भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण जीवन चरित्र तसेच त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी राजकीय नेत्या, माजी राज्यपाल आणि भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारताला पहिल्यांदाच ‘आदिवासी राष्ट्रपती’ मिळाला आहे.
25 जुलै 2022 पासून द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत.

25 जुलै 2022 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी संपला, तर द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाल सुरु झाला.
द्रौपदी मुर्मू जन्म 20 जून 1958 (ऊपरबेडा, ओडिशा) शिक्षण रमादेवी महिला महाविद्यालय, भुवनेश्वर (BA) राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी व्यवसाय राजकारणी व माजी शिक्षिका राजकीय पदे भारताच्या राष्ट्रपती (25 जुलै 2015 ते आजपर्यंत) झारखंडच्या राज्यपाल (2015 ते 2021) ओडिशाच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (2000 ते 2004) ओडिशाच्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (2002 ते 2004) ओडिशा विधानसभेच्या सदस्या (2000 ते 2009) निवास स्थान राष्ट्रपति भवन, दिल्ली पती श्यामचरण मुर्मू मुले दोन मुलगे (लक्ष्मण सिप्पुन) आणि एक मुलगी झाली. तथापि, त्यांचा मोठा मुलगा मुर्मू याचे निधन 2009 मध्ये तर लहान मुलगा महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू
राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या भारत देशाच्या –
- 15 व्या राष्ट्रपती आहेत.
- दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
- पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
- सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
- ओडिशा राज्यातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
- स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
त्या स्वातंत्र्योत्तर भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. या आधीच्या सर्व राष्ट्रपतींचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला होता. नरेंद्र मोदी सुद्धा स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत.
द्रौपदी मुर्मू यांची माहिती – Information about Draupadi Murmu
64 वर्षीय द्रौपदी श्यामचरण मुर्मू (जन्म 20 जून 1958) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अधिकृत उमेदवार म्हणून लढल्या, आणि विजयी झाल्या.
त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या. त्या ओडिशा राज्यातील आहेत.
त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. अनुसूचित जमातीची (ST) व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेली नाही.
मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीच्या (SC) दोन व्यक्ती राष्ट्रपती बनलेल्या आहेत — के.आर. नारायणन आणि रामनाथ कोविंद.
वैयक्तिक जीवन
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते.
1976 मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मूशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. तथापि, त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मण मुर्मू याचे निधन 2009 मध्ये तर लहान मुलगा सिप्पुन मुर्मू याचे निधन 2013 मध्ये झाले.
त्यानंतर पुढच्या वर्षी 2014 मध्ये त्यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचे देखील निधन झाले. अशा दुर्दैवी घटना त्यांच्या आयुष्यात एकानंतर एक घडल्या. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी, नातू आणि जावई आहेत. draupadi murmu in marathi
द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण – ऊपरबेडा गावाच्या मध्यभागी असलेल्या उत्क्रमित माध्यमिक शाळेत द्रौपदी मुर्मू यांनी शालेय शिक्षण घेतले. द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीए केले.
द्रौपदी मुर्मू यांना सहावी-सातवीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महंतो (वय 82 वर्ष) सांगतात की, द्रौपदी लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्रे वाचायच्या.
प्रेरणास्थान – द्रोपदी मुर्मू यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तिघांनी खूप प्रभावित केले आहे. त्यामुळे या तीन महापुरुषांना त्या आपले आदर्श मानतात.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवासमान आहेत. त्यांच्यामुळेच आज मी राष्ट्रपती बनू शकले” असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंनी फेब्रुवारी 2023 मध्ये म्हटले होते.

राजकीय कारकीर्द
राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री, व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.
त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले.
द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिल्या आहेत.
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.
द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, आणि त्यांचा कार्यकाळ 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत होता. एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या देखील होत्या.
भारताच्या राष्ट्रपती
जून 2022 मध्ये, पुढील जुलै महिन्यात होणाऱ्या 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली होती. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली होती.
भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे भारतातील अनेक राज्य सरकारे (आमदार) आणि लोकसभा व राज्यसभा (खासदार) यांमध्ये बहुमत असल्याने या निवडणुकीत त्यांची राष्ट्रपती बनण्याची शक्यता जास्त होती.
21 जुलै 2022 रोजी, मुर्मू यांनी 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा 28 पैकी 21 राज्यांमध्ये (पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशासह) 6,76,803 इलेक्टोरल मतांनी (एकूण 64.03%) पराभव करून बहुमत मिळवले.
द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या. प्रतिभा देवीसिंह पाटील ह्या भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती आहेत.
सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांचा 25 जुलै 2022 रोजी राष्ट्रपतीपदाचा शपथविधी झाला, या दिवशी त्यांचे वय 64 वर्षे 35 दिवस होते. यामुळे त्या देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या. आतापर्यंत सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे, 2 महिने, 6 दिवस होते.
भूषवलेली महत्त्वाची पदे
* भारताच्या 15व्या राष्ट्रपती : 25 जुलै 2015 ते आजपर्यंत
* झारखंडच्या 9वे राज्यपाल : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021
* ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)
* ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)
* ओडिशा विधानसभेच्या सदस्या – आमदार : (2000 ते 2009)
* अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
* नगरसेविका
Draupadi Murmu in Marathi
हे ही वाचलंत का?
- राजरत्न अशोक आंबेडकर यांचे जीवन चरित्र
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
Thank you for most valuable post… Very reliable & well written article….
Thank you so much for your important feedback.
this is great information. thank you.