संविधान गौरव महापरीक्षेचा निकाल जाहीर

Last Updated on 7 January 2025 by Sandesh Hiwale

शौर्य दिनाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2025 रोजी संविधान गौरव परीक्षा 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संविधान गौरव परीक्षा निकाल म्हणजेच स्पर्धेतील विजेत्यांची नावे या लेखामध्ये देण्यात आली आहेत.

samvidhan-gaurav-exam-result
संविधान गौरव परीक्षा 2024 चा निकाल

भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सवानिमित्त (75वा) प्रबुद्ध टीव्ही द्वारे आयोजित राज्यस्तरीय भारतीय संविधान गौरव ऑनलाईन महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली होती. 

संविधान दिनानिमित्ताने 8 डिसेंबर 2024 रोजी ही परीक्षा संपन्न झाली. 40 प्रश्न आणि 200 गुण असे या परीक्षेचे स्वरूप होते (उत्तरपत्रिका पाहा). एक हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता.

 

संविधान गौरव परीक्षा निकाल

संविधान गौरव स्पर्धेमधील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहे.

विजेत्यांची नावे आणि पारितोषिके

  • प्रथम पारितोषिक
    ₹20,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
  • ललिता अशोक कांबळे (नागपूर)

 

  • द्वितीय पारितोषिक
    ₹15,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
  • रुषिकेश ओमप्रकाश मिटकर (पुणे)

 

  • तृतीय पारितोषिक*
    ₹10,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
  • अनुष्का अनिल गजमल (परभणी )

*(10 ते 15 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)

 

  • चतुर्थ पारितोषिक
    ₹5,000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
  • हर्षवर्धन रामजी पंडित (हिंगोली)

स्पर्धकांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली होती – “A वयोगट” हा 10 ते 15 वय वर्षे आणि “B वयोगट” हा 16 वर्षांवरील स्पर्धकांसाठी होता.

पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस हे दोन्ही वयोगांतील सर्व स्पर्धकांसाठी होते, तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे A वयोगटातील (सोळा वर्षांखालील) स्पर्धकांसाठी राखीव होते.

पहिला, दुसरा आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्या तिन्ही स्पर्धकांना समान गुण (155) होते. अशावेळी, परीक्षेचा पेपर सर्वाधिक कमी वेळेत सबमिट करण्यावरून स्पर्धकांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.


या महापरीक्षेला महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून तब्बल 1965 संविधानप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

सहभागी स्पर्धकांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती

1. लिंग समानतेचे दीपः

51% महिला सहभागी, तसेच 200 हून अधिक चिमुकले संविधानवीर, ज्यांचे वय 16 वर्षांखाली आहे, ते संविधान शिक्षणासाठी प्रेरित झाले.

 

2. धामिक विविधतेचा इंद्रधनुष्यः

एक भारत, श्रेष्ठ भारत या तत्त्वाला अधोरेखित करणारा सहभागः

  • 1361 बौद्ध,
  • 540 हिंदू,
  • 20 मुस्लिम,
  • 20 आदिवासी,
  • 2 पारशी,
  • 21 निधर्मी नागरिक

 

3. शैक्षणिक क्षितिजाचा विस्तारः

या महापरीक्षेत विविध शैक्षणिक स्तरांचे स्पर्धक सामील झाले होते.

  • अशिक्षितः 14
  • प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणः 151
  •  SSC उत्तीर्णः 125
  • HSC उत्तीर्णः 449
  • पदवीधरः 781
  • पदव्युत्तर : 358
  • इतर स्तरः माहिती नाही

 

4. रोजगार स्थितीतील वैविध्यताः

संविधानप्रेमींची विविध पार्श्वभूमी या परीक्षेत झळकत आहेः

  • गृहिणींचे योगदानः 171
  • खाजगी क्षेत्रातील कार्यरत स्पर्धकः 307
  • शासकीय सेवेत असलेलेः 201
  • व्यवसायिकः 51
  • विद्यार्थी : 895
  • बेरोजगारः 163

 

5. महाराष्ट्राचे प्रादेशिक वैभवः

महाराष्ट्रातील विविध विभागांतील संविधान प्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे:

  • विदर्भाचे 757 तेजस्वी तारे
  • पश्चिम महाराष्ट्रातील 456 उत्साही स्पर्धक
  • मराठवाड्याचे 363 संविधानसेवक
  • कोकणाच्या 296 कर्तृत्ववान प्रतिनिधी
  • खानदेशातील 92 संविधाननिष्ठ नागरिक

हे ही बघा 


WhatsApp चॅनल्स फॉलो करा


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र

पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

4 thoughts on “संविधान गौरव महापरीक्षेचा निकाल जाहीर

  1. खूप छान आणि उल्लेखनीय प्रोग्राम राबवित आहात धन्यवाद सर्वाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!