जगातील अनेक देशांमध्ये एखादा धर्म बहुसंख्य असतो, ज्याला त्या देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणूनही ओळखले जाते. बौद्ध धर्म हा जगातील सुमारे 20 देश आणि प्रजासत्ताकांमध्ये बहुसंख्य आहे आणि तो त्या देशांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, आणि तेथील राजकारण यांवर आपली मजबूत पकड ठेवतो. – जगात किती बौद्ध देश आहेत
या लेखात आपण जगात किती बौद्ध देश आहेत हे जाणून घेऊया. बौद्ध धर्म बहुसंख्य असलेल्या बौद्ध देशांची नावे आणि यादी आम्ही येथे सादर करू. ज्याप्रमाणे मानवी संस्कृतीची प्रगती झाली, त्याच प्रकारे धर्म देखील जन्माला आले आणि तेही पुढे जात राहिले.
आज जगात 4 प्रमुख धर्म आहेत – ख्रिश्चन, बौद्ध, इस्लाम आणि हिंदू धर्म. हे 4 विश्व धर्म सर्वात जास्त लोकसंख्या असलेले धर्म आहेत. जगातील सर्वात मोठ्या धर्माबद्दल बोलायचे झाले तर तो ख्रिश्चन धर्म आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 2.2 अब्ज (220 कोटी) आहे.
बौद्ध धर्माच्या लोकसंख्येचा एक अचूक अंदाज नाही. वेगवेगळ्या अहवालांनुसार वा अंदाजांनुसार, जगातील बौद्धांची लोकसंख्या वेगवेगळी सांगितली जाते. त्यांमध्ये बौद्ध धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने कधी इस्लामपेक्षा मोठा, कधी इस्लामच्या बरोबरीचा तर कधी इस्लामपेक्षाही लहान असल्याचे देखील म्हटले जाते.
म्हणजेच बौद्ध धर्म हा जगातील दुसरा किंवा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. तथापि, अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात, बौद्ध धर्माला हिंदू धर्मापेक्षा लहान आणि जगातील चौथा सर्वात मोठा धर्म म्हणून नोंदवण्यात करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात प्रामुख्याने चीन, जपान आणि व्हिएतनाममधील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बौद्ध लोकसंख्येची योग्य मोजणीच नाही केली; तर तेथील बौद्ध लोकसंख्या फारच कमी सांगितली!
हेही पाहा : बौद्ध वर्ष आणि बुद्ध जयंतीवर्ष यांत फरक काय आहे?
जगात किती बौद्ध देश आहेत – जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आढळतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक सुद्धा जगातील बहुतेक देशांमध्ये राहतात. तसेच हिंदू धर्माला मानणारे जगातील अनेक देशांमध्येही आढळतात.
अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लामचे पालन करणारे बहुसंख्य आहेत, ज्यापैकी अनेकांनी स्वतःला अधिकृतपणे ख्रिश्चन राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र किंवा बौद्ध राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये हिंदू धर्म बहुसंख्य असला तरी कोणालाही अधिकृतपणे हिंदू राष्ट्र घोषित केले गेले नाही.
जगातील 43 देशांनी स्वत:ला अधिकृतरीत्या धार्मिक देश घोषित केले आहे. त्यापैकी 27 देशांनी स्वत:ला इस्लामिक, 13 नी ख्रिश्चन तर 4 नी बौद्ध म्हटले आहे. (बातमी)
जगात किती बौद्ध देश आहेत?
How many Buddhist countries are there in the world?
संपूर्ण जगात एकूण 14 बौद्ध देश आणि 4 प्रजासत्ताक राज्य आहेत (एकूण 18), जिथे बौद्ध धर्म सर्वात प्रभावशाली किंवा सर्वात मोठा धर्म आहे. इतर धर्मांच्या तुलनेत या देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी सर्वाधिक असल्याने तेथील इतिहास, संस्कृती, समाज, आणि स्थानिक राजकारण यांवर बौद्धांचा प्रभाव आढळतो.
भूतान, चीन, म्यानमार (बर्मा) आणि श्रीलंका या भारताच्या शेजारील देशांमध्ये बौद्ध धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. बौद्ध बहुसंख्य असलेले हे सर्व देश आशिया खंडातील आहेत. या सर्व देशांमध्ये बहुसंख्य बौद्ध लोक आहेत, म्हणून त्यांनी स्वतःला अधिकृतपणे बौद्ध राष्ट्र म्हणून घोषित केले आहे, असे नाही.
या 18 पैकी फक्त 6 असे देश आहेत जे अधिकृत बौद्ध राष्ट्र किंवा बौद्ध देश आहेत. कारण या देशांच्या संविधानांमध्ये बौद्ध धर्माला ‘राष्ट्रधर्म‘ (राज धर्म किंवा अधिकृत धर्म) किंवा “विशेष दर्जा” देण्यात आला आहे. या अधिकृत बौद्ध देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – श्रीलंका, कंबोडिया, भूतान आणि म्यानमार हे चार देशांचा ‘अधिकृत धर्म’ बौद्धधर्म आहे; तर थायलंड आणि लाओस या दोन देशांच्या संविधानात बौद्ध धर्माला विशेष स्थान दिलेले आहे.
हेही पाहा : महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीय सेलिब्रिटी
अमेरिकेसारखा सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला सर्वात मोठा देश असो वा इंडोनेशिया सारखा सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असो, तेथेही तुम्हाला बौद्ध धर्माचे अनुयायी दिसतील, जरी त्यांची लोकसंख्या तेथे फारशी नाही. चीन हा जगातील सर्वात मोठा बौद्ध देश आहे.
चीन बौद्ध टक्केवारी – एका अंदाजानुसार, चीनमधील सुमारे 50% ते 80% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. म्हणजेच 140 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमधील 73 कोटी ते 115 कोटी जनता बौद्ध धर्मीय आहे. तथापि, अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात, केवळ 18.2% चिनी लोक बौद्ध अनुयायी असल्याचे सांगितले आहे!
दुसरीकडे, जपानी सरकारच्या एजन्सी फॉर कल्चरल अफेअर्सच्या अंदाजानुसार, 2018 च्या अखेरीस, सुमारे 8.40 कोटी किंवा सुमारे 67% जपानी लोकसंख्येसह, बौद्ध धर्म हा जपानमधील सर्वात जास्त अनुयायी असलेला धर्म आहे.
मात्र प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार, 2010 मध्ये, जपानमधील अवघे 36.2% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी असल्याचे सांगितले. प्यू रिसर्च सेंटरच्या असल्या अंदाजामुळेच जगातील 130 ते 180 कोटी असलेली बौद्धांची लोकसंख्या ही 50-55 कोटी इतकी कमी दिसतेय. याबद्दल चर्चा स्वतंत्र लेखात करुया.
बौद्ध देशांची नावे आणि यादी
जगातील 14 बौद्ध देशांची नावे आणि यादी खालीलप्रमाणे आहे. List of Buddhist countries in the world
- कंबोडिया (98% बौद्ध)
- लाओस (67 – 98% बौद्ध)
- मंगोलिया (93% बौद्ध)
- जपान (84 – 96% बौद्ध)
- थायलंड (95% बौद्ध)
- भूतान (75 – 94% बौद्ध)
- तैवान (93% बौद्ध)
- चीन (33 – 50 – 80% बौद्ध)
- म्यानमार (90% बौद्ध)
- व्हिएतनाम (75 – 85% बौद्ध)
- श्रीलंका (70 – 71% बौद्ध)
- उत्तर कोरिया (50 – 74% बौद्ध)
- दक्षिण कोरिया (38 – 50% बौद्ध)
- सिंगापूर (51 – 67% बौद्ध)
एका अंदाजानुसार, या सर्व 14 देशांमध्ये बौद्धांची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे, म्हणून हे देश बौद्ध देशांच्या श्रेणीमध्ये ठेवले आहेत. जर आपण बौद्ध बहुसंख्य असलेले रशियाचे तीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे एक बेट पाहिले तर मग जगात एकूण 18 बौद्ध देश आणि प्रजासत्ताक असतील जिथे बौद्ध धर्म बहुसंख्य आहे.
जर त्यात चीनच्या तीन स्वायत्त प्रांतांचाही समावेश केला तर जगात 21 बौद्ध देश, प्रजासत्ताक आणि स्वायत्त प्रांत असतील. बौद्ध धर्म हा हिंदू बहुल नेपाळ आणि मुस्लिम बहुल मलेशिया आणि ब्रुनेई मध्ये दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.
जगातील बौद्ध धर्माची टक्केवारी किती आहे ? जगातील लोकसंख्येच्या 18% ते 26% बौद्ध आहेत; म्हणजेच जगातील 130 कोटी ते 180 कोटी लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
हेही पाहा : बौद्ध धर्माची प्राथमिक माहिती
चीनच्या 3 स्वायत्त प्रांतांमध्ये बौद्धांची सर्वात मोठी संख्या आहे.
15. हाँगकाँग (67 – 91% बौद्ध)
16. मकाऊ (80% बौद्ध)
17. तिबेट (80 – 90% बौद्ध)
ऑस्ट्रेलियाचे ख्रिसमस बेट (19% – 46% बौद्ध) आणि
रशियाच्या काही प्रजासत्ताक (republic) प्रांतांमध्ये बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे.
18. तुवा (Tuva) : 62% बौद्ध
19. काल्मीकिया (Kalmykia) : 48 – 53% बौद्ध
20. बुरियाटिया (Buryatia) : 20% बौद्ध
21. झाबायकाल्स्की क्राय (Zabaykalsky Krai) : 15% बौद्ध
भारतातील लडाख (40% – 50%) आणि सिक्कीम (27% – 30%) मधे लक्षणीय बौद्ध लोकसंख्या आहे.
या 14 देशांमध्ये 1 अब्ज ते 1.5 अब्ज (100 कोटी ते 150 कोटी) बौद्ध राहतात. उर्वरित 15-20 कोटी बौद्ध जगातील अन्य देशांमध्ये स्थायिक आहेत. भारतातील बौद्ध धर्माची टक्केवारी – भारतात अधिकृतपणे 1 कोटी बौद्ध (1%) लोक आहेत.
तथापि, काही सर्वेक्षणांमध्ये भारतातील बौद्ध लोकसंख्या 3%, 5%, 6% आणि अगदी 9% (म्हणजे 5 कोटी ते 10 कोटी) सुद्धा सांगण्यात आली आहे. भारतातील दलितांचा मोठा हिस्सा बौद्ध धर्माचे पालन करतो परंतु देशाच्या जनगणनांमध्ये त्यांचा अधिकृतपणे ‘बौद्ध’ म्हणून उल्लेख होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात.
हेही पाहा : बौद्ध धर्माशी संबंधित 70 खास गोष्टी
तर आता तुम्हाला माहित झाले असेलच की जगात किती बौद्ध देश आहेत. एका अहवालानुसार, जगातील 10 पैकी 8 लोक कोणत्या ना कोणत्या धर्माचे पालन करतात. उरलेले लोक कोणत्याही धर्माला मानत नसले तरी अशा लोकांची लोकसंख्याही खूप मोठी आहे.
चीनमध्ये बरेच लोक नास्तिक आहेत म्हणजे असे लोक जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. बौद्ध लोक देखील देवावर विश्वास ठेवत नाहीत. नास्तिक हे निधर्मी असेलच असे नाही म्हणून, जे लोक चीनच्या लोकसंख्येमध्ये नास्तिक आहेत, त्यातील बहुतांश बौद्ध धर्माचे अनुयायी देखील आहेत.
प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजामधे, चीनच्या नास्तिकांना ‘निधर्मी’ (कोणत्याही धर्मावर विश्वास न ठेवणारे) मानले गेले आहे आणि या कारणामुळे तेथील बौद्ध धर्माची लोकसंख्या खूप कमी लेखली गेली आहे. चीनमधील लोक पारंपारिक चिनी धर्म तसेच बौद्ध धर्माचे पालन करतात.
”कन्फ्यूशियनिझम, ताओवाद आणि बौद्ध धर्म” ह्या तीन विचारधारा चिनी धर्मांमध्ये समाविष्ट आहेत, ज्यांचे चिनी लोक एकत्रितपणे पालन करतात. 14वे दलाई लामा म्हणतात की, चीनमध्ये 40 ते 70 कोटी लोक बौद्ध आहेत.
प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात, जपानच्या लोकसंख्येपैकी फक्त 36.2 टक्के लोक बौद्ध असल्याचे सांगितले जाते, तर जपानमधील अधिकृत सरकारी आकडेवारी दर्शवते की देशातील सुमारे 70% लोक बौद्ध धर्माचे पालन करतात.
जर आपण जगातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या धर्माबद्दल बोलत असू तर तो बौद्ध धर्म आहे. आशा आहे की तुम्हाला या लेखातून बरेच काही कळले असेल.
संदर्भ —
- WORLD’S BUDDHIST POPULATION: Pre-eminence of the Mahayana Tradition (Dr. Daya Hewapathirane)
- Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts
- Desh Deshantar: आशिया आणि बुद्धनीति | Buddha and Asian Convergence
- जगामधील बौद्ध धर्म – विकिपीडिया
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जगात किती बौद्ध देश आहेत ही माहिती जाणून घेतली. बौद्ध धर्माची ही माहिती (buddha dharma information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
FAQs
Que. 1) सर्वात जास्त बौद्ध लोक कोणत्या राज्यात आढळतात ?
उत्तर – सर्वात जास्त बौद्ध लोक महाराष्ट्र राज्यात आढळतात.
Que. 2) जगातील सर्वात मोठा धर्म कोणता ?
उत्तर – ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
Que. 3) भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे ?
उत्तर – हिंदू धर्म हा भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे.
Que. 4) जगातील सर्वात जुना धर्म कोणता ?
उत्तर – हिंदू धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे.
हे ही वाचलंत का?
- जगातील ‘या’ 10 देशांत आहे सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या; जाणून घ्या भारताचा क्रमांक
- दुनिया के 6 देश हैं आधिकारिक तौर पर ‘बौद्ध राष्ट्र’ | official Buddhist countries
- 1 कोटी की 10 कोटी? भारतात बौद्धांची लोकसंख्या किती आहे?
- भारतीय सिनेमा के 50 बौद्ध सेलिब्रिटीज | Buddhist Celebrities in India
- बुद्ध पूर्णिमा के प्रणेता थे डॉ. आंबेडकर; उसे बनाया आधिकारिक अवकाश
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)
It’s Nice information about Buddhist countries