भारतात कोट्यवधी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, आणि यामध्ये सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सुद्धा आहेत. भारत देशातील बौद्ध धम्माचे पालन करणाऱ्या 40 पेक्षा जास्त बौद्ध अभिनेते व अभिनेत्रींची माहिती येथे दिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मराठीमध्ये पहिल्यांदाच भारतातील बौद्ध सेलिब्रिटींची माहिती लोकांसमोर येत आहे. – Buddhist actors in Marathi

Indian Buddhist Actors in Marathi
भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रांत अनेक सेलिब्रिटी (Buddhist Celebrities in India) ह्या बौद्ध धर्मीय आहेत आणि त्या बौद्ध धर्माचे पालन सुद्धा करतात. तुम्हाला जेवढे माहिती आहेत, त्याच्यापेक्षा बरेच अधिक प्रसिद्ध बौद्ध लोक भारतात आहेत. ही कलाक्षेत्रांतील भारतीय प्रसिद्ध बौद्ध व्यक्तिमत्त्वांची यादी आहे, ज्यात अशा सुप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे जे बौद्ध धर्माचे पालन करतात किंवा बौद्ध धर्माचे मोठ्या प्रमाणावर अध्ययन करताहेत. येथे बौद्ध धर्माच्या सर्व शाखांचा समावेश करण्यात आला आहे. बौद्ध धर्म हा बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे.
बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी जगभरात लोकप्रिय आहे. तथापि, हिंदी चित्रपटांसह भारतात सुमारे 24 वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात. आशा सर्व भारतीय चित्रपटांतील वा सिनेसृष्टींतील प्रसिद्ध बौद्ध सेलिब्रिटींचा समावेश या लेखात केलेला आहे. यातील अनेक बौद्ध कलाकार हे बौद्ध पार्श्वभूमीचे आहेत, काही सेलिब्रिटींनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, यापैकी बहुतांश सेलिब्रिटी बौद्ध धर्माचे पालन करणारे आहेत. हे सेलिब्रिटी वेगवेगळ्या बौद्ध परंपरांचे पालन करतात. महाराष्ट्रातील मराठी बौद्ध सेलिब्रिटी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत ‘नवयान’ बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बहुतेक बौद्ध सेलिबेटी निचिरेन बौद्ध धर्माचे उपासक आहेत. indian celebrities following nichiren buddhism
भारत देशात प्रसिद्ध व उल्लेखनीय बौद्ध लोक खूप सारे आहेत. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा बौद्ध आहे, त्याचप्रमाणे डॅनी डेन्झोंगपा आणि तुषार कपूर हे सुद्धा बौद्ध आहेत. हंसिका मोटवानी आणि श्रद्धा दास या दोघी प्रसिद्ध अभिनेत्री बौद्ध धर्मीय आहेत. Buddhist celebrities in Bollywood नागराज मंजुळे हे बौद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का की प्राचीन चौहान, शिवानी गोसाई, नकुल मेहता आणि रवी दुबे यांसारखे भारतीय टीव्ही स्टार देखील बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत?
या लेखामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींसह सर्व भारतीय सिनेसृष्टींतील प्रसिद्ध बौद्ध सेलिब्रिटींचा समावेश या लेखात केलेला आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी असलेले भारतीय मनोरंजन उद्योगांतील उल्लेखनीय सेलिब्रिटी कोणकोणते आहेत, हे जाणून घेणे तुम्हाला नक्कीच आश्चर्यकारक वाटेल. खालील 40+ बौद्ध सेलिब्रिटींची संपूर्ण यादी बघा :
भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री
List of Indian Buddhist actors (male and female) :
1. आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)

आयुष्मान खुराना (जन्म 1984) हा एक भारतीय अभिनेता, गायक, लेखक आणि टेलिव्हिजन होस्ट आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. तो निचिरेन बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. त्यांची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) देखील निचिरेन बौद्ध धर्माचे पालन करते. आयुष्मान हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांचा विजेता आहे.
तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 2013 आणि 2019च्या फोर्ब्स इंडियाच्या Celebrity 100 यादीत तो दिसला आहे. टाइम मॅगझिनने 2020 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्याचे नाव नोंदवले आहे. Buddhist celebrities in Bollywood
बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप या पती-पत्नीला बौद्ध धर्मानेच कर्करोगाविरुद्धच्या लढाईत त्याला शह देण्यासाठी इंधन पुरवले आहे. बौद्ध धर्माने खुरानाला अभिनेता म्हणून त्याचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यात मदत केली आहे, असे आयुष्मान सांगतो.
“मी निचिरेन बौद्ध धर्माचे पालन करते. याने मला शिकवले की तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे. त्याचा प्रभाव तुमच्या भौतिक अस्तित्वावर पडत असतो. ते (कर्करोग) माझ्यासाठी किरकोळ निराशाजनक होते. पण मी ते मनापासून स्वीकारले. मी ठरवले की मी नकारात जगणार नाही आणि ते जगापासून लपवणार नाही,” असे ताहिरा सांगते, ज्यांना उच्च दर्जाच्या घातक पेशी असलेल्या DCIS आढळून आले होते. (संदर्भ – 1, 2, 3, 4)
2. उषा जाधव (Usha Jadhav)

उषा जाधव (जन्म 1984) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. तिला 2012 च्या मराठी चित्रपट ‘धग’ मधील भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यासाठी तिला 60व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
2019 मध्ये, तिला माई घाट: क्राईम नंबर 103/2015 मधील कामासाठी 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार मिळाला. उषा जाधव ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील तिच्यावर मोठा प्रभाव आहे. 2020 मधील, आंबेडकर जयंतीदिनी तिने आपण बाबासाहेबांच्या शिकवणुकींना वा विचारधारेला मानत असल्याचे सांगितले होते. buddhist actors in marathi
3. तुषार कपूर (Tusshar Kapoor)

तुषार कपूर (जन्म 1976) हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे जो आपल्याला हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो. तो बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. एका करमणूक वेबसाईटशी गप्पा मारताना त्याने त्याच्या आयुष्यातील नवीन टप्पा आणि बौद्ध धर्माबद्दलची माहिती दिली. indian celebrities following nichiren buddhism
तुषार म्हणाला, “मला वाटते की यातील (आयुष्यातील टप्पे) बरेच काही बौद्ध धर्मामुळे आहे. मी निचिरेन डायशोनिन बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. मी जप करतो, मी अभ्यास करतो आणि मी सध्या वाचत असलेल्या पुस्तकाला ‘Human Revolution’ (मानवी क्रांती) म्हणतात. हे एक प्रकारे तुम्हाला उलगडलेला आणि एक छान व्यक्ती बनवते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होते आणि तुम्ही तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करू लागता, तुमचे जवळचे कुटुंब आणि तुमचे प्राधान्यक्रम अगदी स्पष्ट होतात.” त्याचे वडील जितेंद्र (#36) देखील निचिरेन बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. (संदर्भ – 1, 2)
4. पूनम बाजवा (Poonam Bajwa)

पूनम बाजवा (जन्म 1985) एक दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसते (buddhist actors in tollywood). तिने 2005 मध्ये तेलुगू चित्रपट मोदाती सिनेमाद्वारे अभिनयात पदार्पण केले, त्यानंतर तिला बॉस (2006) सारख्या अधिक तेलुगु चित्रपटात दाखवण्यात आले. सेवल (2008) हा तिचा पहिला तमिळ चित्रपट होता. ती बौद्ध धर्माचे पालन करते. पूनम बाजवा हिने श्रद्धा दासला बौद्ध धर्माची ओळख करून दिली आहे. (स्रोत – 1, 2) indian celebrities following nichiren buddhism
5. नकुल मेहता (Nakuul Mehta)

नकुल मेहता (जन्म 1983) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे जो इश्कबाज मधील शिवाय सिंग ओबेरॉय, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा मधील आदित्य हरीश कुमार आणि नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड मधील सुमेर सिंग ढिल्लन यांच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. एक मुलाखतीत त्याने तो बौद्ध धर्माचा अनुयायी असल्याचा खुलासा केला आहे. तो सकाळी बौद्ध नामजप करतो, आणि निचिरेन बौद्ध धर्माचे आचरण करतो. (स्रोत – 1, 2) buddhist celebrities in india
6. पाओली दाम (Paoli Dam)

पाओली दाम (जन्म 1980) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये दिसते (buddhist actors in tollywood) तसेच तीने काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. तिने आपल्या या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बंगाली टीव्ही मालिका जीवन नया खेल (2003) मधून केली त्यानंतर तिने 2004 साली पहिला बंगाल चित्रपट तीन यारी कथा मध्ये काम केले.
तिने अनेक बंगाली भाषेतील मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री निचिरेन बौद्ध धर्माची अनुयायी आहे आणि ती बौद्ध ततत्वज्ञानाचे पालन सुद्धा करते. तिचे अध्यात्मिक गुरु जपानी बौद्ध नेते डॉ. दैसाकू इकेडा (Daisaku Ikeda) हे आहेत, जे सोका गक्काई इंटरनॅशनल (SGI) अध्यक्ष आहेत. Buddhist celebrities in Bollywood
पाओली तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय बौद्ध धर्माला देते. या अभिनेत्रीने म्हटले आहे की तिच्या जीवनात बुद्ध धम्माचा मोठा आधार आहे आणि आजपर्यंत तिने जे केले आहे ते केवळ तिचे गुरू डॉ दैकासू इकेडा आणि बौद्ध मंत्र Nam Myoho Renge Kyo यांच्यामुळे शक्य झाले आहे. तिने स्वतःच्या भावाला देखील बौद्ध धम्माच्या सुंदर व अद्भुत तत्त्वज्ञानाची ओळख करून दिलेली आहे.
2012 मध्ये, एका मुलाखतीत पाओली दाम म्हणाली, “मी सात वर्षांपासून या बौद्ध धर्माचे पालन करत आहे. माझ्या धम्म पालनाच्या सुरुवातीच्या वर्षांतच माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आणि माझ्या कारकिर्दीतील नवीन संधी अचानक उघडल्या. बौद्ध धर्माद्वारे, मी माझ्या जीवनात शांतता आणि संतुलन राखण्यास सक्षम आहे. खूप छान वाटतंय.” (स्रोत – 1, 2, 3, 4) indian celebrities following nichiren buddhism
7. अभिजीत सावंत (Abhijeet Sawant)

अभिजीत सावंत (जन्म 1981) हा एक भारतीय गायक, अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडॉल (सीझन 1) चा विजेता आहे. तो ‘जो जीता वही सुपरस्टार’चा पहिला उपविजेता होता आणि एशियन आयडॉलमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावला होता. मुंबईतील एका मराठी बौद्ध कुटुंबात जन्मलेला अभिजीत अप्रतिम गायक आहे. तो हिंदी अणि मराठी गाणी गातो. buddhist actors in marathi
8. मंदाकिनी (Mandakini)

मंदाकिनी (जन्म 1963) ही माजी बॉलीवूड अभिनेत्री आहे. आपल्या चित्रपट करिअरमध्ये तीने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र 1985 च्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. Buddhist celebrities in Bollywood
मंदाकिनीचा जन्म मेरठमधील एक अँग्लो-इंडियन कुटुंबात झाला होता. तिचे वडील जोसेफ ब्रिटीश आणि आई मुस्लिम आहे. 1990 मध्ये, तिने माजी बौद्ध भिक्षू डॉ. काग्युर टी. रिनपोचे यांच्याशी विवाह केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. ती आता मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवते. तिबेटी योगाही शिकवते. (संदर्भ – 1, 2)
9. नागराज मंजुळे (Nagraj Manjule)

नागराज पोपटराव मंजुळे (जन्म 1978) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक, कवी, आणि चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम असा सैराट चित्रपट बनवला आहे, याशिवाय ते पिस्तुल्या या लघुपटासाठी देखील प्रसिद्ध आहेत, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि बौद्ध धर्माच्या शिकवणींवर त्यांचा विश्वास आहे. buddhist actors in marathi
10. टिस्का चोप्रा (Tisca Chopra)

टिस्का चोप्रा (जन्म 1973) एक भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. तिने विविध भाषांमधील 45 हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती निचिरेन बौद्ध धर्माचे पालन करते, आणि यामुळे तिचा मानवतेवर विश्वास वाढला आहे. तिला असे वाटते की बौद्ध धर्म हे एक महान आशा आणि आत्म-साक्षात्काराचे तत्वज्ञान आहे जे आधुनिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ती दररोज नाम म्योहो रेंगे क्यो (Nam MyoHo Renge Kyo) या मंत्राचा जप करते.
सुमारे 20 वर्षांपासून बौद्ध असलेली अभिनेत्री टिस्का चोप्रा म्हणते, “बौद्ध तत्त्वज्ञान माझ्या जीवनाविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी संपूर्णपणे देते.” टिस्का ने मानव गोहिल आणि श्वेता कवात्रा यांच्यासह इतर अनेक टेलिव्हिजन सहकाऱ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली आहे. टिस्का चोप्रा सांगते की, “मला खात्री आहे की भविष्यात जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतील पण आता मी निश्चिंत आहे की, मी कधीही उत्तरांशिवाय राहणार नाही. बौद्ध धर्म मला माझ्या अस्तित्वावर प्रचंड आत्मविश्वास देतो.” (संदर्भ – 1, 2, 3, 4) Buddhist celebrities in Bollywood
11. विनय जैन (Vinay Jain)

विनय जैन हे एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्यांनी वो रहने वाली मेहलों की, छोटी बहू, कुछ तो लोग कहेंगे, और प्यार हो गया इत्यादींसह अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. विनय जैन हे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
बौद्ध धर्म पालनाबद्दल ते म्हणाले की, “बौद्ध धर्माचे पालन करणे हे माझ्या जीवनातील एक प्रमुख प्राधान्य आहे. विविध प्रकल्पांवर काम करताना, मी त्यासाठी पुरेसा वेळ देत आहे याची मी खात्री करतो. त्याचे पालन करण्यामध्ये निचिरेन बौद्ध धर्माचा पुष्कळ जप करणे समाविष्ट आहे.” विनय जैन यांना वाटते की या त्यांच्या जीवनात आनंद आणि स्वातंत्र्य आणणाऱ्या या बौद्ध धर्माच्या अद्भुत पालनामुळे त्यांचे संपूर्ण जीवन आणि दृष्टिकोन बदलला आहे”. (संदर्भ – 1, 2, 3)
अभिनेता विनय जैनने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलच्या बायोमध्ये “Actor • Buddhist • Celebrator of life” असे लिहिले आहे. buddhist celebrities in india
12. पूनम जोशी (Poonam Joshi)

पूनम जोशी (जन्म 1980) ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने भाभी, कहानी घर घर की, कहीं तो होगा, सात फेरे: सलोनी का सफर यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ही अभिनेत्री सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करते. पूनम सोनी, जी गेल्या आठ वर्षांपासून बौद्ध धर्माचे पालन करत आहे, तिची मुलगी कीर्ती हिने बौद्ध धर्माची ओळख करून दिली. (संदर्भ – 1, 2) buddhist actors in marathi
13. सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)

सिद्धार्थ जाधव (जन्म 1981) हा मराठी अभिनेता आणि विनोदीवीर आहे. त्याने टेलिव्हिजन मालिका, तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बौद्ध पार्श्वभूमी असलेला हा अभिनेता महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या बौद्ध समाजातून तो आलेला असल्याचे त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते. सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या बौद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. buddhist actors in marathi
14. श्वेता केसवानी (Sweta Keswani)

श्वेता केसवानी (जन्म 1983) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल आहे, जी हिंदी टीव्ही शो, बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही जाहिरातींमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. ती बौद्ध धर्माची अनुयायी आहे. buddhist actress in bollywood
श्वेता केसवानी म्हणते, “बौद्ध धर्माच्या अनेक शाखा आहेत पण मूलत: निचिरेन दैशोनिन (1222 – 1282) यांचा बौद्ध धर्म हा एकविसाव्या शतकातील धर्म आहे, ज्याचे मी पालन करते. ही एक मंत्राचा जप करून स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे आणि त्याद्वारे केवळ स्वतःलाच चांगले बनवणे नव्हे तर आपले पर्यावरण देखील चांगल्यासाठी बदलण्याची प्रक्रिया आहे. मी कोणती कृती करावी आणि मी स्वतःला आणि माझ्या सभोवतालच्या लोकांना कसे आनंदी आणि अधिक परिपूर्ण बनवू शकतो हे पाहण्याची स्पष्टता मला जप केल्याने मला मिळते.” (स्रोत)
15. श्वेता कवात्रा (Shweta Kawatra)

श्वेता कवात्रा (जन्म 1976) एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आणि दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आहे. ती बौद्ध धर्माचे पालन करते आणि जपानी बौद्ध धर्माच्या सोका गक्काईचे सदस्या आहेत. तिने टीव्ही अभिनेता मानव गोहिल सोबत लग्न केले आहे. ती जेव्हा आई बनली होती तेव्हा तिला बेबी ब्लूजचा त्रास होत होता, परंतु या समस्येतून सावरण्यासाठी तिला बौद्ध धर्माने खूप मदत केली. तिच्या आयुष्याच्या या टप्प्यात बौद्ध धर्मानेच तिला सावरले. buddhist actors in marathi
“बौद्ध धर्माचे पालन केल्याने मला खूप मदत झाली; जेव्हा मला वाटेल की मला शक्तीची गरज आहे तेव्हा मी नामजप करीत असे. यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवनातील परिस्थिती सुधारू शकले आणि एकाच वेळी सर्वकाही संतुलित करू शकले आणि आनंदी राहू शकले,” असे श्वेता सांगते. (स्रोत – 1, 2, 3)
16. मानव गोहिल (Manav Gohil)

मानव गोहिल (जन्म 1974) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. तो एका दशकाहून अधिक काळ हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये सक्रिय आहे आणि कहानी घर घर की, डान्स रिअॅलिटी शो – नच बलिए 2, CID आणि शादी मुबारक यासह अनेक हिंदी टेलिव्हिजन शोमधील त्याच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने टीव्ही अभिनेत्री श्वेता कवात्रा सोबत लग्न केले आहे. हे दांपत्य निचिरेन बौद्ध धर्माचे अनुसरण करते. (स्रोत – 1, 2) Buddhist celebrities in Bollywood
17. हंसिका मोटवानी (Hansika Motwani)

हंसिका मोटवानी (जन्म 1991) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये दिसते, यासोबतच ती तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय करते (buddhist actors in tollywood). तिने देसमुदुरु (2007) या चित्रपटाद्वारे तेलुगु चित्रपटात पदार्पण केले आणि फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त केले. हंसिका मोटवानी बौद्ध धर्माचे पालन करते. indian celebrities following nichiren buddhism
एका मुलाखतीत हंसिका म्हणाली होती की, “माझ्यासाठी प्रभावीपणे तणावमुक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नाम म्यो हो रेंगे क्यो (Nam Myo Ho Renge Kyo) चा जप करणे होय, कारण मी दृढ़तेने बौद्ध धर्माचे पालन करते.” अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, बौद्ध मंत्रोच्चार वा नामजपामुळे तिला वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या मदत झाली आहे. (स्रोत – 1)
18. डॅनी डेन्झोन्ग्पा (Danny Denzongpa)

शेरिंग फिंटसो “डॅनी” डेन्झोन्ग्पा (जन्म 1948) हे एक भारतीय अभिनेता, गायक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. 1971 पासून त्यांनी 190 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2003 मध्ये, डेन्झोंगपा यांना भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान – पद्मश्री देण्यात आला.
सिक्कीम मधील एका बौद्ध कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता, आणि आजही ते बौद्ध धर्माचे पालन करतात. भारतातील सर्वाधिक वरिष्ठ बौद्ध अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. एका मुलाखतीमध्ये डॅनी डेन्झोन्ग्पा यांनी सांगितले की, “माझ्या संगोपनाचे आणि बौद्ध धर्माचे श्रेय मी माझ्या पालकांना आणि शिक्षकांना देतो. आज लोक याला धर्म म्हणतात पण ते खरोखरच एक तत्त्वज्ञान आहे. मी माझ्या कामात शांतता शोधण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही घाई करत नाही.” (स्रोत) Indian celebrities who practice Buddhism
19. श्रद्धा दास (Shraddha Das)

श्रद्धा दास (जन्म 1989) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे जी तेलुगु, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मल्याळम सारख्या विविध चित्रपट उद्योगांमध्ये दिसली. श्रद्धा बौद्ध धर्माचे पालन करते आणि अभिनेत्री पूनम बाजवा हिने तिची ओळख बौद्ध धर्माशी करून दिली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ती स्वतः बौद्ध असल्याचे सांगितले होते. indian celebrities following nichiren buddhism
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचा परिणाम रस्त्यावरील माणसांइतकाच सेलिब्रिटींवर देखील झाला आहे. तेव्हा श्रद्धा दास मुंबईत होती आणि कठीण काळ होता, परंतु बौद्ध मंत्र तिला त्या परिस्थितीचा सामना करण्यास मदत करत असे.
“ते 20 दिवस सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते आणि चिंतेने माझ्याकडून बरेच काही घेतले.” श्रद्धा म्हणते की ती बौद्ध धर्माचे पालन करत आहे आणि जर असे झाले नसते तर ती वेडी झाली असती. मी “नाम म्योहो रेंगे क्यो” चा जप करते. हे मला शांती, शक्ती देते आणि मला संयमित ठेवते,” ती सांगते. (स्रोत – 1, 2, 3)
20. भाऊ कदम (Bhau Kadam)

भालचंद्र “भाऊ” कदम (जन्म 1970) एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. तो विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो, विशेषतः व्यावसायिक मराठी सिनेमा आणि नाटकात काम करताना. चला हवा येऊ द्या या मनोरंजक मराठी टीव्ही शो मध्ये ते कलाकार आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबामध्ये झाला आहे. जेव्हा 2017 मध्ये बौद्ध धर्मीय भाऊ कदम यांनी आपल्या घरामध्ये हिंदू दैवत असलेला गणपती बसवला होता, तेव्हा त्यांची ती कृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 बौद्ध प्रतिज्ञांच्या विरोधात असल्याचे काही बौद्धांनी त्यांच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर भाऊंनी तो गणपती हटवला आणि बौद्ध समाजाची माफी सुद्धा मागितली. भारत देशातील सर्वाधिक विनोदी अभिनेत्यांपैकी हा एक आघाडीचा अभिनेता आहे. buddhist actors in marathi
21. अक्षरा हासन (Akshara Haasan)

अक्षरा हासन (जन्म 1991) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी हिंदी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय करते. ती अभिनेता कमल हासन यांची मुलगी आणि श्रुती हासनची धाकटी बहीण आहे (buddhist actors in tollywood). ती बौद्ध धर्माचे अनुसरण करते आणि त्याचे वर्णन “जीवनाचा एक मार्ग आणि वैयक्तिक जीवनाचा मार्ग” असे करते. Buddhist celebrities in India
2017 मध्ये एकदा अक्षरा हसन यांनी धर्मांतर केल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये प्रसारित झाल्या होत्या, तेव्हा अक्षरा म्हणाली होती की मी नास्तिक (ईश्वरावर विश्वास न करणारी) आहे, आणि माझा बौद्ध जीवनशैली आणि वैयक्तिक मार्गावर विश्वास आहे.
22. पॅडी कांबळे (Paddy Kamble)

पंढरीनाथ ‘पॅडी’ कांबळे हा मराठी चित्रपट अभिनेता आणि विनोदी अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आणि हास्य कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो. तो मराठी चित्रपट सृष्टीतील बौद्ध अभिनेत्यांपैकी (buddhist actors in marathi film industry) एक आहे.
23. मेघा घाडगे (Megha Ghadge)

मेघा घाडगे (जन्म 1980) ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपट चित्रपटांमध्ये काम करते. तिने ‘माहेरची माया’ (2007) चित्रपटामधून अभिनयात पदार्पण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री आहे. लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने अनेक चित्रपटांमध्ये लावणी सादर केलेली आहे. पछाडलेला, पीपट, माहेरची माया, चल धर पकड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स शोमध्ये सुद्धा तिने डान्स केलेला आहे. सध्या ती ‘मेघ मल्हार’ नावाने एक डान्स क्लास चालवत आहे. buddhist actors in marathi
24. गगन मलिक (Gagan Malik)

गगन मलिक (जन्म 1982) हा एक भारतीय अभिनेता आणि बौद्ध कार्यकर्ता आहे. “श्री सिद्धार्थ गौतमा” या श्रीलंकन चित्रपटामधील भगवान बुद्धांच्या भूमिकेसाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध चित्रपट महोत्सवात (World Buddhist Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor Award) पुरस्कार जिंकला. मलिक यांना रामायण टीव्ही मालिकेतील रामाच्या प्रमुख भूमिकेसाठी देखील ओळखले जाते. त्यांचा समावेश बौद्ध धर्मात धर्मांतर करणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये (Celebrities who converted to Buddhism) होतो.
गगन मलिकचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता, परंतु 2014 मध्ये श्रीलंकेतील मिहिंटेल येथे पोसन पोया दिन या बौद्ध उत्सवानिमित्त त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. 10 फेब्रुवारी 2022 रोजी गगन मलिक बँकॉकच्या वाट डॅट थॉन्ग येथे थायलंडमध्ये 15 दिवसांसाठी बौद्ध भिक्खु बनलेले आहेत. जगात बौद्ध धर्माचा प्रसार करणारे सम्राट अशोक आणि भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते आपले आदर्श मानतात.
ते म्हणतात की ‘नमो बुद्धाय‘ हे अभिवादन ‘जय भीम‘ शिवाय कधीच पूर्ण होत नाही. ते भारतभर बौद्ध धम्म प्रचार व प्रसाराचे कार्य करत असतात. 84 हजार बौद्ध स्तूपांची उभारणी करणाऱ्या सम्राट अशोक यांची प्रेरणा घेऊन ते 84 हजार बुद्ध मूर्तींचे दान भारतातील लोकांमध्ये करीत आहेत. (स्रोत) Buddhist celebrities in India
25. नंदेश उमप (Nandesh Umap)

नंदेश उमप हे मराठी गायक आणि लोककलाकार आहेत. ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्म यांना मानणारे आहेत. त्यांच्या वडिलांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता, त्याचाच प्रभाव नंदेश यांच्यावर सुद्धा झालेला आहे. हे एक महाराष्ट्रातील मराठी बौद्ध गायक व लोककलाकार आहेत. buddhist actors in marathi
26. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar)

सुरेखा पुणेकर (जन्म 1978) या मराठी लोककलाकार आहेत ज्या त्यांच्या लावणी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक मराठी लावण्या सादर केले आहेत ज्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. सुरेखा पुणेकर बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत. buddhist actors in marathi
27. विठ्ठल उमप (Vitthal Umap)
विठ्ठल उमप (1931 – 2010) हे महाराष्ट्र राज्यातील मराठी लोकगायक, अभिनेते, शाहीर आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते विधारधारेने आंबेडकरवादी आणि धर्माने बौद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी “माझी वाणी भीमाचरणी” आणि “माझी आई भीमाई” ही गीते-पुस्तके लिहिली.
त्यांचा जन्म एका हिंदू कोळी कुटुंबात झाला पण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी अनेक भीमगीते अणि कोळी गीते गायली आहेत, तसेच अनेक चित्रपटांमध्ये त्यानी अभिनय देखील केलेला आहे. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटामध्ये त्यांनी गायलेल्या “भीमाईच्या वासराचा” गण्याला ते आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गीत मानत. buddhist actors in marathi
28. बरखा मदान (Barkha Madan)

बरखा मदान (जन्म 1974) ही एक माजी भारतीय मॉडेल, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे जी हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती मिस इंडिया फायनलिस्टही राहिली आहे. बौद्ध विचारधारेने प्रभावित होऊन, नोव्हेंबर 2012 मध्ये ती बौद्ध भिक्खुणी (नन) बनली. buddhist actress in bollywood
त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते की, “बुद्ध धर्माचे मूलतत्त्व प्रेम, करुणा आणि समता यावर आधारित आहे. तुम्ही या धर्मावर विश्वास ठेवा किंवा त्या धर्मावर, आम्ही माणसे समान आहोत, ज्यांनी सहअस्तित्व शिकले पाहिजे. भीतीने, सुसंवाद अशक्य आहे. आम्हाला विश्वास हवा आहे. विश्वास हा करुणेचा आधार आहे. अविश्वास भीती आणतो. भीतीमुळे हिंसा येते. भीतीमुळे एकाकीपणा आणि नैराश्य येते. आपण सर्व एकाच ठिकाणाहून आलो आहोत. आपण स्त्रोताचा आदर करायला शिकले पाहिजे.” (स्रोत)
29. प्राचीन चौहान (Pracheen Chauhan)

प्राचीन चौहान (जन्म 1978) एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. त्याने स्टार प्लस वरील लोकप्रिय शो ‘कसौटी जिंदगी की’ द्वारे टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कुछ झुकी पलकें, सिंदूर तेरे नाम का, सात फेरे यासारख्या मालिकांमध्ये काम केले. हा अभिनेता बौद्ध धर्माचे पालन करतो. (स्रोत) famous buddhist celebrities
30. शिवानी गोसाई (Shivani Gosain)

शिवानी गोसाई (जन्म 1975) ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे, जिने जय गंगा मैया, जय महालक्ष्मी, कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की, रंग बदलती ओढानी, लव्ह यू जिंदगी आणि पिया का घर प्यारा लगे यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय, ती Ssshhhhh… कोई है च्या एपिसोडिक्समध्ये देखील दिसली आहे. शिवानी गोसाई ही बौद्ध धर्माचे पालन करते आणि यामुळे तिला आंतरिक शांती मिळते. (स्रोत – 1, 2)
31. रवी दुबे (Ravi Dubey)

रवी दुबे (जन्म 1983) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने 2006 मध्ये DD नॅशनल टीव्ही शो ‘स्त्री तेरी कहानी’तून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तो बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. त्यानंतर त्याने अनेक TV मालिकांमध्ये काम केले. buddhist celebrities in india
एका मुलाखतीत रवी म्हणाला होता की, “मी बौद्ध धर्म पाळायला सुरुवात केली जेव्हा मी माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातून जात होतो आणि मला माझ्या जीवनात सुरू असलेल्या गोंधळाची थोडी समज हवी होती. मला स्वतःला संरेखित करायचे होते आणि स्वतःबद्दल चांगले वाटायचे होते. त्यामुळे जेव्हा गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या, तेव्हा मी नामजप सुरू केला. (स्रोत – 1, 2, 3)
32. रतन राजपूत (Ratan Rajput)

रतन राजपूत (जन्म 1987) ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे, जी तिच्या अगले जनम में मोहे बिटिया ही किजो मधील लाली, महाभारतातील अंबा आणि संतोषी मां मधील संतोषी यांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ती एक उत्कट निचिरेन बौद्ध आहे. (स्रोत – 1, 2) indian celebrities following nichiren buddhism
33. देविका पंजाबी (Devika Punjabi)

देविका शहानी पंजाबी ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी इंतेकाम: द परफेक्ट गेम (2004) आणि टर्निंग 30!!! (2011) चित्रपटांमध्ये झळकली आहे. ती निचिरेन बौद्ध धर्माचे पालन करते. (स्रोत – 1, 2) buddhist actress in bollywood
34. मियांग चँग (Meiyang Chang)

मियांग चँग (जन्म 1982) हा एक भारतीय अभिनेता, टेलिव्हिजन होस्ट, गायक आणि दंतचिकित्सक आहे. तो तिसऱ्या पिढीचा भारतीय-चीनी आहे, ज्याचे मूळ चीनच्या हुबेई प्रांतात आहे. त्याचा जन्म झारखंडमधील एका बौद्ध कुटुंबात झाला होता आणि तो स्वतःला देखील बौद्ध मानतो. हिंदी चित्रपटसृष्टी मधील हा अभिनेता आणि गायक असे दोन्ही वैशिष्ट्य असलेला बौद्ध सेलिब्रेटी आहे. Buddhist celebrities in india
35. सीमा पाटील (Seema Patil)

सीमा पाटील या मराठी लोकगीतकार (शाहीर) आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 6,000 हून अधिक प्रयोग केले आहेत. शाहीर सीमा पाटील यांचा जन्म हिंदू ओबीसी कुटुंबात झाला. परंतु बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी अशोक विजया दशमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. याच दिवशी 1956 मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. (स्रोत)
36. जितेंद्र (Jeetendra)

जितेंद्र (जन्म 1942) हे एक भारतीय चित्रपट अभिनेते आणि निर्माते आहे, जे हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2006 मध्ये स्क्रीन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते 1980च्या दशकात तेलगू चित्रपटांच्या रिमेकमध्ये दिसण्यासाठी ओळखले जातात, ज्यामध्ये ते वारंवार श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्या विरुद्ध भूमिका करत होते. ते बालाजी टेलिफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स आणि एएलटी एंटरटेनमेंटचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. अभिनेते जितेंद्र हे निचिरेन बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्याचप्रमाणे त्यांंचा मुलगा तुषार कपूर देखील निचिरेन बौद्ध धर्माचा उपासक आहे. (स्रोत)
37. रिद्धी डोगरा (Riddhi Dogra)

रिद्धी डोगरा (जन्म 1984) ही एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे जी भारतीय वेब सिरीज असुर, द मॅरीड वुमन, मर्यादा : लेकीन कब तक? यांमध्ये काम केले आहे, तसेच फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6 मध्ये भाग घेतला आहे. तीने टायगर 3 आणि जवान या बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.
रिद्धी डोगरा निचिरेन बौद्ध धर्माची अनुयायी आहे. तिने एकदा सांगितले आहे की ती बौद्ध धर्माचे पालन करते आणि तिच्या बॅगेत बौद्ध धर्मावरील एक पुस्तक ठेवते. ती एक उत्सुक वाचक असल्याने ती सोबत पुस्तके घेऊन जाते. बौद्ध धर्माबद्दलच्या पुस्तकांपैकी एक निवडताना, ही अभिनेत्री म्हणाली की ते ज्या धर्माचे पालन करतात त्याबद्दल तपशीलवार माहिती असणे आवश्यक आहे. (स्रोत – 1, 2)
38. चेतन कुमार (Chetan Kumar)

चेतन कुमार उर्फ चेतन अहिंसा (जन्म 1983) हा कन्नड चित्रपट अभिनेता, पब्लिक इंटेलेक्चुअल आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ता आहे. चेतनने 2007 च्या आ दिनागालू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि उदय चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तो आणि त्यांची पत्नी मेघा उच्च शिक्षित असून दोघेही आंबेडकरवादी आहेत. ते बौद्ध धर्माचा अनुयायी आहेत. त्यांच्या लग्नाच्या दुसर्या वाढदिवसानिमित्त ते दोघे बंगळुरू येथील बुद्ध विहारात बुद्धांना आदरांजली वाहण्यासाठी गेले होते. विषमता, ब्राह्मणवाद, जातिव्यवस्था, हिंसाचार यांसारख्या वाईट गोष्टींवर तो अनेकदा मत व्यक्त करतो. (स्रोत)
39. अनीता राज (Anita Raj)
अनिता राज खुराना (जन्म 1962) ही एक भारतीय अभिनेत्री आणि जगदीश राज यांची मुलगी आहे, जिच्या प्रेम गीत (1981), गुलामी (1985), जरा सी जिंदगी (1983), जमीन आसमान (1984), मास्टरजी (1985) या बॉलिवूड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका आहेत. ती हिंदी मालिका ‘एक था राजा एक थी रानी’ आणि ‘छोटी सरदारनी’ मधील भूमिकेसाठी देखील ओळखली जाते. अभिनेते धर्मेंद्रसोबत तिने सर्वाधिक चित्रपट केले.
अनिता राज ही बौद्ध धर्माच्या अनुयायी आहे. वयाच्या 59व्या वर्षीही ती आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ETimes TV ला दिलेल्या मुलाखतीत अनिता राज म्हणाल्या होत्या की तिच्या दिवसाची सुरुवात बौद्ध मंत्रांच्या जपाने होते. “फिटनेसचा प्रश्न येतो तेव्हा वैयक्तिकरित्या मी वेडी होते. मला तंदुरुस्त व्हायचे आहे. मी फिटनेससाठी वेळ काढायला विसरत नाही. मला सकाळी उठणे आवडते. मी 5:30 वाजता उठते आणि बौद्ध मंत्रांचा जप करते.” (स्रोत → 1, 2, 3)
40. रिनजिंग डेन्झोन्ग्पा (Rinzing Denzongpa)
रिनजिंग डेन्झोन्ग्पा हा एक भारतीय बॉलीवुड अभिनेता आहे, त्याने ‘स्क्वायड’ या 2021 च्या हिंदी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सिक्कीम मधील एका बौद्ध कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला, आणि प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोन्ग्पा यांचा तो मुलगा आहे.
41. नंदिता दास (Nandita Das)

नंदिता दास (जन्म 1969) ही एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिने दहा वेगवेगळ्या भाषांमधील 40 हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम केले आहे. फायर (1996), अर्थ (1998), बवंडर (2000), कन्नाथिल मुथमित्तल (2002), अझागी (2002), कमली (2006), आणि बिफोर द रेन्स (2007) यासह अनेक परफॉर्मन्ससाठी दासने प्रशंसा मिळविली. नंदिता दास नास्तिक आहे. “जर मी कोणत्याही गोष्टीशी जोडले तर ते कदाचित बौद्ध धर्म असेल,” असं ती म्हणाली. तिने विपश्यना केली, ही जी प्राचीन प्रथा होती ती गौतम बुद्धांनी शोधली होती. (स्रोत – 1, 2)
42. वीरा साथीदार (Vira Sathidar)

वीरा साथीदार (1960 – 2021) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. 2014 मध्ये आलेल्या साथीदारांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते, आणि सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती.
42. शेखर सुमन (Shekhar Suman)

शेखर सुमन (जन्म: 7 डिसेंबर 1962) हा एक भारतीय अभिनेता, अँकर, निर्माता, दिग्दर्शक आणि गायक आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. त्यांनी 30 हून अधिक हिंदी चित्रपट आणि 30 हून अधिक टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यांना एक मुलगा अध्ययन सुमन आहे, जो बॉलीवूड चित्रपट अभिनेता आहे. त्यांचा मोठा मुलगा आयुष याचे वयाच्या 11व्या वर्षी 3 एप्रिल 1995 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर शेखर सुमन यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. (स्रोत → 1, 2)
- सदर सेलिब्रिटी खरोखरच बौद्ध धम्माचे अनुयायी असल्याचे पुरावे लेखात संदर्भ/ स्रोत म्हणून जोडण्यात आलेले आहेत.
- सेलिब्रिटींच्या निळ्या रंगातील इंग्रजी नावांना विकिपीडियाचे दुवे जोडण्यात आले आहे, ज्यावर जाऊन तुम्ही त्या त्या सेलिब्रिटी विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
- हा लेख भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांची माहिती देणारा आहे, मात्र यानंतरचा लेख भारतातील बौद्ध गायक आणि गायिकांवर आहे. भविष्यामध्ये भारतातील बौद्ध राजकीय व्यक्तींची (खासदार व आमदार) माहिती सांगणारा लेख सुद्धा तयार करण्यात येईल.
- भारतातील बौद्ध सेलिब्रिटींविषयी आम्ही यापूर्वीही 2 लेख (हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये) बनवलेले आहेत, या लेखांमध्ये अभिनेते आणि गायक या दोन्हींचा समावेश होता – (हिंदी लेख येथे बघा आणि इंग्लिश लेख येथे बघा)
सारांश
मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण भारतीय बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्री (Buddhist actors in Marathi) यांची माहिती पाहिली. बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध सेलिब्रिटींविषयी (Buddhist celebrities in India) ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा, धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय
हे ही वाचलंत का?
- प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- ‘हे’ आहेत 20व्या शतकातील 5 सर्वश्रेष्ठ बौद्ध; जाणून घ्या बाबासाहेबांची ‘रँक’
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी (अभिनेते आणि गायक) – Buddhist Celebrities in India
- जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी
- जगातील ‘या’ 10 देशांत आहे सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या; जाणून घ्या भारताचा क्रमांक
- 1 कोटी की 10 कोटी? भारतात बौद्ध लोकसंख्या नेमकी आहे तरी किती?
- बौद्ध धर्म विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- डॉ. बाबासाहेबांचे 130 अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्थान आहेत – नाना पाटेकर
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी खालील बाजूस उजवीकडे असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)