अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्ती आहे. मराठी विकिपीडियावरील त्यांचा लेख हा दरवर्षीच्या सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पहिल्या 20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट होत असतो. याविषयीचे सविस्तर विश्लेषण या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. जुलै 2015 ते जून 2021 सहा वर्षांमध्ये तब्बल 10,00,000 पेक्षा जास्त वेळा साठेंना Wikipedia वर वाचले गेले आहे. – Anna Bhau Sathe Wikipedia
Anna Bhau Sathe on Wikipedia
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 — 18 जुलै 1969) हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण “अण्णा भाऊ साठे आणि विकिपीडिया” या विषयाबद्दल विविध पैलू जाणणार आहोत. दरवर्षी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकांद्वारे त्यांच्याबद्दलची माहिती मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणात वाचली जाते.
विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून, तो 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे, यापैकी इंग्लिश विकिपीडिया, हिंदी विकिपीडिया, मराठी विकिपीडिया हे संस्करण आहेत.
मराठी विकिपीडियाच्या 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या पाचही वर्षांच्या सर्वाधिक वाचकसंख्या (views) असलेल्या टॉप-20 व्यक्तींमध्ये साठे यांचा समावेश झालेला आहे. मात्र या 20 चरित्रलेखांमध्ये साठे यांचा चरित्रलेख कधीही पहिल्या दहा मध्ये आलेला नाही, तर तो नेहमी 11 ते 20 या दरम्यानच आलेला आहे.
विकिपीडिया विविध भाषांमध्ये असला तरी साठेंचे चरित्रलेख हे केवळ तीनच भाषांमध्ये लिहिले गेले आहेत. त्या तीन पैकी दोन भाषा या विदेशी आहेत — मराठी विकिपीडिया, इंग्लिश विकिपीडिया आणि रशियन विकिपीडिया.
इंग्लिश विकिपीडिया हा जागतिक स्तरावरील विकिपीडिया असला तरी मराठी विकिपीडिया वरील साठेंच्या चरित्रलेखाला इंग्लिश विकिपीडिया वरील चरित्रलेखापेक्षा अधिक वाचकसंख्या (views) मिळाली आहे. म्हणजे इंग्लिश विकी वरील साठेंचा लेख हा मराठी विकिपीडियावरील लेखापेक्षा कमी वाचला गेला आहे.
annabhau sathe information in marathi
अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
‘अण्णा भाऊ साठे’ वाचकसंख्या (views)
1 जुलै 2015 पासून विकिपीडियावरील लेखांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार 1 जुलै 2015 ते 30 जून 2021 मध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या विकिपीडिया लेखांना मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
- मराठी विकिपीडिया – 6,45,511 pageviews
- इंग्लिश विकिपीडिया – 4,27,774 pageviews
- रशियन विकिपीडिया – 239 pageviews
1 जुलै 2015 ते 30 जून 2021 या सहा वर्षाच्या प्रदीर्घ काळात साठे यांना मिळालेले एकूण (तिन्ही विकिपीडिया लेख) व्ह्यूज हे 10,73,524 इतके आहेत.
ही माहिती खाली वर्षनिहाय पद्धतीने विस्तृतपणे दिलेली आहे. यासोबतच मराठी विकिपीडियावरील साठेंच्या लेखाची टॉप-20 लोकप्रिय व्यक्तीं मध्ये असलेली रँक याची सुद्धा माहिती दिलेली आहे. – Anna Bhau Sathe Wikipedia
अण्णा भाऊ साठे – मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडिया (mr.wikipedia.org) वरील अण्णा भाऊ साठे यांच्या लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
कालावधी | वाचकसंख्या (views) | Rank (20 व्यक्तींमध्ये) |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2015 | 19,284 | 19वी rank |
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 | 56,384 | 16वी rank |
1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 | 1,20,251 | 13वी rank |
1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 | 1,07,093 | 12वी rank |
1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 | 1,99,862 | 14वी rank |
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 | 1,14,322 | 16वी rank |
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 | 28,315 | --- |
1 जुलै 2015 - 30 जून 2021 | 6,45,511 | 14वी rank |
1 जुलै 2015 पासून 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या या अगदी सुरुवातीच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये साठे यांच्या लेखाला 19,284 वाचकसंख्या मिळाली आणि ते टॉप-20 मध्ये 19व्या स्थानावर राहिले. (संपूर्ण यादी बघा)
त्यानंतर 2016 या वर्षामध्ये त्यांच्या लेखाला 56,384 views मिळाले आणि त्यांची रँक 16वी झाली होती (यादी बघा). तसेच त्या पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची वाचकसंख्या दुपटीने वाढत 1,20,251 झाली आणि रँक सुद्धा 16 वरून 13व्या स्थानावर गेली. (यादी बघा)
पुढील वर्षी 2018 मध्ये त्यांचा लेख 1,07,093 वेळा वाचला गेला, मात्र रँक 12व्या स्थानावर आली (यादी बघा). 2019 या वर्षांमध्ये साठे यांच्या लेखाला आजपर्यंतचे सर्वांत जास्त views मिळाले, आणि हा आकडा होता 1,99,862. या वर्षी दोन लाखाच्या जवळपास वाचकसंख्या असताना सुद्धा त्यांची रँक 12 वरून 14 वर गेली. (यादी बघा)
यानंतरचे वर्ष 2020, या वर्षी सुद्धा त्यांचा लेख एक लाखाच्या पुढे गेला, तो 1,14,322 views मिळवू शकला. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत त्याला तब्बल 85 हजार व्ह्यूज कमी मिळाले, शिवाय साठेंची रँक 14 वरून परत दोन क्रमांकाने खाली आली (16वी झाली). (यादी बघा)
जानेवारी 2021 ते जून 2021 या अलीकडील सहा महिन्यांच्या कालावधीत साठेंना 28,315 वाचकसंख्या मिळाली, परंतु सहा महिन्यांच्या कालावधी मधील टॉप-20 चरित्रलेखांमध्ये (यादी बघा) अण्णा भाऊ साठे यांचा लेख समाविष्ट होऊ शकला नाही. याचे कारण हे की साठे यांचा जन्मदिवस अर्थात अण्णा भाऊ साठे जयंती हा 1 ऑगस्ट रोजी असतो, तर त्यांचा स्मृतिदिन हा 18 जुलै रोजी असतो.
1 ऑगस्ट व 18 जुलै हे दोन्ही दिवस वरील कालावधीत मोडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रलेखाला जास्त views मिळाले नाहीत. ज्यावेळी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असा संपूर्ण वर्षभराच्या कालावधी मधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्ती निवडले जातील, त्यात साठे यांचा समावेश नक्की असेल.
1 जुलै 2015 ते 30 जून 2021 सहा वर्षांमध्ये मराठी विकिपीडिया वरील अण्णा भाऊ साठे लेखाला मिळालेले एकूण व्ह्यूज 6,45,511 आहेत. या सहा वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय टॉप-20 व्यक्तींमध्ये साठे हे 14व्या स्थानी आहेत.
वर्ष 2021, या वर्षी सुद्धा साठे यांचा लेख 1,28,016 वेळा वाचला गेला, आणि त्यांचे स्थान 13 वे होते. 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2021 या सात वर्षांमध्ये मराठी विकिपीडिया वरील अण्णा भाऊ साठे लेखाला मिळालेले एकूण व्ह्यूज 7,45,212 आहेत.
- अण्णा भाऊ साठे लेखाला महिन्याभरातील सर्वाधिक views जुलै 2018 महिन्यात मिळाले होते – 84,909
- अण्णा भाऊ साठे लेखाला दिवसभरातील सर्वाधिक views 1 ऑगस्ट 2018 रोजी मिळाले होते – 33,986
Anna Bhau Sathe Wikipedia
Anna Bhau Sathe – इंग्लिश विकिपीडिया
इंग्लिश विकिपीडिया (en.wikipedia.org) वरील Anna Bhau Sathe अण्णा भाऊ साठे लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
कालावधी | वाचकसंख्या | टीप |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2015 | 44,657 pageviews | सुरुवातीची 6 महिने |
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 | 65,782 pageviews | |
1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 | 73,370 pageviews | |
1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 | 85,003 pageviews | |
1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 | 83,586 pageviews | |
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 | 60,789 pageviews | |
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 | 14,587 pageviews | अलीकडील 6 महिने |
1 जुलै 2015 – 30 जून 2021 | 4,27,774 pageviews | एकूण 6 वर्ष |
1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2015 या अगदी सुरुवातीच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये साठे यांच्या इंग्लिश लेखाला 44,657 वाचकसंख्या मिळाली.
त्यानंतर 2016 या वर्षामध्ये त्यांच्या लेखाला 65,782 views मिळाले, तसेच त्या पुढील वर्ष 2017 मध्ये त्यांची वाचकसंख्या 73,370 झाली.
पुढील वर्षी 2018 मध्ये त्यांचा लेख 85,003 वेळा वाचला गेला. मात्र 2019 या वर्षांमध्ये साठे यांच्या लेखाला 83,586 views मिळाले, तर दुसरीकडे मराठी विकिपीडिया वरील साठे यांच्या लेखाला 2 लाख views मिळाले होते.
यानंतरचे वर्ष 2020, या वर्षी सुद्धा त्यांचा लेख पुन्हा घसरला, आणि तो केवळ 60,789 views मिळवू शकला.
जानेवारी 2021 ते जून 2021 या अलीकडील सहा महिन्यांच्या कालावधीत साठेंना 14,587 वाचकसंख्या मिळाली.
1 जुलै 2015 ते 30 जून 2021 सहा वर्षामध्ये English Wikipedia वरील Annabhau Sathe लेखाला मिळालेले एकूण व्ह्यूज 4,27,774 खालीलप्रमाणे आहेत.
- Annabhau Sathe लेखाला महिन्याभरातील सर्वाधिक views जुलै 2018 महिन्यात मिळाले होते – 26,418
- Annabhau Sathe लेखाला दिवसभरातील सर्वाधिक views 1 ऑगस्ट 2018 रोजी मिळाले होते – 13,131
अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
anna bhau sathe speciality
anna bhau sathe information in marathi
Аннабхау Сатхе – रशियन विकिपीडिया
रशियन विकिपीडिया (ru.wikipedia.org) वरील अण्णा भाऊ साठे (Аннабхау Сатхе) यांच्या लेखाला मिळालेले व्ह्यूज खालीलप्रमाणे आहेत.
20 सप्टेंबर 2020 – 30 जून 2021 — 239 pageviews
- 1 जानेवारी 2021 – 30 जून 2021 — 134 pageviews (अलीकडील 6 महिने)
- 20 सप्टेंबर 2020 – 31 डिसेंबर 2020 — 105 pageviews
रशियन विकिपीडियावर अण्णा भाऊ साठे यांचा Аннабхау Сатхе लेख 20 सप्टेंबर 2020 रोजी निर्माण करण्यात आला. मात्र या नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या लेखाला अवघी 239 वाचकसंख्या मिळाली. (मूळ स्रोत बघा) अण्णा भाऊ साठे यांनी रशियाला भेट दिलेली आहे, आणि तो जीवनप्रवास पुस्तक रूपाने सुद्धा मांडलेला आहे.
Anna Bhau Sathe Wikipedia
शीर्षक
मराठी विकिपीडियावरील साठे यांच्या लेखाचे शीर्षक सुरुवातीला “तुकाराम भाऊराव साठे” असे होते. त्यानंतर विकी संपादक नात्याने मी ते बदलले, व “अण्णा भाऊ साठे” असे समर्पक शीर्षक ठेवले. येथे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे की या ठिकाणी “अण्णाभाऊ” असा एक शब्द न वापरता, “अण्णा भाऊ” असे दोन शब्द वापरले गेले आहेत. साठेंचे नाव “तुकाराम” उर्फ “अण्णा” होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव “भाऊ” होते. “अण्णा” व “भाऊ” या दोन नावांना एकत्रित “अण्णाभाऊ” असे लिहिणे चूकीचे आहे. म्हणून त्यांचा “अण्णाभाऊ साठे” असा अशुद्ध वा चुकीचा उल्लेख टाळत “अण्णा भाऊ साठे” असे लिहिले गेले पाहिजे.
20 सप्टेंबर 2020 रोजी रशियन विकिपीडियावर साठेंचा लेख लिहिला गेला, आणि 24 एप्रिल 2021 रोजी त्या लेखाचे शीर्षक बदलण्यात आले.
इंग्लिश विकिपीडियावर अण्णा भाऊंचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिले (Annabhau Sathe) गेलेले आहे. ते Anna Bhau Sathe असे लिहायला पाहिजे. आणि रशियन विकिपीडियाने सुद्धा इंग्लिश विकिपीडियाचे अनुसरण सुद्धा केले आहे.
साठे यांचा जन्मदिवस (Annabhau sathe jayanti) 1 ऑगस्ट हा आहे. या दिवशी त्यांच्या लेखाला अत्यधिक व्ह्यूज मिळतात.
मराठी विकिपीडियावर, अण्णा भाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेले अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) व्यक्ती होय.
anna bhau sathe speciality
anna bhau sathe information in marathi
पानाचा आकार
जुलै 2021 नुसार, मराठी विकिपीडिया वरील अण्णा भाऊ साठे लेखाचा आकार 33,080 bytes आहे, तर इंग्लिश विकिपीडिया वरील Annabhau Sathe चा आकार 13,647 बाइट्स आहे आणि रशियन विकीवरील Аннабхау Сатхе लेखाचा आकार 8,149 बाइट्स इतका आहे.
बाह्य दुवे
हेही वाचलंत का?
- Wikipedia पर भी Popular है डॉ. आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख डॉ. बाबासाहब आंबेडकर का है
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)