प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जून महिन्यातील संपूर्ण जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in June) आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या DhammaBharat.com वर जानेवारी ते डिसेंबर अशा सर्व महिन्यांचे जीवनपट लेख बनवलेले आहेत.
Timeline of Dr BR Ambedkar in June
वेगवेगळ्या वर्षांतील जून महिन्यात बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. जून महिन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास या जीवनपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आलेला आहे.
Dr Ambedkar in June – डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक घडामोडींसह काही जागतिक वा आंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय आणि प्रादेशिक दिन, तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्मृतिदिन व जयंती, यासारख्या बाबींचा समावेश देखील या लेखामध्ये करण्यात आला आहे.
जून महिन्यामध्ये घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो — कोलंबिया विद्यापीठातून MA, पीएचडी आणि मानद LLD, बौद्ध धम्माचा उदय व अस्त’ विषयावर श्रीलंकेत भाषण, महार वतन बिल मांडले, भिक्खू लोकनाथ यांची भेट, ‘अमेरिकेतील अनुभव’ विषयावर मुलाखत, सिद्धार्थ महाविद्यालयाची आणि मिलिंद विद्यालयाची स्थापना, लंडन विद्यापीठातून MSc, सुभाषचंद्र बोस यांची भेट, आंबेडकर गुरुजींची भेट, ग्रेज-इन मधून बॅरिस्टर-ॲट-लॉ, ‘समता’ पाक्षिक सुरु, तसेच विविध सभा आणि कार्यक्रम.. इत्यादी.
जूनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट
1 जून
- 1920 : 30 मे ते 1 जून 1920 रोजी नागपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. डॉ. भीमराव आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत उपस्थित होते.
- 1936 : राजकीय परिषदेपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- 1940 : पुणे येथे इलाका परिषद झाली.
- 1942 : दुसऱ्या महार बटालियनची कामठी येथे स्थापना करण्यात आली.
2 जून
- 1915 : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून भीमराव आंबेडकरांना मास्टर ऑफ आर्ट्स (MA) पदवी मिळाली.
- 1935 : मुंबईतील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक झाली.
3 जून
- 1929 : गोविंदनाथ सुरेंद्र टिपणीस यांचे अध्यक्षतेखाली महाड, माणगाव तालुक्यातील अस्पृश्य लोकांची जाहीर सभा झाली.
- 1935 : मुंबई शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
4 जून
- 1913 : परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी बडोदा संस्थांची अट मान्य करून बाबासाहेब आंबेडकरांनी करारावर सही केली.
- 1920 : आकोट येथे ब्राह्मणेतर अकोला जिल्हा परिषद घेण्यात आले.
- धम्मानंद कोसंबी स्मृतिदिन (1947)
5 जून
- जागतिक पर्यावरण दिन
- 1950 : ‘बौद्ध धम्माचा उदय व अस्त’ या विषयावर श्रीलंकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
- 1952 : कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ (एलएलडी) मानद पदवी प्रदान केली.
6 जून
- 1940 : मुंबई विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन बिल मांडले.
- 1950 : श्रीलंका येथे ‘यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन’च्या तरुणांपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
7 जून
- 1920 : ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन फंड संस्थेची स्थापना केल्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र आले.
8 जून
- 1927 : कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रीतसर पीएचडी पदवी दिली. (1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले. मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल. मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.)
- 1928 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मिलिटरी पेन्शनरची दामोदर हॉल, मुंबई येथे सभा झाली.
9 जून
- 1920 : भारतीय बहिष्कृत सभा नागपुर येथे बाबासाहेबांचे स्वागत झाले. बाबासाहेब यांनी सभेत भाषण केले.
- बिरसा मुंडा स्मृतिदिन
10 जून
- जागतिक दृष्टिदान दिवस
- 1925 : वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी सुरु केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही नोकरी त्यांनी 1% जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.
- 1929 : मद्रास येथे ब्राह्मण आणि द्रविड या समाजातील वधू-वरांचा विवाह झाला.
- 1936 : इटालियन बौद्ध भिक्खू लोकनाथ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजगृह, मुंबई येथे भेट झाली.
11 जून
- 1950 : सिद्धार्थ कॉलेज विद्यार्थी संसदेत ‘हिंदू कोड बिल’ यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष व्याख्यान झाले.
- साने गुरुजी स्मृतिदिन
12 जून
- 1937 : प्रायमरी शाळेसमोरील मंडपात अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे झुणका भाकर सहभोजन झाले.
13 जून
- 1933 : संयुक्त समितीच्या सभासदांची बाबासाहेबांकडून साक्ष तपासण्यात आली.
- 1936 : दामोदर हॉल, मुंबई येथे देवदासी, मुरळ्या, जोगतिणी आदी स्त्रियांची परिषदेच्या वतीने झाली.
- आचार्य अत्रे स्मृतिदिन
14 जून
- 1928 : बहिष्कृत हितकारणी सभा विसर्जित करण्याचा ठराव पास करण्यात आला.
- 1952 : ‘अमेरिकेतील अनुभव’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत झाली.
Timeline of Dr Ambedkar in June
15 जून
- 1929 : धारवाड येथील बहिष्कृत विद्यार्थी आश्रमात प्रवेश घेण्याविषयी डॉ. आंबेडकरांचे जाहीर पत्र.
16 जून
- 1936 : मुंबई येथे देवदासी, मुरळ्या, जोगतिण, आराधिनी व पोतराज यांच्या धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
17 जून
- 1931 : त्रिचूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या संयोजकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केले की काँग्रेसची मदत घेऊ नका.
1947 : संस्थानांनी भारतात विलीन व्हावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केले.
18 जून
- 1933 : नागपूर जिल्हा दलित परिषदेचे अधिवेशन बाबुळखेडा, नागपूर येथे झाले.
- 1936 : डॉक्टर मुंजे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली.
- संत कबीर जयंती
19 जून
- 1937 : सी.पी.एंड. बेरार दलित फेडरेशनचे समाजकल्याण मंत्री विठ्ठलराव साळवे यांचे पत्रक ‘जनते’मध्ये प्रसिद्ध झाले.
- 1950 : औरंगाबाद मध्ये मिलिंद विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
20 जून
- 1921 : लंडन विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स (एम.एस्सी.) ही पदवी प्रदान केली.
- 1925 : बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर ऑफ मर्कंटाइल लॉ पदावर बाबासाहेब आंबेडकर रुजू झाले.
- 1946 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले.
21 जून
- 1894 : साताऱ्यातील सैनिकांचा पहिला अर्ज रामजी आंबेडकरांनी सरकारला पाठवला.
- 1927 : मुंबईतील गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक पदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली.
22 जून
- डॉ. भदंत आनंद कौसल्यायन स्मृतिदिन
23 जून
- 1938 : मुंबईतील डीलाईटरोड येथे दलित महिला मंडळाची स्थापना झाली.
24 जून
- 1924 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आंबेडकर गुरुजींना पाच पाने, सुपारी, धोतरपान, आणि सव्वा रुपये गुरुदक्षिणा दिली.
25 जून
- 1918 : राजर्षी शाहू महाराज यांनी परंपरागत कुलकर्णी वतने रद्द केली.
- 1945 : सिमला परिषद सुरू झाली.
- 1946 : बॉम्बे सेंट्रल स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला.
26 जून
- राजर्षी शाहू महाराज जयंती
- 1920 : शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती येथे श्री चोखामेळा फ्री बोर्डिंग उघडण्यात आले.
27 जून
- 1906 : छ. शाहू महाराजांना छोट्या बॉम्बच्या सहाय्याने ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला.
- 1934 : तुमसर रोड येथे भंडारा जिल्हा दलित परिषद अधिवेशन संपन्न झाले, त्यामध्ये लक्ष्मण पाटील अध्यक्ष होते.
- जिजामाता स्मृतिदिन
28 जून
- 1922 : लंडनच्या ग्रेज-इन संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली
- 1933 : दलित फेडरेशनच्या नागपूर येथे वार्ड शाखा स्थापन करून 24 जून ते 6 जुलै दरम्यान जाहीर सभांचे कार्यक्रम झाले.
29 जून
- 1928 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘समता’ पाक्षिक प्रसिद्ध झाले.
1932 : मध्यप्रांतीय दलित परिषद अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या विद्यमाने आणि वीर नायक तुलाराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे घेण्यात आले.
30 जून
- 1939 : नागपूर येथील कोतवालांच्या सभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
जूनमध्ये घडलेल्या अन्य घटना
- 1926 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनपट (महिन्यावर click करा)
* जानेवारी * फेब्रुवारी * मार्च * एप्रिल * मे * जून * जुलै * ऑगस्ट * सप्टेंबर * ऑक्टोबर * नोव्हेंबर * डिसेंबर *
सारांश
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण जून महिन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट (Timeline of Dr Babasaheb Ambedkar in June) याविषयीची माहिती पाहिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा.
सदर लेखात एखादी प्रसंग वा घटना समाविष्ट करायची राहून गेली असेल, किंवा लेखात कुठे व्याकरणाची चूक झाली असेल तर कृपया आम्हाला आवर्जून ईमेल द्वारे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवावे, धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती
- Wikipedia : 2021 मध्ये ‘मराठी विकिपीडिया’वर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती कोण? जाणून घ्या…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:
मैत्रिणींनो व मित्रांनो, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी आणि धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.