2021 वर्षातील जानेवारी ते जून या कालावधी मधील मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक views असलेल्या top 20 चरित्र लेख. या यादीत भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींचा समावेश झालेला आहे. – famous personalities from Maharashtra
Most searched personality on Marathi Wikipedia
Famous personalities from Maharashtra – मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक प्रसिद्ध top 20 व्यक्ती (जानेवारी ते जून 2021)
1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वेळा वाचल्या गेलेल्या (views) top 20 चरित्रलेखांबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींची माहिती येथे देण्यात आली आहे. सर्व कालखंड आणि वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित भारतीय इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तींना महाराष्ट्रात अर्थात मराठी विकिपीडियावर वाचले जाते.
यापूर्वी आपण 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मधील लोकप्रिय व्यक्तींची सूची प्रकाशित केल्या आहेत. वेगवेगळ्या 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे, त्यापैकीच एक मराठी विकिपीडिया आहे.
मराठी विकिपीडियावर प्रसिद्ध मराठी व्यक्तींबद्दल वाचले जात नाही तर महाराष्ट्रेतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दलही वाचले जाते.
महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्यापैकी कोणकोणत्या व्यक्ती जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधी दरम्यान टॉप 20 मध्ये समाविष्ट झाल्या आहेत, याविषयीची तुलनात्मक आकडेवारी येथे तुम्हाला बघायला मिळेल.
महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 लोकप्रिय व्यक्ती – पहिला व दुसरा क्रमांक बघून आपण अचंबित व्हाल!
The 20 most popular people on Marathi Wikipedia from January to June 2021
Top 20 famous personalities in Maharashtra
Top 20 most viewed people on Marathi Wikipedia in 2021 (January to June)
जानेवारी 2021 ते जून 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या 20 व्यक्तींपैकी 15 व्यक्ती ह्या महाराष्ट्रीय आहेत, तर 5 व्यक्ती (#8, #11, #14, #17, व #20) ह्या इतर भारतीय राज्यांतील आहेत.
लेखाला मिळालेल्या वाचकसंख्येनुसार (व्ह्यूज नुसार) त्याची rank ठरली आहे. प्रत्येक फोटोखाली हिरव्या रंगात कोणत्या चरित्रलेखाला सदर कालावधीत किती वेळा पहिले गेले (मिळालेले views) ते दिलेले आहे.
20. विराट कोहली
46,266 वेळा वाचले गेले
विराट कोहली (जन्म: 1988) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि 2013 पासून भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो.
कोहली हा अमराठी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे. तो मराठी विकिपीडियाच्या 2016, 2017, 2018, 2019 व 2020 या सर्व वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेला आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 17वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात विराट कोहली या लेखाला 46,266 व्ह्यूज मिळालेत.
Famous Sports personalities of Maharashtra
19. नामदेव
46,601 वेळा वाचले गेले
संत नामदेव (1270 – 1350) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायातील संत आणि कवी होते. त्यांनी व्रज भाषेतही काव्ये रचली. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते आद्यप्रचारक होते. संत नामदेव हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी संत आहेत. तसेच ते यावर्षीचे “सर्वात लोकप्रिय जुनी व्यक्ती” ठरले आहेत (त्यांच्या आधीच्या कालखंडातील एकही व्यक्ती या सूचीत समाविष्ट नाही).
त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात. ते 2016 ते 2020 या पाच वर्षांपैकी तीन वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये ते समाविष्ट नव्हते. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 46,601 व्ह्यूज मिळालेत.
थोर मराठी व्यक्ती famous personalities of Maharashtra
18. स्वामी समर्थ
49,950 वेळा वाचले गेले
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकातील, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इ.स. 1856-1878 या काळात वास्तव्य केलेले एक स्वामी होते.
जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 49,950 व्ह्यूज मिळालेत. मात्र मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश कधीही झालेला नाही.
Who are the famous personalities of Maharashtra?
55,231 वेळा वाचले गेले
ए.पी.जे अब्दुल कलाम (1931 – 2015) भारताचे 11वे राष्ट्रपती व एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना “मिसाईल मॅन” असेही म्हणतात. त्यांना ‘भारतरत्न‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. अब्दुल कलाम हे एक तमिळ व्यक्ती, मात्र ते मराठी लोकांमध्येही खूप जास्त लोकप्रिय आहेत.
ते अलीकडील काळातील व्यक्ती होते. त्यांचा मराठी विकिपीडियाच्या प्रत्येक वर्षीच्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समावेश झाला होता. त्यातही ते सदैव पहिल्या दहा मध्येच राहिले. गांधींनंतर डॉ. कलाम हे यावर्षीचे महाराष्ट्रातील “सर्वात लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरले आहेत. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 6वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 55,231 व्ह्यूज मिळालेत.
Great personalities of Maharashtra
16. सचिन तेंडुलकर
64,551 वेळा वाचले गेले
सचिन तेंडुलकर (जन्म: 1973) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2009 मध्ये त्याने कारकीर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक मराठी व्यक्ती आहे. त्याच्याबद्दल मराठी विकिपीडियावर मोठ्या संख्येने माहिती वाचली जाते. तो मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय हयात व्यक्ती” म्हणून मान्यता पावलेला आहे.
मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 13वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 64,551 व्ह्यूज मिळालेत.
Famous Sports personalities of Maharashtra
15. वि.वा. शिरवाडकर
67,667 वेळा वाचले गेले
विष्णु वामन शिरवाडकर (1912 – 1999) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 67,667 व्ह्यूज मिळालेत. मात्र मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश कधीही झालेला नाही.
14. स्वामी विवेकानंद
68,027 वेळा वाचले गेले
स्वामी विवेकानंद (१८६३ – १९०२) हे भारतीय विचारवंत व हिंदू संन्यासी होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद हे केवळ भारतातच प्रसिद्ध नाही आहेत, तर ते महाराष्ट्रातील सुद्धा प्रसिद्ध आहे. ते एक बंगाली व्यक्ती होते, तथापि मराठी लोक मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल सातत्याने अधिकाधिक माहिती वाचत असतात.
त्यामुळेच स्वामींचा लेख प्रत्येक वर्षीच्या (2016, 2017, 2018, 2019, व 2020) मध्ये टॉप 20 लोकप्रिय चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 14वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 68,0271 व्ह्यूज मिळालेत.
थोर नेत्यांची माहिती
famous political leaders of maharashtra
68,670 वेळा वाचले गेले
विनायक दामोदर सावरकर (1883 – 1966) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 68,670 व्ह्यूज मिळालेत. मात्र मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश एकदाही झालेला नाही.
12. अहिल्याबाई होळकर
73,521 वेळा वाचले गेले
अहिल्याबाई होळकर (1725 – 1795) ह्या मराठा साम्राज्याच्या प्रसिद्ध राणी आणि इतिहास प्रसिद्ध सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत्या. त्यांनी महेश्वरला राजधानी बनवून राज्य केले.
जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 73,521 व्ह्यूज मिळालेत. मात्र मराठी विकीवरील दरवर्षीच्या (2016 ते 2020) टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये एकदाही त्यांचा समावेश झालेला नाही.
famous personalities of Maharashtra
11. गौतम बुद्ध
74,379 वेळा वाचले गेले
बुद्ध (इ.स.पू. 623/ 563 – इ.स.पू. 543/ 483) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक गुरु व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. जगामध्ये बुद्धांचे 180 कोटी अनुयायी आहेत.
बुद्ध हे भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली नाव असले तरी ते केवळ 2020 या एकाच वर्षीच्या टॉप 20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 18वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 74,379 व्ह्यूज मिळालेत.
famous personalities of Maharashtra
77,880 वेळा वाचले गेले
जिजाबाई (1598 – 1674) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झालेला आहे. राजमाता जिजाबाई ह्या सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती वाचणे सुरू झाले आहे, कारण मागील दोन वर्षांतील टॉप-20 व्यक्तींमध्ये यांचा समावेश नव्हता, मात्र त्यानंतरच्या पुढील तीनही वर्षांमध्ये त्यांचा समावेश आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 12वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 77,880 व्ह्यूज मिळालेत. तसेच या काळात भोसले घराण्यातील चार सदस्य सुद्धा टॉप-20 व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत (#1, #5, #6 व #10).
महाराष्ट्रातील थोर महिला
Famous Maharashtrian female personalities
9. ज्ञानेश्वर
80,820 वेळा वाचले गेले
संत ज्ञानेश्वर (1275 – 1296) हे मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला.
संत ज्ञानेश्वर हे सुद्धा एक लोकप्रिय मराठी संत आहेत. ते या वर्षीचे “सर्वात लोकप्रिय संत” ठरले आहेत, एरवी नंतरच्या सर्व वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची संत तुकारामांच्या नंतरच आलेली आहे. त्यांना दरवर्षी खूप लोक मराठी विकिपीडियावर वाचतात.
यामुळे ते 2016 ते 2020 या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 10वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 80,820 व्ह्यूज मिळालेत.
86,135 वेळा वाचले गेले
मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
महात्मा गांधी हे मराठी किंवा महाराष्ट्रीय व्यक्ती नाहीत, तर ते एक गुजराती आहेत. मात्र तरीही ते महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील “सर्वाधिक लोकप्रिय अमराठी व्यक्ती” ठरलेले आहेत. 2016 ते 2020 या सर्व वर्षांमध्ये ते मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-20 लेखांमध्ये कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या स्थानावर राहिलेले आहेत.
त्यांची लोकप्रियता इतकी अफाट आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज वगळता अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा ते जास्त लोकप्रिय आहेत, इतके जास्त वेळा गांधींना मराठी विकिवर वाचले गेले आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 4थी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 86,135 व्ह्यूज मिळालेत.
Famous Personalities of Maharashtra
थोर समाज सुधारक मराठी
7. महात्मा फुले
98,467 वेळा वाचले गेले
महात्मा जोतीराव फुले (1827 – 1890) हे मराठी लेखक, शिक्षक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली.
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
फुले हे सुद्धा एक लोकप्रिय व्यक्ती आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात येते. सर्व वर्षांमध्ये (2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा टॉप-20 चरित्रलेखांमध्ये दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 9वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 98,467 व्ह्यूज मिळालेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले हे एकमेव असे दांपत्य आहे की, या दोघांचाही समावेश मराठी विकिपीडियाच्या सर्व वर्षांतील टॉप-20 लोकप्रिय लेखांमध्ये झालेला आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती
famous personalities of Maharashtra
6. शाहू महाराज
99,549 वेळा वाचले गेले
राजर्षी शाहू महाराज (1874 – 1922) हे महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारवंत, समाज सुधारक व शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तिमत्व होते. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. 1884 – 1922 दरम्यान) होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्रातील जनता शाहू महाराज यांच्याबद्दल मराठी विकिपीडियावर माहिती वाचत असते. मात्र त्यांचा लेख केवळ 2016, 2018 आणि 2020 या वर्षांमध्येच टॉप-20 चरित्रलेखांमध्ये समाविष्ट झालेला आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 19वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 99,549 व्ह्यूज मिळालेत.
थोर मराठी व्यक्ती
famous personalities of Maharashtra
5. संभाजी भोसले
1,02,110 वेळा वाचले गेले
छत्रपती संभाजी महाराज (1657 – 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते. छत्रपती संभाजी हे महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. मराठी विकिपीडियावर त्यांच्याबद्दल खूप जास्त वेळा माहिती वाचण्यात आलेली आहे.
2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान राहिले आहे. तथापि, वर्ष 2016 वगळता अन्य सर्व वर्षांमध्ये (2017, 2018, 2019 आणि 2020) त्यांचा लेख हा दहाव्या स्थानाच्या आतच राहिलेला आहे.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 5वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 1,02,110 व्ह्यूज मिळालेत.
Famous Personalities of Maharashtra
4. संत तुकाराम
1,16,287 वेळा वाचले गेले
संत तुकाराम (1608 – 1650) हे महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.
संत तुकाराम हे एक शिवकालीन मराठी संत असून, ते आजही महाराष्ट्रात खूप जास्त लोकप्रिय आहेत. ते मराठी विकिपीडियावरील ‘सर्वाधिक लोकप्रिय संत‘ ठरले आहेत. त्यांच्या पेक्षा अधिक वाचकसंख्या कोणत्याही संताच्या लेखाला मिळालेली नाही.
2016 ते 2020 या पाचही वर्षांमध्ये सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप-20 चरित्रलेखांमध्ये त्यांचे स्थान नेहमी 10व्या रँकच्या आतमधेच राहिले आहे. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 7वी होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 1,16,287 व्ह्यूज मिळालेत.
most powerful person in maharashtra
1,75,001 वेळा वाचले गेले
सावित्रीबाई जोतीराव फुले (1831 – 1897) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला.
सावित्रीबाई फुले या मराठी विकिपीडियावरील आतापर्यंतच्या “सर्वात लोकप्रिय महिला” ठरल्या आहेत. त्यांच्या पेक्षा जास्त व्ह्यूज कोणत्याही स्त्रीला मिळालेले नाहीत. दरवर्षी प्रचंड संख्येने वाचकवर्ग त्यांच्या बद्दलची माहिती मराठी विकिपीडियावर वाचत असतो. वाचकसंख्येच्या दृष्टीने लोकप्रियतेचा विचार केला तर त्या आपले पती महात्मा फुले यांनाही मागे टाकतात.
त्या दर वर्षी टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये सामील होतात, एवढेच नाही तर 2016 वगळता पुढील सर्वच वर्षांमध्ये (2017 ते 2020) त्यांची रँक पहिल्या पाच मध्ये आलेली आहे. एक महिला म्हणून तर त्या अव्वल आहेच, परंतु एक मराठी व्यक्ती म्हणून सुद्धा त्या तिसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय व्यक्ती आहेत.
मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 3री होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 1,75,001 व्ह्यूज मिळालेत.
थोर समाजसेविका मराठी
3,00,507 वेळा वाचले गेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891 – 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. ते एक मराठी म्हणून अन्य भाषिक विकिपीडियांवरही त्यांची सर्वात जास्त लोकप्रियता आहे.
2016 ते 2020 या वर्षांमधील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान कधी दुसरे तर कधी पहिलेच राहिले आहे. शिवाजी महाराज वगळता ते मराठी विकिपीडियावरील अन्य कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त लोकप्रिय ठरले आहेत.
बाबासाहेब हे मराठी विकिपीडिया वरील “सर्वाधिक लोकप्रिय समाजसुधारक” तसेच “सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी” व विसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती ठरले आहेत. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 2री होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 3,00,507 व्ह्यूज मिळालेत.
Who is hero of Maharashtra?
4,07,596 वेळा वाचले गेले
छत्रपती शिवाजी महाराज (1630 – 1680) हे एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून आपले स्वराज्य स्थापन केले. त्यांनी वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र यशस्वीपणे वापरले.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांचा चरित्रलेख हासुद्धा 2016 ते 2020 या वर्षांमध्ये कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या स्थानावर होता.
त्यांची लोकप्रियता अफाट असून ते 5 पैकी 4 वर्षांमध्ये प्रथम स्थानावर होते. सतराव्या शतकातील हा शासक एकविसाव्या शतकामध्ये ही अव्वल ठरला आहे. मागील वर्ष 2020 या वर्षातील टॉप-20 लोकप्रिय व्यक्तींमध्ये त्याची रँक 1ली होती. जानेवारी 2021 ते जून 2021 या काळात त्यांच्या लेखाला 4,07,596 व्ह्यूज मिळालेत.
Who are the famous personalities of Maharashtra?
हेही वाचलंत का?
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- 2021 (जानेवारी ते जून) मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय 20 व्यक्ती
- 2020 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2019 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2018 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2017 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2016 मधील मराठी विकिपीडियावरील 20 लोकप्रिय व्यक्ती
- 2015 (जुलै ते डिसेंबर) मधील महाराष्ट्रातील Top-20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती
- 2016 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2017 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2018 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2019 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- 2020 के हिंदी विकिपीडिया पर 20 सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ति
- भारत की मशहूर बौद्ध हस्तियां (अभिनेता & गायक) | List of Buddhist Celebrities in India
- Wikipedia पर भी Popular है डॉ. बाबासाहब आंबेडकर, अप्रैल में रहते हैं Top पर
- कन्नड़ विकिपीडिया में सबसे ज्यादा पढा जाने वाला लेख है ‘बी. आर. आंबेडकर”; तथा मराठी विकिपीडिया में ‘शिवाजी महाराज’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संस्कृत’ अवगत होती का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निघालेत 15 पेक्षा अधिक चित्रपट
- १३०व्या जयंतीच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३० प्रेरणादायक व अनमोल सुविचार
- अन्य लेख वाचा