बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक आहे आणि सुमारे 2,600 वर्षांपूर्वी भारतात त्याचा उगम झाला. गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माची माहिती आपण जाणून घेऊया. – Buddha Dharma information in Marathi
बौद्ध धर्माची माहिती | Buddha Dharma information in Marathi
आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने या आपण बौद्ध धर्माची माहिती ( Buddhist Information in Marathi ) जाणून घेणार आहोत.
बौद्ध धर्म हा ऐतिहासिकदृष्ट्या पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये सर्वात प्रमुख आहे, परंतु त्याचा प्रभाव पश्चिमेत सुद्धा वाढत आहे. अनेक बौद्ध विचार आणि तत्त्वज्ञान इतर धर्मांच्या विचारांशी ओव्हरलॅप होतात.
बौद्धांचा असा विश्वास आहे की तृष्णेमुळे मानवी जीवन हे दुःखमय आहे आणि ध्यान, आध्यात्मिक आणि शारीरिक श्रम आणि चांगले वर्तन हे आत्मज्ञान किंवा निर्वाण मिळविण्याचे मार्ग आहेत. ज्ञानाच्या या अवस्थेला पोहोचणारा गौतम बुद्ध हा पहिला मनुष्य होता आणि आजही आहे.
बौद्ध धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. बौद्ध धर्मास बुद्ध धर्म किंवा बौद्ध धम्म सुद्धा संबोधले जाते.
बौद्ध धर्माची शिकवण
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान : बौद्ध शिकवणुकींमध्ये खालील काही प्रमुख गोष्टी समाविष्ट आहेत :
- बौद्ध धर्माचे अनुयायी ईश्वर, देव किंवा देवता मानत नाहीत. त्याऐवजी ते आत्मज्ञान प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करतात – आंतरिक शांती आणि शहाणपणाची स्थिती. जेव्हा अनुयायी या आध्यात्मिक स्तरावर पोहोचतात, तेव्हा त्यांना निर्वाणाचा अनुभव आला असे म्हटले जाते.
- बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध यांना अद्वितीय व्यक्ती मानले जाते. तसेच त्यांना जागृत मनुष्य मानले जाते परंतु त्यांना देव, अवतार किंवा प्रेषित मानले जात नाही. बुद्ध या शब्दाचा अर्थ “ज्ञानी” असा होतो.
- नैतिकता, ध्यान आणि बुद्धीचा उपयोग करून ज्ञानप्राप्तीचा मार्ग प्राप्त होतो. बौद्ध लोक प्रामुख्याने ध्यान करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की ते सत्य जागृत करण्यात मदत करते.
- बौद्ध धर्मामध्ये अनेक तत्त्वज्ञान आणि व्याख्या आहेत, ज्यामुळे तो एक सहिष्णू आणि विकसित होणारा धर्म बनतो.
- काही विद्वान बौद्ध धर्माला ‘संघटित धर्म’ म्हणून मानत नाहीत, तर एक “जीवनपद्धती” किंवा “आध्यात्मिक परंपरा” म्हणून मानतात.
- तथापि, ‘धर्मा’साठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी बौद्ध धर्मामध्ये आहेत. त्यामुळे बौद्ध धर्म हा ‘धर्म’ देखील आहे आणि ‘तत्त्वज्ञान’, ‘जीवनपद्धती’ आणि ‘आध्यात्मिक परंपरा’ देखील आहे.
- बौद्ध धर्म आपल्या अनुयायांना आत्मभोग आणि आत्मत्याग टाळण्यास प्रोत्साहित करतो.
- भगवान बुद्धांच्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणींना चार आर्यसत्य म्हणून ओळखले जाते, ते बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत.
- बौद्ध लोक कर्म (कारण आणि परिणामाचा नियम) आणि पुनर्जन्म (पुनर्जन्माचे निरंतर चक्र) या संकल्पना स्वीकारतात. बौद्ध धर्मामधील कर्म व पुनर्जन्म या संकल्पना हिंदू धर्मातील कर्म व पुनर्जन्म या संकल्पनेंहून भिन्न आहेत.
- बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध विहारात किंवा स्वतःच्या घरात बुद्धांची पूजा करू शकतात.
- बौद्ध धर्मगुरू – भिक्खू व भिक्खुनी यांना कठोर आचारसंहिता पाळाव्या लागतात, ज्यामध्ये ब्रह्मचर्य सुद्धा समाविष्ट आहे.
- बौद्ध धर्माचे कोणतेही एक विशिष्ट असे चिन्ह नाही. परंतु अनेक प्रतिमा विकसित झाल्या आहेत ज्या बौद्ध विश्वासांचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात कमळाचे फूल, आठ आर्या असलेले धम्मचक्र, चोवीस आर्या असलेले अशोक चक्र, बोधिवृक्ष, पंचरंगी ध्वज आणि स्वस्तिक यांसारखी चिन्हे समाविष्ट होतात. स्वस्तिक हे एक प्राचीन बौद्ध चिन्ह आहे, ज्याचा अर्थ “कल्याण” असतो.
हेही पाहा : बौद्ध धर्माशी संबंधित 70 खास गोष्टी
बौद्ध धर्माचे संस्थापक
बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे इसवी सन पूर्व 7व्या-6व्या शतकात प्राचीन भारतात होऊन गेले आहेत. जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जात होते, परंतु ज्ञान प्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बुद्ध या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानी‘, किंवा ‘प्रबुद्ध‘ व्यक्ती असा होय.
गौतम बुद्ध यांची माहिती – बुद्ध हे पूर्वी कपिलवस्तू गणराज्याचे राजकुमार होते आणि त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता. कपिलवस्तू व लुंबिनी ही प्राचीन भारतातील दोन्ही स्थळे सध्या नेपाळमध्ये आहेत. बुद्धांचे ज्ञान प्राप्तीचे ठिकाण बोधगया, जेथे प्रथम प्रवचन दिले ते सारनाथ, जेथे महापरिनिर्वाण झाले ते कुशीनगर ही स्थळे भारतात आहेत.
बुद्धांचा जीवनकाळ विविध स्रोतांमध्ये भिन्न आढळतो. बौद्ध परंपरेनुसार आणि युनेस्कोच्या संकेतस्थळानुसार बुद्धांचा जीवनकाळ हा इ.स.पू. 623 ते 543 असल्याचे मानले जाते. तर यूरोपीय विद्वान गौतम बुद्धांचा काळ साठ वर्षे अलीकडे — इ.स.पू. 563 — 483— ओढतात. इ.स.पू. 623 ते 543 या जीवनकाळानुसार बौद्ध वर्ष (Buddhist Era) व बौद्ध कॅलेंडर काढले गेले आहे, आणि यानुसारच बुद्ध जयंती साजरी केली जाते. हा बुद्ध जीवनकाळ प्रचलित जीवन काळापेक्षा साठ वर्ष आधी आहे. यानुसार बुद्ध हे वर्धमान महावीरांपेक्षा (इ.स.पू. 599–527) पुर्वी जन्मले असल्याचे कळते.
बुद्धांनी आपले भव्य राजवैभव सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांना मध्यम मार्गाचा विचार सांगितला. भगवान बुद्धांना बोधिवृक्षाखाली ध्यान करताना ज्ञान मिळाले. ही अध्यात्मिक स्थिती कशी मिळवायची हे इतरांना शिकवण्यात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य घालवले.
इ.स.पू. 543 किंवा इ.स.पू. 483 मध्ये बुद्धांचे निर्वाण (निधन) झाले, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सुरू ठेवला. बुद्धांच्या शिकवणी बौद्ध धर्म म्हणून विकसित होण्याचा पाया बनल्या.
सिद्धार्थ गौतम यांचे ज्यावेळी ‘महापरिनिर्वाण’ (इ.स.पूर्व 543) झाले, तेव्हा पासून बुद्धाब्द अर्थात बौद्ध वर्षास प्रारंभ झाला. बौद्ध वर्ष म्हणजे बुद्धाचे जन्मवर्ष किंवा जयंतीवर्ष नव्हे. वर्ष 2023 च्या 3 मे (वैशाख पौर्णिमा) रोजी 2566वे बौद्धवर्ष होते (543+2023=2566); आणि याच दिवशी बुद्धांची 2646वी जयंती (2566+80=2646) होती.
हेही पाहा : बौद्ध वर्ष आणि बुद्ध जयंतीवर्ष यांत फरक काय आहे?
बौद्ध धर्माचा इतिहास : गौतम बुद्धांनी आपल्या हयातीत बौद्ध धम्माचा भारतभर प्रचार केला, आणि पुढील सहस्राब्दीमध्ये हा धर्म संपूर्ण आशिया आणि उर्वरित जगामध्ये पसरला.
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात, मौर्य भारतीय सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माला भारताचा राज्य धर्म बनवले. अशोक काळात हजारो बौद्ध मठ बांधण्यात आले आणि बौद्ध धर्माच्या प्रचाराला प्रोत्साहन देण्यात आले. पुढील काही शतकांमध्ये बौद्ध धर्म भारताच्या पलीकडे पसरू लागला. बौद्धांचे विचार आणि तत्त्वज्ञान वैविध्यपूर्ण बनले. त्यांच्या काही अनुयायी इतरांपेक्षा वेगळ्या कल्पनांचा अर्थ लावतात.
सहाव्या शतकात, हूणांनी भारतावर आक्रमण केले आणि शेकडो बौद्ध मठांचा नाश केला, परंतु या घुसखोरांना अखेर देशाबाहेर हाकलून देण्यात आले. मध्ययुगात इस्लामचा या प्रदेशात झपाट्याने प्रसार होऊ लागला आणि बौद्ध धर्माला उतरती कळा लागली. परंतु आधुनिक युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे बुद्धभूमीत बौद्ध धम्माला पुनर्जीवन मिळाले.
हेही पाहा : महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय सेलिब्रिटी
बौद्ध धर्माचे पंथ
आज जगभरात बौद्ध धर्माचे हजारो पंथ किंवा संप्रदाय अस्तित्वात आहेत. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे चार मुख्य संप्रदाय बौद्ध धर्मात समाविष्ट आहेत:
- थेरवाद बौद्ध धर्म : थायलंड, श्रीलंका, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार या देशांमध्ये प्रचलित आहे.
- महायान बौद्ध धर्म : चीन, जपान, तैवान, कोरिया, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांमध्ये प्रचलित आहे.
- तिबेटी बौद्ध धर्म : तिबेट, नेपाळ, मंगोलिया, भूतान, आणि दक्षिण रशिया व उत्तर भारताच्या काही भागांत प्रचलित आहे.
- नवयान बौद्ध धर्म : हा चौथा सर्वात मोठा बौद्ध संप्रदाय असून तो भारतात (प्रामुख्याने महाराष्ट्रात) प्रचलित आहे.
यापैकी प्रत्येक संप्रदाय काही विशिष्ट ग्रंथांचा आदर करतो आणि बुद्धांच्या शिकवणींचे थोडे वेगळे अर्थ लावतात. झेन बौद्ध धर्म आणि निर्वाण बौद्ध धर्म यांसारखे बौद्ध धर्माचे अनेक उपपंथ देखील आहेत.
बौद्ध धर्माच्या काही संप्रदायांमध्ये ताओवाद, शिंतो आणि बॉन सारख्या इतर धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या कल्पनांचा समावेश आहे.
नवयान बौद्ध धर्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतून विकसित झाला आहे. महायान व हीनयान यासारख्या पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये काही अंधश्रद्धा आणि कालबाह्य विचार बाबासाहेबांना आढळले. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला नवयान हा बुद्धांचा मूळ धम्म होय.
बौद्ध धर्मातील जाती : हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये जाती आढळत नाहीत. आपल्या सर्व अनुयायांना बौद्ध धम्म एक समान मानतो. तथापि भारतात अनेक जातींचे लोक (प्रामुख्याने विविध अनुसूचित जातींचे लोक) बौद्ध धर्माला मानणारे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींपैकी 53 मध्ये बौद्ध धर्मीय आढळले होते (पाहा). तसेच या राज्यातील 45 अनुसूचित जमातींपैकी सुमारे 40 मध्ये बौद्ध आढळले होते.
हेही पाहा : बौद्ध, महार व दलित यांची लोकसंख्या
धम्म
बुद्धांची शिकवण “धम्म” म्हणून ओळखली जाते. त्यांनी शिकवले की प्रज्ञा, शील, दयाळूपणा, संयम, औदार्य आणि करुणा हे महत्त्वाचे गुण आहेत.
विशेषतः सर्व बौद्ध पाच नैतिक नियमांनुसार जगतात, ज्यांना ‘पंचशील‘ म्हणून ओळखले जाते.
- हिंसा न करणे
- चोरी न करणे
- व्याभिचार न करणे
- खोटे न बोलणे
- मद्य व इतर मादक पदार्थांचे सेवन न करणे
चार आर्यसत्ये
चार आर्यसत्य ही बौद्ध धम्माचा पाया होय. सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यांना दिला होता व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती. बुद्धांनी शिकवलेली चार आर्यसत्ये खालीलप्रमाणे आहेत :
- जगात दुःख आहे.
- त्या दुःखाला कारण आहे.
- हे कारण म्हणजे तृष्णा होय.
- दुःख निवारण्याचा मार्ग (अष्टांगिक मार्ग) आहे.
एकत्रितपणे, ही तत्त्वे स्पष्ट करतात की मानवाला दुःख का होते आणि त्याने दुःखावर मात कशी मिळवावी. तृष्णा म्हणजे वासना, मोह, आवड, इच्छा आहे.
हेही पाहा : बौद्ध धर्माचा भारतीय समाजावरील प्रभाव
अष्टांगिक मार्ग
बुद्धांनी आपल्या अनुयायांना शिकवले की चौथ्या आर्य सत्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दुःखाचा अंत अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून प्राप्त केला जाऊ शकतो.
कोणत्याही विशिष्ट क्रमाने, बौद्ध धर्माचा अष्टांगिक मार्ग नैतिक आचरण, मानसिक शिष्यत्व आणि प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी खालील आदर्श शिकवतो:
- सम्यक दृष्टी
- सम्यक संकल्प
- सम्यक वाणी
- सम्यक कर्म
- सम्यक उपजीविका
- सम्यक व्यायाम
- सम्यक स्मृती
- सम्यक समाधी
बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ
बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता ? बायबल किंवा कुराण प्रमाणे बौद्धांचा कोणताही एक असा केंद्रीय धर्मग्रंथ नाही. बौद्ध लोक अनेक पवित्र ग्रंथ आणि धर्मग्रंथांचा आदर करतात. काही सर्वात महत्त्वाचे बौद्ध ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत:
- त्रिपिटक : “तीन टोपल्या” म्हणून ओळखले जाणारे हे ग्रंथ बौद्ध लेखनाचा सर्वात जुना संग्रह असल्याचे मानले जाते. यांना बौद्ध धर्माचे प्रमुख ग्रंथ मानले जाते.
- सूत्रे : 2,000 हून अधिक सूत्रे (सुत्त) आहेत, जी मुख्यतः महायानी बौद्धांनी स्वीकारलेल्या पवित्र शिकवणी आहेत.
- द बुक ऑफ द डेड : हा तिबेटी ग्रंथ मृत्यूच्या टप्प्यांचे तपशीलवार वर्णन करतो.
- द बुद्ध अँड हिज धम्म : हा नवयानी किंवा आंबेडकरवादी बौद्धांचा धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांचे चरित्र व त्यांच्या शिकवणुकी (धम्म) समाविष्ट आहे.
हेही पाहा : भारतीय इतिहासातील 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्ती
बौद्ध धर्माची लोकसंख्या
लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील तिसरा (किंवा चौथा) सर्वात मोठा धर्म आहे. वेगवेगळ्या अहवालात बौद्ध लोकसंख्या वेगवेगळी सांगितलेली आहे.
प्यु रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2010 च्या दशकात सुमारे 55 कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी होते, जे जगातील एकूण लोकसंख्येच्या 7% ते 8% आहे.
यामध्ये चीन, जपान आणि व्हिएतनाम या देशांतील बौद्धांची संख्या फारच कमी गणण्यात आली होती. आणि या अहवालात बौद्ध धर्माला ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथा सर्वात मोठा धर्म ठरवण्यात आले होते.
इतर अहवालांनुसार, बौद्ध धर्मियांची जगातील संख्या 120 कोटी ते 160 कोटी (किंवा 17% – 22%) असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार जगभरातील बौद्धांची संख्या मुस्लिमांच्या संख्येएवढी झाली होती आणि त्या लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्धांचा क्रमांक दुसरा किंवा तिसरा होता.
बौद्ध देश – भूतान, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, चीन, हाँगकाँग, जपान, तिबेट, लाओस, मकाऊ, मंगोलिया, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, थायलंड, काल्मिकिया, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. नेपाळ, भारत आणि मलेशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्ध लोक राहतात.
आपल्या भारत देशामध्ये 1 ते 7 कोटी (किंवा 1% ते 5%) बौद्ध आहेत. बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाला तर त्यांना ज्ञान प्राप्ती आणि त्यांचे निर्वाण भारतामध्ये झाले, परंतु या दोन्ही देशांमध्ये बौद्ध धर्म अल्पसंख्यांक आहे.
चीन हा बौद्धांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, तेथील 25 कोटी ते 70 कोटी (किंवा 18% ते 50%) लोकसंख्या बौद्ध आहे. चीनमध्ये मुख्यतः महायानच्या चिनी शाखांचे बौद्ध अनुयायी आहेत, ज्यामुळे हा बौद्ध संप्रदाय बौद्धांचा सर्वात मोठा भाग आहे.
हेही पाहा : सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले 10 देश
बौद्ध धर्मातील सण व उत्सव
दरवर्षी, बौद्ध लोक वैशाख पौर्णिमा साजरा करतात, हा सण बुद्धांचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू यांचे स्मरण करतो. वैशाख पौर्णिमेलाच वेसाक, बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती म्हणूनही ओळखले जाते.
भारतभर दसरा किंवा विजयादशमी साजरी होत असताना, बौद्ध धर्माचे अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभात भाग घेतात. या दिवशी 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.
जगभरातील बौद्ध अनेक सण-उत्सव साजरा करतात, तसेच ते इतर अनेक वार्षिक उत्सवांमध्ये भाग घेतात.
सारांश
या लेखामध्ये आपण बौद्ध धर्माची माहिती (Buddhism in marathi) माहिती जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून किंवा ईमेलद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.
FAQs
Que. 1) सर्वात जास्त बौद्ध लोक कोणत्या राज्यात आढळतात ?
उत्तर – सर्वात जास्त बौद्ध लोक महाराष्ट्र राज्यात आढळतात.
Que. 2) जगातील सर्वात मोठा धर्म कोणता ?
उत्तर – ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
Que. 3) भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे ?
उत्तर – हिंदू धर्म हा भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे.
Que. 4) जगातील सर्वात जुना धर्म कोणता ?
उत्तर – हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे.
हे ही वाचलंत का?
- राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र
- डॉ. आंबेडकरांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत :
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नव-नवीन लेखांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी उजवीकडील खालील बाजूस असणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी ई-मेल करु शकता.
धन्यवाद या अप्रतिम माहिती बद्दल
Very helpful information
Je kahi buddha baddal mala mahite navte aaj me te vachle mala khup changle vatat aahe aapan asé spardha gheun asech samajprobodhan karat rha, pravin jamnik sir …jay bhim
30 ही लेखांची एक लहान शि पुस्तिका तयार करण्यात आली असती तर बर होईल ?
आकाश सर, ३० लेख हे सतत अपडेट होत असल्यामुळे त्यांना पुस्तकरूपाने प्रकाशित करणे योग्य राहणार नाही.