2015 वर्षातील जुलै ते डिसेंबर या कालावधी मधील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या top 20 चरित्र लेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. या यादीत भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींचा समावेश झालेला आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते. – famous personalities of Maharashtra
Most searched personality on Marathi Wikipedia
famous personalities of Maharashtra – मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक प्रसिद्ध top 20 व्यक्ती (जुलै ते डिसेंबर 2015)
1 जुलै 2015 ते 30 डिसेंबर 2015 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वेळा वाचल्या गेलेल्या (views) top 20 चरित्रलेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींची माहिती येथे देण्यात आली आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते.
यापूर्वी आपण 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मधील लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत. वेगवेगळ्या 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे, त्यापैकीच एक मराठी विकिपीडिया आहे. मराठी विकिपीडियावर प्रसिद्ध मराठी व्यक्तींबद्दल वाचले जात नाही तर महाराष्ट्रेतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दलही वाचले जाते. महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्यापैकी कोणकोणत्या व्यक्ती 1 जुलै 2015 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधी दरम्यान टॉप 20 मध्ये समाविष्ट झाल्या आहेत, याविषयीची तुलनात्मक आकडेवारी येथे तुम्हाला बघायला मिळेल.
1 जुलै 2015 ते 30 डिसेंबर 2015 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 व्यक्तींपैकी 15 व्यक्ती ह्या महाराष्ट्रीय आहेत, तर 5 व्यक्ती (#1, #2, #11, #15, व #17) ह्या इतर भारतीय राज्यांतील आहेत.
लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येनुसार (व्ह्यूज नुसार) त्याची rank ठरली आहे. प्रत्येक फोटोखाली हिरव्या रंगात कोणत्या चरित्रलेखाला सदर कालावधीत किती वेळा पहिले गेले (मिळालेले views) ते दिलेले आहे.
The 20 most popular people on Marathi Wikipedia in 2015 (July to December)
famous personalities of Maharashtra and India
Top 20 most viewed people on Marathi Wikipedia in 2015
20. बाबा आमटे
19,283 वेळा वाचले गेले
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (1914 – 2008) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
आमटे यांचा लेख केवळ या एका वेळी टॉप 20 लोकप्रिय लोकांमध्ये समाविष्ट झाला आहे. 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी एकाही वर्षामध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट झाले नाहीत. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात ‘मुरलीधर देवीदास आमटे’ या लेखाला 19,283 व्ह्यूज मिळालेत.
Famous Sports personalities of Maharashtra
19. अण्णा भाऊ साठे
19,284 वेळा वाचले गेले
अण्णा भाऊ साठे (1920 — 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. त्यांना साहित्यरत्न म्हटले जाते. साठे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. दर वर्षी मोठ्या संख्येने त्यांना मराठी विकिपीडियावर वाचले जाते.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 काळात त्यांच्या लेखाला 19,283 व्ह्यूज मिळालेत. अण्णा भाऊ साठे हे 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. पुढील वर्ष 2016 मध्ये त्यांची रँक 3 क्रमांकाने प्रगती करत 16व्या स्थानावर होती.
थोर मराठी साहित्यिक
18. गाडगे महाराज
19,593 वेळा वाचले गेले
गाडगे बाबा (1876 – 1956) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. गाडगे बाबा यांचा लेख सुद्धा केवळ या एका वेळी टॉप-20 लोकप्रिय लोकांमध्ये समाविष्ट झाला आहे.
2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी एकाही वर्षामध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट झाले नाहीत. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 19,593 व्ह्यूज मिळालेत.
थोर समाजसेवक मराठी
19,883 वेळा वाचले गेले
सर्वेपल्ली राधाकृष्णन (1888 – 1875) हे भारतीय तत्वज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. राधाकृष्णन यांचा लेख सुद्धा केवळ या एका वेळी टॉप 20 लोकप्रिय लोकांमध्ये समाविष्ट झाला आहे. 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी एकाही वर्षामध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट झाले नाहीत. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 19,883 व्ह्यूज मिळालेत.
famous personalities of Maharashtra
16. सावित्रीबाई फुले
23,215 वेळा वाचले गेले
सावित्रीबाई जोतीराव फुले (1831 – 1897) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. सावित्रीबाई फुले या मराठी विकिपीडियावरील आतापर्यंतच्या “सर्वात लोकप्रिय महिला” ठरल्या आहेत.
त्या दर वर्षी टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये सामील होतात, एवढेच नाही तर 2016 वगळता पुढील सर्वच वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची रँक पहिल्या पाच मध्ये आलेली आहे. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 10वी होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांचा लेख 23,215 वेळा वाचला गेला आहे.
थोर समाजसेविका मराठी
15. सम्राट अशोक
25,410 वेळा वाचले गेले
सम्राट अशोक (इ.स.पू. 304 – इ.स.पू. 232) हे मौर्य घराण्यातील सम्राट होते. भारतीय समाजातील सर्वात महान राजा त्यांना मानले जाते, त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. 272 – इ.स.पू. 232 दरम्यान राज्य केले.
अशोक सुद्धा केवळ या एका वेळी टॉप 20 लोकप्रिय लोकांमध्ये समाविष्ट झाले आहे. 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी एकाही वर्षामध्ये ते टॉप-20 मध्ये समाविष्ट झाले नाहीत. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 25,410 व्ह्यूज मिळालेत.
famous personalities of Maharashtra
14. संभाजी भोसले
25,479 वेळा वाचले गेले
छत्रपती संभाजी महाराज (1657 – 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 25,479 व्ह्यूज मिळालेत. 2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान राहिले आहे. तथापि, वर्ष 2016 वगळता अन्य सर्व वर्षांमध्ये (2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 13वी होती.
Famous Personalities of Maharashtra
13. राणी लक्ष्मीबाई
25,933 वेळा वाचले गेले
राणी लक्ष्मीबाई (1835 – 1858) ही मराठा शासित झाशी राज्याची राणी होती. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या सैन्याशी युद्ध केले आणि रणांगणात शहीद झाल्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एक मराठी व्यक्ती होती.
2016 ते 2020 दरम्यान केवळ 2016 (15वे स्थान) आणि 2017 (19वे स्थान) मध्ये त्यांचा चरित्रलेख टॉप-20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 25,933 व्ह्यूज मिळालेत.
great leaders of maharashtra
12. महात्मा फुले
31,273 वेळा वाचले गेले
महात्मा जोतीराव फुले (1827 – 1890) हे मराठी लेखक, शिक्षक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली.
पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 6वी होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 31,273 व्ह्यूज मिळालेत.
फुले हे सुद्धा एक लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात येते. सर्व वर्षांमध्ये (2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले हे एकमेव असे दांपत्य आहे की, या दोघांचाही समावेश मराठी विकिपीडियाच्या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय लेखांमध्ये झालेला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती
famous personalities of Maharashtra
11. भगतसिंग
31,653 वेळा वाचले गेले
भगतसिंग (1907 – 1931) एक भारतीय क्रांतिकारक व प्रखर बुद्धिवादी होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
मराठी व्यक्ती नसलेले भगतसिंग हे महाराष्ट्रात देखील खूप प्रसिद्ध आहेत. यामुळे ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी 4 वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 31,653 व्ह्यूज मिळालेत. पुढील वर्ष 2016 मध्ये त्यांची रँक 3 क्रमांकाने खाली येत 14व्या स्थानावर होती.
भारतातील थोर व्यक्ती
great leaders of maharashtra
10. संत तुकाराम
33,114 वेळा वाचले गेले
संत तुकाराम (1608 – 1650) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.
संत तुकाराम हे एक शिवकालीन मराठी संत असून, ते आजही महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील एक ‘लोकप्रिय संत‘ आहेत.
2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान नेहमी 10व्या रँकच्या आतमधेच राहिले आहे. मागील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 9वी होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 33,114 व्ह्यूज मिळालेत.
most powerful person in maharashtra
9. मस्तानी
35,081 वेळा वाचले गेले
मस्तानी (1699 – 1740) मराठा पेशवे (पंतप्रधान) बाजीराव प्रथम यांची दुसरी पत्नी होती. मराठा ब्राह्मण कुटुंबातील तिचे नाते कौतुकाचे व वादाचे विषय ठरले आहे.
थोरला बाजीराव (4#) आणि मस्तानी यांच्यावरील बाजीराव मस्तानी हा चित्रपट 2015 च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता आणि यामुळेच हा लेख या top-20 लोकांच्या सूचीत समाविष्ट होऊ शकला. हा लेख केवळ या एकाच वेळी टॉप 20 मध्ये समाविष्ट झालेला आहे. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 35,081 व्ह्यूज मिळालेत.
8. ज्ञानेश्वर
37,393 वेळा वाचले गेले
संत ज्ञानेश्वर (1275 – 1296) हे मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला.
संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी संत आहेत. त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. यामुळे ते 2016 ते 2020 या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत.
पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 7वी होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 37,393 व्ह्यूज मिळालेत.
41,205 वेळा वाचले गेले
सचिन तेंडुलकर (जन्म: 1973) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक मराठी व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मराठी विकिपीडियावर मोठ्या संख्येने माहिती वाचली जाते. तो मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय हयात व्यक्ती” म्हणून मान्यता पावलेला आहे.
मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 8वी होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्याच्या लेखाला 41,205 व्ह्यूज मिळालेत.
Famous Sports personalities of Maharashtra
famous personalities of Maharashtra
44,738 वेळा वाचले गेले
बाळ गंगाधर टिळक (1856 – 1920) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य टिळक असाही त्यांचा उल्लेख केला जातो. टिळक हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय असून मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 44,738 व्ह्यूज मिळालेत. मराठी विकीपीडियावरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे. पुढील वर्ष 2016 मध्ये त्यांची रँक 6 वरून 5व्या स्थानावर गेली होती.
freedom fighters of maharashtra
57,046 वेळा वाचले गेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. ते एक मराठी म्हणून अन्य भाषिक विकिपीडियांवरही त्यांची सर्वात जास्त लोकप्रियता आहे.
यावर्षीच्या एप्रिल महिन्यात बाबासाहेबांची 125वी जयंती होती, यामुळे त्यांचा लेख प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचला गेला होता. मात्र त्या महिन्यातील वाचकसंख्या येथे समाविष्ट केली नसल्याने ते top 2 मध्ये येऊ शकले नाहीत.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 57,046 व्ह्यूज मिळालेत. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 2री होती. 2016 ते 2020 या वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान कधी दुसरे तर कधी पहिलेच राहिले आहे.
Who is hero of Maharashtra?
63,441 वेळा वाचले गेले
थोरले बाजीराव पेशवे (1700 – 1740) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या शासनात इ.स. 1720 पासून ‘पेशवे’ पदावर होते.
थोरला बाजीराव आणि त्यांची प्रेयसी मस्तानी यांच्यावरील बाजीराव मस्तानी हा चित्रपट 2015 च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. यामुळेच बाजीराव यांचा लेख या सूचीत समाविष्ट होऊ शकला.
हा लेख पुढील वर्ष 2016 या केवळ या एकाच वर्षी टॉप-20 मध्ये समाविष्ट झालेला आहे, त्यांची rank शेवटची होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 63,441 व्ह्यूज मिळालेत. मस्तानी (#9) यांच्या चरित्रलेखाला सुद्धा वाचकसंख्या वाढली होती.
थोर मराठी व्यक्ती
69,561 वेळा वाचले गेले
छत्रपती शिवाजी महाराज (1630 – 1680) हे एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा चरित्रलेख 2016 ते 2020 या वर्षांमध्ये कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर होता. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात महाराजांची जयंती होती, त्यावेळी त्यांचा लेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला होता. मात्र त्या महिन्यातील वाचकसंख्या येथे समाविष्ट नसल्याने ते सुद्धा बाबासाहेबांप्रमाणे top 2 मध्ये येऊ शकले नाहीत.
त्यांची लोकप्रियता अफाट असून ते 5 पैकी 4 वर्षांमध्ये प्रथम स्थानावर होते. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 1ली होती. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 69,561 व्ह्यूज मिळालेत.
Who are the famous personalities of Maharashtra?
82,115 वेळा वाचले गेले
मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.
महात्मा गांधी हे मराठी व्यक्ती नाहीत, तर ते एक गुजराती आहेत. मात्र तरीही ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील एक “सर्वाधिक लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरलेले आहेत.
जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 82,115 व्ह्यूज मिळालेत. यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात गांधींची जयंती होती, त्यावेळी त्यांचा लेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला होता. म्हणूनच ते top 2 मध्ये येऊ शकले.
2016 ते 2020 या सर्व वर्षांमध्ये ते मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-20 लेखांमध्ये कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत. पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 4थी होती.
Famous Personalities of Maharashtra
थोर समाज सुधारक मराठी
95,551 वेळा वाचले गेले
ए.पी.जे अब्दुल कलाम (1931 – 2015) भारताचे 11वे राष्ट्रपती व एरोनॉटिकल इंजिनिअर होते. डॉ. कलाम हे एक तमिळ व्यक्ती, मात्र ते मराठी लोकांमध्येही खूप जास्त लोकप्रिय आहेत.
2015 याच वर्षीच्या जुलै महिन्याच्या 27 तारखेला यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी विकिपीडियावर त्यांची माहिती इतक्या प्रचंड वेळा वाचली गेली की ते टॉप-20 मध्ये पहिल्या स्थानावर आले. डॉ. कलाम हे या 6 महिन्यातील “सर्वात लोकप्रिय व्यक्ती” ठरले आहेत. जुलै 2015 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांच्या लेखाला 95,551 व्ह्यूज मिळालेत.
पुढील वर्ष 2016 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांची रँक 3री होती. त्यांचा मराठी विकिपीडियाच्या प्रत्येक वर्षीच्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समावेश झाला होता. त्यातही ते सदैव पहिल्या दहा मध्येच राहिले.
Great personalities of Maharashtra
हेही वाचलंत का?
मराठी विकिपीडियावरील लोकप्रिय व्यक्ती
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- 2021 (जानेवारी ते जून) मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय 20 व्यक्ती
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2019 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2018 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2017 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2016 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2015 (जुलै ते डिसेंबर) मधील महाराष्ट्रातील Top-20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
हिंदी विकिपीडिया पर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2016 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2017 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2018 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2019 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- भारत की मशहूर बौद्ध हस्तियां (अभिनेता & गायक) | List of Buddhist Celebrities in India
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख है ‘बी. आर. आंबेडकर”; तथा मराठी विकिपीडिया में ‘शिवाजी महाराज’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- १३०व्या जयंतीच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३० प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- अन्य लेख वाचा