महाराष्ट्राला अनेक मराठी बौद्ध कलाकार लाभलेले आहेत, ज्यांनी अभिनय आणि संगीत क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील ४० बौद्ध कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र ही मराठी लोकांची भूमी आहे आणि भारताला अनेक थोर मराठी माणसं लाभलेली आहेत. या मराठी माणसांनी देशाचे आणि राज्याचे नाव उज्वल केले आहे. महाराष्ट्रातील ‘मराठी कलाकार’ सुद्धा याच श्रेणीत येतात, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र हा अभिनय आणि संगीत क्षेत्रांमध्ये पुढे आहे. महाराष्ट्रात सर्वच प्रमुख धर्मांचे लोक राहत असले तरी येथे हिंदू, बौद्ध आणि मुस्लिम धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे. या सर्वच धर्मीयांचा मराठी गायन आणि अभिनय सृष्टीला फायदा झालेला आहे. महाराष्ट्रातील मराठी बौद्ध लोकसंख्या विचारात करता ती 9 ते 10 टक्के आहे, तथापि शासकीय जनगणनेत हा आकडा 6 टक्के सांगितला जातो.
महाराष्ट्राला अनेक बौद्धधर्मीय कलाकार लाभलेले आहेत, जे मराठी पार्श्वभूमीतून येतात, ज्यांनी अभिनय आणि संगीत क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अभिनेता किंवा कलाकार हा त्याच्यातील असलेल्या कलागुणांमुळे ओळखला जातो, त्याची धार्मिक पार्श्वभूमी ही केवळ एक वैयक्तिक बाब असते. तथापि, कलाक्षेत्रातील मराठी बौद्ध समाजातल्या या उल्लेखनीय बौद्ध व्यक्तींबद्दल वाचायला तुम्हाला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील 40 मराठी बौद्ध कलाकारांविषयी…
महाराष्ट्रातील मराठी बौद्ध कलाकार
1. सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)
सिद्धार्थ जाधव (जन्म 1981) हा मराठी अभिनेता आणि विनोदीवीर आहे. त्याने टेलिव्हिजन मालिका, तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बौद्ध पार्श्वभूमी असलेला हा अभिनेता महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या बौद्ध समाजातून तो आलेला असल्याचे त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते. सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या बौद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. buddhist actors in marathi
2. आदर्श शिंदे (Adarsh Shinde)
आदर्श शिंदे (जन्म 1988) हा एक मराठी पार्श्वगायक आहे. त्याने अनेक आंबेडकरी गाणी (भीम गीते), बुद्ध गीते आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बौद्ध समाजातून तो आलेला आहे. तो मराठी लोकगीते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे.
आदर्श शिंदे हा आंबेडकरी चळवळीचा वारसा भीम गीतांच्या माध्यमातून तेवत ठेवणाऱ्या शिंदे कुटुंबातील एक सदस्य आहे. आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे, आणि काका मिलिंद शिंदे या दिग्गज गायकांचा वारसा तो पुढे चालवत आहे. Buddhist singers in India
3. संभाजी भगत (Sambhaji Bhagat)
संभाजी भगत (जन्म 1959) हे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक शाहीर आहेत. त्यांनी अनेक स्तरांवर आंबेडकरी चळवळीचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रबोधनपर जलसे सादर केले आहेत.
मराठीच्या काही बोलीभाषांतही त्यांची गाणी गाजली आहेत. त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी नेमली गेली आहेत. लोककलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी संभाजी भगत यांनी बरीच व्याख्याने दिली आहेत. buddhist celebrities in india
4. आनंद शिंदे (Anand Shinde)
आनंद शिंदे (जन्म 1965) हा महाराष्ट्रातील एक मराठी गायक आहे. आंबेडकरी गीते, बौद्ध गीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक हजाराहून अधिक गाणी गायली आहेत आणि 250+ चित्रपटांमध्ये गायली आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांच्या कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. indian buddhist celebrities
5. उषा जाधव (Usha Jadhav)
उषा जाधव (जन्म 1984) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. तिला 2012 च्या मराठी चित्रपट ‘धग’ मधील भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यासाठी तिला 60व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. buddhist actors in marathi film industry
2019 मध्ये, तिला माई घाट: क्राईम नंबर 103/2015 मधील कामासाठी 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार मिळाला. उषा जाधव ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील तिच्यावर मोठा प्रभाव आहे. 2020 मधील, आंबेडकर जयंतीदिनी तिने आपण बाबासाहेबांच्या शिकवणुकींना वा विचारधारेला मानत असल्याचे सांगितले होते.
6. प्रल्हाद शिंदे (Prahlad Shinde)
प्रल्हाद भगवानराव शिंदे (1933 – 2004) हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी गायक होते. ते भक्तिगीते, आंबेडकरी गीते आणि कव्वालीसाठी प्रसिद्ध होते. गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे त्यांचे पुत्र, तर आदर्श शिंदे हा त्यांचा नातू होय. ते मराठी बौद्ध कलाकार होते. त्यांच्या शिंदे कुटुंबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे आणि ते आजही बौद्ध धर्माचे पालन करतात. Buddhist singers in India
7. भाऊ कदम (Bhau Kadam)
भालचंद्र (भाऊ) कदम (जन्म 1970) एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. तो विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो, विशेषतः व्यावसायिक मराठी सिनेमा आणि नाटकात काम करताना. चला हवा येऊ द्या या मनोरंजक मराठी टीव्ही शो मध्ये ते कलाकार आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबामध्ये झाला आहे.
जेव्हा 2017 मध्ये बौद्ध धर्मीय भाऊ कदम यांनी आपल्या घरामध्ये हिंदू दैवत असलेला गणपती बसवला होता, तेव्हा त्यांची ती कृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 बौद्ध प्रतिज्ञांच्या विरोधात असल्याचे काही बौद्धांनी त्यांच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर भाऊंनी बौद्ध समाजाची माफी सुद्धा मागितली. भारत देशातील सर्वाधिक विनोदी अभिनेत्यांपैकी हा एक आघाडीचा अभिनेता आहे. buddhist actors in marathi
8. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant)
अभिजीत सावंत (जन्म 1981) हा एक भारतीय गायक, अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडॉल (सीझन 1) चा विजेता आहे. तो ‘जो जीता वही सुपरस्टार’चा पहिला उपविजेता होता आणि एशियन आयडॉलमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावला होता. मुंबईतील एका मराठी बौद्ध कुटुंबात जन्मलेला अभिजीत अप्रतिम गायक आहे. तो हिंदी अणि मराठी गाणी गातो. buddhist actors in marathi
9. नागराज मंजुळे (Nagraj Manjule)
नागराज पोपटराव मंजुळे (जन्म 1978) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक, कवी, आणि चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम असा सैराट चित्रपट बनवला आहे, याशिवाय ते पिस्तुल्या या लघुपटासाठी देखील प्रसिद्ध आहेत, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि बौद्ध धर्माच्या शिकवणींवर त्यांचा विश्वास आहे. buddhist actors in marathi
10. पूनम जोशी (Poonam Joshi)
पूनम जोशी (जन्म 1980) ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने भाभी, कहानी घर घर की, कहीं तो होगा, सात फेरे: सलोनी का सफर यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करते. पूनम सोनी, जी गेल्या आठ वर्षांपासून बौद्ध धर्माचे पालन करत आहे, तिची मुलगी कीर्ती हिने बौद्ध धर्माची ओळख करून दिली. (संदर्भ – 1, 2) buddhist actors in marathi
Buddhist Actors in Marathi Film Industry
11. पॅडी कांबळे (Paddy Kamble)
पंढरीनाथ ‘पॅडी’ कांबळे हा मराठी चित्रपट अभिनेता आणि विनोदी अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आणि हास्य कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो. तो मराठी चित्रपट सृष्टीतील बौद्ध अभिनेत्यांपैकी (buddhist actors in marathi film industry) एक आहे.
12. मेघा घाडगे (Megha Ghadge)
मेघा घाडगे (जन्म 1980) ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपट चित्रपटांमध्ये काम करते. तिने ‘माहेरची माया’ (2007) चित्रपटामधून अभिनयात पदार्पण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री आहे. लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने अनेक चित्रपटांमध्ये लावणी सादर केलेली आहे.
पछाडलेला, पीपट, माहेरची माया, चल धर पकड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स शोमध्ये सुद्धा तिने डान्स केलेला आहे. सध्या ती ‘मेघ मल्हार’ नावाने एक डान्स क्लास चालवत आहे. buddhist actors in marathi
Marathi Buddhist Actors and Singers
13. नंदेश उमप (Nandesh Umap)
नंदेश उमप हे मराठी गायक आणि लोककलाकार आहेत. ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्म यांना मानणारे आहेत. त्यांच्या वडिलांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता, त्याचाच प्रभाव नंदेश यांच्यावर सुद्धा झालेला आहे. हे एक महाराष्ट्रातील मराठी बौद्ध गायक व लोककलाकार आहेत. buddhist actors in marathi
14. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar)
सुरेखा पुणेकर (जन्म 1978) या मराठी लोककलाकार आहेत ज्या त्यांच्या लावणी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक मराठी लावण्या सादर केले आहेत ज्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. सुरेखा पुणेकर बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत. buddhist actors in marathi
15. विठ्ठल उमप (Vitthal Umap)
विठ्ठल उमप (1931 – 2010) हे महाराष्ट्र राज्यातील मराठी लोकगायक, अभिनेते, शाहीर आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते विधारधारेने आंबेडकरवादी आणि धर्माने बौद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी “माझी वाणी भीमाचरणी” आणि “माझी आई भीमाई” ही गीते-पुस्तके लिहिली.
त्यांचा जन्म एका हिंदू कोळी कुटुंबात झाला पण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी अनेक भीमगीते अणि कोळी गीते गायली आहेत, तसेच अनेक चित्रपटांमध्ये त्यानी अभिनय देखील केलेला आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटामध्ये त्यांनी गायलेल्या “भीमाईच्या वासराचा” गण्याला ते आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गीत मानत. buddhist actors in marathi
16. सीमा पाटील (Seema Patil)
सीमा पाटील या मराठी लोकगीतकार (शाहीर) आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 6,000 हून अधिक प्रयोग केले आहेत. शाहीर सीमा पाटील यांचा जन्म हिंदू ओबीसी कुटुंबात झाला. परंतु बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी अशोक विजया दशमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. याच दिवशी 1956 मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. (स्रोत)
17. कडूबाई खरात (Kadubai Kharat)
कडूबाई खरात या मराठी लोकगायिका आणि भीमगायिका आहेत. त्यांनी अनेक भीमगीते गायली आहेत. भिमान माय सोन्यान भरली ओटी, तुम्ही खाता त्या भाकरीवर, कुंकू लावील रमानं, आमचा मास्तर शिकवतो यासारखी अनेक गाणी यांनी गायलेली आहेत जी महाराष्ट्रातील बौद्ध रसिकांमध्ये खूप लोकप्रिय सुद्धा झाली. त्यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला होता, मात्र नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. (स्रोत)
18. वीरा साथीदार (Vira Sathidar)
वीरा साथीदार (1960 – 2021) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. ते मराठी बौद्ध कलाकार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. 2014 मध्ये आलेल्या साथीदारांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती.
न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते, आणि सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. buddhist actors in marathi film industry
19. अभिजीत कोसंबी (Abhijeet Kosambi)
अभिजीत कोसंबी (जन्म 1982) हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने 2007 साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला ‘महागायक’ होण्याचा सन्मान मिळविला. तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो.
मराठी बौद्ध कलाकार
20. वैशाली माडे (Vaishali Mhade)
वैशाली भैसने-माडे (जन्म 1984) या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे 24 ऑगस्ट 1984 रोजी एका गरीब बौद्ध कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. माडे या दूरचित्रवाणीवर 2008 साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली.
हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीम गीते गायली आहेत.
21. राजेश ढाबरे (Rajesh Dhabre)
राजेश फत्तेसिंग ढाबरे हे महाराष्ट्रातील संगीतकार, गायक, गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरवादी-बौद्ध आहेत. ते भीमगीते आणि बौद्ध भक्ती संगीत तयार करतात. त्यांचे अल्बम ‘बुद्ध ही बुद्ध है‘ (2010) आणि ‘सिद्धार्थ‘ (2013) हे बौद्ध धर्मावर केंद्रित आहेत.
2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांनी ‘सरणं‘ अल्बम काढला, जी बॉलीवुडची बाबासाहेबांना दिलेली पहिली आजरांजली होती. त्यांनी मुंबईत कस्टम आयुक्त म्हणून काम केले. राजेश ढाबरे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ लिमिटेड, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
22. शीतल साठे (Sheetal Sathe)
शीतल साठे (जन्म 1986) या मराठी लोक गायिका, लेखिका आणि दलित हक्क कार्यकर्त्या आहेत. ती कबीर कला मंच आणि नवयान महाजलसाची प्रसिद्ध आणि महत्त्वाची गायिका आहे. त्यांचा जन्म एका मातंग (दलित समाज) कुटुंबात झालेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्या बौद्ध धम्माला मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नवयान बौद्ध धर्माचे नाव आपल्या कला मंचाला दिले आहे. त्यांचे पती सचिन माळी सुद्धा कवी आणि शाहीर आहेत. Celebrities who converted to Buddhism
23. मिलिंद शिंदे (Milind Shinde)
मिलिंद शिंदे (जन्म 1962) हे महाराष्ट्रातील एक उल्लेखनीय मराठी गायक आहेत, जे आंबेडकरी/भीम गीते, बौद्ध गीते, भक्तीगीते आणि चित्रपट गीतांसाठी प्रसिद्ध आहेत. ते एक मराठी बौद्ध कलाकार आहेत.
24. किरण सोनावणे (Kiran Sonawane)
किरण सोनावणे हे एक आंबेडकरी गायक व गीतकार आहेत. त्यांनी असंख्य गाणी लिहिली आणि गायली आहेत. त्यांनी आपलं क्षेत्रं संगीतापुरते मर्यादित न ठेवता धार्मिक कार्यातही भाग घेतला. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक कार्य केले.
लोकांमध्ये बौद्ध धर्माविषयी जागृती करण्याचे कामही त्यांनी केले. ‘दूध प्यायलो जिचे त्या आईची चिता’ सोनावणे यांचं हे गीत अत्यंत लोकप्रिय आहे.अशी असंख्य प्रबोधनपर गीतं त्यांनी लिहिली. (स्रोत)
25. उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde)
डॉ. उत्कर्ष शिंदे (जन्म 1986) हे महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी अनेक आंबेडकरी गीते [भीमगीते], चित्रपटगीते आणि लोकगीते गायली आहेत, तसेच अनेक गीते रचली देखील आहेत. ते गायक आनंद शिंदे यांचे पुत्र आणि आदर्श शिंदे यांचे मोठे बंधू आहेत. उत्कर्ष शिंदे सुद्धा मराठी बौद्ध कलाकार आहेत.
26. सायली कांबळे (Sayli Kamble)
सायली कांबळे (जन्म 1997) ही एक मराठी गायिका आहे. ती मराठी बौद्ध कलाकार आहे. तिने अनेक म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, ज्यात स्टार प्लसच्या मुलांचे गाणे या रिॲलिटी टीव्ही शो अमूल व्हॉइस ऑफ इंडिया – मम्मी के सुपरस्टार मधून पदार्पण केले आहे.
सायलीने गौरव महाराष्ट्राचा आणखी एक शो केला आणि स्टार प्लस आणि एटीव्ही मराठीच्या गायन कार्यक्रमांमध्येही दिसली. सायली कांबळेचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय बौद्ध कुटुंबात झाला आहे.
27. नीलेश आंबेडकर (Nilesh Ambedkar)
नीलेश यशवंत आंबेडकर हे एक लघुपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.
28. प्रियंका उबाळे (Priyanka Ubale)
प्रियंका उबाळे ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांनी ‘प्रेमवारी’, ‘बाबो’ या मराठी चित्रपटांमध्ये तर साता जन्माच्या गाठी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियंकाने मी ‘रमाई’ हा एकपात्री चित्रपट काढला आहे, ज्यात रमाबाई आंबेडकर यांचे धाडसी व्यक्तित्व साकारले गेले आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सर्वकाही प्रियंका यांनी केलं आहे.
अत्यंत कमी बजेटमध्ये तिने हा चित्रपट तयार केला आणि ती राज्यभरातील दलित वस्त्या, बौद्ध विहार या ठिकाणी हा चित्रपट प्रोजेक्टरवर दाखवतात. प्रियंका यांचे पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात झाले. अधिक माहिती
29. अंकुर वाढवे (Ankur Wadhave)
अंकुर विठ्ठलराव वाढवे (जन्म: 1988) हे एक मराठी विनोदी अभिनेते आहे. त्यांनी कॉमेडी शो पासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीरा सुरुवात केली. टाइमपास, फिल्मी टाईमपास, आणि नंतर “चला हवा येऊ द्या” पासून ते प्रसिद्धीस आले. त्यांची उंची कमी आहे, आणि त्यामुळे येणाऱ्या शारिरीक मर्यांदांवर मात करत अंकुर यांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
30. कैलास वाघमारे (Kailash Waghmare)
कैलास वाघमारे हे भारतीय सिनेसृष्टीतील अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट, लघुचित्रपट, एकांकिका आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला’ नाटकामध्ये एका कट्टर मावळ्याची भूमिका साकारली होती.
यानंतर त्यांनी प्रमुख भूमिका असलेल्या ‘मनातल्या उन्हात’ चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवले. यानंतर त्यांनी ‘हाफ तिकीट’, ‘ड्राय डे’, ‘भिकारी’ या मराठी चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या. शिवकालीन ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी ’चुलत्या’ हे विनोदी पात्र साकारले होते.
31. प्रवीण डाळिंबकर (Pravin Dalimbkar)
प्रवीण डाळिंबकर हे एक मराठी बौद्ध कलाकार आहेत. ते चित्रपट अभिनेते, नाटक अभिनेते आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. नाटकापासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ मध्ये यम हे पात्र साकारले होते.
ते झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये गुरुनाथच्या ऑफिसमधील शिपाई रघू ही भूमिका सध्या साकारत आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबादच्या विवेकानंद कॉलेजमध्ये झाले आहे.
32. वनिता खरात (Vanita Kharat)
वनिता खरात ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करतात तसेच त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.
33. तृशांत इंगळे (Trushant Ingle)
तृशांत इंगळे हे मराठी चित्रपट दिग्दर्शक असून त्यांनी ‘झॉलीवुड’ हा चित्रपट बनवला आहे.
34. अक्षय इंदिकर (Akshay Indikar)
अक्षय इंदिकर हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. ‘स्थलपुराण’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
35. शैलेश नरवाडे (Sailesh Narwade)
शैलेश नरवडे हे सुद्धा एक चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्म मेकर आहेत. ‘जयंती’ हा प्रसिद्ध सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला.
36. गौरव मोरे (Gaurav More)
विनोदवीर अभिनेता गौरव मोरे याने मराठी नाटक, चित्रपट यासारख्या अनेक ठिकाणी अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव मोरे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो.
37. पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap)
38. किरण माने (Kiran Mane)
किरण माने (जन्म 5 एप्रिल 1970) हे एक भारतीय अभिनेता आणि लेखक आहेत जे प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम करतात. ऑक्टोबर 2022 मध्ये, त्यांनी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 4 या रिॲलिटी टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मराठा कुटुंबात जन्माला आलेले किरण माने बुद्धांना आणि बाबासाहेबांना मानतात.
39. संतोष संखद (Santosh Sankhad)
संतोष भीमराव संखद (जन्म 9 मार्च 1978) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक आहेत. 1998 पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी 60 पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
40. रेशमा सोनवणे (Reshma Sonawane)
रेश्मा सोनवणे ही भारतीय गायिका आहे. रेश्मा सोनवणे यांनी बहुतांशी मराठीत काम केले आहे आणि मराठीसारख्या भाषांमध्येही काम केले.
टीप : ही पोस्ट नेहमी अद्ययावत (अपडेट) होत असते. तथापि, एखाद्या बौद्ध सेलिब्रिटीचे नाव या सूचित हवे होते असे तुम्हाला वाटल्यास कृपया (संदर्भासह) कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा किंवा ईमेल द्वारे कळवा.
हे ही वाचलंत का?
- प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- भारतातील बौद्ध धर्मीय अभिनेते आणि अभिनेत्री
- भारतातील बौद्ध धर्मीय गायक आणि गायिका
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक गोष्टी आणि महत्त्वपूर्ण माहिती
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे
- 1 कोटी की 10 कोटी? भारतात बौद्ध लोकसंख्या किती आहे?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मित्र – मैत्रिणींनो, धम्म भारतच्या असंच नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
ह्यातल्या काही जणांना समाजासाठी काय घेणं देणं नाही
नसेल, मात्र या पोस्टमध्ये सेलिब्रिटींचे सामाजिक योगदान सांगायचे नसून केवळ त्यांची धार्मिक पार्श्वभूमी सांगायची आहे.
सायली कांबळे यांच्यावर हिंदू धर्माचा पगडा आहे त्यांचं नाव साईबाबा वरून सायली असे ठेवले आहे असे त्यानी ऑन कॅमेरा शो मध्ये सांगितले आहे
हो बरोबर, मात्र त्या एका बौद्ध परिवारातून येतात, यामुळे सदर लेखात त्यांना समाविष्ट केले गेले आहे.
बरोबर
भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरांत विनोदवीर म्हणून पोहोचलेलं व्यक्तिमत्त्व आहे आणि आपल्या लेखात त्यांनी गणपतीची मूर्ती हटवली असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होईल. हिंदू लोकांच्या भावना दुखावतील. कृपया असे लेखात टाकू नका.
कलाकाराला जात धर्मा पेक्षा लोकांची करमणूक करणं हेच त्यांचं कर्तव्य असतं…. हीच त्यांची समाजसेवा असते.
सहमत, मूळ मुद्यास हात न लावता मूर्ती हटवल्याचे विधान काढले.
पुजा मोहिते पवार
हि मल्टी टॅलॅन्टेड कलाकार आहे. लोक कले मध्ये पोष्ट ग्रॅज्युएट तसेच सुलोचना चव्हाण यांचेकडे शास्त्रीय व लोक संगीत शिकलेली आहे. सर जे जे स्कुल मधुन ग्रॅज्युएट असुन पोष्ट ग्रॅज्युएशन करीत आहे. उत्तम लावणी नर्तिका आहे. तसेच दोन लोक संगीताचे व एक भिम गीतांचा असे तीन अल्बम आलेत.
धन्यवाद सर, अधिक माहिती शोधून व धर्माचा पडताळणी करून सदर व्यक्ती लेखात समाविष्ट करण्यात येईल.
यात एक प्रसिद्ध सिने–गीतकार/कवी सागर पवार यांचा समावेश करण्यात यावा.
हे सुध्दा बौद्ध समाजातील आंबेडकरवादी प्रसिद्ध,ख्यातनाम गीतकार असून आता पर्यंत 2000 गी
ते ध्वनिमुद्रित सामाजिक जन माणसात त्यांची एक सामाजिक ओळख आहे. आतापर्यंत 24 मराठी चित्रपटात त्यांनी गीत लेखन केले आहे.
धन्यवाद, अधिक माहिती शोधून व धर्माचा पडताळणी करून सदर व्यक्ती लेखात समाविष्ट करण्यात येईल.
ह्यातील काही धर्म लपवे आहेत, त्यामुळे तसल्याचं काही कौतुक नाही आम्हाला..
बौद्ध कलाकार त्यांचा धर्म जाहिरपणे सांगतील अथवा नाहीही सांगणार. ही सर्वस्वी त्यांची व्यक्तिगत बाब आहे.
राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अनविकर यांनी महाराष्ट्र सह उत्तर प्रदेश बिहार सह देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचारांचे प्रबोधन केले.
उत्तर प्रदेश राज्यसरकारने मानाचा काशिराम पुरस्कार प्रदान केला.
त्यांचे वडील हरिभाऊ अनवेकर यांचा तमाशा फड मराठवाड्यात प्रसिद्ध होता. पुढे त्यांचे बंधू रतन आणि उत्तम अनविकर अनविकर यांनीही तमाशा फड चालवला होता.
फार चांगला लेख आहे हा. या लेखाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील मराठी बौद्ध कलाकारांची फार चांगली माहिती मिळाली आहे. इतर क्षेत्रातील बौद्ध व्यक्तींविषयी सुद्धा जरूर लेख लिहावेत.
राहुल अनवेकर यांचे नाव ह्या यादी समाविष्ट केले गेले दिसत नाहीत
आज मुंबई कुणाची असे एक नाटक सुरु आहे त्यातील कलावंत सिद्धार्थ प्रतिभावंत त्याचे मूळ आडनाव बाविस्कर आहे अनेक जाहिराती मधून तो दिसतो, पोस्ट ऑफिस सुरु आहे या मालिकेतहि तो होता प्रबोधनाची गाणी गाणार जलसा या कार्यक्रमातूनही तो असतो अतिशय गुणी कलावंत आहे
साहेब,
बौद्ध कलाकार असंख्य आहेत आणि ज्यांनी नांवे तुम्ही यात समाविष्ट केली आहेत, त्यांच्यापेक्षा किती तरी सुप्रसिद्ध, गुणवंत, आंबेडकरवादी प्रचारक, गायक, कवी वामन दादा कर्डक, प्रतापसिंग बोदडे, रंजनाताई शिंदे, कृष्णा शिंदे, विष्णू शिंदे, इत्यादी अनेक गायकांचा समावेश नाही. त्यामुळे तुम्ही हे ४० कलावंत निवडताना कोणते निकष लावले, हे समजले तर बरे होईल.
जयभीम साहेब, निश्चितच या चाळीस कलावंतांव्यतिरिक्त देखील अनेक सुप्रसिद्ध बौद्ध कलावंत आहेत. या लेखामध्येच अजून नवीन बौद्ध कलावंतांची नावे जोडली जावीत यासाठीचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तुम्ही सुचवलेली नावे या लेखामध्ये जोडण्यात येतील. तुम्ही सुचवलेल्या नावांव्यतिरिक्त इतरही काही प्रख्यात नावे असतील तर कृपया ती आवर्जून कळवावीत, धन्यवाद.