आज गांधी जयंती – महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. 1969 ला जन्मलेले महात्मा गांधी हे भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. – Mahatma Gandhi facts in Marathi
महात्मा गांधी यांना जाऊन 70 पेक्षा जास्त वर्षे झाली तरीही त्यांची लोकप्रियता अफाट वाढलेली दिसते. Gandhi jayanti in Marathi
महात्मा गांधी यांच्या बद्दल माहिती (Mahatma Gandhi in Marathi) आपण जाणणार आहोत. ज्यामध्ये महात्मा गांधींच्या लोकप्रियतेविषयी काही रंजक आणि महत्त्वपूर्ण अशा खास गोष्टी समाविष्ट आहेत. Mahatma Gandhi facts in Marathi
महात्मा गांधी यांच्याबद्दल काही खास व रंजक गोष्टी, ज्यावरून त्यांच्या अफाट लोकप्रियतेची प्रचिती येते…
1. महात्मा गांधी हे इंग्लिश विकिपीडियावरील “सर्वात लोकप्रिय भारतीय व्यक्ती” आहेत, कारण अन्य कुठल्याही भारतीय व्यक्तीपेक्षा त्यांचा इंग्लिश विकिपीडियावरील लेख सर्वात जास्त वेळा (5,17,09,852) वाचला गेला आहेत. Mahatma Gandhi is the most viewed Indian personality on English Wikipedia.
2. महात्मा गांधी हे “आधुनिक काळातील सर्वात लोकप्रिय भारतीय व्यक्ती” आहेत, त्यांच्यानंतर क्रमांक लागतो तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा.
3. व्यक्तींच्या लोकप्रियतेची माहिती गोळा करणाऱ्या Pantheon च्या ‘हिस्टॉरिकल पॉप्युलरिटी इंडेक्स 2022’ नुसार, सर्वकालीन सर्वात लोकप्रिय भारतीयांमध्ये महात्मा गांधी हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांचा हिस्टॉरिकल पॉप्युलरिटी इंडेक्स (HPI) 100 पैकी 88.49 आहे.
आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय भारतीयांमध्ये पहिल्या स्थानावर गौतम बुद्ध येतात, आणि त्यांचा ऐतिहासिक लोकप्रिय निर्देशांक (HPI) 90.82 आहे. तर HPI – 82.44 असणारे चक्रवर्ती सम्राट अशोक हे तिसरे सर्वात लोकप्रिय भारतीय ठरले आहेत.
4. विकिपीडिया हा 325 पेक्षा जास्त भाषांमध्ये (आवृत्ती) उपलब्ध आहेत. महात्मा गांधी यांचे चरित्रलेख तब्बल 189 विकिपीडियांवर उपलब्ध आहेत, जे की गौतम बुद्ध यांच्या चरित्रलेखांनंतर (195) सर्वाधिक आहेत. विकिपीडियावर सर्वाधिक चरित्रलेख उपलब्ध असणाऱ्या व्यक्तींमध्ये बुद्ध व गांधी यांच्यानंतर रवींद्रनाथ टागोर (152) यांचा नंबर लागतो.
- हे सुद्धा पहा – टॉप 36 लोकप्रिय भारतीय व्यक्तींची यादी; ज्यांचे 90+ विकिपीडियांवर चरित्रलेख उपलब्ध आहेत
5. भारतात सर्वाधिक पुतळे असणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधी हे दुसऱ्या स्थानी आहेत. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे गांधींपेक्षा जास्त आहेत.
6. भारताखेरीज विदेशांमध्ये सर्वाधिक पुतळे असणाऱ्या भारतीय व्यक्तींमध्ये सुद्धा महात्मा गांधी दुसऱ्या क्रमांकावर येतात. त्यांच्याआधी केवळ गौतम बुद्ध आहेत, ज्यांचे भारताबाहेर जगभरात लक्षावधी पुतळे उभारण्यात आलेले आहेत. महात्मा गांधी यांचे विदेशांत 110 पेक्षा अधिक पुतळे उभारलेले आहेत.
7. महात्मा गांधी यांच्यावर एक लाख पेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. जगभरातील लेखकांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गांधींबद्दल पुस्तके लिहिली आहेत.
8. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस युनायटेड नेशन्स द्वारे “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” म्हणून साजरा केला जातो.
9. भारतीय स्वतंत्र चळवळीतील अग्रणी नेत्यांमध्ये महात्मा गांधींना महाराष्ट्र वगळता इतर सर्वच भारतीय राज्यांमध्ये सर्वात जास्त वेळा Google वर शोधले जाते. केवळ महाराष्ट्रामध्ये डॉ. आंबेडकरांचा Google search गांधींपेक्षा जास्त आहे.
जगभरातील Google search मध्ये भारतीय स्वतंत्र चळवळीतील अग्रणी नेत्यांमध्ये गांधींनंतर दुसऱ्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर तिसऱ्या क्रमांकावर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत.
10. 24 भारतीय भाषांमधील विकिपीडियावर देखील महात्मा गांधी अत्यंत लोकप्रिय आहे.
11. 1 लाख 40 हजार पेक्षा जास्त आर्टिकल्स असणाऱ्या हिंदी विकिपीडियावर सर्वाधिक वाचला जाणारा चरित्रलेख हा महात्मा गांधी यांचाच आहे. जुलै 2015 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये महात्मा गांधींचा हिंदी विकिपीडियावर लेख तब्बल 81,99,906 वेळा वाचला गेला होता.
गांधींच्या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर क्रमशः डॉ. बाबासाहेब आंबेडकर (63,29,821 pageviews) आणि प्रेमचंद (48,81,763) आहेत.
12. महाराष्ट्राचा विचार करता, मराठी लोकांमध्ये सुद्धा महात्मा गांधी प्रचंड लोकप्रिय आहेत. केवळ छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोघांचा अपवाद वगळता मराठी विकिपीडियावरील महात्मा गांधींचा चरित्रलेख अन्य कुठल्याही मराठी वा अमराठी व्यक्तीपेक्षा जास्त वाचला जातो.
जुलै 2015 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये, मराठी विकिपीडियावरील “शिवाजी महाराज” (36,23,361 views), “बाबासाहेब आंबेडकर” (31,31,014) आणि “महात्मा गांधी” हे 3 सर्वाधिक लोकप्रिय लेख आहेत.
13. महात्मा गांधी हे असे एकमेव भारतीय आहेत ज्यांचे टपाल तिकीट जगातील सर्वाधिक देशांनी प्रकाशित केले आहे.
14. वेगवेगळ्या अहवालांनुसार, जगाच्या इतिहासातील, आजपर्यंतच्या 10 सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ दोन भारतीयांचा समावेश केला गेला आहे — गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी.
15. महात्मा गांधी यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळू शकेल नाही, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील प्रदान केला गेला नाही. मात्र ते या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
16. 2004 मधील Great South Africans नावाच्या सर्वेक्षणामध्ये महात्मा गांधी हे Nelson Mandela, Christiaan Barnard आणि F. W. de Klerk यांच्यानंतर चौथे “सर्वश्रेष्ठ दक्षिण आफ्रिकन” ठरले होते.
17. 2006 मधील The Top 100 Historical Persons in Japan नावाच्या सर्वेक्षणामध्ये महात्मा गांधी हे 31 व्या क्रमांकावर होते.
महात्मा गांधी यांच्या बद्दल माहिती सांगणार्या या खास गोष्टी (Mahatma Gandhi facts in Marathi) तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी कोणती गोष्ट जास्त खास वाटते?
महात्मा गांधींबद्दल अन्य एखादा महत्त्वाचा वा रंजक फॅक्ट तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सुद्धा कळवा.
लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पर जरूर शेअर करा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- आमिर खान – डॉ. बाबासाहेब आंबेडकर से बहुत प्रेरणा मिली है
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)