भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी बाबासाहेबांना आपापल्या परीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांनी त्याच धाडसाने आणि जोमाने पडद्यावर बाबासाहेबांना जीवंत केले. – films about dr ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना लोक आदरपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु मोठ्या पडद्यावर त्यांना बर्याचदा जिवंत केले गेले आहे. या लेखामध्ये आपण भीमराव रामजी आंबेडकर यांचे चित्रपट जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि विचारधारेवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत मुख्यधारेचे एकूण 12 चित्रपट बनवले गेले आहेत. त्यापैकी 7 चित्रपट हे एकट्या मराठीमध्ये आहेत, त्यानंतर कन्नडमध्ये 3, तेलगूमध्ये आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी 1 चित्रपट बनवला गेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेतून इतरही चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. films about dr ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट – films about Dr Ambedkar
1. भीम गर्जना (Bhim Garjana) :

भीम गर्जना हा १९९० मधील एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय पवार यांनी केले आहे, तर चित्रपटाच्या निर्मात्या नंदा पवार या होत्या. या चित्रपटामध्ये बाबासाहेबांची प्रमुख भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती, तर अभिनेत्री प्रथमा देवी यांनी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बनवण्यात आलेला हा पहिला चित्रपट आहे. हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठी चित्रपट एक उत्कृष्ट स्वरूपाचा चित्रपट आहे, आणि यात बाबासाहेबांची भूमिका उत्तम प्रकारे साकारलेली आहे. films about dr ambedkar
2. बालक आंबेडकर (Balak Ambedkar) :

बालक आंबेडकर हा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला एक कन्नड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बसवराज केस्थर यांनी केले आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. यात बालक भीमराव आंबेडकरांची भूमिका बाल अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती.
3. डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) :

डॉ. आंबेडकर हा तेलुगू चित्रपट आहे, जो 25 सप्टेंबर 1992 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन परपल्ली भारत यांनी केले आहे, तर चित्रपटाचे निर्माते डॉक्टर पद्मावती आहेत.
अभिनेता आकाश खुराणा याने बाबासाहेबांची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री नीना गुप्ताने रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली होती. रोहिणी हट्टांडीनेही या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग 28 दिवस चालले होते. यामध्ये S.P. बाल सुब्रमण्यम यांनी पार्श्वगायन केले आहे. films about dr ambedkar
4. युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar) :

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा 1993 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती माधव लेले आणि दिग्दर्शन शशिकांत नलावडे यांनी केले होते. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलाके यांनी साकारली होती.
अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर यांनीही चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात ‘खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे’, ‘जय भीमा’, ‘शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम’ ही गाणी शाहीर साबळे, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पै यांनी गायली आहेत. युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बाबासाहेबांवरील तिसरा आणि मराठीतील दुसरा चित्रपट आहे.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – द अनटोल्ड ट्रुथ (Dr. Babasaheb Ambedkar – The Untold Truth) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ हा 2000 मधील जब्बार पटेल दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता मामुट्टी (Mammootty) यांनी साकारली होती, तर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती, तर मृणाल कुलकर्णी यांनी बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर यांची भूमिका केली होती.
हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया, गुजराती यासारख्या अनेक भाषांमध्ये डब झालेला आहे. Best Feature Film in English, Best Actor (मामुट्टी), Best Art Direction (नितीन देसाई) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत.
बुद्धं शरणं गच्छामि, कबीर कहे ये जग अंधा, मन लागो मेरा यार, भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा यांसारखी उत्कृष्ट गीते चित्रपटाचे सौदर्य वाढवतात. चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च झाला. या चित्रपटाची शूटिंग करताना 100 आंबेडकरी विचारवंतांचे सहकार्य सुद्धा घेतले गेले होते. भीम जयंतीदिनी आणि महापरीनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी चित्रपट महाराष्ट्रातील सरकारी दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित केला जात असतो. films about dr ambedkar
6. डॉ. बी. आर. आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) :

डॉ. बी.आर. आंबेडकर हा 30 डिसेंबर 2005 रोजी प्रदर्शित झालेला आणि शरण कुमार कब्बूर दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अभिनेते विष्णुकांत बी.जे. यांनी साकारली होती. अभिनेत्री तारा हिने बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी रमाबाईची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री भव्या हिने दुसरी पत्नी सविता आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.
या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत – कन्नड राज्य चित्रपट पुरस्कार (2005-06), सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – रवींद्रनाथ, आणि परीक्षकांकडून विशेष सन्मान पुरस्कार. गायक नंदिता, अभिमान, शंकर शानभाग आणि गुरुमूर्ती यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले, तर अभिमान रॉय यांनी चित्रपटासाठी संगीत दिले.
7. पेरियार (Periyar) :

पेरियार हा 2007 चा तमिळ भाषेतील चित्रपट आहे, जो समाजसुधारक आणि तर्कवादी पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञान राजसेकरन यांनी केले होते. या चित्रपटात अभिनेते मोहन रमण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती, तर प्रसिद्ध अभिनेते सत्यराज यांनी पेरियार यांची भूमिका साकारली होती. हा तोच सत्यराज आहे ज्याने बाहुबलीमध्ये कटप्पा ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारली होती.
पेरियार यांच्यावर डॉ. आंबेडकरांचा खूप प्रभाव होता. या दोघांच्या अनेकदा भेटी सुद्धा झालेल्या आहेत. पेरियार यांनी एकदा आपल्या अनुयायांना सांगितले होते, “जर कदाचित मी जगात मी नाही राहिलो तर तुम्हाला कोणाला ‘पिता’ मानायचे असेल तर ते तुम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच माना, व त्यांच्याच शिकवणीनुसार मार्गक्रमण करा.” films about dr ambedkar
8. डेबू (Debu) :

डेबू हा नीलेश जळमकर दिग्दर्शित 2010 चा मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित असून अभिनेते मोहन जोशी यांची मुख्य भूमिका होती. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रही दाखवण्यात आले आहे. गाडगे बाबांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा खूप प्रभाव होता, आणि दोघेही अनेकदा अनेकदा भेटी झालेल्या आहेत.
9. रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) (Ramabai Bhimrao Ambedkar (Ramai)) :

रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा प्रकाश जाधव दिग्दर्शित रमाबाई आंबेडकरांवर आधारित मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2010 रोजी प्रदर्शित झाला. अभिनेत्री निशा परुळेकर हिने रमाबाईंची मुख्य भूमिका साकारली आहे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेठे यांनी केली आहे.
शकुंतला जाधव, विजय सरतापे, नंदेश उमप, कोरस या गायकांनी या चित्रपटात पार्श्वगायन केले आहे. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर बनलेला हा पहिलाच चित्रपट असून, याशिवाय रमाबाईंवर आणखी दोन चित्रपट बनले आहेत. films about dr ambedkar
10. रमाबाई (Ramabai) :

रमाबाई हा एम. रंगनाथ दिग्दर्शित 2016 चा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. रमाबाई आंबेडकर यांच्यावर आधारित हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेते सिद्धाराम कर्णिक यांनी केली होती, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका अभिनेत्री यागना शेट्टीने केली होती.
अभिनेता ऑडिटर श्रीनिवास, नागराज, बँक जनार्दन, सुमथी श्री, मायसोर रामानंद यांनीही चित्रपटात काम केले आहे. के कल्याण यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2016 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीदिनी प्रदर्शित झाला.
11. बोले इंडिया जय भीम (Bole India Jai Bhim) :

बोले इंडिया जय भीम : बाबु हरदास एल. एन. यांचा संघर्षमय प्रवास हा 7 ऑक्टोबर 2016 रोजी प्रदर्शित झालेला सुबोध नागदेवे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते जितेंद्र खुशालदास दोशी आणि धनंजय गलानी आहेत. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि समाजसुधारक एल.एन. हरदास यांच्या जीवन कार्यावर आधारित आहे.
यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेते श्याम भीमसारिया यांनी केली होती, तर हरदास यांची प्रमुख भूमिका अभिनेता अमोल चिव्हाणे याने साकारली होती. सुप्रसिद्ध अभिवादन जय भीम हरदास यांनी सुरू केले. दिनेश अर्जुन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर गायक जावेद अली आणि बेला शेंडे यांनी चित्रपटात गाणी गायली आहेत.
12. सरणं गच्छामि (Saranam Gacchami) :


“शरणं गच्छामि” हा सन २०१७ मधील प्रेम राज दिग्दर्शित, भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक तेलुगू चित्रपट आहे. “आंबेडकर सरणं गच्छामि“ हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात डॉ. आंबेडकर यांचीही व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे. या चित्रपटात मुख्य कलाकार नवीन संजय व तनिष्का तिवारी हे होते. हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चित्रपट हिंदीमध्ये आढळून येत नाही, तथापि याचे तमिळमध्ये डबिंग झाले आहे.
13. बाळ भिमराव (Bal Bhimrao) :

बाळ भिमराव हा 9 मार्च 2018 रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश नारायण जाधव होते. बालकलाकार मनीष कांबळे याने बालक भीमराव आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, निशा भगत आणि प्रेमा किरण यांच्याही भूमिका आहेत. शंकर महादेवन आणि सुरेश वाडकर यांनी चित्रपटात गाणी गायली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या जीवनावरील हा दुसरा चित्रपट आहे. भीमराव रामजी आंबेडकर यांचे चित्रपट
14. रमाई (Ramai) :

रमाई हा बाळ बागराळे दिग्दर्शित 2019 चा मराठी चित्रपट आहे. रमाबाई आंबेडकर यांच्यावरील हा तिसरा चित्रपट आहे. प्रा. प्रगती खरात, मनीषा मोटे आणि चंद्रकांत खरात यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात अभिनेत्री विणा जामकर यांनी रमाबाईंची प्रमुख भूमिका केली होती, तर अभिनेता सागर तळाशीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.
अरुण नलावडे, स्वनील राजशेखर, प्रफुल्ल सामंत, प्रकाश धोत्रे यांचाही या चित्रपटात समावेश होता. आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे आणि विजय सरतापे यांनी चित्रपटाची गाणी गायली आहेत, तर भीमराव धुळबुळू आणि गोपाल कबनुरक हे गीतकार होते. हा चित्रपट 12 एप्रिल 2019 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित झाला.
15) ओरिजिन

Origin (ओरिजिन) हा 2023 चा अमेरिकन बायोग्राफिकल चित्रपट आहे जो Ava DuVernay ने लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. हा हॉलीवुड चित्रपट इसाबेल विल्करसन यांच्या कास्ट : द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टंट्सवर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रोफेसर गौरव जे. पठानिया सकारली आहे. डॉ. आंबेडकरांवर आधारित ओरिजिन हा पहिला हॉलिवूड चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट
16. जोशी की कांबळे (Joshi ki Kamble) :

जोशी की कांबळे हा 2008 चा शेखर सरतांडेल दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक संजय कांबळे [अमेय वाघ] हा एक आंबेडकरी युवक आहे, जो बौद्ध अनुसूचित जातीच्या कुटुंबात [कांबळे परिवार] वाढला आहे , परंतु त्याचे जैविक पालक हिंदू ब्राह्मण [जोशी परिवार] आहेत. आरक्षण आणि जातिव्यवस्थेच्या मुद्द्यांवरही हा चित्रपट भाष्य करणारा आहे. भीमरावांचा जयजयकार हे भीम गीत या चित्रपटात आहे. तसेच या चित्रपटात रामदास आठवले यांची विशेष भूमिका आहे.
17. शूद्र : द राइझिंग (Shudra : The Rising) :

शूद्र : द राइझिंग हा 2012 मधील प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन संजीव जयस्वाल यांनी केले आहे. हा चित्रपट शूद्रांच्या जीवनाचे वर्णन करीत असला तरी तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेला आहे. या चित्रपटात ‘जय जय भीम‘ हे लोकप्रिय भीमगीत सुद्धा आहे.
18. अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (A Journey of Samyak Buddha) :

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा प्रवीण दामले दिग्दर्शित 2013 चा हिंदी चित्रपट आहे. गौतम बुद्धांच्या जीवनावरील हा एक उत्कृष्ट चित्रपट असून त्यांची भूमिका अभिनेते अभिषेक उराडे याने साकारली आहे. हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकावर आधारित आहे. हा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित चित्रपट आहे.
19. जय भीम (Jai Bhim)

जय भीम हा टी.जे. ज्ञानवेल दिग्दर्शित 2021चा तमिळ-भाषेतील चित्रपट आहे आणि ज्योतिका आणि तो सूर्या यांनी 2D एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित केला आहे. चित्रपटात सूर्या (suriya), लिजोमोल जोस, के. मणिकंदन, राजिशा विजयन, प्रकाश राज, राव रमेश आणि इतर सहाय्यक भूमिकेत आहेत.
1993 मधील एका सत्य घटनेवर आधारित, ज्यामध्ये न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी लढलेल्या खटल्याचा समावेश आहे, ते इरुलर जमातीतील जोडपे सेंगेनी आणि राजकन्नू यांच्या जीवनाभोवती फिरते.
या चित्रपटाचे नाव “जय भीम” हे सर्वपरिचित आहे, जे सामाजिक व आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे घोषवाक्य वा नारा आहे. चित्रपटाचा नायक चंद्रू हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरित झालेला दाखवण्यात आलेला आहे.
20. जयंती (Jayanti)

जयंती हा 2021चा मराठी-भाषेतील सामाजिक चित्रपट आहे, जो शैलेश नरवडे दिग्दर्शित आहे आणि मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आहे. रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे, मिलिंद शिंदे, वीरा साथीदार हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचा नायक संतोष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असल्याचे दाखवण्यात आले आहे.
21. द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव (The Battle of Bhima Koregaon) :

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा रमेश थेटे निर्मित-दिग्दर्शित आगामी हिंदी चित्रपट आहे. रमेश थेटे फिल्म्सच्या बॅनरखालील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेला चित्रपट आहे.
हा चित्रपट 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या ऐतिहासिक कोरेगावच्या लढाईवर (Battle of Koregaon) आधारित आहे. या चित्रपटात शिदनाक इनामदार या महार योद्ध्याच्या मुख्य भूमिकेत अभिनेते अर्जुन रामपाल असणार आहेत. तसेच दिगंगना सूर्यवंशी, सनी लिओनी, अभिमन्यू सिंग हे कलाकार सुद्धा चित्रपटात असणार आहेत.
हे सुद्धा पहा :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील टीव्ही मालिका
- येथे पहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील सर्व चित्रपटांचे व documentries चे videos
डॉ. आंबेडकर यांच्यावरील लघुपट (Dr Ambedkar short films)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 130व्या जयंती (2021 मध्ये) साजरी होत असताना बाबासाहेबांवरील एका दुर्मिळ लघुपटाची माहिती मिळाली, त्याचे नाव होते महापुरुष डॉ. आंबेडकर (The Great Dr. Ambedkar). हा 1968 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर निर्मित मराठी लघुपट आहे. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे 1968च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे 18 मिनिटांच्या या लघुपटाला संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते. अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी लघुपटाचे निवेदन केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट मराठी
Films based on Dr Ambedkar
जर बाबासाहेबांवर बनवलेल्या चित्रपटांचा विचार केला तर बहुतेक लोकांना एकच नाव स्मरते ते डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” चित्रपटाचे, ज्यामध्ये अभिनेता माम्मूट्टीने मुख्य भूमिका साकारली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट हा मूळ इंग्रजीमध्ये होता, आणि त्याची हिंदी आवृत्ती सुद्धा खूप लोकप्रिय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बघितले जातात.
परंतु ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाच्या आधी आणि नंतरही बाबासाहेबांवर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत, जे बहुधा प्रादेशिक भाषांपुरते मर्यादित होते तर काहींचे हिंदी डबिंगदेखील झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदी चित्रपट – मात्र एक आश्चर्याची गोष्ट ही की आजवर आपल्या बॉलिवूडने बाबासाहेबांवर कोणताही हिंदी चित्रपट बनलेला नाही!
बाबासाहेबांवर बनवलेल्या सर्व चित्रपटांबद्दल मी बर्याचदा गुगलवर search केले, पण मला कधीच योग्य निकाल मिळाला नाही. नेहमी दोन तीन चित्रपटांचीच माहिती दिसायची. आणि जेव्हा मी महात्मा गांधींवर बनलेल्या चित्रपटांविषयी माहिती शोधली तेव्हा मला बर्याच बातम्या आणि पोस्ट सापडल्या ज्यामध्ये त्यांच्यावरील चित्रपटांबद्दल पुरेशी माहिती होती.
बाबासाहेब आंबेडकरांवर बर्याच वेळा माहिती शोधल्यानंतरही योग्य ते सापडत नाही म्हटल्यावर मी स्वतः त्यांच्यावर बनविलेले सर्व चित्रपट शोधण्याचा आणि ते संकलित करण्याचा संकल्प केला, आणि बरेच संशोधन व मेहनत घेऊन मी ही माहिती गोळा केलीच. ही माहिती संक्षिप्त स्वरुपात मी मराठी आणि हिंदी विकिपीडियामध्ये सुद्धा जोडली आहे.
संदर्भ व नोंदी
- डेबू आणि सरणं गच्छामि या चित्रपटांमध्ये बाबासाहेबांची भूमिका कोणत्या अभिनेत्यांनी साकारली होती, याची माहिती मला मिळालेली नाही. त्यामुळे मी या लेखामध्ये त्या दोन अभिनेत्यांची नावे नमूद करू शकलो नाही. जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर जरुर जरूर कळवावी, ही विनंती.
- या यादीमध्ये एखाद्या चित्रपटाची माहिती लिहिली गेली नसेल तर कृपया मला संदर्भासह सूचित करा, तसेच या लेखात चुकून काही त्रुटी झाली असेल तर मला जरूर कळवावे.
- बाबासाहेबांवर निर्मित चित्रपट आणि त्यामधील त्यांच्या भूमिका साकारलेले कलाकार, यांच्या नोंदी मी मराठी आणि हिंदी विकिपीडियांमध्ये सुद्धा केलेल्या आहेत. links खालीप्रमाणे आहेत :
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 अनमोल सुविचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 75 प्रेरणादायी सुविचार
- भगतसिंग विषयी डॉ. आंबेडकरांचे विचार
- हिंदी विकिपीडिया पर भारत के टॉप 20 सबसे लोकप्रिय लोग (2016-2020)
- मराठी विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्ती (2016-2020)
- भारतातील बौद्ध सेलेब्रिटी – Buddhist Celebrities in India
- अन्य लेख वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
उत्कृष्ट संकलन केलं आहे दादा.
धन्यवाद प्रतिक
भीमराव रामजी आंबेडकर यांचे चित्रपट