणि नंतरच्या गोरीयो (918-1392) राज्यांमध्ये बौद्ध धर्माचा मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव होता. तथापि, नंतरच्या जोसेन साम्राज्यात (1392-1910) कोरियन कन्फ्युशियनवाद राज्याचा धर्म म्हणून स्थापित झाला आणि कोरियन बौद्ध धर्म पुढील 500 वर्षांसाठी दडपला गेला. कोरियन बौद्ध धर्मात सुद्धा अनेक पंथ आहेत.
कोरियामधील वोन बौद्ध धर्म (Won Buddhism) हा एक आधुनिक सुधारित बौद्ध धर्म आहे जो सर्वांसाठी ज्ञानप्राप्ती शक्य व्हावा आणि नियमित जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतो.
#8 तैवान (2.18 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Republic of China
- क्षेत्रफळ : 36,197 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 2.35 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 2.18 कोटी (93%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : महायान बौद्ध धर्म
तैवान हा पूर्व आशियातील एक देश आहे. याच्या वायव्येला चीन (पीआरसी) आणि ईशान्येला जपान आणि दक्षिणेला फिलीपिन्सच्या सागरी सीमा आहेत. बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म आहे. तैवानचे लोक प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन विचारधारा, स्थानिक प्रथा आणि ताओवादी परंपरा यांचे पालन करतात. बौद्ध आणि ताओवादी दोन्ही परंपरांमध्ये धार्मिक तज्ञांच्या भूमिका विशेष प्रसंगी महत्त्वाच्या असतात.
तैवानमधील सुमारे 93% लोक बौद्ध धर्माला मानणारे आहेत, ज्यांची लोकसंख्या सुमारे 2 कोटी 18 लाख इतकी आहे. Top 10 highest Buddhist population countries मध्ये तैवान 8व्या क्रमांकावर आहे. येथेही बहुतेक लोक बौद्ध आणि ताओ धर्म या दोन्ही धर्माचे एकत्रितपणे पालन करतात आणि दोन्ही विचारधारा पाळतात.
तथापि, तैवानच्या सरकारी आकडेवारीने बौद्ध धर्माला ताओवादापासून वेगळे केले आहे, दोन्हीसाठी अंदाजे समान लोकसंख्या सांगितली आहे. तैवानचे अनेक स्वयंघोषित “ताओवादी” प्रत्यक्षात बौद्ध धर्मावर आधारित चिनी पारंपारिक धर्माशी संबंधित पद्धतींचे पालन करतात. बौद्ध सुद्धा यिगुआंडाओ सारख्या स्थानिक धर्माचे अनुयायी असू शकतात, जे गुआनिन किंवा मैत्रेय सारख्या बौद्ध विभूतींवर जोर देतात आणि शाकाहाराचे समर्थन करतात.
डच वसाहतवादाच्या काळात फुजियान (Fujian) आणि ग्वांगडोंग (Guangdong) या चिनी प्रांतातील स्थायिकांनी बौद्ध धर्म तैवानमध्ये आणला होता. डच, ज्यांनी 1625 ते 1663 पर्यंत तैवानवर नियंत्रण ठेवले, त्यांनी बौद्ध धर्माला नाउमेद (discourage) केले, कारण त्या वेळी डच कायद्याद्वारे मूर्तिपूजा दंडनीय होती. 1662 मध्ये, कोक्सिंगाने (Koxinga) डचांना तैवानमधून हाकलून दिले. त्यांचा मुलगा झेंग जिंग (Zheng Jing) याने तैवानमधील पहिले बौद्ध मंदिर स्थापन केले. या काळात बौद्ध धर्माची प्रथा फार व्यापक नव्हती.
1683 मध्ये जेव्हा किंग राजघराण्याने तैवानचा ताबा घेतला तेव्हा फुजियान आणि ग्वांगडोंग प्रांतातून मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू तैवानमध्ये आले आणि विशेषत: बोधिसत्व गुआनिन समर्पित बौद्ध मंदिरे स्थापन केली, आणि अनेक भिन्न बौद्ध पंथाची भरभराट झाली. तथापि, मठातील बौद्ध धर्म 1800 च्या दशकापर्यंत तैवानमध्ये आला नाही.
#9 कंबोडिया (1.67 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Kingdom of Cambodia
- क्षेत्रफळ : 1,81,035 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 1.70 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 1.67 कोटी (98%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : थेरवाद बौद्ध धर्म
कंबोडिया हा दक्षिणपूर्व आशियातील इंडोचायनीज द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात वसलेला देश आहे, ज्याच्या वायव्येस थायलंड (#4), उत्तरेस लाओस, पूर्वेस व्हिएतनाम (#3) आणि नैऋत्येस थायलंडचे आखात आहे. नोम पेन्ह (Phnom Penh) ही देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.
थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडियाचा ‘अधिकृत धर्म’ किंवा ‘राज्य धर्म’ आहे आणि तो देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 98% लोक पाळतात. which country has the highest percentage of buddhist – कंबोडियामध्ये जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक बौद्धांचे प्रमाण (टक्केवारी) आहे. कंबोडियामध्ये किमान 5व्या शतकापासून बौद्ध धर्म अस्तित्वात आहे.
आपल्या सुरुवातीच्या काळात येथे महायान बौद्ध धर्म प्रचलित होता. मात्र सध्या, थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडियातील बौद्ध धर्माचा पंथ प्रचलित आहे. कंबोडियन संविधानात “थेरवाद बौद्ध धर्म” हा देशाचा अधिकृत धर्म (state religion) म्हणून समाविष्ट आहे. हा थेरवाद बौद्ध धर्म 13व्या शतकापासून (ख्मेर रूज कालावधी वगळता) कंबोडियाचा राज्य धर्म आहे.
#10 श्रीलंका (1.56 कोटी बौद्ध)
- अधिकृत नाव : Democratic Socialist Republic of Sri Lanka
- क्षेत्रफळ : 65,610 वर्ग किलोमीटर
- लोकसंख्या : 2.22 कोटी
- बौद्ध लोकसंख्या : 1.56 कोटी (70.2%)
- प्रभावशाली बौद्ध पंथ : थेरवाद बौद्ध धर्म
श्रीलंका हा दक्षिण आशियातील एक छोटासा देश आहे. तो हिंदी महासागरात, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येस आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेस स्थित आहे; यास मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनीने भारतीय उपखंडापासून वेगळे केले आहे.
बौद्ध धर्म हा श्रीलंकेचा सर्वात मोठा आणि ‘अधिकृत धर्म’ आहे, जो देशाच्या 70.19 टक्के लोकसंख्येद्वारे पाळला जातो. most populous buddhist countries मध्ये श्रीलंका हा देश 10व्या स्थानावर आहे. हा सुद्धा थेरवाद बौद्ध बहुसंख्य देश आहे.
श्रीलंका हा सर्वात प्राचीन पारंपारिक बौद्ध देशांपैकी एक आहे. श्रीलंकेच्या राज्यघटनेच्या कलम 9 अंतर्गत बौद्ध धर्माला एक प्रमुख स्थान दिले गेले आहे, ज्याला पूर्व-वसाहतिक कालखंडात बौद्ध धर्माची स्थिती पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाऊ शकते. श्रीलंकन बौद्ध धर्माचे अनुयायी बहुसंख्य असलेल्या सिंहली लोकसंख्येमध्ये तसेच अल्पसंख्याक वांशिक गटांमध्ये आढळतात.
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात बौद्ध धर्माचे आगमन झाल्यापासून श्रीलंका हे बौद्ध प्रथांचे केंद्र राहिले आहे. श्रीलंकेच्या बहुतांश राजांनी बौद्ध संस्थांच्या देखभाल आणि पुनरुज्जीवनात मोठी भूमिका बजावली. 19व्या शतकात, श्रीलंका बेटावर आधुनिक बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले ज्याने बौद्ध शिकवणीला चालना दिली.
वैशिष्ट्य
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 10 सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल (10 most populous buddhist countries) जाणून घेतले. बौद्ध धर्माची ही माहिती (buddha dharma information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
संदर्भ —
- WORLD’S BUDDHIST POPULATION: Pre-eminence of the Mahayana Tradition (Dr. Daya Hewapathirane)
- Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts
- विश्व में बौद्ध धर्म – विकिपीडिया
most populous buddhist countries – Top 10 Buddhist Populations in 2021 (chart)
हे ही वाचलंत का?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- डॉ बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी – Buddhist Celebrities in India
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्थान आहेत – नाना पाटेकर
- Rajratna Ambedkar biography | राजरत्न आंबेडकर का जीवन परिचय
- Ambedkar Family | जानें आंबेडकर परिवार की संपूर्ण जानकारी
- भारत के टॉप 10 सबसे प्रसिद्ध गायक (Pantheon और Wikipedia की HPI रैंकिंग)
- हिंदी विकिपीडिया पर भारत के टॉप 20 सबसे लोकप्रिय लोग (2016-2020)
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- अन्य लेख वाचा
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
अतिशय उत्कृष्टपणे आणि इत्यंभूत माहिती दिली आहे.
धन्यवाद सर, आपला हा अभिप्राय माझ्यासाठी अतंत्य महत्त्वाचा आहे.
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे सर
Super sir खूप सुंदर माहिती दिलात सर
धन्यवाद सर.