अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावरील त्यांचा लेख दरवर्षी सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पहिल्या 20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट होतो. या लेखात त्यासंबंधीचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. जुलै 2015 पासून आजपर्यंत विकिपीडियावर त्यांचा लेख 14,00,000 पेक्षा जास्त वेळा वाचला गेला आहे. – Anna Bhau Sathe Wikipedia

अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 — 18 जुलै 1969) हे मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय परिवर्तनावर आधारलेले होते.
अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. या लेखात आपण “अण्णा भाऊ साठे आणि विकिपीडिया” याबाबत विविध पैलूंवर चर्चा करू. महाराष्ट्रात आणि भारतात दरवर्षी असंख्य लोक मराठी विकिपीडियावर त्यांच्या जीवनाविषयी माहिती वाचतात.
विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश असून तो 300 हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यातील काही प्रमुख म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि मराठी विकिपीडिया.
2016 ते 2024 या 9 वर्षांत, मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 चरित्रांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा समावेश आहे. मात्र, त्यांचा लेख नेहमी 11 ते 20व्या स्थानी (टॉप-20) राहिला आहे. 2022 हे एकमेव वर्ष होते जेव्हा हा लेख टॉप-10 मध्ये म्हणजे 10व्या स्थानी पोहोचला.
अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र किती विकिपीडिया भाषांमध्ये आहे?
आज (एप्रिल 2025 मध्ये) अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र केवळ 6 विकिपीडिया भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी 3 परदेशी भाषा आहेत:
- मराठी विकिपीडिया
- इंग्रजी विकिपीडिया
- रशियन विकिपीडिया
- इजिप्शियन अरेबिक विकिपीडिया
- हिंदी विकिपीडिया
- तेलगू विकिपीडिया
जरी इंग्रजी विकिपीडिया हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचला जात असला, तरीही अण्णाभाऊ साठे यांचा मराठी विकिपीडियावरील लेख इंग्रजी विकिपीडियापेक्षा जास्त वाचला गेला आहे.
विकिपीडियावरील वाचकसंख्या (views)
1 जुलै 2015 पासून विकिपीडियाने लेखांच्या वाचकसंख्येचा (pageviews) तपशील उपलब्ध केला. 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राला खालीलप्रमाणे वाचकसंख्या मिळाली:
- मराठी विकिपीडिया: 14,15,000 views
- इंग्रजी विकिपीडिया: 7,65,658 views
- रशियन विकिपीडिया: 1,700 views
1 जुलै 2015 ते 30 जून 2021 या 6 वर्षांत तिन्ही विकिपीडियांवरील एकूण views = 10,73,524
विकिपीडियावर अण्णा भाऊ साठे यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला जातो. विशेषतः मराठीत त्यांचा प्रभाव अधिक आहे. त्यांच्या लेखाची टॉप-20 लोकप्रिय मराठी चरित्रांमध्ये कायम असलेली उपस्थिती हे त्याच्या प्रचंड लोकप्रियतेचे प्रमाण आहे. – Anna Bhau Sathe Wikipedia
अण्णा भाऊ साठे – मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडिया (mr.wikipedia.org) वरील अण्णा भाऊ साठे यांच्या लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
कालावधी | वाचकसंख्या (views) | Rank (20 व्यक्तींमध्ये) |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2015 | 19,284 | 19वी rank |
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 | 56,384 | 16वी rank |
1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 | 1,20,251 | 13वी rank |
1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 | 1,07,093 | 12वी rank |
1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 | 1,99,862 | 14वी rank |
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 | 1,14,322 | 16वी rank |
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 | 28,315 | --- |
1 जुलै 2015 - 30 जून 2021 | 6,45,511 | 14वी rank |
मराठी विकिपीडिया वरील अण्णा भाऊ साठे यांच्या लेखाचा वाचकसंख्येचा आलेख
मराठी विकिपीडिया (mr.wikipedia.org) वरील अण्णा भाऊ साठे यांच्या लेखाला मिळालेली वाचकसंख्या (व्ह्यूज) आणि टॉप-20 व्यक्तींमध्ये असलेले स्थान खालीलप्रमाणे आहे:
वर्ष | वाचकसंख्या (Views) | लोकप्रियतेचा क्रम (Rank) |
---|---|---|
2015 (जुलै – डिसेंबर) | 19,284 | 19वे |
2016 | 56,384 | 16वे |
2017 | 1,20,251 | 13वे |
2018 | 1,07,093 | 12वे |
2019 | 1,99,862 | 14वे |
2020 | 1,14,322 | 16वे |
2021 | 1,28,016 | 12वे |
2022 | 1,90,426 | 10वे |
2023 | 2,11,669 | 11वे |
2024 | 1,56,265 | 13वे |
वर्षानुसार संक्षिप्त विश्लेषण:
- 2015: शेवटच्या सहा महिन्यांत 19,284 वाचकसंख्या मिळाली आणि लेख 19व्या स्थानी राहिला.
- 2016: 56,384 views मिळाले आणि लेख 16व्या स्थानावर पोहोचला.
- 2017: वाचकसंख्या दुपटीने वाढून 1,20,251 झाली, आणि लेख 13व्या स्थानी आला.
- 2018: वाचकसंख्या किंचित घसरली (1,07,093), पण लेखाचे स्थान 12वे राहिले.
- 2019: लेखाची वाचकसंख्या 1,99,862 इतकी झाली, परंतु स्थान 14वे झाले.
- 2020: वाचकसंख्या घटून 1,14,322 झाली, आणि क्रमवारीत घसरण होऊन 16वे स्थान मिळाले.
- 2021: 1,28,016 views मिळाले, आणि लेख पुन्हा 12व्या स्थानी पोहोचला.
- 2022: लेख पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये (10वे स्थान) पोहोचला आणि 1,90,426 views मिळाले.
- 2023: विकिपीडियावर सर्वाधिक views (2,11,669) मिळाले, परंतु स्थान 11वे राहिले.
- 2024: वाचकसंख्या 1,56,265 झाली आणि लेख 13व्या स्थानी आला.
अण्णा भाऊ साठे यांच्या लेखाची वाचकसंख्या वर्षानुवर्षे बदलत गेली, परंतु 2019 ते 2023 दरम्यान हा लेख सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाचला गेला. विशेषतः जुलै-ऑगस्ट महिन्यात (त्यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी) वाचकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मराठी विकिपीडियावरील हा लेख अजून अधिक तपशीलवार आणि माहितीपूर्ण केल्यास भविष्यात याला आणखी मोठी लोकप्रियता मिळू शकते.

- अण्णा भाऊ साठे लेखाला महिन्याभरातील सर्वाधिक views जुलै 2018 महिन्यात मिळाले होते – 84,909
- अण्णा भाऊ साठे लेखाला दिवसभरातील सर्वाधिक views 1 ऑगस्ट 2018 रोजी मिळाले होते – 33,986
Anna Bhau Sathe Wikipedia
Anna Bhau Sathe – इंग्लिश विकिपीडिया
इंग्लिश विकिपीडिया (en.wikipedia.org) वरील Anna Bhau Sathe अण्णा भाऊ साठे लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
Anna Bhau Sathe – इंग्रजी विकिपीडिया
इंग्रजी विकिपीडिया (en.wikipedia.org) वरील Anna Bhau Sathe या लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत:
वर्ष | वाचकसंख्या |
---|---|
2015 (जुलै – डिसें.) | 44,657 |
2016 | 65,782 |
2017 | 73,370 |
2018 | 85,003 |
2019 | 83,586 |
2020 | 60,789 |
2021 | 54,606 |
2022 | 83,339 |
2023 | 1,06,794 |
2024 | 93,211 |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2024 या एकूण साडेनऊ वर्षांत इंग्रजी विकिपीडियावरील Annabhau Sathe या लेखाला मिळालेल्या एकूण वाचकसंख्येचा आकडा 7,47,137 आहे.

- Annabhau Sathe लेखाला महिन्याभरातील सर्वाधिक views जुलै 2018 महिन्यात मिळाले होते – 26,418
- Annabhau Sathe लेखाला दिवसभरातील सर्वाधिक views 1 ऑगस्ट 2018 रोजी मिळाले होते – 13,131
अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
anna bhau sathe speciality
anna bhau sathe information in marathi
Аннабхау Сатхе – रशियन विकिपीडिया
रशियन विकिपीडिया (ru.wikipedia.org) वरील अण्णा भाऊ साठे (Аннабхау Сатхе) यांच्या लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
20 सप्टेंबर 2020 – 30 जून 2021 — 239 pageviews
- 1 जानेवारी 2021 – 30 जून 2021 — 134 pageviews (अलीकडील 6 महिने)
- 20 सप्टेंबर 2020 – 31 डिसेंबर 2020 — 105 pageviews
रशियन विकिपीडियावर अण्णा भाऊ साठे यांचा Аннабхау Сатхе लेख 20 सप्टेंबर 2020 रोजी निर्माण करण्यात आला. मात्र या नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या लेखाला अवघी 239 वाचकसंख्या मिळाली. (मूळ स्रोत बघा) अण्णा भाऊ साठे यांनी रशियाला भेट दिलेली आहे, आणि तो जीवनप्रवास पुस्तक रूपाने सुद्धा मांडलेला आहे.
Anna Bhau Sathe Wikipedia
शीर्षक
मराठी विकिपीडियावरील साठे यांच्या लेखाचे शीर्षक सुरुवातीला “तुकाराम भाऊराव साठे” असे होते. त्यानंतर विकी संपादक नात्याने मी ते बदलले, व “अण्णा भाऊ साठे” असे समर्पक शीर्षक ठेवले. येथे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे की या ठिकाणी “अण्णाभाऊ” असा एक शब्द न वापरता, “अण्णा भाऊ” असे दोन शब्द वापरले गेले आहेत. साठेंचे नाव “तुकाराम” उर्फ “अण्णा” होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव “भाऊ” होते. “अण्णा” व “भाऊ” या दोन नावांना एकत्रित “अण्णाभाऊ” असे लिहिणे चूकीचे आहे. म्हणून त्यांचा “अण्णाभाऊ साठे” असा अशुद्ध वा चुकीचा उल्लेख टाळत “अण्णा भाऊ साठे” असे लिहिले गेले पाहिजे.
20 सप्टेंबर 2020 रोजी रशियन विकिपीडियावर साठेंचा लेख लिहिला गेला, आणि 24 एप्रिल 2021 रोजी त्या लेखाचे शीर्षक बदलण्यात आले.
इंग्लिश विकिपीडियावर अण्णा भाऊंचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिले (Annabhau Sathe) गेलेले आहे. ते Anna Bhau Sathe असे लिहायला पाहिजे. आणि रशियन विकिपीडियाने सुद्धा इंग्लिश विकिपीडियाचे अनुसरण सुद्धा केले आहे.
साठे यांचा जन्मदिवस (Annabhau sathe jayanti) 1 ऑगस्ट हा आहे. या दिवशी त्यांच्या लेखाला अत्यधिक व्ह्यूज मिळतात.
मराठी विकिपीडियावर, अण्णा भाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेले अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) व्यक्ती होय.
anna bhau sathe speciality
anna bhau sathe information in marathi
बाह्य दुवे
हेही वाचलंत का?
- Wikipedia पर भी Popular है डॉ. आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख डॉ. बाबासाहब आंबेडकर का है
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)